खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे फोटो मस्त!
VB दिसल्या नाहीत बरेच दिवस झाले. त्यांच्या ताटातली भाकरी टेम्पटींग असते.

ऑफ कोर्स. फ्रेश ताजे लोणचे! मी गेली कित्येक वर्षे लोणच्यात तेल घालत नाही. यावेळी १ किलोला १०० मिलि या हिशोबाने तिळाचे तेल घातले आहे, स्पेसिफिकली लाह्यांचा गोपालकाला करताना त्यात लागते म्हणून. हे टोटल २ किलो कैरीचे लोणचे आहे. घरी 'सुड्यावर' कैर्‍या 'फोडून' केलेले. त्यापैकी सुमारे १ किलो वानवळा वाटण्यात जाते. १ किलोचे आम्हा म्हातार्‍यांना वर्षभर पुरते Wink

केया any time वेलकम!
आरारा लोणचं बघून तोंडाला पाणी सुटलं! स्क्रीन मधे हात घालून खावंसं वाटतंय!

आ रा रा..लोणचं खतरनाक दिसतय..पाणी सुटलं..>>>+१

आरारा , यावेळच प्रेझेंटेशन भारी आहे. फुल मार्क्स! . काकूंनी फोटू काढलेला दिसतोय Biggrin

लोणच्याची एकच फोड- एकदम tempting

अंड ऑम्लेट मध्ये हिरवी मिर्ची,कांदा आणि लसुण घातला आहे का?

PSX_20210606_064537.jpg
खेकडा / कांदा भजी.
इकडे काल संध्याकाळी अचानक पाऊस पडला.
बाहेर पाऊस आणि घरात गरमा गरम भजी खायला मजा आली.

वाह मोदकाची कढी सार भातासोबत.. फेव्हरेट आयटम Happy
सोबत चिकन भाकरी कोशिंबीर.. भारी कॉम्बिनेशन आहे.. तापातही चव आली तोंडाला हे बघून Happy

Pages