"पती-पत्नीच्या नात्यातील पारदर्शकता!"

Submitted by चंद्रमा on 9 June, 2021 - 04:33

........नात्यांमध्ये पारदर्शकता असावी कारण पारदर्शक नातीच प्रदीर्घ काळ जिवंत राहतात. एकदा का त्या नात्यांमध्ये अस्पष्टता आली की ती नाती निर्जीव आणि निस्तेज होत जातात.
'भांडण' हा शब्द पुर्वानुकालापासून आपल्या कानावर ऐकायला येतो. आपल्या घरी असणारे 'आजी-आजोबा', 'आई-बाबा', 'काका-काकू' आपल्याला भांडताना दिसतात. चार चौघांकडून सुद्धा हेच ऐकायला मिळतं जिथे चार भांडी एकत्र आली की आवाज होणारच! अशी भांडणाऱ्याची समजूत घालतात. समाजातील जनमानसाकडून आपल्या मनःपटलावर हे बिंबवले जाते की 'नवरा-बायको' एकत्र असतील तर त्यांच्यामध्ये 'तंटा' होणारच ! हा मनोग्रह धरून आपण वाढतो. त्यामुळे भांडणाची प्रवृत्ती आपल्याला समाजातूनच देणगी स्वरुपात मिळाली आहे.
......नवरा बायकोचे नाते कसे असावे? हे कित्येकांना कळलेलेच नाही. आजही कुठे-कुठे आपला पौरूषी रोब झाडणारे बिनचुके दिसतात पण त्यांचा संसार सुरू होण्याआधीच संपतो पण फार पूर्वी आणि अगदी आमच्या पिढीच्या तरुणपणातही बायको ही 'क्षणाची पत्नी' आणि 'अनंत काळाची मोलकरीण' हा समज दृढ होता. "नवरा-बायको ही संसार रथाची दोन चाके आहेत." ही कल्पना आता कालबाह्य होत चालली आहे तर मुळ मुद्दा बाजुलाच राहला तर 'भांडण' का होतात? तर त्यासाठी तुम्हाला एक सुंदर दाखला देतो.

.....दोन मित्र जॉगिंगला सकाळी भेटतात. रमेशची तक्रार असते की त्याचे त्याच्या बायको सोबत रोज भांडणं होतात. सुरेशला तो यावर काही सोल्युशन आहे का म्हणून विचारतो. 'रमेश' या विषयावर आपण घरी जाऊन बोलू. असे म्हणून सुरेश रमेशला आपल्या घरी घेऊन येतो. सकाळचा स्वच्छ सुंदर प्रकाश खिडकीतून पाझरत असतो तरी पण श्रीमान श्रीमतीला दिवसा लाईट लावायला सांगतात. पत्नी काही न बोलता दिवा लावते त्यानंतर पत्नी दोघांसाठी चहा घेऊन येते. रमेश चहाचा कप तोंडाला लावतो तर चहा त्याला कडवट लागतो. चहा बाजूला ठेवून देतो पण सुरेश चहा दोन घोटात संपवतो आणि गप्पा मारायला सुरुवात करतो. रमेशला आश्चर्य वाटते चहामध्ये साखर नसून मीठ असतानासुद्धा हा आपल्या बायकोला काहीही बोलला नाही. बाहेर पडताना 'रमेश' त्याला याचं कारण विचारतो तर 'सुरेश' बोलतो, "पहा मी सकाळी आल्यानंतर गरज नसताना सुद्धा लाईट लावायला सांगितले तर बायकोने काही न बोलता आत गपचूप दिवा लावला आणि मी पण चहात साखरेऐवजी मीठ असताना सुद्धा तिला काही बोललो नाही अर्थातच हे तिने काही जाणून केले नाही पण मला न बोलताच कळाले." यासारख्या लहान-सहान बाबींना आपण समजून घेतलं तर दोघांमध्ये वाद-विवाद होत नाही. या सुरेशच्या संभाषणाने रमेशला सुखी आणि आनंदी राहण्याचा मंत्र मिळाला. मनावरचे दडपण हलके झाल्यासारखे वाटले आणि तो हसत मुखाने घरी परतला.

