जागतिक पातळीवर सर्वच लसींचे समान वाटप व्हावे व लसीकरणाचे प्रमाण वाढून आजारांचे उच्चाटन व्हावे म्हणून
GAVI (ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायजेशन) ही शिखर संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न होऊन
कार्यरत असते. मागास राष्ट्रांनाही लस
मिळावी हा या संस्थेचा मुख्य व उदात्त हेतू आहे. यासाठी
" गावी " या संस्थेला बिल अँड मिलिंडा गेट्स
फाउंडेशनसारख्या अनेक बलाढ्य सेवाभावी संस्थांकडून
निधी मिळतो. नुकतेच १५ एप्रिल रोजी वॉशिंग्टन इथे " गावी" ने आयोजित केलेल्या " वन वर्ल्ड प्रोटेक्टेड" या इव्हेंटमध्ये बऱ्याच देशांनी मुक्तहस्ताने निधीचे वाटप केले.
तरीही श्रीमंत देशांनी निधी दिला आणि गरीब राष्ट्रांना लसी मिळाल्या एवढे सोपे हे काम होत नाहीं. " गावी" तसेच निधी पुरवठा करणाऱ्या संस्था जेव्हा एखाद्या देशाला लस
निर्मितीसाठी निधी देतात तेव्हा एखाद्या कंपनीच्या लसीला झुकते माप देणे, एखाद्या विशिष्ट कंपनीच्याच लसीची खरेदी
करण्यासाठी दबाव आणणे, आणि अविकसित, मागास देशातील लसीकरण कार्यक्रम ठरवताना तो श्रीमंत व विकसित राष्ट्रांना कसा फायदेशीर ठरेल हे पाहणे असे छुपे, न दिसणारे एजेंडा पुढे ढकलतात.
भारतातील सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी " गावी " ने आगाऊ खरेदीची हमी म्हणून ३०० अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य दिले आहे. त्याबदल्यात सीरमने
कमी उत्पन्नाच्या ९२ देशांना जूनपर्यंत १०০ दशलक्ष डोसेस देण्याचा कायदेशीर करार " गावी " आणि गेट्स फाउंडेशन यांच्याशी केला आहे. 'गावी' व्यतिरिक्त सीरम
इन्स्टिट्यूटला भारत सरकारकडून ३ हजार कोटींचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. " गावी" च्या कराराअंतर्गत ७६ देशांना ६०.४ दशलक्ष डोसेस आजवर सीरमने दिले
आहेत. या लसी दिलेल्या देशांमध्ये सौदी अरेबियासारखे श्रीमंत आखाती देशही आहेत. आज सीरम इन्स्टिट्यूटचा एकच कारखाना पुण्यात कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीला आग लागली होती. शिवाय अमेरिकेने सीरमला कच्चा माल देण्यास नकार दिला होता. ( ही रोखलेली निर्यात आताच मागे घेण्यात आली आहे ). अशा स्थितीत सीरमला दिवस रात्र उत्पादन करावे लागत असून " गावी " बरोबर करार केल्यामुळे त्यांनाही सलाम ठोकावा लागत आहे. सीरमच्या कोविशिल्ड या लशीचा तुटवडा यामुळेच भासत आहे. आज सिरम अशा कात्रीत अडकली आहे की स्वतःच्या देश बांधवांना लशी पुरवाव्यात की ९२ देशांची मागणी पूर्ण करावी.
