मुलीचा बाप होणे फार अवघड असते. आणि त्यात तुझ्या लेकीसारखीचा बाप होणे तर आणखी अवघड. येतील हळूहळू अनुभव तुला ..
लेक अगदी अडीच तीन वर्षाची झाल्यापासून हे ऐकतोय. आणि तेव्हापासून उत्सुक आहे, तयार आहे, ते अनुभव कधी येताहेत याची वाट बघत
आज एक बहुधा त्यातलाच मजेशीर अनुभव आला, तो शेअर करावासा वाटतोय. तेवढीच विचारांची देवाणघेवाण...
तर झाले असे,
काल लेकीने आपली एक पँट दाखवली. जिला लेगिंग की काय म्हणतात. तिला गुडघ्याजवळ एक छानसे भोक पडले होते. म्हटले बाद झाली.
आज तिने गपचूप तिच्या दोन्ही पायांवर छान कातरकाम करत आणखी भोकं पाडली आणि मी एक बाद झालेली पँट कशी फॅशनच्या नावावर पुनर्जिवित केली असा आव आणू लागली.
आईबापच आहोत तिचे. सात वर्षे झाली तिच्यासोबत. तर तिनेच हा गेम केला हे आम्हाला समजले.
त्यात मी पडलो बाप, मला तर तिचे सारेच आवडते, हे सुद्धा आवडले. म्हणजे आता पुन्हा असे करू नकोस अशी ताकीद देऊन झाली. पण कौतुकाने तिचा एक फोटोही काढला. तिनेही छान दारातली सायकल घरात आणून त्यावर बसून छान पोज वगैरे देत फोटो काढून घेतला. त्यानंतर शास्त्रंच असते ते म्हणत मी तो फोटो छानसे कॅप्शन देत फेसबूक आणि व्हॉटसप स्टेटसवर शेअर केला... आणि कामाला लागलो.
तासाभराने लाईक्स कॉमेंट चेक केल्या. ज्यात व्हॉटसपवर मला एका शालेय मित्राची मजेशीर कॉमेंट आढळली.
थांबा, एक मिनिट, फोनच बघून सांगतो.. म्हणजे त्यापुढे आमच्यात घडलेल्या संवादाचा शब्दन शब्द डिट्टो देता येईल..
हम्म, तर मित्राची प्रतिसाद होता,
भिकारपणा आहे हा, आवरायला हवे..
मी - छे रे, बघण्याचा दृष्टीकोण .. (तुटक उत्तर देऊन संवाद न वाढवता निसटणार होतो पण तो भाई काही ऐकायच्या मूडमध्ये नव्हता)
मित्र - काय बघण्याचा दृष्टीकोण? तुला तुझा आणि ईतर लोकांचा पोरींकडे बघण्याचा दृष्टीकोण माहीत नाही का? की आता बदलला आहेस तू.. सर्वांचा दृष्टीकोण तोच असतो..
(मला उगाचच मी स्वत:ही शक्ती कपूर, रणजीत कॅटेगरी असल्यासारखे वाटू लागले)
मी - सर्वच लोकांचा दृष्टीकोण तसा आहे हे मानले तरी काय मग आपल्या पोरी बुरख्यात ठेवायच्या का?
मित्र - बुरख्यात कशाला, पण आहे ते नीट घालावे ना, फाडायचे कश्याला. लोकांना मुद्दाम फाडून दाखवावेच कश्याला?
मी - तसे तर साडीतही पोट दिसते, ब्लाऊजमध्ये पाठ दिसते. एखादा पाठ पोट बघून चेकाळत असेल तर मग आपले पारंपारीक वस्त्र साडीही नेसणे सोडायचे का आता?
मित्र - हे बघ मला ईतके गहन नाही जायचेय, काय दिसतेय काय नाही. याबाबत तू आईबाबांचा सल्ला घे.
मी - बाबा तर मीच आहे.
मित्र - अरे तुझ्या आईवडिलांचा सल्ला घे.
मी - त्यांचा काय ईथे संबंध?
मित्र - पोरगी लहान आहे. काही संस्कार जुन्या जाणत्या लोकांनी केले तर वाईट नाही. आणि संस्कार म्हणजे लगेच काही बुरखा नव्हे.
मी - एक्झॅक्टली. संस्कारांचा आणि पोशाखाचा काही एक संबंध नसतो. सर्वांशी प्रेमाने वागावे, शांततेत जगावे, समानता बाळगून राहावे हे शिकवतो तिला..
मित्र - This is westernization. Mad mimic of western culture
मी - असू दे ना वेस्टर्न कल्चर. हे मॅड आहे हे कोणी ठरवले?
