आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल कोलकत्त्याच्या ३-४ विकेट्स पडल्यावर मी मॅच बंद करुन टाकली होती.... जेवण वगैरे झाल्यावर सहज किती रन्सने हारली कोलकत्ता बघाव म्हणून बघितले तर २२ बॉल ४५ का असे काहितरी इक्वेशन होते आणि कमिन्स मस्त खेळत होता..... पण ते दोन रन आऊट्स आणि चेन्नई जिंकले!

फाफ आणि ऋतूराज मस्तच खेळले..... Moeen is good addition for CSK!
दीपक चहर दिवसेंदिवस चांगली बॉलिंग करतोय पण शार्दूल ठाकूरची व्हेरिएशन्स चालेना झालीत.

बाय द वे, मॅचच्या आधी सुरेश रैना भज्जीच्या ऑलमोस्ट पाया पडला ते बघितले का कुणी?

आरसीबी ने टॉस जिंकून बॉलिंग घेतलीय. विको आणि चेस हा काँबो जबरदस्त आहे. संजू सहसा दर आयपीएल ला दोन चांगल्या इनिंग्ज खेळतो. एक जबरदस्त - ज्यामुळे तो भारताकडून का खेळत नाही असा प्रश्न पडतो. मग एखादी थोडी कमी रन्स ची, पण त्याच क्वालिटीची - प्रश्न दृढ होतो. मग उरलेल्या १२ इनिंग्ज मधे त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं. आज त्या पहिल्या सेट मधली दुसरी इनिंग बघायला मिळावी अशी आशा आहे. Happy

"दीपक चहर दिवसेंदिवस चांगली बॉलिंग करतोय" - चहर ला स्विंग मिळाला तर तो खतरनाक बॉलिंग करतो. हिस्टरी बफ्स स्पेशलः त्याच्या रणजी डेब्यू मधे त्याने राजस्थानकडून खेळताना हैद्राबाद च्या ८ विकेट्स काढून त्यांना २१ रन्स मधे गुंडाळलं होतं. त्याची एक अस्पष्ट क्लिप कुठेतरी पाहिली आहे.

and... RR is on a familiar track!

आयपीएल च्या टीम्स च्या संख्येपेक्षा, दर्जावर लक्ष देऊन काही low hanging fruits काढता येतील का असा कधी कधी प्रश्न पडतो.

चांगला ओढला स्कोअर म्हणायचे का शेवटी हाराकिरी केली म्हणायचे?
"हिट ॲंड मिस" चालला आज आणि मस्त स्मार्टली खेळत होता.... फक्त अजुन जरा टिकायला पाहिजेल होता!

RCB च्या बॅटींग लाईन अप ला अवघड नाहिये स्कोअर हा!
जर सुरुवातीला थोडी पडझड झाली RCB ची तरच काहितरी चान्स आहे!

"RCB च्या बॅटींग लाईन अप ला अवघड नाहिये स्कोअर हा!" - ओपनिंग च जबरदस्त मिळाली आहे आरसीबी ला. राजस्थान च्या बॉलिंग मधे काही भेदकता नाहीये. एखाद्या दिवशी एखादा बॉलर चालून जातो ही. पण ओव्हरऑल, राजस्थान ला ही एक-दोन स्टार प्लेयर्स वर बक्कळ पैसा खर्च करून उरलेल्या जागांसाठी रिजेक्ट्स उचलायची पॉलिसी घातक ठरतेय. एक संजू सोडून कुठल्याही खेळाडूला त्यांनी ग्रूम केलं नाहीये.

