Submitted by गणक on 14 May, 2021 - 06:16
ठसे....
हुंदके दाटून येता भावनांचे !
केवढे उपकार झाले आसवांचे !
फेडण्या कर्जात विकली माय ज्यांची ,
काय झाले हो पुढे त्या वासरांचे !
दगड असतो तर कदाचित देव असतो ,
घाव इतके सोसले मी आपल्यांचे !
त्या निसर्गाच्या छटा दिपलेत डोळे ,
घातकी ते रंग सारे माणसांचे !
सूर्य गिळले , आगसागर पार केले ,
हाय चटके सोसले मी गारव्यांचे !
घेतले आधीच तुम्ही सर्व तारे ,
छाटले का पंख माझ्या काजव्यांचे ?
ज्या किनाऱ्यावर बुडाली नाव माझी ,
गाव कुठले...बेट होते वादळांचे !
जीव माझा घेतला हे तेच होते ,
लागले तिरडीस माझ्या हात ज्यांचे !
शब्द सुचले काल माझ्या लेखणीला ,
कंठ बसले आज साऱ्या गायकांचे !
थांब तू ही नागमोडी गझल माझी ,
बघ ठसे दिसतील माझ्या अक्षरांचे !
वृत्त - मंजुघोषा
( गालगागा × 3 )
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वा !!
वा !!
धन्यवाद ! आदित्य .
धन्यवाद ! आदित्य .
उत्तम. अनेक शेर अवडले.
उत्तम. अनेक शेर अवडले.
प्रतिसादाबद्ल धन्यवाद ! आर्त
प्रतिसादाबद्ल धन्यवाद ! आर्त ..