मित्र - ते लोकं नागडे फिरतात, आपण फिरायचे का?
मी - मग बुरख्यात जायचे का? निसर्गानेच माणसाला नागडे जन्माला घातले आहे. कपड्यांचा शोध नंतरच लागला आहे.
मित्र - ते सोड, मी काय म्हणतो, घेऊन फाडायचे कश्याला. मग फाटकेच घ्यायचे ना?
मी - हो, हे बरोबर म्हणालास. तिलाही तेच सांगितलेय. कसेही फाडू नकोस. वाटल्यास तुला एखादी छानशी डिझायनर कटस असलेली जीन्स घेऊया.
मित्र - पण न फाडता वापरले तर चालणार नाही का? उगी तापू नको हा, nothing personal.
मी - छे रे, मी कूल आहे. तूच लोड घेत आहेस उगाच.
मित्र - नाही रे, लोड नाही घेत. विचार करतोय या मानसिकतेचा.
मी - तेच, उगाच जास्त विचार करू नकोस. आपले विचार वेगळे आहेत ईतकेच.
मित्र - नाही रे विचार नाही करत आहे जास्त. कोणाला कर्मदरीद्री व्हायचे असेल तर आपल्याला काय.
मी - बघ, पुन्हा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोणाचा फरक. आपल्या आनंदासाठी जगावे, जगाचा विचार करू नये. ईतका सिंपल फंडा आहे आमच्याकडे
(मला जेव्हा जेव्हा असली फिलॉसॉफी झाडायचा चान्स मिळतो तेव्हा मी तो सोडत नाही )
मित्र - असू देत. compulsion नाही बाबा. कपडे फाडण्यात आनंद मिळतो तर मिळू देत. तुझ्याशी म्हणून बोललो मी. अन्यथा उगी तोंड उघडत नाही.
मी - एक्झॅक्टली ! हाच अॅटीट्यूड ठेवावा. मला काय. प्रत्येकाला आपल्या मर्जीने जगण्याचा अधिकार द्यावा. जर त्याने आपले नुकसान नसेल..
मित्र - तू मित्र आहेस, म्हणून बोललो रे..
मी - जरूर बोलावे. विचारांची देवाणघेवाण झालीच पाहिजे. फक्त ते लादले जाऊ नयेत. कोणाला एखाददुसर्या गोष्टीवरून जज करू नये. हेच जर माझ्या मुलाने पँट फाडली असती तर कदाचित असे बोलला नसतास..
मित्र - मुलगी आहे म्हणूनच तर जास्त काळजी घ्यावी लागते.....
(फायनली !! ये सुनने के लिये मेरे कान तरस गये थे )
मी - मी स्वतःही एक पोरगा आहे रे. मलाही कॉलेजला असताना अशी जीन्स फाडायची बरेचदा ईच्छा व्हायची. पण कधी हिंमत झाली नाही.
मित्र - आपले संस्कारच तसे होते.
मी - छे रे, संस्कारांनी हात बांधले नव्हते. माझ्यात ती फॅशन कॅरी करायची हिंमत नव्हती. त्यासाठी लागणारी बेफिकीरी, तो स्मार्टनेस नव्हता. पोरीत ते ऊपजत आहे.
मित्र - जेवलास का? काय होते स्पेशल आज? तुझी बायको केक करते ते आवड म्हणून की बिजनेस म्हणून? चल बाय ! Dont Take it personally ...
कटला मेला, ते सुद्धा जेव्हा मी छान रंगात आलेलो.. म्हणजे त्या डीडीएलजेच्या अनुपम खेर सारखे, "बस्स चौधरी साहब बस्स, मेरी बेटी मेरा गुरूर है, और मेरे गुरूर को मत ललकारो" वगैरे डायलॉग मारायच्या मूडमध्ये आलेलो तेवढ्यात तो शुभरात्री बोलून निसटला...
बाकी त्याला कोण समजवणार, मी पर्सनली बोललेले किती छान एंजॉय करतो ते
जोक्स द अपार्ट,
मुलीचा बाप होणे फार अवघड असते. येतील हळूहळू अनुभव तुलाही...
येऊ देत
डी डी एल जे मध्ये अनुपम खेरला
डी डी एल जे मध्ये अनुपम खेरला मुलगी नसते. अमरिश पुरीला दोन असतात.
मुलीचा बाप होणे फार अवघड असते
मुलीचा बाप होणे फार अवघड असते. आणि त्यात तुझ्या लेकीसारखीचा बाप होणे तर आणखी अवघड>> मुलीची आई होणंही फार काही सोप्प नसतं.. त्यात दोन दोन मुलींची आई होणं तर आणखी अवघड असतं..
