आज रविवार. रविवारी संध्याकाळी सूर्याची किरणे खिडकीतून आत येतात, खिडकीच्या ग्रीलची सावली भिंतीवर पसरते आणि हळू हळू मोठी होत जाते. पलाश काल रात्री चेन्नईला गेला. ऑफिसचे काम. तो असा नेहमीच जातो. मुंबईला बदली होऊन सात महिने झाले आज. अशी एकटी राहायची सवय झालीय आता. जेवल्यावर पुस्तक हातात घेऊन पलंगावर पडले आणि वाचता वाचता कधी झोपेच्या आधीन झाले कळलंच नाही. भिंतीवर पडलेली सूर्याची किरणे परावर्तीत होउन जेंव्हा डोळ्यात खुपायला लागली तेंव्हा जाग आली.
चला, चहाची वेळ झाली म्हणून मी उठले. गॅलरीत चहाचा कप घेउन बसले आणि माझी नजर न्यूज पेपर मधल्या कोपऱ्यात छापलेल्या जाहिरातीवर पडली. नाटकाची जाहिरात वाटत होती. मी पेपर उचलून वाचलं, "मैं तुम्हें फिर मिलूंगी!". पृथ्वी थिएटर मध्ये संध्याकाळी सात वाजता. अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवीच्या जीवनावर नाटक. ओहो.. अमृता माझी फेवरीट. कुणाला उद्देशून म्हणाला होता साहीर, " वो अफसाना जिसे अंजाम तक, लाना ना हो मुमकिन, उसे इक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा", अमृता, इमरोज़ की सुधा मल्होत्रा? जायलाच हवं. थोडा वेळ कुंड्यात लावलेल्या गुलाबाकडे बघत राहिले. चहाचे घुटके घेत त्या जाहिरातीकडे पहात राहिले आणि मग स्वतःशीच हसले.
सगळं आवरून शॉवरच्या थंड पाण्याखाली उभं राहिल्यावर आळस कुठे दडी मारून बसला कळलंच नाही. वॉर्डरोब उघडला आणि कुठली साडी नेसावी याचा विचार करू लागले. सलवार कमीज घालावी का? छे...! नको तिथे चरबी साठलीय अंगावर. शिवाय पंचेचाळीस वर्षाच्या महिलेला साडीच बरी दिसणार. साड्यांची थप्पी ओढली आणि बेडवर ठेवली. सगळ्यात तळाला राणी कलरची बांधणी दिसली आणि मी ती बाहेर ओढली. घडी उलगडली तसा कापराचा मंद सुगंध हवेत पसरला, आणि त्याच बरोबर प्लवाची (माझी कन्या) वाक्यं आठवली, " " ईईई मां, तुमि एई सारीते महिसेरा मातो देखा छे" ह्या साडीत म्हशी सारखी दिसतेस. असू दे मी म्हशी सारखी. म्हशीचं दूध मात्र गोड वाटतं ह्यांना.आणि पलाश? " ही साडी नेसून माझ्या बरोबर पार्टीत जायचं नाही." " आई, किती आऊट ऑफ डेट साडी आहे ही.. फाडून टाक. कार तरी पुसायला उपयोगी पडेल."
" नाही आई, ऑसम दिसतेस तू ह्या साडीत. अशाच साड्या घेत जा." विप्लव, माझा मुलगा. प्लवा म्हणेल त्याच्या विरुद्धच बोलणार. सिब्लिंग रेवल्री. दुसरं काय?
लग्न झाल्यावर किती हौसेनी ही साडी घेतली होती आणि घडी मोडलीच नव्हती. आज कुणीच नाही. कन्या आणि पुत्र हॉस्टेलला आणि पलाश चेन्नईत. नेसून टाकूया. मी साडी नेसले, हॅण्डबॅगेत अमृता प्रीतमचं पुस्तक टाकलं आणि स्टेशनवर जाऊन ट्रेन पकडली. विलेपार्लेला उतरून टॅक्सी घेतली आणि जुहुला पृथ्वी थिएटरला पोचले एकदा. बाहेर नाटकाचे मोठ मोठे बॅनर्स लावले होते.वेगात पावले टाकत मी तिकिट खिडकीवर गेले आणि पर्स उघडून आत पैसै सरकवत " एक मैं तुम्हें फिर मिलूंगी!" म्हणाले. माझे पैसे हातातच राहीले. आतला माणूस हाऊसफुलच्या बोर्डकडे बोट दाखवत होता.
ओह!! एकदम मूड गेला. इतकी घाई करून काही उपयोग झाला नाही. पहिल्यांदा आवडीची साडी नेसून बाहेर पडले, अगदी दिमाखात आणि हा असा विरस झाला. नाटकाच्या मोठया बोर्डकडे एकदा पाहिलं आणि एकदम थकवा आल्यासारखं वाटलं. मी पायऱ्या उतरून कॅफेकडे वळले. आयरिश कॉफी घेउन लांब एका झाडाखाली टेबल होतं तिथे जाऊन बसले आणि पुस्तक काढलं. थोडया वेळाने सूर्य कलला आणि संधिप्रकाश झाडांवर पसरला. एक विशितला मुलगा माझ्यासमोर येऊन बसला. माझ्याकडे बघून हसत म्हणाला, " एक सेल्फी घेऊ का?" असं म्हणत सेल्फी घेतली पण. या मोठया शहरातली मुलं म्हणजे बेशरम. मला अगदी ऑकवर्ड वाटत होतं.
