........नात्यांमध्ये पारदर्शकता असावी कारण पारदर्शक नातीच प्रदीर्घ काळ जिवंत राहतात. एकदा का त्या नात्यांमध्ये अस्पष्टता आली की ती नाती निर्जीव आणि निस्तेज होत जातात.
'भांडण' हा शब्द पुर्वानुकालापासून आपल्या कानावर ऐकायला येतो. आपल्या घरी असणारे 'आजी-आजोबा', 'आई-बाबा', 'काका-काकू' आपल्याला भांडताना दिसतात. चार चौघांकडून सुद्धा हेच ऐकायला मिळतं जिथे चार भांडी एकत्र आली की आवाज होणारच! अशी भांडणाऱ्याची समजूत घालतात. समाजातील जनमानसाकडून आपल्या मनःपटलावर हे बिंबवले जाते की 'नवरा-बायको' एकत्र असतील तर त्यांच्यामध्ये 'तंटा' होणारच ! हा मनोग्रह धरून आपण वाढतो. त्यामुळे भांडणाची प्रवृत्ती आपल्याला समाजातूनच देणगी स्वरुपात मिळाली आहे.
......नवरा बायकोचे नाते कसे असावे? हे कित्येकांना कळलेलेच नाही. आजही कुठे-कुठे आपला पौरूषी रोब झाडणारे बिनचुके दिसतात पण त्यांचा संसार सुरू होण्याआधीच संपतो पण फार पूर्वी आणि अगदी आमच्या पिढीच्या तरुणपणातही बायको ही 'क्षणाची पत्नी' आणि 'अनंत काळाची मोलकरीण' हा समज दृढ होता. "नवरा-बायको ही संसार रथाची दोन चाके आहेत." ही कल्पना आता कालबाह्य होत चालली आहे तर मुळ मुद्दा बाजुलाच राहला तर 'भांडण' का होतात? तर त्यासाठी तुम्हाला एक सुंदर दाखला देतो.
.....दोन मित्र जॉगिंगला सकाळी भेटतात. रमेशची तक्रार असते की त्याचे त्याच्या बायको सोबत रोज भांडणं होतात. सुरेशला तो यावर काही सोल्युशन आहे का म्हणून विचारतो. 'रमेश' या विषयावर आपण घरी जाऊन बोलू. असे म्हणून सुरेश रमेशला आपल्या घरी घेऊन येतो. सकाळचा स्वच्छ सुंदर प्रकाश खिडकीतून पाझरत असतो तरी पण श्रीमान श्रीमतीला दिवसा लाईट लावायला सांगतात. पत्नी काही न बोलता दिवा लावते त्यानंतर पत्नी दोघांसाठी चहा घेऊन येते. रमेश चहाचा कप तोंडाला लावतो तर चहा त्याला कडवट लागतो. चहा बाजूला ठेवून देतो पण सुरेश चहा दोन घोटात संपवतो आणि गप्पा मारायला सुरुवात करतो. रमेशला आश्चर्य वाटते चहामध्ये साखर नसून मीठ असतानासुद्धा हा आपल्या बायकोला काहीही बोलला नाही. बाहेर पडताना 'रमेश' त्याला याचं कारण विचारतो तर 'सुरेश' बोलतो, "पहा मी सकाळी आल्यानंतर गरज नसताना सुद्धा लाईट लावायला सांगितले तर बायकोने काही न बोलता आत गपचूप दिवा लावला आणि मी पण चहात साखरेऐवजी मीठ असताना सुद्धा तिला काही बोललो नाही अर्थातच हे तिने काही जाणून केले नाही पण मला न बोलताच कळाले." यासारख्या लहान-सहान बाबींना आपण समजून घेतलं तर दोघांमध्ये वाद-विवाद होत नाही. या सुरेशच्या संभाषणाने रमेशला सुखी आणि आनंदी राहण्याचा मंत्र मिळाला. मनावरचे दडपण हलके झाल्यासारखे वाटले आणि तो हसत मुखाने घरी परतला.