येतात असे अनुभव.. मी जेव्हा मुलींचे स्विमिंग कॅास्च्युम घातलेले फोटोज स्टेटसवर टाकते तेव्हा माझे काही नातलग, काही मैत्रिणी सुनावतात मला.. कधी कधी स्वताचेही शॅार्ट्समधले फोटोज टाकले की “तूच असे कपडे घातले तर मुली काय शिकणार“ असे ही उपदेश आत्या मावश्या देतात.
अजून बरंच लिहायचंय .आवडीचा विषय आहे ..रात्री लिहीते
जरूर लिहा म्हाळसा.. ईथे परखड
जरूर लिहा म्हाळसा.. ईथे परखड लिहू शकणारया सर्वांचेच स्वागत आहे. मग ते विरोधातले मत का असेना..
ईथे तुर्तास रात्र संपत आल्याने मी मात्र थोडे झोपून घेतो
बाकी जवळच्या नात्यातल्या बायका बरेचदा काळजीनेच बोलतात. पण त्यांनाही हे समजवायला हवे की ईतक्या लहान मुलींच्या स्विमिंग कॉशच्यूममधील फोटोंना कोणी चुकीच्या नजरेने बघत असेल तर अश्या नजरांपासून तुम्ही काही केले तरी वाचू शकत नाही. आणि तसे वाचून जगण्यात अर्थही नाही.
@ सीमंतिनी, तुम्ही हनुमानाला सांगत आहात की रामाची सीता कोण
बाकी तो डायलॉग माझा लहानपणापासून आवडीचा आणि मी तो तेव्हाही लिंगनिरपेक्षच घेतला होता.
छान दिसतेय परी( डीपी मधला
छान दिसतेय परी( डीपी मधला फोटो बघून सांगतेय).
लोकांचे काय बोलणारच. उद्या त्यांच लोकांच्या मुली जेव्हा असे कपडे घालतील मग, आम्ही कसे मॉडर्न(?) आहोत आणि फॅशनेबल असं सांगत सुटतील.
माझ्या लहानपणी, मी छान प्युअर जॉर्जेट लहान स्कर्ट घातलेला माझ्याच वाढदिवसाला, तर इतर कुसक्या मुलींच्या आयांनी, आईला इतके टोमणे मारलेले, स्वतःची त्यांची ( कुसक्यांची) आर्थिक एपत न्हवती म्हणून जळणे व फॅशन तर कळतच न्हवती म्हणून जळणे असे दोन कॅटागरीज ग्रूपस करतात व टोमणे मारतातच. तेव्हा अशी लोकं भेटणारच, फाट्यानेच मारायचे तेव्हा.....
आईला व बाबांना तर कमालीच एकायला लागयाचे, मुलगी तुझी हाताबाहेर जाईल वगैरे. इतके लाड करू नका.
उलट, अश्याच लोकांची मुलं जिंदगीत काहीच करू शकली नाहीत, त्यांचे आई वडील डोकं( स्वतःचेच) बडवत बसलीत.
तेव्हा, कमाल अपमान करायचा किमान शब्दात अश्या लोकांचा.
फेसबुकवर गैरवापर होणार नाही
फेसबुकवर गैरवापर होणार नाही याची योग्य काळजी घेतल्यास, तशी सेटिंग केल्यास तुमच्या मुलांनी काय घालायचं यात जगाने पडू नये.
इथे मला 'प्रसंगानुरूप ड्रेसिंग' ही कल्पना मात्र मी माझ्या मुलीला शिकवावी असं वाटतं.जे गोव्यात बीचवर अतिशय नॉर्मल आहे(अगदी छोटी बम शॉर्ट आणि बॉडी फिट टीशर्ट वगैरे),किंवा एखाद्या चांगल्या हॉटेलात पार्टीला जाताना घालायला अगदीच नॉर्मल आहे(गुडघ्यावर असणारा शॉर्ट वन पीस) ते डिलिव्हरी बॉय साठी दरवाजा उघडताना किंवा बाहेर कोपऱ्यावर वाण्याकडे काही घ्यायला जाताना नाही.पण हेही मी माझ्या मुलीला नीट समजावून सांगू शकते.मोठेपणी तिला पटलं तर ती प्रसंगानुरूप ड्रेस कोड पाळेल.न पटल्यास, त्यावेळी अजून 10 मुलंमुली त्या प्रसंगाला तेच घालत असल्यास तेच घालेल.इतरांच्या मुलींनी (किंवा मुलांनी) कोपऱ्यावर वाण्याकडे जाताना काय घालावं हा त्यांचा प्रश्न आहे.