"त्याचे एक आयकॉनिक युवांसाठी मार्गदर्शक खेळाडू असने" - बापरे!!! मोठे मोठे शब्द वाप्रून राह्य्ले नं बाप्पा तुम्ही तं. दांभिकपणा, स्वार्थीपणा, आर्थिक फायद्यासाठी तत्त्वांना तिलांजली देणं ह्यातली कुठली मार्गदर्शक तत्त्व युवा खेळाडूंसाठी आयकॉनिक आहेत? Happy
>>>>>

@ फेरफटका,
नावडतीचे मीठ अळणी असे तर होत नाहीये ना Happy
धोनी मैदानावर येतो तेव्हा तमाम पब्लिक धोनी धोनी असा गजर करते जे याआधी मी तरी फक्त सचिनसाठीच पाहिले आहे.
नवीन खेळाडू जे धोनीसोबत खेळतात ते खरयाखुर्‍या आदराने त्याच्या पाया पडतात वा स्वतःहून त्याला श्रेय देतात.
सारे स्पिनर कबूली देतात की धोनी यष्टीमागे असल्याचा त्यांना काय फायदा होतो. आणि हे आपल्यालाही समोर दिसते.
एखाद्या खेळाडूकडून बेस्ट कसे काढून घ्यायचे हे देखील धोनीसारखे जमणारा विरळाच.
नुकत्याच झालेल्या ईंग्लंड मस्लिकेत सॅम करनने जी चेस करताना खेळी केली त्याला खुद्द ईंग्लंडचे खेळाडूच म्हणाले की धोनीच्या संगतीचा हा प्रभाव.
गावस्कर त्याला सचिनपेक्षा मोठा आयकॉन समजतो कारण तो छोट्या शहरातून आलेला असल्याने आज कित्येकांना आणखी जवळचा वाटतो.
ईतकेच नव्हे तर खुद्द क्रिकेटचा देव सचिन म्हणतो की मी आजवर खेळलेल्या कर्णधारांपैकी धोनी हा सर्वोत्तम कर्णधार आहे.
त्याच्या लोकप्रियतेबद्दल बोलायलाच नको, आजही निवृत्त होऊन तो जाहीरातदारांसाठी सर्वात मोठा ब्रांड आहे.

जर कोणी धोनीला दांभिक स्वार्थी वगैरे म्हणत त्याच्यावर हलकी टिका करत असेल आणि वर मी त्याचे अति कौतुक करतो म्हणून तो अशी टिका करतोय असे समर्थन करत असेल तर ........... Happy मी फक्त एक स्माईलीच उत्तरादाखल देऊ शकतो.

अरे हो, मी आयपीएल फिक्स आहे म्हटले की मी खेळाडूंच्या कॅरेक्टरवर शंका घेतोय असे आरडाओरडा करणारे आता कोणी धोनीला दांभिक, स्वार्थी, आर्थिक फायद्यासाठी तत्त्वांना तिलांजली देणारा म्हणतेय त्याच्याकडे पुरावे मागणार आहेत की धोनीवर बिनबुडाची टिका माफ आहे Happy

पडिक्कल तुफान खेळला. मागच्या आयपीएल नंतर त्याच्या फीटनेसमधे सुद्धा जाणवण्याइतपत फरक पडलाय. मागच्या आयपीएल मधे ४०-५० नंतर दमणारा पडिक्कल आज पूर्ण क्षमतेनं सेंच्यूरी करताना दिसला. त्याचे आणि कोहली चे शॉट्स बघताना मजा आली. आजच्या सारखा परफॉर्मन्स + एबी+मॅक्सवेल = 'रियल चॅलेंजर्स बँगलोर' (हे नाव गावसकर ने दिलं).

राजस्थान - ये रे माझ्या मागल्या! एखाद-दुसरा individual brilliance, पण टीम म्हणून ताकद कमी. एक-दोन खेळाडूंचं अपयश धूवून काढून एक मोठा स्कोअर उभा करण्याची किंवा बॅटींग चं अपयश बाजूला सारून बॉलिंगमधून लढत देण्याची क्षमता अजिबात नाहीये त्यांच्याकडे.

उद्या मुंबई वि. पंजाब - परत एकतर्फी सामना??

मी आयपीएल फिक्स आहे म्हटले की मी खेळाडूंच्या कॅरेक्टरवर शंका घेतोय असे आरडाओरडा करणारे आ >> अजिबात विचारणार नाही त्याला मी तरी असे काही. तो एकदा म्हणालाय (नि का म्हणालाय हे त्याने स्पष्ट केले होते आधीच ) ह्याउलत तू 'मी प्रत्येक सामन्यानंतर अमक्या फोरम वर हे वाचवा, माझ्या नुक्कडवरच्या पोरान्नी हे सांगितले नि तमका माझा अंदाज आहे' असे गेली ३-४ वर्षे सातत्याने प्रत्येक मॅच नंतर लिहित आला आहेस. जमिन आस्मानाचा फरक आहे. तुला कळावा अशी अपेक्षा नाही. कळला असता तर चार लोक आता बस्स कर का सांगता हे समजून थांबला असतास.

