खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) घरगुती जेली केक - अवेसम झालेला Happy
२) भेल + फरसाण + खाकरा + दही + बटाट्याची भाजी + कांदा + टमाटर +++ मीठ मसाला.. जो मी तसाही सगळीकडे थोडा थोडा टाकतच असतो Happy

1623629941157.jpg
.
1623630045965.jpg

हिंगामध्ये गव्हाचे पीठ असते हे माहीतच नव्हते.. म्हणून माझ्याकडे असलेल्या वनदेवी हिंगाची डबी काढून बघितली..
<
एडीबल गम (उर्फ बाभळीचा डिंक), गव्हाचे पीठ हे हिंगाव्यतिरिक्तचे दोन इन्ग्रेडियंट्स आहेत.

मेधावि, हो ऑर्डरही घेते बायको. कमाल म्हणजे लोकं देतातही Happy
फोटोज खरे तर तसे फार प्रो नसतात, जमेल तसे दोघांपैकी कोणीतरी मिळेल त्या मोबाईलने काढते. ऊलट तीच तिला खंत असते की एवढे छान केक बनवते पण त्याचे तितके चांगले फोटो आपण काढत नाही Happy

@ मोक्षू, जर वरचा केक कुठल्या यूट्यूब लिंकवरून केला असेल तर ती शेअर करतो नक्की...

वरचा केक घरी खायला आणि प्रॅक्टीसला केलेला. पण ईतका भारी झालेला की विकल्यास हातोहात खपेल. मी कधी चुकूनही केक न खाणारा, पण दर अर्ध्या तासाने फ्रीज उघडून उघडून खाल्ला Happy

1623631241278.jpg
.
1623631167898.jpg

ऋन्मेऽऽष केक मस्त असतात तुमच्याकडचे. हे आजच्या फोटोत तवा पुलाव आहे का? आणि दुसरं काय आहे?

अरे वाह खालचा मेनूही जवळपास सेम आला Happy

@ माझे मन,
तो तवा पुलाव नाही. कूकर पुलाव आहे Happy
दुसरे पिठले आहे

आणि हो. धन्यवाद
ईसी बात पे अजून थोडे रैवारचे केक Happy

1623785862199.jpg
.
1623785879974.jpg
.
1623785900250.jpg
.
1623685495516.jpg

अप्रतीम केक्स.

रू, बायकोचं कौतुक पोचवा तिच्यापर्यंत. नेहमी नेहमी तुमचंच होतं नाहीतर Wink

चला मंडळी.........या आमरस पुरी खायला. :)) (कोणाला डिटेल्स हवेत की काय काय आहे तर सांगेन)
WhatsApp Image 2021-06-16 at 11.17.20 AM (1).jpeg

कोणाला डिटेल्स हवेत की काय काय आहे तर सांगेन
>>>
मला पुरी कुठली ते सांगा Happy
ताट बाकी झ्याक दिसतेय

ते वरचे आंब्याचे सांदण म्हणजे नेहमीच्या ईडलीत आमरस जोडतात का?

सामो मेधावि च्रप्स .. धन्यवाद
@ च्रप्स, ऑर्डर घेतो जमेल तसे. पण आम्हा दोघांना बिजनेस माईंड शून्य आहे. वाटल्यास धागा काढायला हवा यावर. मायबोलीवर कोणी केक वा तत्सम फूड प्रॉडक्टस बनवून विकत असेल तर अनुभव सल्ले कामाला येतील.

ते वरचे आंब्याचे सांदण म्हणजे नेहमीच्या ईडलीत आमरस जोडतात का? >>>>
फणसाचे सांदण म्हणून एक रेसिपी टाकली आहे माबोवर MSL यांनी त्याचेच व्हेरिएशन आहे .

Pages