स्वतःला सुरक्षित ठेवून, स्वतःला आरामदायी वाटेल असं काहीही कोणीही घालावं.
मुलीना बंधनात ठेवावे किंवा
मुलीना बंधनात ठेवावे किंवा त्यानी काय घालावे आणि काय घालू नये असले फडतूस सल्ले ज्याना मुली नाहित ती लोक जास्त देतात. माझा स्वानुभव.
मुलींच्या आई वडिलांपेक्षा बाकी लोकांकडे जास्त वेळ असतो असे संस्कार वगैरे गप्पा मारायला.
@ झंपी
@ झंपी
आईला व बाबांना तर कमालीच एकायला लागयाचे, मुलगी तुझी हाताबाहेर जाईल वगैरे. इतके लाड करू नका.
>>>>>
असे म्हणताना त्यांच्या डोक्यात लाड म्हणजे स्वातंत्र्य असते. मुलीला ते जास्त देऊ नये अशी त्यांची अपेक्षा असते
फॅशन तर कळतच न्हवती म्हणून जळणे >>>> फॅशन कळली नाही तर त्याला थेरं म्हटली जातात. आम्हीही फॅशन केली पण असली थेरं कधी केली नाही हा टिपिकल डायलॉग. ज्याची फॅशन आपल्यापेक्षा जास्त मॉडर्न तो वाया गेलेला, ज्याची कमी तो बावळट
@ सियोना
@ सियोना
मुलीना बंधनात ठेवावे किंवा त्यानी काय घालावे आणि काय घालू नये असले फडतूस सल्ले ज्याना मुली नाहित ती लोक जास्त देतात. माझा स्वानुभव.
>>>>>>
ज्या मित्राकडून हे सल्ले आले त्याला स्वतःलाही मुलगीच आहे. कालच्या संवादात त्याने तिचा उल्लेखही केलेला. तो तिला कसे संस्कार लावतो वा काय बंधने घालतो वगैरे. त्यावर मी काही टिप्पणी केली नव्हती. अन्यथा फरक ऊरला नसता
@ अनु
@ अनु
कोपऱ्यावर वाण्याकडे जाताना काय घालावं हा त्यांचा प्रश्न आहे.
>>>
हो नक्कीच, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहेच. कारण या वाण्याकडे जातानाच्या ड्रेसकोडमध्येही फार तफावत आढळते. स्पेशली भारतासारख्या देशात जिथे कमालीची आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे तिथे तुमचे अपब्रिंगिंग का काय म्हणतात ते कसे झालेय त्यावर हे तुमचे ड्रेसिंग अवलंबून असते.
म्हणजे एखाद्या हायफंडू सोसायटीतील एखादी टीनेजर मुलगी रात्री शॉर्टस घालून झोपणे पसंद करत असेल. सकाळी त्याच कपड्यांवर गेटबाहेरच्या वाण्याकडे दूध ब्रेड बटर घ्यायला येत असेल. तेव्हा आजूबाजूच्या लोकांच्या नजरा अप्रूप वाटल्याने वळत असतील. कारण ते वेगळ्या स्तरातील असतात. आता त्या मुलीकडे दोन चॉईस आहेत. एक म्हणजे आपल्या सोसायटीपुरतेच शॉर्टवर फिरा आणि गेटबाहेरच्या जगात जिथे लोकांना ते पचनी पडत नाही त्यांच्या नजरा वळवून घेण्याऐवजी फुल्ल जीन्स घालूनच नाक्यावरच्या वाण्याकडे जा.. किंवा दुसरा पर्याय म्हणजे जर सुरक्षितत्तेचा प्रश्न नसेल तर अश्या नजरांकडे दुर्लक्ष करत जे आपल्याला कम्फर्टेबल वाटते तेच घाला. यातला कुठला पर्याय निवडावा हे ती मुलगी आणि तिच्या घरचे ठरवतील. जगाला का घेणे देणे? मुळात काही लोकांना पोशाखावरून संस्कार आणि कॅरेक्टर जज करायची भारी घाई असते.
मायबोलीवर अनेकदा ही चर्चा
मायबोलीवर अनेकदा ही चर्चा झालेली आहे. त्यातल्या त्यात तीन धाग्यावर जास्त झाली आहे.
