Submitted by ------ on 30 April, 2021 - 21:39
गरज ही शोधांची जननी आहे. आपल्याला अनेक साध्या साध्या गोष्टींसाठी काही तरी शोध लागायला हवा होता असे वाटते. नंतर आपण ते विसरून जातो. अशा ( साध्या वाटणा-या ) शोधांबद्दल चर्चा करूयात.
मला प्राण्यांची भाषा समजण्यासाठी एखादं ट्रान्सलेटर किंवा अॅप बनलं तर हवं आहे.
चित्रपट बघताना खाद्यपदार्थ स्क्रीनवर आले / फोटो घेतले तर त्यांचा वासही आला पाहीजे असा शोध लागावा असे वाटते.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अशी वाटी बनली पाहिजे की
अशी वाटी बनली पाहिजे की त्यातला आमरस कितीही खाल्ला तरी संपू नये.
मी व्यायाम न करता आपोआप
मी व्यायाम न करता आपोआप व्यायाम होणारे app हवे. बायसेप , ट्रायसेप, पुश अप ..
स्वयंपाक मेन्यू फिड केला की द्रौपदीच्या थाळीप्रमाणे सगळे तयार व्हायला हवे.
बोकलत.... ते या थाळीत मिळेल.
त्या वासाच्या मशीनचा शोध
त्या वासाच्या मशीनचा शोध पूर्वीच लागलेला आहे. पिझ्झा ऑर्डर करताना त्याचा वास जोखून तुम्ही ठरवू शकता - अशी योजना होती. फारसे लोकप्रिय झाले नाही. कदाचित उपयुक्ततेच्या मानाने फारच महाग असावे.
माणसासाठी सुखसोयीचे पण
माणसासाठी सुखसोयीचे पण निसर्गाला हानीकारक असे शोध नष्ट व्हावेत असा शोध लागावा.
मानवजात एका क्षणात वेदनारहीत
मानवजात एका क्षणात वेदनारहीत नष्ट व्हावी
^^ आमच्यात पेनलेस नावाची जात
^^ आमच्यात पेनलेस नावाची जात येईल
समोरच्या व्यक्तीच्या मनात काय
समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे अचूक ओळखता येणार एखादं मशीन..
रात्री ज्या वेळी पाहिजे त्या वेळी बरोबर झोप आणणारे आणि सकाळी पाहिजे तेव्हा आपोआप झोपेतून जागे करणारे एखादे मशीन ते सुद्धा अजिबात आळस न वाटता आणि दिवसभर झोप न येता फ्रेश ठेवणारे..
कितीही खाल्ल आणि काहीही workout नाही केलं तरी जाड न होणारे मशीन..
महत्वाचे सगळे एकदा वाचले तरी सुद्धा चांगले लक्षात राहील अशी काहीतरी सोय..
1. एखादी गोष्ट (प्रसंग,
1. एखादी गोष्ट (प्रसंग, व्यक्ती, वस्तू, ध्यास, अनुभव इत्यादी काहीही) मनातून काढणारे किंवा मनात भरणारे यंत्र
2. आपणहून दुरुस्त होतील अशी उपकरणे (जसे आपले शरीर जखम बरी करते)
ब्रेन स्टोर मधून वाईट आठवणी
ब्रेन स्टोर मधून वाईट आठवणी,मान-अपमानाचे प्रसंग , आयुष्यातून निघुन गेलेली माणसे हे सगळे रोजच्या रोज वाहत्या धाग्यासारखे डिलिट करणारे यंत्र.
पा आ, तुम्ही तुमच्या जगातून
पा आ, तुम्ही तुमच्या जगातून किंवा वेगवेगळ्या मितीत फिरून सर्व्हे करताय का? कुठेतरी ओसाड ठिकाणी अशी जास्त मागणी असलेली गेझेट्स टाका मग.
मला घरात/ ऑफिस मध्ये असं मशीन हवंय की त्यात सापडत नसलेल्या वस्तूच नाव टाकलं की जीपीएस द्वारे ती वस्तू कुठल्या कोपऱ्यात धूळ खात पडलीय तीचं लोकेशन दिसावं.
रोजच्या पौष्टिक आहाराची गरज भागेल अशी बटणं प्रेस केली मावेसारखी की कोफी मेकर, टी मेकर असतो तसा टॅबलेट मेकर हवा, ती ब्रेकफास्ट, लचं, डिनर ला फक्त गोळी खायची.
बाकी मग टाईमपास म्हणून वडापाव, दाभेली , भेळ असलं खायचं.