" थिएटर करता तुम्ही?" त्यानं विचारलं.
"नो, नो."
"मग?"
"अरे साधी गृहिणी आहे मी. हाऊस वाइफ."
"मैं तुम्हें फिर मिलूंगी बघायला आला होतात ना?"
"अरे, तुला कसं कळलं?"
"तुमच्या हातात अमृता प्रीतमचं पुस्तक आहे त्यावरून."
"हो.. पण अफसोस, तिकीट मिळालं नाही एवढया लांबून येऊन."
"ओह.."
नाटकाची पहिली घंटा वाजली. लोकं आत जाऊ लागली. मी पण परत जायचा विचार केला आणि उठले. मी पुढे पाऊल टाकलं तसं तो म्हणाला,
"एक्स्क्युज मी मॅडम", मी त्याच्याकडे बघितलं तर त्याने नाटकाचं तिकीट माझ्यासमोर धरलं. मी चमकले.
"नको नको, मी येईन परत पुढच्या आठवड्यात."
"घ्या हो मॅडम, मी इथेच राहतो बाजूला. मी केंव्हाही बघू शकेन. तुम्हाला कदाचित् परत येणं जमणार नाही." मी त्याच्याकडे पहात राहीले.
"घेते, पण मोफत मध्ये नाही हां,"
" नकोत पैसै."
" अरे, असं कसं, मला पण तिकीट नको मग."
" बर, द्या."
मी पर्स उघडून त्याला पैसै दिले. तिकीट घेउन थँकयू म्हणत मी जाऊ लागले तेवढयात माझ्या मनात विचार तरळला आणि मी त्याला हाक मारली.
"खरं सांग, तू मला तिकीट का दिलंस? खरंच तुला नाटक बघायचं नाहीय?"
तो हसला आणि म्हणाला, " जस्ट बिकॉज ऑफ योर सारी. मला माहित नाही ह्याला काय म्हणतात पण माझी आई नेहमी असली साडी नेसायची. सहा महिन्यापूर्वी ती गेली. तुम्ही तिची आठवण करून दिलीत म्हणून तुम्हाला तिकीट दिलं." असं म्हणत तो वळला. त्याच्या डोळ्यात माझ्या साडीचं कौतुक बघत होते की तरळलेलं पाणी ते कळेपर्यन्त तो दिसेनासा झाला आणि त्याच वेळी नाटकाची दुसरी घंटा वाजली.
......
छान ! आवडलं हे.
छान ! आवडलं हे.
खूप छान कथा...
खूप छान कथा...
भावस्पर्शी... आवडली...!
आवडली.
आवडली.
छान आहे
छान आहे
छान! मनाला स्पर्शून गेली.
छान! मनाला स्पर्शून गेली.
छान आहे कथा. आवडली.
छान आहे कथा. आवडली.
काय सुंदर कथा आहे. व्हेरी मच
काय सुंदर कथा आहे. व्हेरी मच फील गुड!!! हे असं वाचलं की दिवसच मस्त जातो.
छान आहे हे
छान आहे हे
मस्त आहे
मस्त आहे
मस्त कथा. अजून वाचायला आवडेल
मस्त कथा. अजून वाचायला आवडेल तुमचं लिखाण.
छानच! आवडली कथा!
छानच! आवडली कथा!
छान कथा!
छान कथा!
मस्तयं कथा. आवडली.
मस्तयं कथा. आवडली.
अप्रतिम लिहिली आहे. पण कथा
अप्रतिम लिहिली आहे. पण कथा वाटत नाहीये. गोष्ट प्रत्यक्षात घडल्यासारखी वाटली. असो.
अजून वाचायला आवडेल आपलं लिखाण.
किती छान लिहिलय ! मन:पटलावर
किती छान लिहिलय ! मन:पटलावर उमटलेल्या भावना शब्दानी विस्कटतील अशी भीती वाटली... म्हणून ....
मस्तच लिहिलंय...आवडलं..!
मस्तच लिहिलंय...आवडलं..!
छान लिहीले आहे!
छान लिहीले आहे!
एक मिनीट मला प्रश्न पडला की सूर्याची किरणे फक्त रविवारीच संध्याकाळी कशी येतील आत? पण ते रविवारी घरी असल्याने तशी ती आलेली जाणवतात अशा अर्थाने असावे
आवडली गोष्ट
आवडली गोष्ट
मस्तच कथा !
मस्तच कथा !
पण ते रविवारी घरी असल्याने तशी ती आलेली जाणवतात अशा अर्थाने असावे
>>>> पण ती हाऊसवाईफ आहे ना, मोस्टली घरीच असेल
आशयघन आहे कथेमध्ये!
आशयघन आहे कथेमध्ये!
हसता-हसता डोळ्यांच्या कडा ओलावून गेली!
पुलेशु!
छान लिहिली आहे. आवडली कथा.
छान लिहिली आहे. आवडली कथा. अजून वाचायला आवडेल आपले
सुरेख जमलीय कथा.
सुरेख जमलीय कथा.