मुलाचे नाव सुचवा

Submitted by हेमदिप on 2 April, 2017 - 10:54

नमस्कार मित्रांनो,
मला माझ्या मुलाचे नाव काही अक्षरांवरून ठेवायचं आहे.
ता, दु, ज्ञा, झा अशी अक्षरं आहेत.कृपया यापैकी आपल्याला माहित असतील तशी नावे सुचवा.

धन्यवाद!

Group content visibility: 
Use group defaults

आता नावाच्या अर्थाचा विषय निघालाच आहे तर माबोवरील प्रसिद्ध 'ऋन्मेष' नावाचा काय अर्थ असेल? आणि तेसुद्दा
ऋन्मेssष..

नाव भारदस्त असे. मग कोणत्या का अक्षाराने सुरू होईना.. उदा.
हरदनहळ्ळी हरपनहळ्ळी दोड्डेगौडा देवेगौडा.

अशा भारदस्त नावाचे बालक पुढे ध्यानी मनी नसताना झोपेतही सर्वोच्च स्थानी जाऊ शकते.

हरदनहळ्ळी हरपनहळ्ळी दोड्डेगौडा देवेगौडा >> असं कुणी सर्वोच्च स्थानावर गेल्याचं ऐकिवात नाही. माझ्या माहितीत एक 'हरदनहळ्ळी दोड्डेगौडा देवेगौडा' होते, जे पंतप्रधान झाले होते.

ज्ञानल हे नाव इंग्रजीत कसे लिहिणार? (उदा. पासपोर्टवर) आणि ते वाचणारा त्याचा उच्चार कसा करणार, याबद्दल उत्सुकता आहे.

देवेगौडा यांच्या नावात गावाचे पण नाव आहेना. साउथमध्ये (का फक्त कर्नाटकमध्ये) काही ठिकाणी गावाचे नाव पण नावात लावायची पद्धत आहे असं ऐकून आहे.

इतकी वर्षे भारतात राहून इंग्रज काहीच शिकले नाहीत, लिपी सुधारावी, नवीन उच्चार शिकावे असे त्यांना वाटले नाही. फुकट घालवले त्यांनी इथले वास्तव्य.

देवेगौडा यांच्या नावात गावाचे पण नाव आहेना >> हरदनहळ्ळी हे त्यांच्या गावाचं नाव, दोड्डेगौडा हे वडिलांचं नाव आणि देवेगौडा त्यांचं नाव. नो आडनाव.

धन्यवाद हरचंद.

हरपनहळ्ळी >>> हे कदाचित आजोबांचे किंवा आजोळच्या गावाचे असेल का नाव. तुम्ही तीन नावांबद्दल माहिती दिलीत म्हणून उत्सुकता.

दक्षिणेत बहुतेक सर्वांच्याच पूर्ण नावामध्ये प्रथम गावाचे नाव किंवा आद्याक्षर, मग वडिलांचे नाव किंवा आद्याक्षर आणि शेवटी स्वतः चे पूर्ण नाव असे लिहिण्याची पद्धत असते.

अच्छा thank u हरचंद. तुम्ही सांगितलेलं नाव आणि त्याचा पूर्ण अर्थ तुम्ही आधीच दिलाय.

हिरा thank u.

Pages