Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22
आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.
तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!
त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
What a match!
What a match!
मॉरीस ने बदला घेतला
"मॉरीस यंदा जरा गंडल्यासारखा
"मॉरीस यंदा जरा गंडल्यासारखा का वाटतोय?" ते "मॉरीस ने बदला घेतला" - Submitted by स्वरुप
एव्हढ्यातच आजच्या मॅच चं सार आहे
गंडला होताच तो ज्याप्रकारे
गंडला होताच तो ज्याप्रकारे खेळत होता एकदा तर मला असे वाटले की जमत नसेल तुझ्याच्याने तर त्या उनाडकटला दे बाबा स्ट्राईक पण शेवटच्या दोन ओव्हर तो भारीच खेळला
बहुतेक लास्ट मॅचची संजूने नाकारलेली सिंगल (जरी माझ्या मते संजूचा तेंव्हाचा तो निर्णय योग्यच होता) त्याला कुठेतरी टोचत असणारच.... म्हणून म्हंटले की बदला घेतला
बाकी बदला वगैरे आपण फॅन लोक म्हणूया पण morris has proved his worth once again
स्वरूप - सगळ्या पोस्ट ला
स्वरूप - सगळ्या पोस्ट ला अनुमोदन! आज मॉरिस पण म्हणाला की मी दुसर्या रन्साठी धावून सॅमसन ला स्ट्राईक देणार होतो तेव्हा. पण आज ची मॅच शेवटी मॉरिस ने शांत डोकं ठेवणं आणि टॉम क्युरन ने ३ वाईट बॉल टाकणं (१८ व्या ओव्हरमधे एक आणि २० व्या ओव्हरमधे दोन) इथवर येऊन पोहोचली.
मॉरीस चे काही खास शॉट्स आहेत,
मॉरीस चे काहीच खास शॉट्स आहेत, त्याने डोके शांत ठेवून बॉलर्स त्या पट्ट्यात बॉल्स द्यायची वाट पाहिली नि मग मारले हे त्याचे क्रेडीट. रबाडा नि कुरान ने अतिशय फडतूस ओव्हर्स टाकल्या शेवटच्या दोन. अश्विन पाचाच्या आत स्ट्राईक रेट मधे असताना त्याने तीनच ओव्हर्स टाकल्यात - स्टोनिस ला आणणे नडले. दोन लेफ्टी असले तरी अश्विन मॅनेज करू शकला असता.
@ फेरफटका
@ फेरफटका
स्टॅट्स, फॅक्ट्स वगैरे गोष्टींच्या नादी न लागता, एका वेगळ्याच दृष्टीकोनातून क्रा.मा. गोगो दर्शन घडलंय आज!!
>>>>
हे जे दिलेय ना,
२०-२० वर्ल्डकप !
वन डे वर्ल्डकप !
चॅम्पियन ट्रॉफी !
तीनही आयसीसी ट्रॉफी मिळवणारा एकमेव कर्णधार.
याऊपर धोनीच्याच नेतृत्वात भारत पहिल्यांदा कसोटी क्रमांक १ वर विराजमान झाला.
हे देखील स्टॅटस आणि फॅक्टच आहे हो
२५-३० जागतिक विक्रम धोनी ला खुणावतच होते जे त्याने मोठ्या मनाने सोडून दिले. Wink
>>>>>
यासाठी मात्र मी उद्या गूगल नक्की करतो
मोजदाद होऊ नये त्याच्या विक्रमांची. संघाला जिंकवून देताना त्याचे विक्रम झालेत. न की त्याच्या विक्रमापायी संघाला हरावे लागले
हा कोणालाही टोमणा नाही, पण मला वैयक्तिक विक्रमांचे कौतुक नाही ईतकेच. तरी धोनीचे नक्की आणतो. मला आवडेल हे गूगाळून आणायला.
धोनी ५०% हून अधिक हारलाय >>>> मला हे खरेच बघायचेय की कुठे तो ५० टक्केहून अधिक हरलाय. कश्याला उग्गाच बोलून टाळू नका. चुकून आलेले विधान असेल, टायपो असेल तर तसे सांगा
रबाडा नि कुरान ने अतिशय फडतूस
रबाडा नि कुरान ने अतिशय फडतूस ओव्हर्स टाकल्या शेवटच्या दोन.