आडदांडपणा न करतां छानच फटकेबाजी >> हा एकदम बरोबर शब्दांमधे पकडलेत हे भाऊ. मधेच कोहली सुटला तेंव्हा ह्याचे सेंच्युरी तरी होउ देतो का नाही असे वाटलेले. अर्थात पड्डिकल ने कोहली ला थांबू नको सांगितले असे नंतर स्पष्ट केले नि कोहली ने पहिले शतक कर नि मग बोलूया असे सांगितले.

"नावडतीचे मीठ अळणी असे तर होत नाहीये ना " - असंख्य वेळा ह्याच फोरम वर मी हे सांगितलंय की मला कुठलिही वैय्यक्तिक आकस वगैरे नाहीये. ह्याच धोनी च्या वन-डे मधल्या खेळाचं कौतुक सुद्धा इथेच केलंय. जे खटकलंय त्याच्यावर टीका केलीये. आता मला त्याच त्याच विषयावर गोल गोल फिरण्यात इंटरेस्ट, वेळ काहीही नाही. तु चालू ठेव.

"आडदांडपणा न करतां छानच फटकेबाजी" - परफेक्ट! एलेगन्स, टायमिंग, पॉवर हिटींग, प्लेसमेंट - सगळं होतं त्याच्या इनिंग मधे आज.

*बाय द वे, मॅचच्या आधी सुरेश रैना भज्जीच्या ऑलमोस्ट पाया पडला ते बघितले का कुणी?* -
टाॅस झाल्यावर परवां पंतने रोहितलया गुदगुल्या केल्या व रोहितने तितक्याच मिश्किलपणे प्रतिसाद दिला. शिवाय, मॅच संपल्यावरही ( व मुंबई हरल्यावर) हस्तांदोलन करतांनाही पंत व रोहित मस्त मूडमधे होते. हेंही बघितलं का कुणी ? वरवर क्षुल्लक वाटणार्या हया गोष्टी खरं तर क्रिकेटच नाहीं तर क्रिडाक्षेत्राचाच पाया आहे व असावाच. That's, I believe, the proper perspective of sports & life. जीवाची बाजी लावून स्पर्धा करा पण खेळ हा खेळ आहे याकडे दुर्लक्ष न करतां !

"जीवाची बाजी लावून स्पर्धा करा पण खेळ हा खेळ आहे याकडे दुर्लक्ष न करतां !" - टोटली सहमत!! हेच धोरण इथे खेळावर टीप्पणी करताना पण ठेवावं. Happy

रवी बिष्णोई खेळतोय आज पंजाब कडून.

राजस्थान ला अजून एक धक्का - स्टोक्स, लिविन्ग्स्टोन बरोबर, जोफ्रा आर्चर सुद्धा आयपीएल मधून बाहेर. Sad

आज मुंबई हरली तर पॉवर प्ले मधे हरली ह्यावर शंकाच नको. स्काय हा एकमेव बॅट्समन फ्लोईंगली खेळतोय तर त्याला खाली खेचणे ह्यासारखे पातक नसावे. ह्या विकेट वर जिथे तुम्हाला पहिल्या दहा ओव्हर्स मधे बॉल हार्ड असताना कॅश करायला हवे हे मुंबई च्या डावपेचात कसे नाही ? बरं असं नाहीये कि पांड्या बंधू नि पोलार्ड दणकून फॉर्म मधे आहेत.

रोहित आणि सूर्या खेळत असताना वाटत होतं की आज तरी काहीतरी ठीक स्कोर होईल
पण परत ये रे माझ्या मागल्या
5 पैकी 1 ही मॅच मध्ये धड बॅटिंग केली नाहीये

पोलार्ड ला आऊट करायचं नाही असं ठरल्यासारखी पंजाब ची फिल्डींग चाललीय. पूर्वी एक्झिबिशन मॅचमधे जशी फिल्डींग करायचे तशी फिल्डींग दोन वेळ गेल ने शॉर्ट थर्डमॅन वर आणि कुणीतरी लाँग-ऑन बाऊंड्रीवर केली.