......आयुष्यात आपण जसे इतरांना आदर देतो. त्यांचे आभार व्यक्त करतो. कोणी आपल्यासाठी काही केलं तर लगेच 'धन्यवाद'! 'थँक यू!' म्हणतो तसं लहान सहान गोष्टींसाठी आपल्या पत्नीचे आभार व्यक्त करा. तिला जवळ घ्या. प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवा आणि मग बघा आनंदाचे मोती कसे तिच्या गालावर तरळतात.
.....शब्द हे तीष्ण अग्निबाणाप्रमाणे असतात जेव्हा भात्यातून या अग्निबाणांचा वर्षाव होतो तेव्हा मौनरूपी जलबिंदूचा वर्षाव करून त्याची दाहकता कमी करायला हवी.
"जेव्हा राग आला तेव्हा थोडं थांबलं आणि चुकलं तेव्हा थोडं नमलं"तर हा जीवन प्रवास कसा आनंदात निघून गेला हे कळणार सुद्धा नाही. "पतीचे प्रेम हे पत्नीच्या हृदयातील अमृत तर पत्नीचे प्रेम हे पतीकरीता संजीवनीच!"
आयुष्यात एकमेव जिवलग मैत्रीण ही बायकोच होऊ शकते आणि जिवलग मित्र हा नवराच! हे नातं सुंदर आणि सुदृढ असलं की जीवनातले कुठलेही चढ-उतार आपण सहज पार करु शकतो.
(आपले या विषयावर काही मनोगत असतील तर कृपया मायबोलीकरांनी व्यक्त करावे ही नम्र विनंती!)
>>ह्यांचं बघुन घरी गेल्यवर
>>ह्यांचं बघुन घरी गेल्यवर बायकोला लाईट लाव सांगितलान तर त्याला मीठाचा चहापण नशीबात नसेल. >> सस्मित
लाईट लाव सांगितल्यावर फट्टाक्कन कानाखाली बसेलेली दिसली मला. 
'म्हाळसा' आपला लाडवाचा किस्सा
'म्हाळसा' आपला लाडवाचा किस्सा छान सांगितला तुम्ही!
खरतर प्रामाणिकपणे खूप कमी जोडपे आपल्या जोडीदाराचं ऐकतात!
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद!
अजून कुणाला तीष्ण अग्निबाण
अजून कुणाला तीष्ण अग्निबाण दिसले नाहीत की काय! तीक्ष्ण आणि उष्ण या एकाच अग्निबाणाच्या दोन बाजू आहेत.
सियोना आपल्या बेधडक
सियोना आपल्या बेधडक प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
मानवदादा उपमाबंबाळ
मानवदादा उपमाबंबाळ

घोड्यांंऐवजी गाढवं किंवा बैलं घेऊन करावे वाटतेयं, चल ले चल खटारा खिंचके ..!
जरासंध
@ पारंबीचा आत्मा
@ पारंबीचा आत्मा
तुमच्यात ऋन्मेषचा आत्मा शिरलाय का ? वेगवेगळे प्रतिसाद देताय. मला टाळताय. मी काही जरासंध नाही.
नवीन Submitted by पारंबीचा आत्मा on 10 June, 2021 - 22:13
>>>>
अहो, मी कुठे कधी तुम्हाला टाळले?
तुमच्या एखाद्या प्रतिसादावर माझे एखादे उत्तर मी देणे तुम्हाला अपेक्षित होते जे दिले नाही असे कुठे झाले असेल तर प्लीज निदर्शनास आणून द्याल का?
