तुम्हाला कोणता प्राणी पाळायला आवडेल?

Submitted by अनिळजी on 22 April, 2021 - 11:18

काहीतरी साहसी करायचं मनात आहे. कुत्रे, मांजर हे पाळणारे लोकं भरपूर आहेत. त्यात काय मजा नाही. कुठलातरी डेंजर प्राणी मला पेट म्हणून पाहिजे. मी टीव्हीवर अनेक कार्यक्रम बघतो आहे त्यातून थोडीफार आयडिया आली आहे. तरीपण एक धाकधूक मनात आहे. थोडीतरी चूक झाली तर जीवावर बेतू शकतं. आमच्या नदीत एक मगर आली आहे. आठ दहा फूट मोठी मगर आहे. ती काठावर झोपली होती तेव्हा गुपचूप जाऊन लांबी मोजली. ती मगर पकडायचा मानस आहे. दोघे तिघे मदतीला तयार झालेत पण ते मगरीच्या जवळ जाणार नाही बोलत आहेत, लांबून शूटिंग काढणे, मगरीने मला पकडलं तर आरडाओरडा करणे असली कामं करणार आहेत. माझा प्लॅन असा आहे की दुपारी मगरीला पोटभर कोंबड्या खायला द्यायच्या. मग ती दुपारी काठावर येऊन झोपेल. झोपल्यावर मी झटकन तिच्या पाठीवर उडी मारून डोळ्यावर पोतं टाकणार आहे जेणेकरून तिला काही दिसू नये. नन्तर चपळाईने तिचं तोंड दोरखंडाने बांधणार आहे. दुसरं टोक ट्रॅक्टरला बांधलेले असेल. तसाच तिला ओढत ओढत घरी नेणार आहे. यानंतर पुढची पायरी म्हणजे तिला पेट करणं आणि ट्रेनिंग देणं. हा पुढचा भाग असल्याने याबाबत फार विचार नाही केला. तरी मगर कशी पकडावी या विषयावर माबोकरांनी त्यांचे सल्ले देऊन मार्गदर्शन करावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

दुपारी नको, रात्री जा आणि 'चांद फिर निकला, मगर तुम न आये' हे गाणं अगदी कातर आवाजात म्हणा. मग ती स्वतःहून येईल.

डोळ्यावर पोतं टाकणार आहे जेणेकरून तिला काही दिसू नये. नन्तर चपळाईने तिचं तोंड दोरखंडाने बांधणार आहे. दुसरं टोक ट्रॅक्टरला बांधलेले असेल. तसाच तिला ओढत ओढत घरी नेणार आहे. >> गंमत सोडा, पण मगर वन्य जीव आहे. तुम्ही नक्कीच आत जाल.

तिला यू यू यू करा. मग ती काठावर येईल.
मग काय, पटकन गळ्यात पट्टा बांधा, त्याला साखळी बांधून आणायचं.
स्कूटीवर मधे बसायला शिकवा तिला. चक्कर पण मारून आणता येईल.
निसर्ग नियमासाठी न्यावं लागतं ना..
त्या वेळी दुसरा कुणी आपली मगर फिरवायला येत नाही ही खात्री करून घ्या.
नाहीतर भुंकाभुंकी (मगरीच्या आवाजाला काय म्हणतात ?) होईल.
आमच्या कुत्रीला मी असंच ट्रेन केलंय.

कुत्रे, मांजर हे पाळणारे लोकं भरपूर आहेत. त्यात काय मजा नाही. >> अगदी अगदी.. मला असं गेले ५ वर्षे वाटतंय.. मला तर पांडा पाळायची इच्छा आहे.. हि इच्छा किती तरी वेळा घरी बोलूनही दाखवली पण कोणी सिरिअसलीच घेत नाहीत.. तुमचा धागा घरी दाखवते आणि बघते काही फरक पडतोय का ते

वरती म्हटल्याप्रमाणे
मै शायर तो नही
मगर
ऐ हसी
जबसे मैने देखा तुझको
मुझको शायरी आ गयी
हे गाणं किमान ५वेळा हातात लाल गुलाब धरून मगरी समोर जाऊन म्हणा, नक्कीच impress होऊन घरी येईल.
चेहऱ्यावर प्रेमळ आणि शुद्ध भाव असू द्या मात्र आणि तिचे आवडते खाणे घेऊन जा सोबत Happy

खूप झाल्या पशुपालनाच्या निव्वळ गप्पा आता करून दाखवायचे! मानवदादांनी सांगितलेल्या कालव्यातून मगरीच्या घरात जा आणि तिला "मला पाळ" असे आवाहन करा. (इथे मला= धागाकर्ता.... हो, नायतर ती चुकून मलाच पाळायची आणि मरतुकडा पशू मिळाला म्हणून रूसायची!)

आमचे आजोबा सांगायचे की त्यांच्या लहानपणी आमच्या गावच्या नदीला पूल नव्हता तेव्हा लोकं मगरीच्या पाठीवर बसून नदी पार करायचे.
आजकालच्या पोरांना मगरीच्या पाठीवर बसवायचे म्हटले तरी बुडाला टोचू नये म्हणून ऊशी मागतील Happy

सांगायचा हेतू एवढाच की निम्म्या प्रतिसादात मगर शब्द असलेली गाणीच आली आहेत. तुम्हीही धाग्याच्या सुरुवातीला याला काहीतरी साहसी काम म्हटले आहे. पण एकेकाळी आमच्या गावी हे नॉर्मल होते.