नीधप, साती यांची मतं तुमच्या संभाषणात आलेली आहेत. त्याचप्रमाणे इतर आयडींचीही आली आहेत. छोटी या आयडीचा एक धागा होता. तसेच खाप पंचायतीने मुलींनी कोणते कपडे घालावेत असा एक आदेश काढला होता त्यासंबंधीच्या धाग्यावर सुद्धा हे मुद्दे येऊन गेले आहेत. निर्भया कांडाच्या वेळच्या तीन चार धाग्यांवर सुद्धा हे मुद्दे येऊन गेले आहेत. सर्च दिल्यास हे मुद्दे तपशीलवार वाचता येतील.
"आपल्याला कम्फर्टेबल वाटते
"आपल्याला कम्फर्टेबल वाटते तेच घाला. यातला कुठला पर्याय निवडावा हे ती मुलगी आणि तिच्या घरचे ठरवतील. जगाला का घेणे देणे? मुळात काही लोकांना पोशाखावरून संस्कार आणि कॅरेक्टर जज करायची भारी घाई असते."
हे पूर्णपणे पटलं.
पारंबीचा आत्मा ज्या समस्यांचे
पारंबीचा आत्मा ज्या समस्यांचे निराकरण समाजप्रबोधनात असते त्या चर्चा पुन्हा पुन्हा होऊ द्याव्यात. जसे शेजारच्या एका धाग्यावर मनुष्याने पर्यावरणाची कशी हानी केलीय आणि आता काय कसे सुधारायला हवे याची चर्चा आजवर बरेच धाग्यात झाली आहे तरीही पुन्हा पुन्हा होणे गरजेचे आहे. कारण त्याशिवाय बदल घडणार नाही.
माझे काम लेख लिहावे, अनुभव शेअर करावे, धागे काढावे. त्याशिवाय चर्चा होत नाही.
कुणी कधी , कसा आणि का धागा
कुणी कधी , कसा आणि का धागा काढावा याचे काही नियम नाहीत. मात्र पूर्वी या विषयावर धागा / गे येऊन गेलेले आहेत हे पण सांगितले जाते.
इथे मुलींच्या कपड्याचा जो विषय आहे तो एखाद्या असंवेदनशील घटनेच्या संदर्भात या पूर्वी मांडला गेलेला आहे. त्यामुळे त्यात टोकाच्या मतभेदांवर व्यवस्थित चर्चा झालेल्या आहेत. त्या चर्चा पुन्हा वाचल्या तरी चालू शकते. जी तीव्रता एखाद्या निषेधार्ह घटनेच्या बाबत असते ती काल्पनिक संभाषणात जाणवत नाही. पूर्वीचे मुद्दे संभाषणात घुसडल्यासारखे वाटते. चर्चा पुन्हा होऊ नये असे अजिबातच नाही. नव्याने मांडणी असावी, नवे मुद्दे असावेत, अस्सल विचार असावा अशी अपेक्षा आहे. ( ती धुडकावून लावण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे).
त्या त्या वेळेला न पटलेले मुद्दे नंतर पटल्यानंतर वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन ते मुद्दे आपले पूर्वीपासून हेच मत होते असे सांगणारी मांडणारी मंडळी आहेत. तर काही मंडळी पूर्वी माझे हे मत होते, आता ते बदलले आहे कारण.. अशी चर्चा सुरू करतात. दुस-या पद्धतीच्या चर्चेतला प्रामाणिकपणा भावतो. त्यामुळे पुन्हा एकदा विचारमंथन होते. यात शिळ्या कढीला ऊत आणला आहे अशी भावना होत नाही.
इथे जे संभाषण हेडर मधे दिलेले आहे त्यातले सर्व मुद्दे यापूर्वी येऊन गेलेले आहेत.
पूर्वीचा एखादा धागा शोधून
पूर्वीचा एखादा धागा शोधून त्यावर चर्चा चालू ठेवू शकतो
त्यावर आधी बरीच मतं येऊन गेली आहेतच (त्या निमित्ताने स्वतःची काही वर्षापूर्वीची मतं बदलली आहेत की कसे तेही प्रत्येकाला तपासता येईल)
मानसिक ता आणि पेहराव ह्याचा
मानसिक ता आणि पेहराव ह्याचा जवळचा संबंध असतो .तरुण मुलं बाह्य फिट असणारे शर्ट वापरतात ते त्यांच्या दंड चे स्नायू दाखवण्यासाठी साठीच.उगाच ताकाला जाताना भांड. लपवण्यात काही अर्थ नाही.
जेव्हा एकाधी मुलगी फिट जिन पँट घालते तेव्हा तिची मानसिकता हीप उठून दिसावी आणि लोकांनी बघावी हीच असते.
