`हद कर दी आपने!`

Submitted by पराग र. लोणकर on 26 April, 2021 - 04:25

`हद कर दी आपने!` हा माझ्या आवडत्या चित्रपटांतील एक चित्रपट!

कदाचित माझं वरील वाक्य खूपच धाडसाचं असणार आहे. जरासं भीतभीतच मी ते लिहितोय. पण ज्या अर्थी माझ्या अतिशय आवडत्या चित्रपटांमध्ये संजीव कुमार-रेहाना सुलतानचा दस्तक (१९७०), अमिताभ-नूतनचा सौदागर (१९७३), संजीव कुमार-शर्मिला टागोरचा मौसम (१९७५), जितेंद्रचा परिचय (१९७२), राखी+रेखा आणि शशी कपूरचा बसेरा (१९८१) यांसारखे काही हिंदी चित्रपट, Valkyrie (२००८), A Few Good Men (१९९२), Fracture (२००७) यासारखे काही इंग्रजी चित्रपट आहेत, त्या अर्थी माझं डोकं तसं शाबूत असल्याची मला खात्री असल्यानं मी हे धाडसी विधान करत आहे. हे मी आत्ता उल्लेख केलेले सात-आठ चित्रपट कधीही एखाद्या वाहिनीवर लागलेले दिसले की ते मी पुन्हा पुन्हा संपूर्ण पाहू शकतो. (यापैकी दस्तक हा मात्र मला अजून फक्त एकदाच पहावयास मिळालेला आहे.) अर्थात दैनंदिन नोकरी-व्यवसायातील व्यस्ततेमुळे प्रत्येक वेळी आवडते चित्रपट संपूर्ण पाहणे हे कुणालाच शक्य नसतं.

असे हे अतिशय दर्जेदार चित्रपट आवडत असताना मला काही असेही चित्रपट आवडतात जे संपूर्णत: डोकं बाजूला ठेवून पाहिले तर आवडू शकतात (म्हणजे मला तरी आवडतात.) `हद कर दी आपने` हा असाच एक चित्रपट!

एखाद्या चित्रपटावर चार ओळी लिहिण्याची ही माझी पहिलीच वेळ, पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे कृपया चूक-भूल माफ असावी. (आणि त्यामुळेच वाचकाचा फार वेळ जाणार नाही इतकंच लिहिलंय.)

संजय नावाच्या मित्राच्या बायकोवर पाळत ठेवण्यासाठी राजू (गोविंदा) युरोप ट्रीपवर जातो आणि मग ज्या गमती जमती होतात त्या या चित्रपटात दाखवल्या आहेत. यातील बहुतेक गमती-जमती इतक्या वेडसर आहेत, इतक्या तर्कहीन आहेत, की त्यामुळेच हा चित्रपट आवडतो असे म्हणणे मला खूपच धाडसाचे वाटते. पण तरीही हे धाडस करायचा वेडेपणा मीही करतोय.

चित्रपटात कलाकारांची बऱ्यापैकी गर्दी आहे आणि गोविंदा आणि राणी मुखर्जी यांच्याबरोबरच बाकीचे बहुतेक सगळे कलाकार संपूर्ण चित्रपट दिसत राहतात. डोके अक्षरश: बाजूला ठेवून बघण्यासारखे चित्रपटात बरेच प्रसंग आहेत. गोविंदाचा मित्र त्याच्या घरी आल्यानंतर गोविंदाचे दाखवलेले कुटुंब, गोविंदा आणि राणी मुखर्जी यांचा विमानातील प्रसंग, गोविंदाने t.v.च्या आतमध्ये शिरून म्हटलेले गाणे असे काही प्रसंग (मला तरी) प्रचंड हसायला लावतात, आणि चांगलेच मनोरंजन करतात.

या चित्रपटातील काही गाणी अगदी बघण्यासारखी आहेत. ती बघण्यासारखी आहेत आणि किंबहुना कदाचित त्यामुळेच ऐकण्यासारखीही! आपल्यालाही ही गाणी फ्रेश करतात.

चित्रपटातील युरोपचे दर्शन अगदी सुखावणारे आहे. गोविंदाने वेळोवेळी स्वत:च्या हिमतीवर संपूर्ण चित्रपट मनोरंजक करण्याचे काम केले आहे. अनेकदा त्याला नायिके ऐवजी कादर खान या सशक्त अभिनेत्याची साथ मिळाली आहे. येथे राणी मुखर्जी या गुणी अभिनेत्रीने गोविंदाच्या बरोबरीने अतिशय सुंदर काम केले आहे. संपूर्ण चित्रपटातील या दोघांचा वावर आणि या दोघांना पाहणे सुखद अनुभव वाटतो.

