Submitted by हेमदिप on 2 April, 2017 - 10:54
नमस्कार मित्रांनो,
मला माझ्या मुलाचे नाव काही अक्षरांवरून ठेवायचं आहे.
ता, दु, ज्ञा, झा अशी अक्षरं आहेत.कृपया यापैकी आपल्याला माहित असतील तशी नावे सुचवा.
धन्यवाद!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
फायनली काय नाव ठेवले मुलाचे?
फायनली काय नाव ठेवले मुलाचे? >>>>>>ज्ञानल
सर्व मायबोलीकरांचे खूप खूप
सर्व मायबोलीकरांचे खूप खूप धन्यवाद!
छान
छान
ज्ञानल छान आहे
ज्ञानल छान आहे
ज्ञानल चे मंगल नावाच्या
ज्ञानल चे मंगल नावाच्या मुलीशी जुळणार आणि ते ही कार्यालयात. हलके घ्या.
छान आहे नाव आणि बाळास अनेकानेक आशीर्वाद.
नाव आवडलं.
नाव आवडलं.
मुलीचं नाव असते का हे?
ज्ञान + ल - असं ते तद्धित आहे
ज्ञान + ल - असं ते तद्धित आहे. हा शब्द विशेषण असल्यामुळे मुलगा किंवा मुलगी, कुणालाही हे नाव वापरता येऊ शकतं. हाच नियम स्नेहल, शीतल, वत्सल - ह्या शब्दांनाही लागू होतो. ही नावे बऱ्याचदा मुलींनाच दिली गेली असली, तरी काही मुलांचीही ही नावे पाहिलेली आहेत.
छान नाव निवडलेत. अभिनंदन!
मला खरंतर दोन नावे सुचवायची
मला खरंतर दोन नावे सुचवायची होती पण मी खूप दिवसांनी आलो ना
So, it's too late
१) याज्ञवल्क्य
२) दुरिताक्ष
Next time साठी असुदेत
झा वरून झांगडगुत्ता हेच
झा वरून झांगडगुत्ता हेच आठवतंय नाव.
१) याज्ञवल्क्य, २) दुरिताक्ष
१) याज्ञवल्क्य, २) दुरिताक्ष >> फारच प्रगल्भ नावं आहेत!
खरे तर , म्हणजे अगदी
खरे तर , म्हणजे अगदी व्याकरणाच्या नियमांनुसार पाहिले तर स्नेहल, शीतल, वत्सल ह्या शब्दांची स्त्रीलिंगी रूपे स्नेहला, शीतला, वत्सला अशी व्हायला हवीत. पण चालतेय की नावे व्याकरणानुसार नाही ठेवली तरी.
प्रेमल- प्रेमला, निर्मल- निर्मला, मंजुल- मंजुला (मराठीमध्ये ल चा ळ)
(मराठीमध्ये ल चा ळ) >>
(मराठीमध्ये ल चा ळ) >> प्रेमळा, वत्सळा ऐकिवात नाहीत. शीतळा (देवी), मंजुळा ऐकिवात आहेत.
स्त्रीलिंगी टाप् प्रत्यय (म्हणजे शेवटी आ लागणे) लागायला हवा, त्यामुळे तुमचा मुद्दा पटतोय. पण चालतंय की!
काही नावे केवळ आकारांत म्हणुन
काही नावे केवळ आकारांत म्हणुन मुलींची ठेवली जातात जरी तो शब्द पुल्लिंगी असेल तरी.
उदा: तारा, हीरा
ता वरून मी तारा हे नाव सुचवणार होतो मुलाचे.
अर्थात कोणी ठेवणार नाही.
काही नावे केवळ आकारांत म्हणुन
काही नावे केवळ आकारांत म्हणुन मुलींची ठेवली जातात जरी तो शब्द पुल्लिंगी असेल तरी.>>>
सवितृ शब्द पुल्लिंगी आहे त्याचे तृतिया एकवचन सविता म्हणजे सूर्य. हे मुलींसाठी पहायला मिळते.
इथे मी सविता टाइप केले की पुढे लगेचच ऑटोकरेक्टने भाभी सुचवले..