."सगळी श्रीमंत व गरीब राष्ट्रे मिळून एकत्रित लस खरेदी करू,"असे " गावी " म्हणत असताना अमेरिका व ब्रिटनने नोव्हेंबरमध्येच लस तयार करणाऱ्या - फायजर, मॉडर्ना व
जॉन्सन अँड जॉन्सन या तीन मुख्य कंपन्यांना अब्जावधी
डॉलर्स देऊन बहुतांश डोस "प्री बुक' केले. रशिया आणि चीनने स्वतःच्या बळावर देशी लसी बनविल्या. यामुळे आज
जगात १४ % लोकसंख्या असलेल्या देशांकडे जगातील
८५% लससाठा उपलब्ध आहे. अमेरिकेने ५०% व इंग्लंडने
६०% लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतात एक डोस मिळालेल्यांचे प्रमाण ५.२ % व दोन्ही डोस मिळालेल्यांचे प्रमाण १ % एवढे कमी आहे. ज्या देशातून जी मिळेल ती लस खरेदी करणे आणि प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर देणे आवश्यक असताना, भारतात लसीकरण केंद्रांवरून अनेक जण लसीअभावी
परतताना दिसत आहे. भारत बायोटेक या काही अंशी देशी संस्थेचा लस निर्मितीतील सहभाग आज केवळ १०% आहे. भारताने १० हजार कोटी रुपये हे अर्थसंकल्पात लसीसाठी निश्चित केले आहेत. पण यापैकी बहुतांश निधी हा खाजगी
कंपन्या व परदेशी लसी खरेदीसाठी खर्ची पडणार आहे.
हाफकिन इन्स्टिट्यूट - मुंबई, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट - कसौली, पाश्चर इन्स्टिट्यूट, कुन्नूर, किंग इन्स्टिट्यूट - चेन्नई या भारत सरकारच्या लस तयार करणाऱ्या संस्थांचा उपयोग करुन घेतला पाहिजे. असे केले तरच सर्वांचे लसीकरण होऊ शकेल अन्यथा एकशे तीस कोटी जनतेचे लसीकरण कसे आणि केंव्हा होईल त्याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो. त्यामुळेच १ मे २०२१ पासून १८ ते ४५ या वयोगटातील लोकांचे सरसकट लसीकरण करणे केवळ अशक्य आहे.
....
मुंबै महापालिका तशी अगदी
मुंबै महापालिका तशी अगदी काटेकोर पावलं उचलते आहे हे दिसतंय. परंतु पुरेशा लशी मिळाल्याशिवाय हे काटेकोर नियोजन मातिमोल होण्याचीच शक्यता अधिक.
माझ्या मुलाने १८-४५ गटासाठी
माझ्या मुलाने १८-४५ गटासाठी कोविंन वरून रजिस्ट्रेशन केलं. त्याला मेसेज ही आला. पण त्यानंतर काहीच नाही.. स्लॉट कुठे आणि कसा चेक करायचा?
कोवीनवरच.
कोवीनवरच.
हे काही स्क्रीनशॉट सोसायटी
हे काही स्क्रीनशॉट सोसायटी ग्रुप साठी काढले होते ते टाकतेय




माझ्याकडे तर आरोग्य सेतूच
माझ्याकडे तर आरोग्य सेतूच नाही... लसीकरणा साठी याचं कंपलशन नसावं बहुतेक.
डीजे , लसीकरणासाठी आरोग्यसेतू
डीजे , लसीकरणासाठी आरोग्यसेतू अँप सक्तीचे नाही. कोविनच्या साईटवर जाऊनही करता येतं. मी माझ्या दोन्ही मावश्याच तिथूनच रजिस्ट्रेशन केल. पहिला डोस झालाय त्यांचा पूर्ण .
हो
हो
आरोग्य सेतू,थेट कोविन,उमंग कुठूनही होतं
सगळे इंटरनली एकाच डेटाबेस ऍक्सेस करतात.
आरोग्य सेतू आणि उमंग कोविन ला रिडायरेक्ट होतात.
धन्यवाद जाई. मनातील शंका
धन्यवाद जाई. मनातील शंका घालवल्याबद्दल
माझ्या मते जवळची PHC बघा
माझ्या मते जवळची PHC बघा खेड्यात लोकांमध्ये लसी बद्दल अजूनही साशंका असल्याने लोक लस घेण्यासाठी जात नाही आहे त्यामुळे तिथे नक्की भेटेल व लवकर होईल
हो.. मी तेच करणार आहे.