मुंबईचा स्कोअर बिलो-पार वाटतोय. पण पंजाब ला कमी लेखून चालणार नाही. they can make a perfect mess of the chase. Happy

*मुंबई वि. पंजाब - परत एकतर्फी सामना??* हो, तसाच होतोय. फक्त, पंजाबतर्फी !! Wink
*रवी बिष्णोई खेळतोय आज पंजाब कडून.* - बरा वाटतो ! त्याचा गुगली अधिक वळतो व भेदक वाटतो. दखलपात्र गोलंदाज!!

"त्याचा गुगली अधिक वळतो व भेदक वाटतो. दखलपात्र गोलंदाज" - त्याची अ‍ॅक्शन पण थोडी मुश्ताक अहमद सारखी आहे (अब्दुल कादीर च्या अ‍ॅक्शनला अजून तरी पर्याय सापडला नाहीये :)) त्यामुळे बॉल हातातून ओळखणं अवघड जातं.

"फक्त, पंजाबतर्फी " - मुंबई अगदीच इनर्ट गॅससारखी 'कलरलेस, ओडरलेस' खेळली आज.

उद्या एकदम काँटेंकी टक्कर - केकेआर वि. आर आर! Wink . राजस्थानकडे काही बेंच स्ट्रेंथ सुद्धा उरलेली नाहीये. फार फार तर व्होरा च्या जागी जैस्वाल आणि मुस्तफिझूर ऐवजी टाय एव्हढेच ऑप्शन्स आहेत. शिवम दुबे ला ते बॉलिंग का देत नाहीत माहित नाही.

जे खटकलंय त्याच्यावर टीका केलीये. >>>> ती तद्दन चुकीची वाटली म्हणूनच खोडतोय... दांभिक, स्वार्थी, आर्थिक फायद्यासाठी तत्त्वांना तिलांजली देणारा वगैरे वगैरे असो Happy

तो एकदा म्हणालाय (नि का म्हणालाय हे त्याने स्पष्ट केले होते आधीच ) >>>>>> अरे वा, त्यांनी म्हटले आणि धोनी दांभिक, स्वार्थी, आर्थिक फायद्यासाठी तत्त्वांना तिलांजली देणारा वगैरे वगैरे झाला आणि तुम्हालाही ते लगेच पटले. खूप छान. वादच मिटला. कधीतरी आयपीएल मध्ये फिक्सिंग होते हे सुद्धा पटेल. मी त्या दिवसाची वाट बघतो Happy

असो,
आजचा सामना

तो रवी बिश्नोई गरीबांचा अनिल कुंबळे आहे. पंजाबने त्याला आधीच खेळवायला हवे होते असे मला वाटायचे, आज खेळवले फायद्यात ठरले.

चेन्नईत पॉवरप्लेमध्ये ज्या २५ धावा कमी पडल्या त्या निर्णायक ठरल्या. सुर्या वन डाऊनच हवा होता. एक फलंदाज ज्याचा टायमिंग चौफेर आहे आणि एक फलंदाज ज्याकडे सदैव एक्स्ट्रा टाईम आहे अशी जोडी खेळताना अश्या खेळपट्टीवरही खेळ किती सहज भासतो हे मागच्या सामन्यालाही दिसलेले.

असो, पाच सामने झाले. मुंबईचा चेन्नईवास संपला. जर पाचात ३ झाले असते चेन्नईत तरी मुंबई यावर नाराज झाली नसती. आता पुढे जिथे जातील तिथे लगेच सूर गवसायला हवा. जे त्यांचा ईतिहास पाहता अवघड नाही.

के एल राहुलने मागे एक बॅटींग पीच वर तुलनेत संथ सामना घालवणारी खेळी केल्यानंतर आजची खेळी त्याच्यासाठी आणि तो पंजाबचा कॅप्टन असल्याने पंजाबसाठीही चांगली.

