मुलाचे नाव सुचवा

Submitted by हेमदिप on 2 April, 2017 - 10:54

नमस्कार मित्रांनो,
मला माझ्या मुलाचे नाव काही अक्षरांवरून ठेवायचं आहे.
ता, दु, ज्ञा, झा अशी अक्षरं आहेत.कृपया यापैकी आपल्याला माहित असतील तशी नावे सुचवा.

धन्यवाद!

Group content visibility: 
Use group defaults

छान

ज्ञानल चे मंगल नावाच्या मुलीशी जुळणार आणि ते ही कार्यालयात. हलके घ्या.

छान आहे नाव आणि बाळास अनेकानेक आशीर्वाद.

नाव आवडलं.
मुलीचं नाव असते का हे?

ज्ञान + ल - असं ते तद्धित आहे. हा शब्द विशेषण असल्यामुळे मुलगा किंवा मुलगी, कुणालाही हे नाव वापरता येऊ शकतं. हाच नियम स्नेहल, शीतल, वत्सल - ह्या शब्दांनाही लागू होतो. ही नावे बऱ्याचदा मुलींनाच दिली गेली असली, तरी काही मुलांचीही ही नावे पाहिलेली आहेत.

छान नाव निवडलेत. अभिनंदन!

मला खरंतर दोन नावे सुचवायची होती पण मी खूप दिवसांनी आलो ना
So, it's too late Sad

१) याज्ञवल्क्य
२) दुरिताक्ष

Next time साठी असुदेत Wink

खरे तर , म्हणजे अगदी व्याकरणाच्या नियमांनुसार पाहिले तर स्नेहल, शीतल, वत्सल ह्या शब्दांची स्त्रीलिंगी रूपे स्नेहला, शीतला, वत्सला अशी व्हायला हवीत. पण चालतेय की नावे व्याकरणानुसार नाही ठेवली तरी.
प्रेमल- प्रेमला, निर्मल- निर्मला, मंजुल- मंजुला (मराठीमध्ये ल चा ळ)

(मराठीमध्ये ल चा ळ) >> प्रेमळा, वत्सळा ऐकिवात नाहीत. शीतळा (देवी), मंजुळा ऐकिवात आहेत.
स्त्रीलिंगी टाप् प्रत्यय (म्हणजे शेवटी आ लागणे) लागायला हवा, त्यामुळे तुमचा मुद्दा पटतोय. पण चालतंय की!

काही नावे केवळ आकारांत म्हणुन मुलींची ठेवली जातात जरी तो शब्द पुल्लिंगी असेल तरी.
उदा: तारा, हीरा
ता वरून मी तारा हे नाव सुचवणार होतो मुलाचे.
अर्थात कोणी ठेवणार नाही.

काही नावे केवळ आकारांत म्हणुन मुलींची ठेवली जातात जरी तो शब्द पुल्लिंगी असेल तरी.>>>
सवितृ शब्द पुल्लिंगी आहे त्याचे तृतिया एकवचन सविता म्हणजे सूर्य. हे मुलींसाठी पहायला मिळते.

इथे मी सविता टाइप केले की पुढे लगेचच ऑटोकरेक्टने भाभी सुचवले.. Happy

Hi we have sardaar Tara Singh in Mulund West. Used to be our area representative

इथे मी सविता टाइप केले की पुढे लगेचच ऑटोकरेक्टने भाभी सुचवले >> Lol Lol Lol

मागे कुणीतरी कार्यकर्ता चं स्त्रीलिंग कार्यकर्ती नसून कार्यकर्त्री पाहिजे असं सांगितलं होतं. अभिनेता - अभिनेत्री त्याप्रमाणे. तृ+इ = त्री हा नियम आहे म्हणे. त्यानुसार सविता भाभीचं सवित्री (सावित्री नाही - ती एकपतिपरायण असते) भाभी असं नामकरण करावं अशी जागतिक चळवळ उभी करायला हवी.

रश्मिन (न अर्धा) हे नाव पुंलिंगीच आहे. त्याचे प्रथमा एकवचन रश्मी हेही पुंलिंगी आहे.

ज्ञानल छान नाव.

झ वरून झंकार कोणीतरी वर लिहिलं आहे, ते आवडतं मला. गावी शेजारच्यांच्या मुलाचे नाव आहे पण मला पटकन आठवलं नाही हे.

सवितृ चे तृतीया एकवचन नसावे ते. प्रथमा एकवचन असावे. >> हो बरोबर. प्रथमाच आहे. त्याचं तृ. एव. 'सवित्रा' असं होतं.

सवित्री : याला काही विशेष संदर्भ आहे का? (माझे सामान्य ज्ञान जरा जास्तच कच्चे आहे; खरच.)

मानव, अहो मूळ संदर्भ सविता भाभींचाच होता. पण सविता हे पुल्लिंगी नाव असल्यामुळे (संदर्भ - पहा वरील चर्चा, आणि तसलेच इतर शब्द दाता, नेता, कर्ता वगैरे) त्याचं स्त्रीलिंगीकरण करणं ही आपल्यावर राष्ट्रीय जबाबदारी येऊन पडली. त्यासाठी व्याकरणाचा अथक अभ्यास करून सवित्री हे नाव सुचवण्यात आलं आहे.

चंद्रीका असते पण सूर्यीका नसते. हीरा Happy हे उगाच आपलं.
राष्ट्रीय जबाबदारी Lol
मला तर निरंजनी नाव असलेली मुलगी(पार्वती?) असते हेही कुणी तरी सांगितले. अस्मित नाव गुजराती भाषेत मुलांमध्ये असतं तसं ! काय अर्थ आहे कुणाला माहिती !!

गुजराती लोक हे नाव ' अश्मित ' असे ठेवतात. उच्चारताना त्यांच्या सवयीप्रमाणे अस्मित म्हणतात. त्यांनी ( ओढून ताणून) लावलेला अर्थ असा: अश्म म्हणजे खडा. (गुजरात्यांसाठी मौल्यवान खडा.) प्रेशिअस स्टोन. त्यानुसार अश्मित म्हणजे अश्मांनी मढलेला. रत्नजडित.
पुष्पित, गंधित, अंकित वगैरेंसारखे

Pages