आता ती माणसेही नाहीत आणि मगरीही नाहीत. त्या नदीचे पाणीही आटून तिचा वहाळ झालाय. ज्यात माझ्या लहानपणी लोकं शौचाला बसायचे. मगरीच्या जागी बोटभर लांबीचे मासे येऊन त्यांच्या पायाशी खेळायचे. आणि आता घरात घरात शौचालय झाल्याने त्या माश्यांची मजाही संपली आहे. कधी गेलेच त्या वहाळाकाठी तर काही लिबलिबीत गांडूळे वळवळताना दिसतात

कुत्रे, मांजर हे पाळणारे लोकं भरपूर आहेत. त्यात काय मजा नाही. >> अगदी अगदी.. मला असं गेले ५ वर्षे वाटतंय.. मला तर पांडा पाळायची इच्छा आहे.. हि इच्छा किती तरी वेळा घरी बोलूनही दाखवली पण कोणी सिरिअसलीच घेत नाहीत.. तुमचा धागा घरी दाखवते आणि बघते काही फरक पडतोय का ते>>.

पांडा पाळण्यासाठी चीन सरकारची परवानगी घेणं आवश्यक आहे कारण जगातल्या सगळ्या पांडावर त्यांचा हक्क आहे..

आणि पांडा पाळण खुप अवघड आहे.. लहान मुलांसारखं त्याच्यावर लक्ष ठेवाव़ लागतं.. त्याची काळजी घ्यावी लागते.. त्याला Cuddling खुप आवडत़ं.. त्याच्याबरोबर खेळायला कुणी नसलं तर तो उदास होतो..

चीनमध्ये पांडा सांभळण्यासाठी कामगार आहेत आणि ही नोकरी तिथे फार मानाची मानली जाते..

काही प्रतिसाद Lol
तिला "मला पाळ" असे आवाहन करा. >>>>> आवाहनगीत !

पाळ, पाळ , पाळ मला पाळ , मला पाळ
अगं मगरी मला पाळ मला पाळ
मनामध्ये होS ते माझ्या हाळचाळ
अगं मगरी मला पाळ, मला पाळ

ह्या चालीत म्हणावे ----->
पल पल हर पल हर पल
कैसे कटेगा पल हर पल हर पल
दिल में मची है हलचल
कैसे कटेगा पल, हर पल हर पल

मगर नाही मिळत तोवर हेच गाणं म्हणत पाल पाळून ही सराव करता येईल. एकाआड एका 'ळ' ला 'ल' करून , टंगट्विस्टर फ्रि. Wink

अस्मिता ती मगर ही साथ देईल की ,
पाळ पाळ पाळ पाळ
मला पाळ
मला पाळ
ओ s अनिळ
मला पाळ
मला पाळ
तुला पाहुन
टपकते रे लाळ
ओ s अनिळ
मला पाळ
मला पाळ

पांडा कशाला, पेंग्विन पाळा त्यापेक्षा.......असं कसं? हे म्हणजे कुत्रा पाळायचा असेल तर मांजर पाळ म्हणण्यासारखे आहे.

पांडा पाळण्यासाठी चीन सरकारची परवानगी घेणं आवश्यक आहे>> हो.. त्या गोष्टीची कल्पना आहे.. पण चीन सरकारच्या आधी घरातून परवानगी मिळणं जास्त कठिण आहे.

पांडा कशाला, पेंग्विन पाळा त्यापेक्षा>> अनिळजींची मगर पकडून झाली कि पांडा का पेंग्विन ह्यावर धागा काढू

तुम्हाला मगर भारतात पाळायची आहे हे गृहित धरतो.

स्थूलमानाने जिला क्रोकोडाईल म्हणतात, तिचे ३ प्रकार भारतात आढळतात: १. मगर (Crocodylus palustris), २. घडियाल/सुसर (Gavialis gangeticus) आणि ३. खाऱ्या पाण्यातील मगर (Crocodylus porosus). १९७२ पासून भारतातील मगरींचे प्रमाण भरपूर वाढले असले, तरी सरकार अजूनही (का कुणास ठावूक) मगरींना endangered species मानते. त्यामुळे मगरीच्या व्यापार/हाताळणी/शिकार वगैरेवर निर्बंध आहेत. आता संख्या वाढली असल्यामुळे ती पुढे बेसुमार होऊ नये म्हणून त्यावर कंट्रोल असावा असे अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यातच आदिवासींना मगरपालनाची परवानगी मिळावी अशी मागणी पुढे येत आहे. त्यामुळे मगर कशी पकडावी ह्या आधी 'आदिवासी होण्यासाठी काय करावे' हा धागा काढल्यास ते मगरपालनाच्या दृष्टीने पहिले पाऊल ठरेल.

झपाटलेल्या घराबद्दलचा तुमचा धागा नुकताच वाचला. मगरीला या घरात नेणार आहात का ?
घर झपाटलेले आहे हे माहीत असतानाही एका मुक्या प्राण्याला तिथे नेणे हा क्रूरपणा नाही का ?

Pages