Doremon चं असतं तसलं एनिव्हेअर डोअर हवंय. फोल्डिंगचं. सकाळी मस्त डोंगरावर ,कधी बीचवर योगा नाहीतर walking करायचं, दुपारी हिमालय किंवा बर्फाळ प्रदेशात एक चक्कर मारून यायची अँड so on ...
उगीच स्वप्नरंजन नुसतं
हवं ते हवं तेवढं हवं तेव्हा
हवं ते हवं तेवढं हवं तेव्हा खाऊन, कसलाही व्यायाम, अंग मेहनत न करून वजन आणि फिगर मेंटेन करता येत नाही हे लोकांना समजवून आणि वळवून देणाऱ्या कॅप्सूलचा शोध लागायला हवा.
लोकं वाटेल तसं पार्किंग करतात
लोकं वाटेल तसं पार्किंग करतात. त्यांची गाडी उचलून धड लावणारे मशीन हवे. (ह्या मशीनने कुणाची गाडी 'टो' नको व्हायला. पण मशीनने नीट व्यवस्थित गाड्या लावल्या तर माणसं जसं ५ पार्किंग चौकटीत ४ गाड्या करतात तसं होणार नाही.)
माणसाच्या मनात कॄर भावना येऊ
माणसाच्या मनात कॄर भावना येऊ नये असे औषध. त्यामुळे हकनाक कोणी दुसर्यांचे जीवन संपवणार नाही.
स्त्रीयांबाबतीत होणारे वाईट अपराध होऊ नये याकरता औषध.
मला घरात/ ऑफिस मध्ये असं मशीन
मला घरात/ ऑफिस मध्ये असं मशीन हवंय की त्यात सापडत नसलेल्या वस्तूच नाव टाकलं की जीपीएस द्वारे ती वस्तू कुठल्या कोपऱ्यात धूळ खात पडलीय तीचं लोकेशन दिसावं.
नवीन Submitted by वर्णिता on 1 May, 2021 - 19:15
>>
https://www.imore.com/best-alternatives-apple-airtag
हवं ते हवं तेवढं हवं तेव्हा
हवं ते हवं तेवढं हवं तेव्हा खाऊन, कसलाही व्यायाम, अंग मेहनत न करून वजन कमी करणारे मशीन हवंय.
मानव यांच्या शब्दांची उसनवारी केलीय.
एखादा सिनेमा डोक्यात भरून
एखादा सिनेमा डोक्यात भरून देणारं यंत्र हवं. म्हणजे असं की त्या यंत्रात सिनेमाची डीव्हीडी (किंवा पेन ड्राइव्ह) घातली कि यंत्रात तो सिनेमा लोड होणार. मग त्या यंत्राचा बेल्ट किंवा हेल्मेट आपल्या डोक्याला लावला की दोन तीन मिनिटांत आपल्या डोक्यात सिनेमा लोड. मग आपल्याला तो पाहिल्यासारखेच वाटणार.
दोन अडीच तास कोण बघत बसणार
… लावला की दोन तीन मिनिटांत
… लावला की दोन तीन मिनिटांत आपल्या डोक्यात सिनेमा लोड.>>अभ्यासाचे पुस्तक वाचून डोळे मिटायला लागले कि ते पुस्तक तसेच डोक्यावर ठेवावे आणि पुस्कातले ज्ञान आपोआप डोक्यात उतरावे असे वाटायचे
ते अद्रुश्य व्हायचा शोध
ते अद्रुश्य व्हायचा शोध नेहमीच फॅन्टसी राहिली आहे शालेय जीवनापासून.
आणि अद्रुश्य होऊन पहिला काय करायचे तर आपल्या आवडतय मुलीच्या आजूबाजूला घुटमळत राहायचे हे ठरलेलेच होते.
आणि अद्रुश्यही असे तसे नाही तर भुतासारखे कश्याच्याही आरपार जाता यायला हवे.
दुसरा शोध (किंवा ईच्छा म्हणा
दुसरा शोध (किंवा ईच्छा म्हणा) म्हणजे आयुष्यात कधी काम करायची गरज पडली नाही पाहिजे.
एखाद्या सुंदर मुलीचा जन्म घेतला असता तर कदाचित हे शक्यही झाले असते. पण पुरुषाच्या जन्मात शक्य नाही. तरीही कोणीतरी मला आयते पोसावे आणि सोबत अर्थात व्यक्तीस्वातंत्र्यही हवेच हे माझे एक स्वप्न आहे. सध्या कुठलीही महत्वाकांक्षा नसूनही नाईलाजाने पोटापाण्यासाठी जॉब करावा लागतोय.