छान दिसण्यासाठी कपडे कोणते असावेत ह्याचा काही संबंध नाही.नैसर्गिक सुंदर असणारे कोणत्या ही कपड्यात सुंदर च दिसत.ठराविक अवयव दाखवण्याची मानसिकता आणि फक्त फॅशन म्हणून कपडे परिधान करणे ह्या मध्ये नक्कीच फरक आहे
अवयव त्याचे/तिचे आहेत
अवयव त्याचे/तिचे आहेत.त्यामुळे तिचा/त्याचा प्रश्न.
जीन्स वापरायला कंफर्टेबल आहे, वर कोणत्या रंगाचा टॉप/ शर्ट/कुर्ता चांगला दिसेल याचा फार विचार करावा लागत नाही, लगेच लगेच धुवावी लागत नाही, कुठे खिळा/बाहेर आलेला भाग भिंतीत असल्यास अडकून लगेच फाटत नाही.फक्त हिप्स चांगले आहेत हे दाखवणे हा त्याचा एकमेव्/मुख्य वापर नाही.
हेमंत यांच्यासारखेच प्रतिसाद
हेमंत यांच्यासारखेच प्रतिसाद येऊन गेलेले आहेत. त्यांना ज्यांनी उत्तरे दिलेली आहेत त्यांना पुन्हा तीच उत्तरे द्याविशी वाटणार नाहीत. कदाचित त्यामुळे हेमंत यांचा मुद्दा निर्विवाद आहे असे वाटेल. शिळ्या चर्चेत हा धोका असतो. त्यापेक्षा संबंधितांनी जुने धागे पाहिले तरी चालेल. हा धागा काढला याबद्दल आभार. त्यामुळे सर्व जुन्या धाग्यांची उजळणी होईल. ज्यांनी वाचलेले नाहीत त्यांची मतं बदलली तर चांगलेच आहे. नाही बदलले तरी काही काळाने बदलेल. जेव्हढे आठवते तेव्हढ्या लिंका इथे देतो. ज्यांना इतर लिंक्स देणे शक्य आहे त्यांनी त्या द्याव्यात.
छोटी यांचा एक धागा सापडला नाही. मात्र इतर धागे सापडले.
https://www.maayboli.com/node/70573
https://www.maayboli.com/node/44801
https://www.maayboli.com/node/50659
स्त्रियांसाठी ड्रेस कोड या
स्त्रियांसाठी ड्रेस कोड या धाग्यावर या धाग्याच्या संदर्भाने छान चर्चा झालेली आहे. इथे येणारे संभाव्य आक्षेप त्यात येऊन गेलेले आहेत. त्याला उत्तरेही दिली गेलेली आहेत.
https://www.maayboli.com/node/39618
इथेही चर्चा झाली आहे. स्त्री
इथेही चर्चा झाली आहे. स्त्री भ्रूण हत्याच बरी
https://www.maayboli.com/node/39946
इथे फक्त कपडे कोणते वापरवावेत
इथे फक्त कपडे कोणते वापरवावेत हा एकमेव प्रश्न नाही .
तो एकमेव प्रश्न असता तर उत्तर एका वाक्यात आहे ज्याला जे आवडतील ,जशी आवडतील तशी त्याने कपडे वापरावीत बाकी लोकांना आक्षेप घेण्याचं काही कारण नाही.
पण खरा प्रश्न जो व्यक्ती कपडे कोणती घालतो त्या पाठी त्यांची मानसिकता काय आहे.ह्याचा पण आहे.
तीच बाब बघणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक तेची पण आहे काही व्यक्ती कमी कपड्यात असलेल्या व्यक्ती ला बघून काहीच वेगळे वाटतं नाही तर काही ना कमी कपड्यात असलेली व्यक्ती बघून ऑकवर्ड वाटते.
खरे तर तसे वाटण्याचे काहीच कारण नाही.
जी तीव्रता एखाद्या निषेधार्ह
जी तीव्रता एखाद्या निषेधार्ह घटनेच्या बाबत असते ती काल्पनिक संभाषणात जाणवत नाही.
>>>>
ओके, तर आपणास हे संभाषण काल्पनिक वाटत आहे. काही हरकत नाही. पण का काल्पनिक वाटले हे ईथे मला महत्वाचे वाटते.
१) म्हणजे धागा ऋन्मेषचा आहे म्हणून संवाद काल्पनिकच असणार
२) की असा कोणी विचारच करत नाही वा केला तरी बोलून दाखवत नाही असे आपणास वाटते.