......आयुष्यात आपण जसे इतरांना आदर देतो. त्यांचे आभार व्यक्त करतो. कोणी आपल्यासाठी काही केलं तर लगेच 'धन्यवाद'! 'थँक यू!' म्हणतो तसं लहान सहान गोष्टींसाठी आपल्या पत्नीचे आभार व्यक्त करा. तिला जवळ घ्या. प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवा आणि मग बघा आनंदाचे मोती कसे तिच्या गालावर तरळतात.
.....शब्द हे तीष्ण अग्निबाणाप्रमाणे असतात जेव्हा भात्यातून या अग्निबाणांचा वर्षाव होतो तेव्हा मौनरूपी जलबिंदूचा वर्षाव करून त्याची दाहकता कमी करायला हवी.
"जेव्हा राग आला तेव्हा थोडं थांबलं आणि चुकलं तेव्हा थोडं नमलं"तर हा जीवन प्रवास कसा आनंदात निघून गेला हे कळणार सुद्धा नाही. "पतीचे प्रेम हे पत्नीच्या हृदयातील अमृत तर पत्नीचे प्रेम हे पतीकरीता संजीवनीच!"
आयुष्यात एकमेव जिवलग मैत्रीण ही बायकोच होऊ शकते आणि जिवलग मित्र हा नवराच! हे नातं सुंदर आणि सुदृढ असलं की जीवनातले कुठलेही चढ-उतार आपण सहज पार करु शकतो.

(आपले या विषयावर काही मनोगत असतील तर कृपया मायबोलीकरांनी व्यक्त करावे ही नम्र विनंती!)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.या दोघांचे प्रेम आणि पाहुण्याला खारट चहा. >>> खारट नाही कडवट. Happy .
तेच तर . मित्राला का शिक्षा. एवढ नवरा बायकोत सामंजस्य आहे तर सांगितले का नाही चहा कडू झालाय म्हणून . आणि मित्राला ज्ञान देण्याएवजी एक कप चांगला चहा द्यायचा परत. बायकोशी भांडण करायच नसेल तर राहूदे , मित्राची माफी पण नाही मागितली.

शिवाय तो चहा दोन घोटात सम्पवला म्हणजे नुसता खारट नाही थंडगार पण होता
कदाचित सुरेशच्या कपात साधे पाणी आणि रमेशच्या कपात खारट चहा असेल. तसेही रमेश मित्र म्हणून आला नव्हता. सुरेश कडून आनंदी राहण्याचा मंत्र घेण्यासाठी आला होता Light 1 Happy

शिवाय तो चहा दोन घोटात सम्पवला म्हणजे नुसता खारट नाही थंडगार पण होता
>>

थंडगारच असणे गरजेचे नाही. गुळण्या मारायच्या कोमट पाण्यासारखा चहाही दोन घोटात संपवता येतो.
आमच्या ऑफिसमध्ये असेच होते. चहावाला ट्रे भरेभरेपर्यंत सुरुवातीचे कप थंड होत जातात. मग एकेक कप वाटत तो आपल्या जागेवर येईपर्यंत कमीजास्त प्रमाणात आणखी थंड होतात. मी याच कारणासाठी जागेवर चहावाल्याची वाट न बघता सरळा कँटीनमध्ये जाऊन थेट त्याच्या टाकीतलाच पितो.
एकदा असेच सेक्शन मॅनेजर आमच्याईथे बोलत उभे होते. चहावाला आला चहा वाटत. मी घेतला नाही. तर त्यांनी मला कारण विचारले. मी म्हटले, मला गरम आणि कडकच लागतो. त्यांनी असा लूक दिला की काय याची नाटके. मग मी त्या चहावाल्याच्या ट्रे मधून एक कप ऊचलत त्यांच्यासमोर दोन घोटात कप रिकामा केला आणि म्हटले हा असा दोन घोटात संपतो. म्हणून यात मजा नाही Happy

छान चर्चा चालूय,
अवांतराबद्दल क्षमस्व !

लेख नवरा-बायको नात्या बद्दल आहे, तर लेखात रमेश आणि सुरेश ह्यांची नावे आली ती देखील प्रत्येक वेळी अवतरण चिन्हांमध्ये आणि त्यांच्या बायकांच्या नावाचा साधा ऊल्लेखही नाही? बायकांची नावे न देता त्यांना फक्त श्रीमती असे सर्वनाम वापरून लेखात कमी महत्व देण्याचे कारण हा लेख पुरूषाने लिहिला आहे हे असावे काय?

रमेश आणि सुरेश ही नावं पाहता शेवटी रमेश ची बायको आणि रमेश एकमेकांना माफी मागून मिठी मारून रमेश, सुरेश, मिसेस रमेश आणि मिसेस सुरेश मोठे मोठे फाईव्ह स्टार चॉकोलेट बार खाताना दाखवायला हवे होते Happy

मलाही फाईव स्टारच आठवले. रमेश-सुरेश मित्र नसून भाऊ वाटतात. Happy
शिवाय लव्ह- हेट ड्रामा चाललेल्यांच्या घरी अजिबात जाऊ नये, साखरेचा चहा का असेना.. घरचा ड्रामा/प्रेम घरातच राहू द्यावे, याने समाज प्रबोधन वगैरे करायची गरज नाहीच मुळी.
दुसऱ्यांंच्या नात्याची आपल्या नात्याशी तुलना करू नये , आपल्यावरून त्यांना व त्यांंच्यावरून आपल्या नात्याला जोखू नये. पारदर्शकता वेगळी असते/वेगळी असावी. बाहेरच्यांसाठी नवरा-बायकोने पारदर्शक होऊ नये. Happy

अवांतराबद्दल क्षमस्व !>> ते ठीक आहे पण किती त्रास होत असेल ना जिथे तिथे मी कसा असा तसा आहे सांगायचा? वरतून काही नतद्रश्ट अत्यित्यूड वगैरे म्हणून पण हिणवत असणार ते वेगळं.