हनुमानासारखे हवे तेव्हां
हनुमानासारखे हवे तेव्हां सूक्ष्म होता यायला हवे. (विशाल नको). अगदी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमधे सर्जन (शल्यविशारद) सूक्ष्म रूप धारण करून थेट रक्तवाहिनिआत प्रवेश करून ब्लॉकेज काढू शकतील अथवा शस्त्रक्रिया करू शकतील.
राभू, नॅनो टेक्नॉलॉजी
राभू, नॅनो टेक्नॉलॉजी
हनुमानासारखे हवे तेव्हां
हनुमानासारखे हवे तेव्हां सूक्ष्म होता यायला हवे.>>+१
Cosmos: A Spacetime Odyssey या documentary मधे जसे एका कॅप्सूल मधे बसून सर्वात मोठा तारा ते अगदी अणू-रेणू बघता येणे आणि कोणत्याही काळात, कुठेही जाणे दाखविले आहे तसे करता यायला हवे.
माफक दरात सोलर,बॅटरी,वीज वर
माफक दरात सोलर,बॅटरी,वीज वर चालणारी खुर्ची,म्हणजे जेष्ठ नागरिक कुणावरही अवलंबून न राहता जवळपास फिरून ,कामं वगैरे करून येऊ शकतील
तजो अशा व्हील चेअर्स उपलब्ध
तजो अशा व्हील चेअर्स उपलब्ध आहेत. किंमत बाजूला ठेवा, पण आपले रस्ते, बेशिस्त ट्राफिक आणि गर्दी यामुळे ती असूनही वापरणे किती प्रॅक्टिकेबल आहे?
सोबत चांगले, रस्ते, शिस्तबद्ध ट्राफिक, व्हील चेअर लेन वगैरेही लागेल.
हो ते तर आहेच
हो ते तर आहेच
पण जेव्हा जड सामान वगैरे स्वतः घेऊन जाणारे,किंवा दुसऱ्यांवर अवलंबून राहणारे वृद्ध पाहिले की अशी सोपी ,सुटसुटीत वाहने हवीत असे वाटते
मस्त धागा आहे...
मस्त धागा आहे...
एखादा परकीय चित्रपट पाहताना असे ऍप हवे की आपोआप आपल्याला हव्या त्या भाषेत ट्रान्सलेट होईल. म्हणजे आत्ता कसे फक्त डब झालेले चित्रपट हव्या त्या भाषेत पाहता येतात बाकीच्यांसाठी subtitles शिवाय पर्याय नाही. खूप सुंदर भारतीय आणि परदेशीय चित्रपटांचा आस्वाद मनमुराद घेता येईल. Subtitles मध्ये मजा येत नाही आणि खूप जुने classic चित्रपट असे आहेत ज्यांना दोन्ही सोई नाहीत.
मला हिस्टरी वाचायचा कंटाळा
मला हिस्टरी वाचायचा कंटाळा येतो त्यामुळे इतिहास पाहता यायला हवा असं वाटतं राहते. म्हणजेच ज्या वेळी ज्या काळात जावं वाटल तिथे फेरफटका मारता यायला हवा..तो एक movie पण होता यावर ऐश्वर्या आणि अक्षय होते बहुतेक त्यात. Time travel..
आज जर हडप्पा च्या नोट्स वाचायच्या असतील तर दिवसभर मस्त तिकडे फेरफटका मारून यायचा मग आपण काय वाचतोय ते नक्की समजेल..शिवाजी महाराजांच्या काळात पण राहता येईल दोन तीन दिवस.. मस्त वाटेल.
डोक्यात logic तयार असेल तर
डोक्यात logic तयार असेल तर आपोआप script लिहून व्हावी, debug run etc आपोआप व्हावे
AI मुळे कदाचित हे शक्य होईल
किल्ली, वैतागलेल्या डेवलपरचे
किल्ली, वैतागलेल्या डेवलपरचे प्रतिनिधिक विचार हो पण याची गरज आहे व प्रोगामिंग चे आयाम बदलतील. येणारा भविष्यकाळ मशीन लर्निंग ने टेक ओव्हर केलेलं असेल.
यदाकदाचित पुढे चार्जिंगवाला
यदाकदाचित पुढे चार्जिंगवाला/विनाचार्जिंगवाला चष्मा.
असा चष्मा ज्यावर नंबर डायल असेल, जो नंबर सेट करु त्याप्रमाणे चष्मा नंबर अॅडजस्ट करेल
Pages