तुम्हाला कोणता प्राणी पाळायला आवडेल?

Submitted by अनिळजी on 22 April, 2021 - 11:18

काहीतरी साहसी करायचं मनात आहे. कुत्रे, मांजर हे पाळणारे लोकं भरपूर आहेत. त्यात काय मजा नाही. कुठलातरी डेंजर प्राणी मला पेट म्हणून पाहिजे. मी टीव्हीवर अनेक कार्यक्रम बघतो आहे त्यातून थोडीफार आयडिया आली आहे. तरीपण एक धाकधूक मनात आहे. थोडीतरी चूक झाली तर जीवावर बेतू शकतं. आमच्या नदीत एक मगर आली आहे. आठ दहा फूट मोठी मगर आहे. ती काठावर झोपली होती तेव्हा गुपचूप जाऊन लांबी मोजली. ती मगर पकडायचा मानस आहे. दोघे तिघे मदतीला तयार झालेत पण ते मगरीच्या जवळ जाणार नाही बोलत आहेत, लांबून शूटिंग काढणे, मगरीने मला पकडलं तर आरडाओरडा करणे असली कामं करणार आहेत. माझा प्लॅन असा आहे की दुपारी मगरीला पोटभर कोंबड्या खायला द्यायच्या. मग ती दुपारी काठावर येऊन झोपेल. झोपल्यावर मी झटकन तिच्या पाठीवर उडी मारून डोळ्यावर पोतं टाकणार आहे जेणेकरून तिला काही दिसू नये. नन्तर चपळाईने तिचं तोंड दोरखंडाने बांधणार आहे. दुसरं टोक ट्रॅक्टरला बांधलेले असेल. तसाच तिला ओढत ओढत घरी नेणार आहे. यानंतर पुढची पायरी म्हणजे तिला पेट करणं आणि ट्रेनिंग देणं. हा पुढचा भाग असल्याने याबाबत फार विचार नाही केला. तरी मगर कशी पकडावी या विषयावर माबोकरांनी त्यांचे सल्ले देऊन मार्गदर्शन करावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

काय आहे हे आलिया,मृगया, पाला, शहामूर्ख , संकरपाळी (ही दिवाळीत पाळतात का ), Rofl
आता सशाचं स्त्रीलिंगी सांगा. 'पाला' प्रमाणे... त्यांना नर नव्हता यांना मादी नाही.

मी तर आहे ससुल्या गडी या बालगीतावरून ससुल्याची बायडी ससुली.
मायबोलीवर कुणी बिहारी असेल तर ते ससुरी पण म्हणू शकतात.

शहामृग हा महागुरूचा अपभ्रंश असण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्याचा महाकाय आकार पाहता.

बाकी हा वाद व्यर्थ आहे. आपण जो प्राणी पाळू त्याला आपण आपल्या मनाने काहीही नाव देऊ शकतो.
जसे की आमच्या शेजारी एक कुत्रा द डॉग होता. त्याला त्याचा मालक टायगर म्हणायचा. जेवणात मात्र तो उकडलेले टमाटर भातात कुस्करून खायचा.

मॉरल ऑफ द स्टोरी - तुम्ही एक कुत्रा पाळा आणि त्याला टायगर लायन एलिफंट शहामृग काहीही नाव द्या..

टायगर कमी झाले की दुसरं काय करणार माणूस ?? मुलांचीच नाव प्राण्यांची ठेवून टिव्हीवर बघत बसायचं .
मी समजू शकते. Animal planet काय फ्लाइंग जट काय...

जॅकीच्या आधी हे मी अमिताभला सांगितलेले. पोराचे नाव बदल आपल्या. सेम सेम होतेय Happy
तो म्हणला ठिकाय, पण ठेऊ काय?
मी टायगर सुचवले.. त्या गधड्याला एवढे आवडले की पुढच्या पिक्चरमध्ये ते आपलेच नाव ठेवले Happy
बर्र पिक्चर हिट झाला. नाव फेमस झाले. मी म्हटले आता तरी बदल पोराचे नाव आणि टायगर ठेव..
तो म्हणला आपल्याच कॅरेक्टरचे नाव पोराला.. असे कुठे होतेय हो..
मग मीच त्याला ते करून दाखवले Happy

१०८ थाट
१०९ मऊ
११० पहा चहा
१११ बकरा
११२ वारा गारा तारा भारा
११३ प्यारा
११४ सौदा
११५ स्वतःचं पण चालवा की

११९
रताळ्याचा/बटाट्याचा/ओठांचा पाडला किस

एकशे एकवीस
आत्मा,हडळ आहेत पण
माबो वर कधी येणार खविस

Pages