>>>शिवाय तो चहा दोन घोटात सम्पवला म्हणजे नुसता खारट नाही थंडगार पण होता
कदाचित सुरेशच्या कपात साधे पाणी आणि रमेशच्या कपात खारट चहा असेल. तसेही रमेश मित्र म्हणून आला नव्हता. सुरेश कडून आनंदी राहण्याचा मंत्र घेण्यासाठी आला होता
<<<<
शाब्बास शेरलॉक.. म्हणजे दिवसा उजेडी दिवा लाव हा कोड्वर्ड असणार मीठ युक्त चहा आणि पाण्या करता Lol

पतीच्या अंगात चपळाई नसताना त्याने पत्नीच्या हाती ब्रह्मोस क्षेपणास्त्र पडू नये याची दक्षता घेणे हीच नात्यातली पारदर्शकता होय.

दिवसा उजेडी दिवा लाव हा कोड्वर्ड असणार मीठ युक्त चहा आणि पाण्या करता>>> असे असेल तर त्या नवरा-बायको मधे फारच बट्टी असणार. फक्त एकमेकांनाच समजतील असे सांकेतीक शब्द असणे चांगले असते.

थंडगारच असणे गरजेचे नाही. गुळण्या मारायच्या कोमट पाण्यासारखा चहाही दोन घोटात संपवता येतो.
आमच्या ऑफिसमध्ये असेच होते. चहावाला ट्रे भरेभरेपर्यंत सुरुवातीचे कप थंड होत जातात. >>> इथे तर फक्त दोघांसाठी चहा केला आहे. तरीही थंडच दिला. मुद्दाम!

लेख चांगला आहे. पण ते उदाहरण चुकीचे वाटले. ते एकमेकांना फक्त सहन करतात असे दिसते.
काय पटले, काय नाही, काय आवडले, काय सुचवावेसे वाटले असे सगळे काही समोरच्याला बिनदिक्कत सांगता यायला हवे, हीच पारदर्शकता.

घरात हदीकुंकू असतं..देवीपुढे नैवेद्यासाठी लाडू, कैरीची डाळ, पन्हे, फळं वगैरे बरच काही ठेवलेलं असतं..स्वयंपाक घरात सगळा extra stock ठेवलेला असतो..
बायको तीच्या मात्रिणींसोबत गप्पा मारण्यात, हसण्या खिदळण्यात गुंग असते..
नवरा आतल्या खोलीत एकटा बसून बाहेरचा अंदाज घेत असतो..योग्य क्षण येताच संधी साधून स्वयंपाक घराकडे सटकतो आणि डाव साधतो.. एक लाडू ढापून मागे वळतो आणि तेव्हा कळतं की बायको आपल्यावर लक्ष ठेऊन आहे..बायको नजरेनेच खुणावते “ह्या सगळ्यांना पुरू द्यात, त्या गेल्या की हवे तेवढे गिळा”.. नवरा गुपचूप लाडू परत ठेवतो..चमचाभर कैरीची डाळ खाऊन, ल ला ला हु हु हु गुणगूणत आत खोलीत जातो.
हि आहे खरी पारदर्शकता

:आत्मा मोड ऑफः
पती पत्नीच कशाला पाहीजेत ? कुठे मित्रांसोबत जरी गेलो तरी अ‍ॅडजस्टमेण्ट करावीच लागते. सर्वांचे स्वभाव सारखेच कसे असतील ? आणि स्वभाव सारखेच असणे आणि पूरक असणे यात फरक आहे. एकमेकांबरोबर राहताना पर्फेक्ट अ‍ॅडजस्टमेण्ट हे फारच झाले. भांडणात सुद्धा मजा असते. बायको नव-याच्या आणि नवरा बायकोच्या काही खोड्या समजून चुकतो. न बोलता ही एकमेकांना काय हवे आहे हे समजू लागते हे फक्त सहवासानेच समजते. त्यात गंमत असते. एकमेकांबरोबर राहता चुकत चुकत शिकत जाणे हाच संसार असतो. जे पहिल्या दिवसापासून परफेक्ट असतात त्यांनी खुशाल क्लासेस उघडावेत.बाकीच्यांनी भांडणांचा बाऊ नाही केला तरी चालेल.
:आत्मा मोड पुन्हा ऑनः

अस्मिता आणि पा आ प्रतिसाद आवडला.