Hi we have sardaar Tara Singh
Hi we have sardaar Tara Singh in Mulund West. Used to be our area representative
इथे मी सविता टाइप केले की
इथे मी सविता टाइप केले की पुढे लगेचच ऑटोकरेक्टने भाभी सुचवले >>
मागे कुणीतरी कार्यकर्ता चं स्त्रीलिंग कार्यकर्ती नसून कार्यकर्त्री पाहिजे असं सांगितलं होतं. अभिनेता - अभिनेत्री त्याप्रमाणे. तृ+इ = त्री हा नियम आहे म्हणे. त्यानुसार सविता भाभीचं सवित्री (सावित्री नाही - ती एकपतिपरायण असते) भाभी असं नामकरण करावं अशी जागतिक चळवळ उभी करायला हवी.
:haahaa:
रश्मिन (न अर्धा) हे नाव
रश्मिन (न अर्धा) हे नाव पुंलिंगीच आहे. त्याचे प्रथमा एकवचन रश्मी हेही पुंलिंगी आहे.
एक वत्सल शेठ आहे. आज मुंबई
एक वत्सल शेठ आहे. आज मुंबई टाइम्स मध्ये त्याच्या वर आर्टी कल दिसले.
ज्ञानल छान नाव.
ज्ञानल छान नाव.
झ वरून झंकार कोणीतरी वर लिहिलं आहे, ते आवडतं मला. गावी शेजारच्यांच्या मुलाचे नाव आहे पण मला पटकन आठवलं नाही हे.
सवितृ चे तृतीया एकवचन नसावे
सवितृ चे तृतीया एकवचन नसावे ते. प्रथमा एकवचन असावे.
सवितृ चे तृतीया एकवचन नसावे
सवितृ चे तृतीया एकवचन नसावे ते. प्रथमा एकवचन असावे. >> हो बरोबर. प्रथमाच आहे. त्याचं तृ. एव. 'सवित्रा' असं होतं.
हो.
हो.
धन्यवाद हर्पा.. विसरलं
धन्यवाद हर्पा.. विसरलं संस्कृत
सविता भाभीचं सवित्री
सवित्री : याला काही विशेष
सवित्री : याला काही विशेष संदर्भ आहे का? (माझे सामान्य ज्ञान जरा जास्तच कच्चे आहे; खरच.)
मानव, अहो मूळ संदर्भ सविता
मानव, अहो मूळ संदर्भ सविता भाभींचाच होता. पण सविता हे पुल्लिंगी नाव असल्यामुळे (संदर्भ - पहा वरील चर्चा, आणि तसलेच इतर शब्द दाता, नेता, कर्ता वगैरे) त्याचं स्त्रीलिंगीकरण करणं ही आपल्यावर राष्ट्रीय जबाबदारी येऊन पडली. त्यासाठी व्याकरणाचा अथक अभ्यास करून सवित्री हे नाव सुचवण्यात आलं आहे.
सूर्यचं सूर्यी होईल काय? !
सूर्यचं सूर्यी होईल काय? !
जसं चंद्रचं चंद्री...
चंद्रीका असते पण सूर्यीका
चंद्रीका असते पण सूर्यीका नसते. हीरा हे उगाच आपलं.
राष्ट्रीय जबाबदारी
मला तर निरंजनी नाव असलेली मुलगी(पार्वती?) असते हेही कुणी तरी सांगितले. अस्मित नाव गुजराती भाषेत मुलांमध्ये असतं तसं ! काय अर्थ आहे कुणाला माहिती !!
गुजराती लोक हे नाव ' अश्मित '
गुजराती लोक हे नाव ' अश्मित ' असे ठेवतात. उच्चारताना त्यांच्या सवयीप्रमाणे अस्मित म्हणतात. त्यांनी ( ओढून ताणून) लावलेला अर्थ असा: अश्म म्हणजे खडा. (गुजरात्यांसाठी मौल्यवान खडा.) प्रेशिअस स्टोन. त्यानुसार अश्मित म्हणजे अश्मांनी मढलेला. रत्नजडित.
पुष्पित, गंधित, अंकित वगैरेंसारखे
Pages