कारण मी सारे खरे खोटे आरोप सहन करू शकतो पण कोणाला ऊत्तर द्यायला टाळलेय असे कधी मुद्दाम करत नाही. तुमचे समाधान हाच माझा संतोष हिच भावना नेहमी मनात असते
@ सीमंतिनी
चंद्रमा, असा ऋन्मेष सारखा तुटक-तुटक लेख नि एक-एक प्रतिसाद का देत आहात? Happy मी बाकीचे लेख नाही वाचले तुमचे अजून पण वाचेन नंतर आता... Happy
>>>>
अरे काय हे, कोणाची एखादी लकब माझ्यासारखी असेल तर असे माझे नाव घेऊन प्रतिसाद लिहू नका लोकहो. ऊगाच ईतरांचे गैईरसमज होतात. आधीच खरे खोटे बरे च आयडी झालेत माझ्या नावावर
अतुल,मानवजी आपण फार विचाराधीन
अतुल,मानवजी आपण फार विचाराधीन मत मांडलेत त्याबद्दल आभारी आहे!
आणि मानवजी आपण फार समर्पक उपमा वर्णित केली!
पतीचा समंजसपणा हे एक चाक आणि पत्नीचा हे दुसरे!
रोमांसचे अॅक्सल या दोघांना जोडते आणि स्नेहरूपी वंगण असेल तर संसाररूपी रथ छान चालतो!
अजून कुणाला तीष्ण अग्निबाण
अजून कुणाला तीष्ण अग्निबाण दिसले नाहीत की काय! >> वावे,
सोयी हुई नागीण को जगाते नै... मी तीन वेळा बनचुके टाईप केलेलं खोडलं... नको उगाच म्हणून....
सीमंतनी आपल्या प्रतिसादासाठी
सीमंतनी आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! खरतर वेगळा प्रतिसाद मिळायलाच हवा वाचकांना! त्याने आपला अमूल्य वेळ दिला आहे या लेखासाठी! तो तर त्याचा हक्क आहे!
शेवटी काय, आयुष्य हा एक चहाच.
शेवटी काय, आयुष्य हा एक चहाच.
अनेक सुंदर पॉझिटिव्ह क्षण रुपी कोवळा उजेड असला तरी आपण मनरुपी बायकोला चंगळवादरुपी कृत्रिम दिवा लावायला सांगतो. अश्याने आयुष्यरुपी चहात अमाप खर्चरुपी मीठ जरी पडले तरी सोबत असलेले पी एफ आणि एफ डी रुपी मित्र हा कडू चहा हसत हसत पितात आणि मग (लोकांची पैश्याची गरज भागवून) संपणेरुपी घरी जातात.
यातच आयुष्याचे खरे सार (आणि रसम सामावले आहे.) कारण चहा काय, मीठ काय, सार काय, रसम काय, सगळी एकाच आत्म्याची निरनिराळी वस्त्रं ल्यायलेली रुपे.
(दमले.आता झोपते :))
लोकांचे गैरसमज दूर करायला एक
( अवांतरः लोकांचे गैरसमज दूर करायला एक "गैरसमज निवारण" धागा हवा. क्षमस्व ऋन्मेष!)
मी_अनु
मी_अनु
वावे तीक्ष्ण आणि उक्ष्ण हे
वावे तीक्ष्ण आणि उक्ष्ण हे आहेत एकाच प्रकारात मोडणारे!
पण तीक्ष्ण उक्ष्णपण असेल तर त्याची जखम आणि दाहकता प्रखर असते!
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद!
मी_अनु, तुम्ही मांजरांकरता
मी_अनु, तुम्ही मांजरांकरता कीबोर्ड बडवणे सोडून असं काही तरी सकस लिहिलंत तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे.
अवांतरः लोकांचे गैरसमज दूर
अवांतरः लोकांचे गैरसमज दूर करायला एक "गैरसमज निवारण" धागा हवा.
>>>>>
हो, हि छान कल्पना आहे. नोंद करून ठेवतो. नवीन विषय सुचवून आपण फिट्टंफाट केलीत.
बाई दवे,
निवारण वरून आठवले,
आमच्याकडे जे आंबट वरण करतात त्यात सप्पासप मिरच्या कापून टाकतात आणि ते मसाल्याच्या तिखट डाळीपेक्षाही तिखट करतात.