>>>
+७८६
स्ट्रॅटेजिक टाईम आऊट मध्ये ठरते हे
रिकी पाँटींग ने इतक्यातल्या
रिकी पाँटींग ने इतक्यातल्या इतक्यात २-३ वेळा मॅचविषयी, खेळाडूंविषयी पब्लिक स्टेटमेंट्स केली. हे 'ज..रा..सं' ग्रेग चॅपेल च्या वळणावर चाललंय का?
ऋन्मेष, माझा कुठलाही टायपो
ऋन्मेष, माझा कुठलाही टायपो नाहीये. तू उद्या रेकॉर्ड्स शोधशील तेव्हा हे सुद्धा शोध. आपण एकमेकांची मतं बदलू शकत नाही. तेव्हा उगाच शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा, आयपीएल मधल्या मॅचेस वर बोलू.
रबाडाला मॉरिसचा पहिला सिक्स
रबाडाला मॉरिसचा पहिला सिक्स बसला तो बॉल इतका वाईट नव्हता खरं तर. दुसर्याला त्याची लेंत चुकली पण आजिबात पाय न हलवता जो मॉरिसनी फ्लिक केल्यागत सिक्स मारला तो जबरी होता. फारच अचूक मिडल केला तो पण अफलातून टायमिंगसकट. येव्ड्या लेग्साईड्ला जाणारा बॉल सहसा कनेक्ट केला की तो डीप फाईन लेगला वगैरे जातो , तो पण जमिनीलगत. त्यानी अक्षरशः त्या बॉलला फॉलो करत बरोबर असा कनेक्ट केला की उचलून सिक्स गेला. कमाल स्किल!
खुप मजा आली. किती वेळा पारडं कधी इकडे कधी तिकडे जड होत होतं.
मला मॉरिस विषयी माहित नव्हतं आणि त्याला संजू सॅमसननी दुसर्या रन करता नकार दिला तेव्हा त्याचा निराश झालेला चेहरा आठवला. तेव्हा असं वाट्लं ह्याला काय झालं? इक्डे स्ट्राईकला संजू आहे भौ! तो मारेल ही शक्यता अर्थातच जास्त आहे.
आता नाही वाटत तसं.
*आता नाही वाटत तसं* -
*आता नाही वाटत तसं* - प्रत्येकाचा एखादा दिवस, एखादी वेळ असते , हात लावेल त्याचं सोनं होण्याची ! काल माॅरीसची तर त्यादिवशीं संजूची !! निर्णय चूक कीं बरोबर हें त्या विशिष्ट वेळेशी निगडीत असावं.
काल अश्विनला तीनच षट्के दिली
काल अश्विनला तीनच षट्के दिली गेली. चौदाच रन्स दिल्या होत्या.
आपण एकमेकांची मतं बदलू शकत
आपण एकमेकांची मतं बदलू शकत नाही.
>>>
हो, पण चुकीचे मुद्दे किंबहुना चुकीची माहीती नक्कीच खोडू शकतो नाही का
तर धोनी ५० टक्के पेक्षा जास्त हरला आहे असे आपण म्हणत आहात ते यात कुठे हे मला दाखवा
कर्णधार धोनी
कसोटी - सामने ६० विजय २७ पराभव १८ अनिर्णित १५ - विन लॉस रेशिओ १.५०
एकदिवसीय- सामने २०० विजय ११० पराभव ७४ अनिर्णित १६ - विन लॉस रेशिओ १.४९
२०-ट्वेंटी- सामने ७२ विजय ४१ पराभव २८ अनिर्णित ३ - विन लॉस रेशिओ १.४६
आयपीएल - सामने १८९ विजय ११० पराभव ७८ अनिर्णित १ - विन लॉस रेशिओ १.४१
म्हणून मी आपल्याकडून कन्फर्म केले की टायपो आहे का? आता याव्यतीरीक्त आपल्याला कुठे दिसले त्याचे ५० टक्केहून अधिक हरलेले सामने ते मला दाखवा.
ईथे आयपीएलच्या धाग्यावर धोनीची चर्चा जास्त होत असेल तर हिच पोस्ट तिथेही कॉपीपेस्ट करतो, तिथे उत्तर दिले तरी चालेल.