हो.. मी तेच करणार आहे.
या सर्व ट्रिक सर्व जनते
या सर्व ट्रिक सर्व जनते पर्यंत पोहचल्या आहेत
स्लॉट आल्या आल्या क्लिक करेपर्यंत फुल होतायत
रोज प्रयत्न करत राहावे|| तोवर स्टॉकही वाढेल.
मुंबैत उद्या ४५+ दुसऱ्या डोस
मुंबैत उद्या ४५+ दुसऱ्या डोस साठी walk in.
Centres ची यादी आली आहे.
केंद्राच्या कोव्हिड सुपर
केंद्राच्या कोव्हिड सुपर मॉडेल कमिटी घ्या प्रमुखांची उत्तरं ऐकून कपाळावर हात मारून घ्यावा लागतोय.
https://youtu.be/A9JWzXWewd0
मुंबैत उद्या ४५+ दुसऱ्या डोस
मुंबैत उद्या ४५+ दुसऱ्या डोस साठी walk in.
Centres ची यादी आली आहे.
कुठे दिसते ही यादी??
भरतनी शेअर केलेला व्हिडिओ
भरतनी शेअर केलेला व्हिडिओ बघुन पोटात खड्डा पडला!
रिपोर्टेड केसेसचा कर्व खाली गेला म्हणजे अनरिपोर्टेड केसेसचा ही जाणार???? यात त्या दोघांमधलं रिलेशन सेम असेल हे भलं मोठं अझम्शन प्रोफेसर आणि चेअर म्हटला जाणारा मनुष्य बोलतच नाही? ही कमीटी स्वायत्त बॉडी नाही का? सरकारच्या दावणीला बांधलेल्या म्हशीसारखी वक्तव्य का आहेत?
अॅकेडमिक म्हणून जे आम्ही मॉडेल केलं ते आम्ही सांगितलं. त्यात काय चुका झाल्या त्या प्रमाणे रिमॉडेल करुन परत सांगितलं. इतकं सांगून बाकी कसल्याही स्पेक्युलेटिव्ह (असे प्रश्न न्हवतेच. प्रश्न विचारणारा टिपिकल आतातायी पणा न करता व्यवस्थित उत्तरं समजुन प्रतिप्रश्न विचारत होता) किंवा पॉलिसी मॅटर प्रश्नांना कानावर हात ठेवायचा सोपा आणि पीसी मार्ग उपलब्ध असताना ही सरकारी कृतीचे समर्थन करण्याची काय इतकी लाचारी? मिझरेबल रिस्पॉन्स आणि पथेटिक सिस्टिम्स! याईक्स!
दादर कोहिनुर square
दादर कोहिनुर square
कार मध्ये बसूनच लस मिळणार
https://www.loksatta.com/desh
https://www.loksatta.com/desh-videsh-news/international-media-targets-pm...
भित्रट मोदी
भित्रट मोदी
गेल्या वर्षी मोदीने एका सभेला 150 पोलीस रक्षणाला घेतले होते , सगळे कोविड होऊन गेलेले होते , म्हणजे अँटिबॉडी असलेले असतील , ह्या अपेक्षेने घेतले होते.
आणि भक्त ह्याला मास्टर स्ट्रोक म्हणत नाचत होते .आज ह्यांना ऑक्सिजन नाही अन बेड नाही.
आज ह्यांना ऑक्सिजन नाही अन
आज ह्यांना ऑक्सिजन नाही अन बेड नाही.>> त्यासाठी भक्ताडांनी अजुन नेहरूंना कसं जबाबदार धरलं नाही याचंच आश्चर्य वाटतंय
मुंबईत काल संध्याका ळपासून ४५
मुंबईत काल संध्याका ळपासून ४५+ लोकांसाठी ऑनलाइन बुकिंग पुन्हा सुरू झालंय. २० % वॉक इन. ८० % ऑनलाइन.