लव-हेट प्रदर्शनवाले नवरा-बायको एकेकाला घरी नेऊन आमच्या दोघांच्या तक्रारी ऐक आणि कोण बरोबर फैसला करा असे शिवधनुष्य पाहुण्याच्या गळ्यात मारतात.

नंतर दोघे मिळुन पाहुण्यालाच नावे ठेवतात. म्हणतात ना नवरा बायकोच्या भांडणात पडू नये शहाण्या माणसाने.

@मॅक्स Lol हो, कुणालातरी सोबत घेऊन आलो नी लाईट लावायला सांगितले कि समजून जायचे, असा प्रोटोकॉल असेल lol

जोक्स अपार्ट, वरचे काही प्रतिसाद पण खूप पटले. धाग्यातली उदाहरणे कृत्रिम वाटतात. माझे वैम सविस्तर लिहीतो जरा वेळाने

मी-अनु,स्वस्ति खरच आपले प्रतिसाद खूप छान आहेत!
प्रत्यक्षात मी आपल्या मतांची पिंक दिली आणि आपल्याकडूनही अशा पिंकाची अपेक्षा केली!
आभारी आहे त्यासाठी!

मी-अश्विनी काय निरीक्षण आहे तुमचं! स्तुत्य आहे ते!श्रीमतींच्या नावाचा उल्लेख याकरीता नाही केला की फक्त भांडणाचं मूळ काय आहे हे त्या दोन मित्रांच्या दाखल्यातून दाखवायचे होते!
पण क्षमस्व! स्त्री-पुरूष हा भेदाभेद नाही करायचा मला!
स्त्री-पुरूष समान!

अस्मिता आपल्या निराळ्याच विचारांची झलक बघायला मिळाली! खरतर पारदर्शक असणं किंवा नसणं हे त्या व्यक्तीच्या नीतीमूल्यांवर अवलंबून असतं तो व्यक्तीपरत्वे आपली मते ठरवू शकतो!
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद!

पती आणि पत्नी हे संसाररुपी रथाचे दोन घोडे (एक घोडा + एक घोडी) आहेत.
पतीचा समंजसपणा हे एक चाक आणि पत्नीचा समंजसपणा हे दुसरे चाक आहे. रोमान्सचे ऍक्सल दोन्ही चाकांना जोडते.
त्यात स्नेहरुपी वंगण असेल तर रथ छान चालतो आणि वेळोवेळी आत्मपरीक्षणरुपी वरायलिंग केले तर छान टिकतो.

पारंबीचा आत्मा आपली प्रतिसादाची शैली मिश्किल जरी असली तरी विचाराधीन आहे! आपल्या अमूल्य प्रतिसादासाठी आभारी आहे!

प्रिय मॅक्स उत्तम त्या प्रसंगाची तुलना शेरलाॅक होमशी केल्याबद्दल!
पण भारी आहे तुमचा प्रतिसाद!एका छोट्याश्या दाखल्याचेही अनेक पैलू असू शकतात!

चंद्रमा, असा ऋन्मेष सारखा तुटक-तुटक लेख नि एक-एक प्रतिसाद का देत आहात? Happy मी बाकीचे लेख नाही वाचले तुमचे अजून पण वाचेन नंतर आता... Happy

नाही नाही तसं अजीबात नाही! 'पारंबीचा आत्मा' आपला प्रतिसाद आणि आपले विचार माझ्यासाठी प्रशंसनीय आहे!
वेगळा प्रतिसाद केवळ यासाठी आपण वेळात वेळ काढून या लेखाला मतप्रवाहात आणण्यासाठी मायबोलीकरांनी न्याय दिला!
खरतर प्रत्येकांचे आभार मानायला हवे!

सर्वप्रथम sonalisl आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद!
चहा हे फक्त माध्यम आहे तो थंडं आहे,कडू-गोड आहे यावर समोरच्या व्यक्तीची काय प्रतिक्रिया येते ते जाणून घ्यायचे आहे!रमेश आणि सुरेश या दोघांची प्रतिक्रिया ही वेगवेगळी होती.त्यातच या गोष्टीचं गूढ लपलेलं आहे!

पती-पत्नी(झालेले-होणारे) प्रतिसाद द्यायला आले काय?

मला तर त्या भांडण होणार्या मित्राचाच विचार येतोय. ह्यांचं बघुन घरी गेल्यवर बायकोला लाईट लाव सांगितलान तर त्याला मीठाचा चहापण नशीबात नसेल. कारण तिला कुठे माहितीये की दिवसाउजेडी लाईट लाव सांगितल्यावर मीठाचा चहा द्यायचा ते.
चंद्रमा, एकदम सगळयांचे आभार मानलेत तरी कोणी रागवणार नाही.

Pages