धोनीला कुठले विक्रम खुणावत होते त्याचे उत्तरही मी जे देणार आहे ते विक्रम या धाग्यावर वाहून जाण्याऐवजी तिथेच धोनीच्या धाग्यावर द्यायला आवडतील
आणि हो, मला आपले धोनीबद्दलचे वैयक्तिक मत बदलायचे नसून माहिती खरी खोटी करायची आहे
धोनीवर आणखी चर्चा करायची
धोनीवर आणखी चर्चा करायची असल्यास, आणि खरेच त्याचे कुठे ५० टक्के पेक्षा जास्त हरले असल्यास हा धागा वापरा
https://www.maayboli.com/node/54427?page=13#comment-4657903
विक्रमही तिथेच टाकेन त्याचे. शोधतानाच मजा येणार आहे, काही धोनीच्या खेळीही शोधून पुन्हा बघायला आवडतील
ऋन्मेष, मी खरंच ह्या विषयावर
ऋन्मेष, मी खरंच ह्या विषयावर अधिक चर्चा करू इच्छीत नाही. we just look at things differently. तू चांगलं स्टॅट्स शोधलयंस. हा विषय जिथून सुरू झाला होता, त्या 'सर्वाधिक यशस्वी कप्तान' चर्चेसाठी तू अशीच माहिती शोधलीस तर तुझ्या लक्षात येईल की तितक्याच टेस्ट्स मधे कॅप्टन्सी करणार्या कोहली चे विजय आणि विन पर्सेन्टेज पण धोनीपेक्षा जास्त आहे. वनडे मधे त्याच्या मॅचेस (कॅप्टन्सी च्या) कमी आहेत, पण विन पर्सेन्टेज जास्त आहे. असो. मी इथेच थांबतोय.
आज पंजाब वि. चेन्नई! चेन्नई ने सुरूवात जबरदस्त केलीय. दोन्ही ओपनर्स फारच स्वस्तात गेले आहेत. राहूल ने जडेजा च्या हातात बॉल असताना कसा काय चान्स घेतला कुणास ठाऊक? आगरवाल ला चहर ने टाकलेला बॉल अप्रतिम होता. पण तरिही आगरवाल कुठेतरी सूर हरवलेला वाटतोय.
हारली पंजाब.
हारली पंजाब.
पण तरिही आगरवाल कुठेतरी सूर
पण तरिही आगरवाल कुठेतरी सूर हरवलेला वाटतोय. >> हो रणजी खेळून त्याचे टेस्ट साठी लागणारे टेक्निक नि मेंटॅलिटी मस्त झालेले. आय पील एल मधे घुसायला बदल केले नि गेल्या आय पी एल मधे तो सुसाट सुटला पण नंतर टेस्ट मधे बोर्या उडाला. आता ना घर का ना घाट का मधे अडकलाय
असामी, टोटली सहमत!
असामी, टोटली सहमत!
आजची मॅच एकतर्फी होईल असं दिसतंय.
आजची मॅच एकतर्फी होईल असं
आजची मॅच एकतर्फी होईल असं दिसतंय. >> ऋन्मेऽऽष ला विचार की ब्रेक मधे काय कळवलय ते
शाहरुख खान शांतपणे खेळला आज.
आयपीएलचा मोह पुजाराला पण
आयपीएलचा मोह पुजाराला पण सुटला नाही तर मयंक कसा दूर राहिल आयपीएलपासून!
चहरने सुंदर केली बॉलिंग..... त्याचे टेंपरामेंट मला बरेचसे भुवीसारखे वाटते!
माझं सहावं इंद्रिय सांगतंय
माझं सहावं इंद्रिय सांगतंय पंजाब जिंकणार.
"शाहरुख खान शांतपणे खेळला आज.
"शाहरुख खान शांतपणे खेळला आज." - छान खेळला शाहरूख खान. क्लीन हिटींग होतं. थोडी अजून साथ मिळाली असती तर जरा काँपिटिटीव्ह स्कोअर झाला असता.
"ऋन्मेऽऽष ला विचार की ब्रेक मधे काय कळवलय ते" - मी काही कधी नकळत तुझ्या बाबतीत काही चूकलो असेन, तर माफी मागतो बाबा तुझी.
"माझं सहावं इंद्रिय सांगतंय पंजाब जिंकणार." - तसं काही झालं तर मोठा चमत्कार होईल.
"आयपीएलचा मोह पुजाराला पण सुटला नाही तर मयंक कसा दूर राहिल आयपीएलपासून!" - खरंय. तरी सुरूवातीला टेस्ट च्या टेक्निक वर दुष्परिणाम होईल म्हणून पुजारा आयपीएल पासून लांब राहिला होता असं मध्यंतरी त्याच्या एका इंटरव्ह्यू मधे वाचलं होतं.
