........नात्यांमध्ये पारदर्शकता असावी कारण पारदर्शक नातीच प्रदीर्घ काळ जिवंत राहतात. एकदा का त्या नात्यांमध्ये अस्पष्टता आली की ती नाती निर्जीव आणि निस्तेज होत जातात.
'भांडण' हा शब्द पुर्वानुकालापासून आपल्या कानावर ऐकायला येतो. आपल्या घरी असणारे 'आजी-आजोबा', 'आई-बाबा', 'काका-काकू' आपल्याला भांडताना दिसतात. चार चौघांकडून सुद्धा हेच ऐकायला मिळतं जिथे चार भांडी एकत्र आली की आवाज होणारच! अशी भांडणाऱ्याची समजूत घालतात. समाजातील जनमानसाकडून आपल्या मनःपटलावर हे बिंबवले जाते की 'नवरा-बायको' एकत्र असतील तर त्यांच्यामध्ये 'तंटा' होणारच ! हा मनोग्रह धरून आपण वाढतो. त्यामुळे भांडणाची प्रवृत्ती आपल्याला समाजातूनच देणगी स्वरुपात मिळाली आहे.
......नवरा बायकोचे नाते कसे असावे? हे कित्येकांना कळलेलेच नाही. आजही कुठे-कुठे आपला पौरूषी रोब झाडणारे बिनचुके दिसतात पण त्यांचा संसार सुरू होण्याआधीच संपतो पण फार पूर्वी आणि अगदी आमच्या पिढीच्या तरुणपणातही बायको ही 'क्षणाची पत्नी' आणि 'अनंत काळाची मोलकरीण' हा समज दृढ होता. "नवरा-बायको ही संसार रथाची दोन चाके आहेत." ही कल्पना आता कालबाह्य होत चालली आहे तर मुळ मुद्दा बाजुलाच राहला तर 'भांडण' का होतात? तर त्यासाठी तुम्हाला एक सुंदर दाखला देतो.
.....दोन मित्र जॉगिंगला सकाळी भेटतात. रमेशची तक्रार असते की त्याचे त्याच्या बायको सोबत रोज भांडणं होतात. सुरेशला तो यावर काही सोल्युशन आहे का म्हणून विचारतो. 'रमेश' या विषयावर आपण घरी जाऊन बोलू. असे म्हणून सुरेश रमेशला आपल्या घरी घेऊन येतो. सकाळचा स्वच्छ सुंदर प्रकाश खिडकीतून पाझरत असतो तरी पण श्रीमान श्रीमतीला दिवसा लाईट लावायला सांगतात. पत्नी काही न बोलता दिवा लावते त्यानंतर पत्नी दोघांसाठी चहा घेऊन येते. रमेश चहाचा कप तोंडाला लावतो तर चहा त्याला कडवट लागतो. चहा बाजूला ठेवून देतो पण सुरेश चहा दोन घोटात संपवतो आणि गप्पा मारायला सुरुवात करतो. रमेशला आश्चर्य वाटते चहामध्ये साखर नसून मीठ असतानासुद्धा हा आपल्या बायकोला काहीही बोलला नाही. बाहेर पडताना 'रमेश' त्याला याचं कारण विचारतो तर 'सुरेश' बोलतो, "पहा मी सकाळी आल्यानंतर गरज नसताना सुद्धा लाईट लावायला सांगितले तर बायकोने काही न बोलता आत गपचूप दिवा लावला आणि मी पण चहात साखरेऐवजी मीठ असताना सुद्धा तिला काही बोललो नाही अर्थातच हे तिने काही जाणून केले नाही पण मला न बोलताच कळाले." यासारख्या लहान-सहान बाबींना आपण समजून घेतलं तर दोघांमध्ये वाद-विवाद होत नाही. या सुरेशच्या संभाषणाने रमेशला सुखी आणि आनंदी राहण्याचा मंत्र मिळाला. मनावरचे दडपण हलके झाल्यासारखे वाटले आणि तो हसत मुखाने घरी परतला.
......आयुष्यात आपण जसे इतरांना आदर देतो. त्यांचे आभार व्यक्त करतो. कोणी आपल्यासाठी काही केलं तर लगेच 'धन्यवाद'! 'थँक यू!' म्हणतो तसं लहान सहान गोष्टींसाठी आपल्या पत्नीचे आभार व्यक्त करा. तिला जवळ घ्या. प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवा आणि मग बघा आनंदाचे मोती कसे तिच्या गालावर तरळतात.