जर यातले पहिले कारण असेल तर ईटस ओके. माझ्याबद्दल आपले मत बनवण्याचा तुमचा पुर्ण अधिकार आहे. हा मुद्दा बाजूला ठेऊया.
पण जर दुसरे कारण असेल तर मात्र हि विचारात घेण्याजोगी बाब आहे. म्हणजे असे होऊ शकत नाही हे लोकांना वाटतेय हि विचारात घेण्याजोगी बाब आहे.
जुन्या लिंक या धाग्यावर दिल्यात त्याबद्दल धन्यवाद चाळता येईल सवडीने.
मुळात लोकांनी चर्चा केलीच पाहिजे असा माझा काही हट्ट नसतो. धागा ललित लेखनात आहे. एक अनुभव आलाय तो शेअर केलाय. लोकांनी वाचला, विचार केला, तर हे माझ्यासाठी पुरेसे आहे. चर्चेचा आग्रह नाही. केली तर हरकत नाही. या निमित्ताने तुम्ही जुन्या धाग्याच्या लिंका दिल्या, लोकं या निमित्ताने ते धागे उघडून वाचतील, हे देखील खूप छानच झाले की.. अन्यथा नवीन सभासद मुद्दामहून असे करत नाही. आणि धागाकर्ते मुद्दामहून प्रतिसाद देऊन आपले जुने धागे वर आणत नाहीत.
@ पारंबीचा आत्मा,
@ पारंबीचा आत्मा,
आणखी एक म्हणजे मी हा अनुभव एका वेगळ्या अनुषंगाने शेअर केला आहे. म्हणजे मुलींनी काय कोणते कपडे घालावे, आणि त्यावर कोणी आक्षेप घेणे योग्य अयोग्य हे एक झाले...
पण जेव्हा तुमच्या मुलींच्या कपड्यांवर कोणी आक्षेप घेते तेव्हा एक पालक म्हणून तुमची भुमिका, तुमची प्रतिक्रिया काय असावी, ते प्रकरण तुम्ही कसे हॅन्डल करावे.. ??
या अनुषंगाने चर्चा झाली असल्यास ते ईतरांचे अनुभव सुद्धा मला एक पालक म्हणून पुढील आयुष्यात कामाला येतील.
@ पारंबीचा आत्मा,
डुप्लिकेट डुप्लिकेट
यातही कपड्यांचा मुद्दा येऊन
यातही कपड्यांचा मुद्दा येऊन गेलेला आहे. स्त्रियांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा जर मित्राशी,सोसायटीत व्हॉट्स अॅप संभाषण झाले तर त्यांना या लिंका देता येतील.
https://www.maayboli.com/node/39716
समजा समलिंगी संबंधाबाबत चर्चा
समजा समलिंगी संबंधाबाबत चर्चा करताना तुमचा मित्र चुकला तर तो कसा चुकला हे मायबोलीवर सांगण्यापेक्षा त्याला या धाग्याची लिंक द्यावी. त्या चे प्रबोधन होईल.
https://www.maayboli.com/node/9629
या सर्व चर्चा समाजातल्या गैरसमजांबाबत आहेत. अशाच चर्चा इतर समाजमाध्यमातही मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत. त्या चर्चांमधले चांगले मुद्दे का सोडून द्यावेत ? कदाचित आता तितके प्रभावी मुद्दे मांडणारे कुणी सहभागी होणार नाहीत. हे नुकसान नको असेल तर जुने धागे पहायलाच हवेत.
कुणी नव्याने चर्चा करू नये
कुणी नव्याने चर्चा करू नये असे म्हटलेले नाही. मुद्दा हा आहे की पूर्वी जर कसदार चर्चा होऊन गेलेल्या असतील (आणि आपण त्यात असू ) तर नव्याने होणा-या चर्चांनी त्यापेक्षा अधिक उंचीची पातळी गाठली तर बरेच नाही का ? ही सुद्धा सक्ती नाही. केवळ व्हॉट्स अॅप वर आमचे अमूक तमूक संभाषण झाले आणि मित्र कसा चुकला आणि माझे मत कसे बरोबर असे पाठ थोपटून घेणारे धागे वारंवार काढले की लोकांचा दृष्टीकोण वेगळा राहतो. अशा चर्चेत आपण स्वतः कमी असायला हवे असे माझे मत आहे. पुन्हा त्याचीही सक्ती नाही. संपूर्ण धाग्यात आत्मकेंद्रीत चर्चा करण्याला बंदी नाहीच. आणि लोकांच्या अपेक्षा धुडकावून लावू नयेत , फाट्यावर मारू नयेत असेही नाही.