पण काल मला ओटीपीच आला नाही. आधीही अनेकदा असं झालं आहे.
कोविन अॅपमधल्या गोंधळासाठीही लोक मुंबई मनपालाच शिव्या घालताहेत. तर कमी डोसेस उपलब्ध असल्याबद्दल राज्य सरकारला शिव्या घालताहेत. राज्य सरकार आणि मनपा इत्यादिंनी लशींचा किती स्टॉक मिळतोय याबद्दल लोकांना सांगत राहायला पाहिजे. आणि हा कार्यक्रम आणखी काही महिने चालणार आहे, हेही.
ओटीपी आला नाही तर साईट ची
ओटीपी आला नाही तर साईट ची हिस्टरी क्लिअर करुन परत चेक करा, किंवा डेस्कटॉप वर असल्यास ब्राउजर बदलून.
तो व्हिडिओ पथेटिक आहे! हा
तो व्हिडिओ पथेटिक आहे! हा कसला scientist? If you knew the timing of the peak, why nothing was done to avoid it? उतू जाणाऱ्या दुधाकडे पहात रहाण्याचं काम दिलं होतं का? And he has no regrets for completely missing the peak values. If I was in his position, I would have cried and said sorry at least 10 times for wrong predictions. खरं बोलला तर फंडींग आणि पोझिशन दोन्ही जाईल अशी देहबोली आहे एकूण.
फोनमधून पहात होतो. असं
फोनमधून पहात होतो. असं आधीही झालंय.
खरं बोलला तर फंडींग आणि
खरं बोलला तर फंडींग आणि पोझिशन दोन्ही जाईल अशी देहबोली आहे एकूण.>> अगदी! चीड आली त्याला बघून. सॉरीची ही अपेक्षा नाही. गृहितकं, डेटा रोज बदलत असतो. तो नवा डेटा घेऊन, रोज मॉडेल मध्ये फरक करत, नंबर क्रंचिंग करणे अपेक्षित आहे. दोन महिन्यातुन एकदा शिळ्या माहितीवर आकडेमोड काय कामाची?
आणि चुकीचे निश्कर्ष आले, तर ते का? आणि त्यात काय सुधारणा केली हे सांगायचं का सरकार कसं बरोबर आहे याचा पाढा!
भरत, मलाही फोनमधून पाहताना
भरत, मलाही फोनमधून पाहताना ओटिपी येत नाही असा अनुभव आहे कोविनचा.
कोविनच्या साईटवर कधीही पाहिले
कोविनच्या साईटवर कधीही पाहिले तरीही १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी booked अस दाखवतं . आज सकाळी ७ वाजता चेक केली साईट तरीही booked ! नक्की कधी हे बुकिंग होते ?
बुकिंग ज्या ठिकाणी दिवसाचे
बुकिंग ज्या ठिकाणी दिवसाचे स्लॉट ज्या वेळी संपतात त्यावेळी एकदा चेक करणे
आता 9 वाजता पुण्यात 6 ठिकाणचे स्लॉट अपडेट झाले.
2-3 दिवस शांतपणे बघत राहिलं की पॅटर्न कळतो कोणत्या जागा केव्हा रिकाम्या ते.
संध्याकाळी साडेसातच्या
संध्याकाळी साडेसातच्या सुमारास स्लॉट ओपन करतात. ते काही सेकंदांत फुल होतात. मुंबई मनपाचे ट्विटर हँडल फॉलो करा. तिथे अपडेट्स मिळतात. इन्स्टावरही आहे.
काहीही समजलं नाही
ओके. समजलं भरत. थँक्स . Mybmc हँडल फॉलो करते.
मी अनु , धन्यवाद .
आपली अशी फाफे होतीय .
आपली अशी फाफे होतीय . गावातल्या पब्लिकचे हाल कुत्रा खात नसेल . तरीही मी बीजेपीलाच मत देणार!!
Pages