@ रोहीट शर्मा - हा आयपीएलमध्ये फलंदाजी तितकीशी सिरीअसली घेत नाही असे माझे आपले एक निरीक्षण आहे. बरेचदा कॅज्युअल खेळतो. कधी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत भाग घ्यायला जात नाही. पण मुंबईचे मिडल आणि लोअर ऑर्डर या स्लो खेळपट्टीवर गडबडताहेत आणि सलग सामने ईथेच आहेत. हरतच राहिलो तर आव्हान संपुष्टात येईल हे पाहून मात्र यंदा नेहमीपेक्षा सिरीअसली खेळताना दिसला.

आता उर्वरीत सामन्यांमध्ये त्याची एकदोन शतके येतील असे मला आतून फार वाटतेय Happy

कधीतरी आयपीएल मध्ये फिक्सिंग होते हे सुद्धा पटेल. मी त्या दिवसाची वाट बघतो >> तुझा गोंधळ होतोय काहीतरी नेहमीसारखाच (त्यात नवीन काय म्हणा) . आयपीएल मध्ये फिक्सिंग झाले आहे हे मलाही माहित आहे पण त्यानंतर करप्शन ब्युरो ने घेतलेल्या मेजर्सकडे सरळसरळ दुर्लक्ष करत तू नित्यनेमाने काडीचाही पुरावा नसताना 'फक्त तुला इथे फुकट लिहिता येते नि कुठल्या तरी सोशल मिडियाच्या कंडम फोरमवर कोणी तरी टिकोजी म्हणाला' ह्या जोरावर 'हे फिक्स झाले ते फिक्स झाले ' हा कंठशोष करतोस नि खेळाडूंच्या इंटीग्रिटीवर जाता येता बोट ठेवतोस त्याबद्दल फे फ च्या पोस्ट शी तुलना करताना मी वर लिहिले होते. फे फ ला काय म्हणायचे होते ते त्याने स्पष्ट शब्दांमधे लिहिले होते नि वर स्पष्ट केले होते (तू त्यातून दोन वाक्ये उचलतोयस हा तुझा प्रश्न आहे)

उद्या एकदम काँटेंकी टक्कर - केकेआर वि. आर आर! >> नथिंग टू लूज ह्या भावनेतून बतलर नि सॅमसन सुटतील असे वाटतेय.

असामी...... ईट्स ओके Happy

बाबूजी ठिक कहते है सिम्रन.. बाबूजी ठिक कहते है..
धोनी एक दांभिक और स्वार्थी ईन्सान है.. जो आर्थिक फायदे के लिए अपने तत्वों को तिलांजली देता है..
तो क्या हुआ अगर ऊसने हमे पच्चीस साल बाद वर्ल्डकप जिताया..
तो क्या हुआ अगर उसने हमे २०-२० का पहला वर्ल्डकप जिताया..
तो क्या हुआ ऊसीने हमे चॅम्पियन ट्रॉफी जितायी.. पहली बार टेस्ट नंबर वन बनाया.. और न जाने कितने बार गिरते हुए ईंनिंग को संभाल के हमे जिताया...

जीतना सब कुछ तो नही होता ना सिम्रन ...
बाबूजी ठिक कहते है सिम्रन बाबूजी ठिक कहते है Happy

यावेळी आहे तो शर्यतीत...
>>>>>
असेल पण त्याचे ईंटेंशन कधी वाटत नाही. आय मीन त्याला या आयपीएलमध्ये आपली फलंदाजी सिद्ध करावी असे फारसे वाटत नसावे. बहुधा आपण वरच्या दर्जाचे खेळाडू आहोत आणि ईंटरनॅशनल आणि तेथील मोठ्या स्पर्धांमध्ये स्वत:ला सिद्ध करू असा कूल ॲटीट्यूड असतो. आयपीएलम्ध्ये यर तो कप्तानी एंजॉय करतो.

मला बरेचदा हे भारताचे, भारतीय खेळाडूंचे आणि भारतीय क्रिकेटप्रेमींचे दुर्दैव्य वाटते की ते शर्मासारख्या कर्णधाराला मुकलेत. राजा माणूस _/\_

Pages