पारंबीचा आत्मा, आपण या
पारंबीचा आत्मा, आपण या मुद्द्यावर म्हणजे चर्चा कश्या असाव्यात वा कश्या व्हाव्यात यावर वेगळा धागा काढूया. कारण याबाबत सर्वांचे मत सर्वांचा दृष्टीकोण जाणून घेणे गरजेचे आहे. केवळ तुम्हाला किंवा मला वाटते अमुकतमुक प्रकारेच चर्चा व्हायला हवी म्हणून सर्वांनीच तेच नियम वा गाईडलाईन्स फॉलो कराव्यात अशी आपण ईतर सभासदांवर सक्ती करू शकत नाही.
तो धागा तुम्ही काढला तरी चालेल. जर तुमचे याबाबत विचार स्पष्ट असतील तर तुम्ही ते एका धाग्यात मांडा. मला वाचायला आणि त्यात माझे मत नोंदवायला आवडेल. पण या पोस्ट ईथे नको तर एका स्वतंत्र धाग्यात असाव्यात असे मला वाटते.
पारंबीचा आत्मा, आपण या
पारंबीचा आत्मा, आपण या मुद्द्यावर म्हणजे चर्चा कश्या असाव्यात वा कश्या व्हाव्यात यावर वेगळा धागा काढूया. >>> तुम्ही काढा. माझे काही एक म्हणणे नाही.
कारण याबाबत सर्वांचे मत सर्वांचा दृष्टीकोण जाणून घेणे गरजेचे आहे. केवळ तुम्हाला किंवा मला वाटते अमुकतमुक प्रकारेच चर्चा व्हायला हवी म्हणून सर्वांनीच तेच नियम वा गाईडलाईन्स फॉलो कराव्यात अशी आपण ईतर सभासदांवर सक्ती करू शकत नाही. >>> कुठे सक्ती केली आहे ? उलट सभासदांची मते फाट्यावर मारू नयेत असे काहीच नाही, सक्ती नाही असेच वारंवार म्हटलेले आहे. तुम्हाला सक्ती कुठे दिसली यात ?
तो धागा तुम्ही काढला तरी चालेल. जर तुमचे याबाबत विचार स्पष्ट असतील तर तुम्ही ते एका धाग्यात मांडा. >> माझा असा कोणताही विचार नाही. या धाग्याची तुमची सूचना तुम्ही अंमलात आणावीत. एकाच कमेण्ट मधे रिपीटेशन झाले आहे. तेच तेच उत्तर द्यायला लागू नये असे माझे मत आहे.
मला वाचायला आणि त्यात माझे मत नोंदवायला आवडेल. पण या पोस्ट ईथे नको >> ही सक्ती झाली. माझा एकही प्रतिसाद धागा कसा असावा याबद्दलचा नाही. तुमचे विषयांतर झाले आहे. शिवाय तुम्हाला मला काय म्हणायचे हे समजलेले नाही. जो विषय मुलींचे कपडे ( आणि स्त्रियांचे स्वातंत्र्य) या संदर्भाने मांडला आहे त्या संदर्भात वेळो वेळी जी मतं मांडली आहेत ती अधिक उपयोगी आहेत. ती पुन्हा कुणी मांडेलच असे नाही. त्यामुळे अधिक कसदार चर्चा समोर यावी असे माझे मत आहे. ती सक्ती नाही असेच म्हटलेले आहे. तुम्ही फाट्यावर मारू शकता असे म्हटले आहे. त्याप्रमाणे तुम्ही केले याबद्दल समाधान आहे.
विषयाच्या संदर्भाने मत मांडणे याला बंदी आहे का तुमच्या चर्चेत ? तसे असेल तर काळजी घेईन. तुम्ही चर्चेचे प्रस्ताव ओपन डोमेन मधे ठेवाल तर कुणी काय मत मांडावे हे तुम्हीच ठरवणार ही सक्ती नाही का ? तुम्ही माहितीपूर्ण लेख लिहा, गोष्ट लिहा, कविता लिहा. त्यावर वेगळे मत येईल. असे येणार नाही.
तर एका स्वतंत्र धाग्यात असाव्यात असे मला वाटते. >> ते तुमचे मत आहे की नियम आहे ?
आज जागरण करायला लावले. आता झोपत नाही. दिवसा माझी झोपण्याची वेळ असते.
तुम्ही काढा. माझे काही एक
तुम्ही काढा. माझे काही एक म्हणणे नाही. >> ओके
लेख आणि प्रतिसाद वाचून मुलगी
लेख आणि प्रतिसाद वाचून मुलगी होणे किती अवघड आहे अजूनही हे जाणवले.
Pages