तरीही मी त्यावर समंजसपणाच्या तूपाची धार सोडून गोडं वरण समजून ते खातो
मी_अनु भगवदगीता मोड मध्ये
मी_अनु भगवदगीता मोड मध्ये
चंद्रमा जी आपण आर्ट ऑफ
चंद्रमा जी आपण आर्ट ऑफ लिव्हिंग, हॅप्पी थॉट्स, एसेसवाय किंवा तत्सम असे काही करत आहात किंवा केलं आहे का? धाग्यातली उदाहरणे व टोनिंग तसे वाटले म्हणून विचारत आहे बाकी काही नाही. (हो, अशा शिबिरांचा अनेकांना फायदा झाला आहे)
पावसाने वातावरण गार झालंय.
पावसाने वातावरण गार झालंय. तरीही नवर्याने एसी टेंमपरेचर कमी करायला सांगितलं मला. उद्या मला मीठाचा चहा करावाच लागेल.
तीक्ष्ण असो वा उक्ष्ण,
तीक्ष्ण असो वा उक्ष्ण, अग्निबाण (कुठल्याही प्रकारात) मोडून चालणार नाही. निदान शत्रूच्या बाजूला जाऊन पडेपर्यंत तरी नाही. त्यामुळे तीष्ण अग्निरूपी वाग्बाणाला उच्च आवाजरूपी ध्वनुष्याची जोड हवी!
लेखाचे नाव आणि एव्हढे
लेखाचे शिर्षक आणि एव्हढे प्रतिसाद बघून आयडिया आलीच होती की इथे मज्जानू लाईफ सुरू असणारे
नवरा बायको दोघांच्या फोन
नवरा बायको दोघांच्या फोन मध्ये एसी/हीटरचा थर्मोस्टॅटचं तापमान बदलायची सोय आहे. अंथरुणातुन बाहेर न पडता हे होतं. तरी सकाळी उठल्यावर कोणी टेंपरेचर इतकं खाली/ वर करुन ठेवलं? यावरुन अग्निबाण. वर 'हे असं करतोस/तेस आणि मग मी अॅमेझॉनवर ते हे घेतलं की पैसे उडवतो म्हणतो/ते' यावर आवाजरुपी धनुष्याला प्रत्यंचा ओढून ओढून बाग्बाणांचा पाऊस. अर्थात पाऊस पाडायला निमित्त असं लागतंच नाही.
दुसर्याला चहा करुन देण्याइतके आम्ही बिलकुल उदार नाही. कारण दुसर्याच्या चवीचा चहा आवडून घ्यायचाच नाही हे पक्कं ठरवुन ठेवलंय. त्यामुळे आपला आपला करुन पितो. त्यात मीठ नाही घालता येणार. आणखी कुठे मीठ चोळाता येईल यावर विचार करतोय.
आमच्याकडे आम्ही गोडगोड
वा चर्चा छान चालली आहे. कीप
वा चर्चा छान चालली आहे. कीप इट अप मित्रोंज.
हे तेच आहेत का
हे तेच आहेत का मायबोलीकरांच्यात लेखक दडलेला आहे वाले ?
वेड घेऊन पेडगावला जाण्याचा धंदा आहे.
आभार निल्सन आपल्या
आभार निल्सन आपल्या प्रतिसादासाठी! खर तर मायबोली हे एकच स्थान आहे जिथे आपले मनोगत लिखित स्वरूपात प्रगट करता येते!
अमितव आपल्या विचारांचा मी आदर
अमितव आपल्या विचारांचा मी आदर करतो!
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद!
रानभुली तुमच्या शैलीला तोड
रानभुली तुमच्या शैलीला तोड नाही! स्पष्टपणे बोलणारे फार कमी असतात! स्पष्टवक्तेपणा हा स्वभावात असायला हवा!
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे!
खरतर 'अमा' तुझेच आभार मानायला
खरतर 'अमा' तुझेच आभार मानायला हवेत जे तू मायबोलीकरांना या चर्चेत सामील व्हायला प्रवृत्त केलत!
वावे आपण फार सुंदर वर्णन केलं
वावे आपण फार सुंदर वर्णन केलं आहे शरांचं!
Anytime
Anytime
Pages