मला ब्रेकमध्ये कळलंय की १९
मला ब्रेकमध्ये कळलंय की १९ ओव्हर्समध्ये ९८-७ असतील चेन्नई आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जाडेजा ९ रन्स करून जिंकवेल.
मला ब्रेकमध्ये कळलंय की १९
मला ब्रेकमध्ये कळलंय की १९ ओव्हर्समध्ये ९८-७ असतील चेन्नई आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जाडेजा ९ रन्स करून जिंकवेल. >> महामहिम बद्दल एकही शब्द न लिहिल्याने पोस्ट बाद ठरवण्यात यावे
मी काही कधी नकळत तुझ्या बाबतीत काही चूकलो असेन, तर माफी मागतो बाबा तुझी. >
पुजारा ला सुरूवातीच्या ऑक्शन नंतर घेतले नव्हते असे आठवतेय. ह्याबद्दल धन्यवाद द्यायला हवेत आयपील मालकांना.
पंजाब जिंकण्याच्या वाटेवर.
पंजाब जिंकण्याच्या वाटेवर.
महामहिम बद्दल एकही शब्द न
महामहिम बद्दल एकही शब्द न लिहिल्याने पोस्ट बाद ठरवण्यात यावे Wink >>> कोहली ह्या मॅचमध्ये कुठे अरे?
अरे तो डुप्लीकेट आहे. मूळ
अरे तो डुप्लीकेट आहे. मूळ आद्यपुरुष !
जिंकला धोनी ! जिंकली सीएसके!
जिंकला धोनी ! जिंकली सीएसके! चॅम्पियनच्या थाटात
सुरुवातीपासूनच जे आक्रमण केले विकेट टू विकेट गोलंदाजीचे त्याला तोड नाही.
दिपक चहर चार विकेट कारण चार सलग ओवर हे धोनीच्याच राज्यात होऊ शकते.
लास्ट आयपीएल असेल हा धोनीचा. कदाचित. मजा येणार आहे...
तितक्याच टेस्ट्स मधे
@ फेरफटका
तितक्याच टेस्ट्स मधे कॅप्टन्सी करणार्या कोहली चे विजय आणि विन पर्सेन्टेज पण धोनीपेक्षा जास्त आहे. वनडे मधे त्याच्या मॅचेस (कॅप्टन्सी च्या) कमी आहेत, पण विन पर्सेन्टेज जास्त आहे. असो. मी इथेच थांबतोय.
>>>>>
तुम्हाला केव्हाही थांबायचा अधिकार आहेच.
ते आकडे मी फक्त तुम्ही धोनी ५० टक्क्यांपेक्षा जास्त हरला आहे असे जे चुकीचे विधान केले होते त्यासाठीच आणले होते.
माझे मत आणि माझा दृष्टीकोण मी आधीच लिहिला होता की मला धोनीची कप्तानी जोखायला त्या स्टॅटसची गरजच नव्हती. किंबहुना सारे आयसीसी चषक जिंकणे या फॅक्टलाही मुद्दा बनवायची गरज नाही. त्याच्यासारखी खेळाची जाण जगात एखाद्यालाच असेल आणि हे ओळखायला मला कुठल्याही आकड्यांची गरज नाही. जे लाईव्ह क्रिकेट बघतो ते पुरेसे आहे.
पण जर विनिंग रेशिओ पाहता कोहली हा धोनीपेक्षा उत्तम कर्णधार आहे असे कोणी म्हणत असेल तर मग खरेच आपला दृष्टीकोण वेगळा आहे
सुरुवातीपासूनच जे आक्रमण केले
सुरुवातीपासूनच जे आक्रमण केले विकेट टू विकेट गोलंदाजीचे त्याला तोड नाही.
दिपक चहर चार विकेट कारण चार सलग ओवर हे धोनीच्याच राज्यात होऊ शकते. > हे थोडे जास्तीच होते असे वाटत नाही तुला ? ह्याच बॉलर्स नी आधीच्या सामन्यामधे दीड फूटाची विड्थ देऊन फटके खल्ले होते तेंव्हाही धोनी होताच ना मैदानामधे ? धोनी चा क्रिकेटींग सेन्स वगैरे मान्य करूनही मैदानात होणारी प्रत्येक गोष्ट तोच घडवून आणतो असा आव कशाला आणत असतोस ? काय मिळते ह्या सगळ्यातून तुला हे एक तो देव च जाणे !
Pages