.....शब्द हे तीष्ण अग्निबाणाप्रमाणे असतात जेव्हा भात्यातून या अग्निबाणांचा वर्षाव होतो तेव्हा मौनरूपी जलबिंदूचा वर्षाव करून त्याची दाहकता कमी करायला हवी.
"जेव्हा राग आला तेव्हा थोडं थांबलं आणि चुकलं तेव्हा थोडं नमलं"तर हा जीवन प्रवास कसा आनंदात निघून गेला हे कळणार सुद्धा नाही. "पतीचे प्रेम हे पत्नीच्या हृदयातील अमृत तर पत्नीचे प्रेम हे पतीकरीता संजीवनीच!"
आयुष्यात एकमेव जिवलग मैत्रीण ही बायकोच होऊ शकते आणि जिवलग मित्र हा नवराच! हे नातं सुंदर आणि सुदृढ असलं की जीवनातले कुठलेही चढ-उतार आपण सहज पार करु शकतो.
(आपले या विषयावर काही मनोगत असतील तर कृपया मायबोलीकरांनी व्यक्त करावे ही नम्र विनंती!)
वीरू तुम्ही १५० ..
वीरू तुम्ही १५० ..
धाग्यावर किती प्रतिसाद झाले
धाग्यावर किती प्रतिसाद झाले हे दर्शवणे बंद करावे अशी मी वेमांना विंनती करतो.
ज्यांना किती प्रतिसाद झाले याची माहिती हवीच असेल तर त्यांनी धाग्यावर येऊन प्रतिसाद संख्या स्वतः मोजावी.
वीरू तुम्ही १५० ..
वीरू तुम्ही १५० ..
Submitted by श्रवु् >> अरे हो.
या वेगाने ३०० नक्की त्यात चंद्रमाजींचे १७५.
धाग्यावर किती प्रतिसाद झाले
धाग्यावर किती प्रतिसाद झाले हे दर्शवणे बंद करावे अशी मी वेमांना विंनती करतो.
ज्यांना किती प्रतिसाद झाले याची माहिती हवीच असेल तर त्यांनी धाग्यावर येऊन प्रतिसाद संख्या स्वतः मोजावी.>>>>>+१११
अरे इथे २०० चे टारगेट नाहीये
अरे इथे २०० चे टारगेट नाहीये पण
आपण माबोकर आहोत, ईंजिनीअर
आपण माबोकर आहोत, ईंजिनीअर नाही.... दरवेळी कोणी येऊन टारगेट द्यायची गरज कश्याला.. स्वतःहून इनिशिएटीव्ह नाही घेऊ शकत का??
आणि धाग्यावर किती प्रतिसाद झाले हे दर्शवणे बिलकुल बंद करू नये.. विचार करा तुम्ही आयपीलची मॅच बघत आहात आणि शेवटपर्यंत कोणी तुम्हाला स्कोअरच नाही दाखवला तर मॅच बघायची मजा नाहीशी नाही का होणार?? हायलाईटस बघा आणि त्यात मोजा किंवा उद्या पेपरात वाचा असे सांगितले तर चालेल का??
इथे काय कोणाच्या धाग्यावर
इथे काय कोणाच्या धाग्यावर किती प्रतिसाद पाडायचे याची स्पर्धा आहे का? नाही ना, मग एकूण किती याने फरक पडायला नको. प्रतिसाद वाढवायचा आटापिटा तरी बंद होईल.
प्रतिसाद किती त्यापेक्षा गप्पा किंवा चर्चा कशी चालू आहे त्यात मजा असावी.
समर्थांनी काही लोकांची लक्षणे
समर्थांनी काही लोकांची लक्षणे सांगितली आहेत त्यांच्या पंक्तीत बसवल्यावर देखील कुणी आभार मानत असेल तर निर्वाणाला पोहोचलेला मनुष्य पाहतानाचा आनंद अध्यात्मिकच असल्याची खात्री पटते.
अरे वा इतके प्रतिसाद
अरे वा इतके प्रतिसाद रात्रीतून झोपेत नंबर बघितला होता २१ !!
मंजुताई : आंध्रा साइडला चंद्राम्मा चंद्रम्मा हे खूप कॉमन बाईचे नाव आहे.
मी हॅपी प्राइड मंथ म्हट्ले ते आपण इन्गोर केलेत का ब्रे.
बाई बुवा काही फरक नाही लेखन सकस पाहिजे. नाहीतर नो -व्हॅलु -अॅडिशन बहु - प्रसव गणगटे आहेतच.