एकूण मला हा चित्रपट आपले डोके बाजूला ठेवून धमाल मनोरंजन करणारा time pass चित्रपट वाटतो.

***

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

गोविंदा माझा आवडता नट आहे
त्याचे comedy movies मी कितीही वेळा पाहू शकते
गोविंदा कादर खान ही जोडी तर अफलातून आहे

हद कर दी आपने..माझा ही आवडता सिनेमा.. जितक्या वेळा टिव्हीवर लागतो.प्रत्येक वेळी पाहताना मला तितकेच हसू येते.गाणी पण आवडतात सगळी.

एकूण मला हा चित्रपट आपले डोके बाजूला ठेवून धमाल मनोरंजन करणारा time pass चित्रपट वाटतो. >> +१

गाढव बाल्कनीत जाण्याचा प्रसंग सगळ्यावर कळस आहे Lol

हा हा ...या चित्रपटाचा धागा निघेल असं वाटलं नव्हतं. मला आधी आवडायचा नाही हा पण एकदा असंच टीपी म्हणून बघत बसले तर बघणेबल आहे तसा कारण गोविंदाचे टोटल येडचाळे आहेत. आणि जोडीला सतीश कौशिक. राणी पण आवडलेली तेव्हा फारच बोल्ड वाटली होती. ओय राजू गाणं आवडतं.
हो तो गाढवाचा सीन फारच हहपुवा आहे Lol

मला अजिबात आवडत नसलेला चित्रपट. गोविंदा एक चांगला कलाकार आहे. त्याचे राजा बाबू,कूली नं 1, साजन चले ससुराल,हिरो नं 1,हसीना मान जायेगी,बडे मियाँ छोटे मियाँ हे कधीही आणि कितिही वेळा पाहू शकते.

पण हा नाही. हा चित्रपट ओढून ताणून कॉमेडी वाटतो. गोविंदाला न झेपणारं इंग्रजी संवाद आणि फक्त कॉमेडी साठी टाइप्कास्ट नाही आवडले. डीडीएलजे मुळे प्रसिध्द झालेले युरोप उगाच घेतले आहे. कथेत फारसा दम नाही त्यामूळे एकटा गोविंदा इतकी पात्र रंगवतो. इतर पात्र वाया घालवली आहेत हे माझे वैयक्तिक मत आहे. पुन्हा वाद नको.

अगदी अगदी !!! कादर खान - जॉनी लिवर - गोविंदा ह्या त्रिकुटाचे चित्रपट अक्षरशः स्ट्रेस बस्टर असायचे. डोके बाजूला ठेवून बघण्यासारखे अगदी हाच वाक्प्रचार मी वापरायचो. वेडपट विनोद (Silly Comedy) ची खरंच हद्द आहे. बनारसी बाबू, राजा बाबू, दुल्हे राजा एकापेक्षा एक आहेत Lol

>> गोविंदाने t.v.च्या आतमध्ये शिरून म्हटलेले गाणे mhnje
>> गाढव बाल्कनीत जाण्याचा प्रसंग
Lol
हद कर दी मधला हा एक प्रसंग अजूनही मला तितकाच हसवतो:
https://www.youtube.com/watch?v=iAYQ-Im0YNA&t=2494s

"गाढव बाल्कनीत जाण्याचा प्रसंग सगळ्यावर कळस आहे" - मंदार, त्यापेक्षा मला तुझ्या मेमरी ला दाद द्यावीशी वाटली. तुला काहीही आठवतंय. Happy

मायबोलीवर अतिशय चोखंदळ वाचक आणि उत्तम लेखक असतात. सडेतोड प्रतिक्रिया देणारी जाणकार मंडळी असतात. अश्या मंचावर हा विषय आणि हा चित्रपट - यांविषयी चार ओळी लिहायची खरंच खूप भीती वाटत होती. पण आपण सर्वांनी या चार ओळी वाचल्या, त्यांवर प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद! शिवाय माझ्याप्रमाणेच आपल्यातील अनेकांना हा चित्रपट आवडतो हेही समजून गेले.

