मगर पकडणे

तुम्हाला कोणता प्राणी पाळायला आवडेल?

Submitted by अनिळजी on 22 April, 2021 - 11:18

काहीतरी साहसी करायचं मनात आहे. कुत्रे, मांजर हे पाळणारे लोकं भरपूर आहेत. त्यात काय मजा नाही. कुठलातरी डेंजर प्राणी मला पेट म्हणून पाहिजे. मी टीव्हीवर अनेक कार्यक्रम बघतो आहे त्यातून थोडीफार आयडिया आली आहे. तरीपण एक धाकधूक मनात आहे. थोडीतरी चूक झाली तर जीवावर बेतू शकतं. आमच्या नदीत एक मगर आली आहे. आठ दहा फूट मोठी मगर आहे. ती काठावर झोपली होती तेव्हा गुपचूप जाऊन लांबी मोजली. ती मगर पकडायचा मानस आहे. दोघे तिघे मदतीला तयार झालेत पण ते मगरीच्या जवळ जाणार नाही बोलत आहेत, लांबून शूटिंग काढणे, मगरीने मला पकडलं तर आरडाओरडा करणे असली कामं करणार आहेत.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मगर पकडणे