चंद्रमा म्हणजे चंद्रा
चंद्रमा म्हणजे चंद्रा नावाच्या बाईची आई
चांदोबा म्हणजे चंदा नावाच्या बाईचा बाबा.
चंद्रमा म्हणजे चंद्रा
चंद्रमा म्हणजे चंद्रा नावाच्या बाईची आई
चांदोबा म्हणजे चंदा नावाच्या बाईचा बाबा.>> म्हणजे तिचे नाव चंदा चांदोबा चंद्रात्रे असे असावे.
सही जबाब. अब अगला प्रश्न आपके
सही जबाब. अब अगला प्रश्न आपके कंप्युटर स्क्रीन पर..
(No subject)
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/75006
चंद्रमाजी या कवितेत व्यवहारी प्रियकर उभा केला आहे आपण. या कवितेने खरेतर खळबळ माजायला हवी होती.
प्रेमाचा गुलकंद नावाची कविता होती १०वी की १२वी ला. त्या कवितेची आठवण करुन देणारी ही कविता. माबोकरांनी का बरे दुर्लक्षित केली असावी?
चहात मीठ घातलाय म्हणून इतकं
चहात मीठ घातलाय म्हणून इतकं काय ते.
याक टी किंवा पहाडी लोकं, नेपाळी लोकं चहात मीठ घालतातच.
नवर्याला सांगायचं लगेच, आज तुला नेपाळी/लेह्/लडाख पद्धतीने चहा केलाय...
पारदर्शक म्हणजे किती? आरशाइतकं की पार्याइतकं...
एक काकू सांगत होत्या, की त्यांचे नातं इतकं पारदर्शक की, काका बसल्या ठिकाणीच पाद**. काकीं काहीच हुं की चुं करत नाहीत....
व्यत्यय
व्यत्यय
आभारी आहे विरू आपला! आपण माझी
आभारी आहे विरू आपला! आपण माझी मागील कविता प्रेमाची फळं' वाचली! हो थोर कवी आचार्य अत्रे यांची बारावीतील कविता 'प्रेमाचा गुलकंदं'!
खरंतर गद्य आणि पद्य यामध्ये पद्य कळायला थोडं कठीण असतं त्यामुळे वाचक डोक्याला शाॅट नको
म्हणून पद्य पसंत करतात!पण काही तुमच्यासारखी रसिक मंडळी असतात ती आवर्जून वाचतात!
धन्यवाद आपल्या अभिप्रायासाठी!
झंपी आपला प्रतिसाद फार रंजक
झंपी आपला प्रतिसाद फार रंजक आहे! धन्यवाद!
'अमा','पारंबीचा आत्मा'!
'अमा','पारंबीचा आत्मा'! 'चंद्रमा' नावामागचं काही खास कारण आहे!
Actually बाबांचं नाव 'चंद्रमणी',आणि आईचं नाव 'माया'
या दोघांच्या नावाची सांगड घालून 'चंद्रमा' बनला!
बस आई-बाबांना आदर म्हणून नाव धारण केलं!
पण छान नावामधूनच स्त्रिलिंगी की पुल्लिंगी असा गोंधळ निर्माण झाला याहून मिश्किल काय!
छान आपले प्रतिसाद आवर्जून वाचतो मी! धन्यवाद!
तोच चंद्रमा नभात
तोच चंद्रमा नभात
आधा है चन्द्रमा
यावरून चंद्रमा पुल्लिंगी आहे हे कळून येतं.
पण जगात आकारांत नावे स्त्रियांची ठेवण्याची रीत आहे त्यामुळे काहींना तसे वाटले असेल.
प्रिय 'व्यतय' खट्याळ मीम आहे
प्रिय 'व्यतय' खट्याळ मीम आहे आपलं!
नाही नाही स्पर्धा नाही कुणाशी!
हे तर मायबोलीकरांच प्रेम आहे ऋन्मेशजींवर!
आपलं तर केवळ पदार्पण आहे.पण छान वाटतं काहीतरी विनोद आणि गप्पा-टप्पा निर्माण होतात या चर्चेतून!
मानवजी आपण चंद्रमाचा अर्थ
मानवजी आपण चंद्रमाचा अर्थ समजून घेतल्याबद्दल धन्यवाद!
आणि हो विशेष आपले नावपण छान आहे!
'मानव पृथ्वीकर' मानव जो पृथ्वीलाच आपले घर मानतो.
छान!
Pages