मी अजून पाहिला नाही. पण ओय राजू गाणं खूप आवडतं. माझा अश्या यादीत गोलमाल रिटर्न्स आणि वेलकम (१) आहे.
बिन्धास्त लिहा हो. सध्याच्या काळात कोणताही मनाला आनंदी करणारा,हसवणारा कंटेट सर्वांनाच हवा आहे.
एकदा गोलमाल रिटर्न्स, नो एन्ट्री, वेलकम बद्दल लिहायचं आहे.
इद के छुटी का मुहुर्त निकालेंगे. सलमान का पिच्चर और मेरा लेख एकही टाईम.

माझा हा लेख - लेख category मध्ये मलाच दिसत नाहीये. कालपर्यंत तो तिथे दिसत होता. (माझ्या या मंचाबाबतच्या अज्ञानाबद्दल क्षमस्व!) मला माझ्या नावामध्ये जाऊन लेखन विभागात जाऊन पाहावा लागतोय. स्वत:च्या नावाला login न करता हा लेख कुठे आणि कसा पाहायचा?

मला वाटते तुम्ही हे करून पहा. धागा एडिट मध्ये जाऊन:

Group content visibility:
Public - accessible to all site users

बाय द वे लॉगिन न करता सुद्धा दिसतोय हा धागा लिंक शेअर केल्यास:
https://www.maayboli.com/node/78675

तुम्ही ललित लेख विभागात टाकला होता. प्रशासकांनी चित्रपट विभागात हलवला आहे. https://www.maayboli.com/node/2205
तुम्ही त्या ग्रुपचे सदस्यत्व घेतले नसेल तर नवीन लेखनात तुम्हांला दिसणार नाही.

ओये राजू प्यार ना करीयो आम्ही कॉलेजात कुणी प्रेमात पडत असेल तर गायचो.
डींगडींगडींगडींगडींग डींगडींगडींगडींगडींग
सिनेमा आवडलेला. गोविंदा आवडता होता.
हम तुमपे मरते है, साजन चले ससुराल,हिरो नं 1,हसीना मान जायेगी आणिव्बरेच सिनेमे चांगले आहेत.

अतुलजी, भरतजी, मार्गदर्शनाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

असे आधीही घडलेले आहे.. लेखकाला स्वतःचा लेख न दिसणे...
मला वाटते वेमा जर लेख move करतात तर त्या ग्रुप चे सदस्यत्व आपोआप लेखकाला मिळायला हवे...किंवा त्यांनी द्यायला हवे...

बरीच वर्षे झाली पाहून पण बघितला तेव्हा फुल टीपी वाटला होता हे लक्षात आहे.

गाढव बाल्कनीत जाण्याचा प्रसंग सगळ्यावर कळस आहे >>> टोटली. सुपरलोल होता सीन तो.

मला अमर अकबर अँथनी भयानक आवडतो. >> भारी आहेच तो Happy अचाट योगायोग आणि अतर्क्य सीन्स आहेतच पण अनेक ठिकाणी खतरनाक मेथड इन मॅडनेस दडलेली आहे Happy पुढे मनमोहन देसाईने तेच तेच करायला सुरूवात केली पण या पिक्चर मधे सगळे जमून आले आहे. हिरॉइन्सना व्हिलन लोक पळवतात हे सगळेच दाखवतात. पण व्हिलनच्या मुलीला हीरोचा बाप पळवतो असला प्रकार मनमोहन देसाईच दाखवू शकतो.

गोविंदा टिव्हीमधे शिरतो तो प्रसंगही टोटल टीपी आहेच, मात्र त्या प्रसंगाचे मूळ जनक माने आहेत Happy

फेरफटका - मेमरीला दाद दिल्यामुळे ही अजून एक गोष्ट आठवली पहा Lol

पण व्हिलनच्या मुलीला हीरोचा बाप पळवतो असला प्रकार मनमोहन देसाईच दाखवू शकतो. >>> लोल!

हो तो अशोक मामांच्या सीन वरून ढापलाय आणि अशोक मामांचा पण बेस्ट होता. बाळाचे बाप ब्रम्हचारी वाला. त्यातलाच आणखी एक आवडता म्हणजे 'आचाऱ्याची बायको वेडी काय... आचाऱ्याच्या जानव्याला किल्ली काय..' Lol बास. विषयांतर होतंय.

आचाऱ्याची बायको वेडी काय... आचाऱ्याच्या जानव्याला किल्ली काय
----- माझा आवडता सीन, त्यासाठी हा अखंड movie पाहावा Lol
अशोक सराफ ची केसर शेती एकच no आहे, हहपुवा

"मेमरीला दाद दिल्यामुळे ही अजून एक गोष्ट आठवली पहा" - दंडवत घ्या आता!! Happy तुला सिरियसली काहीही आठवतंय Happy

Pages