Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.
भारी किस्से .
भारी किस्से .
आइस्क्रीमवाल्या काकू आवडल्याच . धोरणी आहेत एकदम
एकाच प्लेट मध्ये खाणारा नवरा पण सुपर .
ज्यांना पत्रिका बघायची आहे ते
ज्यांना पत्रिका बघायची आहे ते बघायला आधी का येतात. आमच्याकडे पत्रिका बघायची असेल तर आधी पत्रिका जुळतेय की नाही ते बघतात आणि त्यानंतर पुढचं सर्व.
मध्यस्थीने सांगून टाकलं कि तिचं लग्न आहे आता पुढच्या महिन्यात आणि आता अमेरिकेत सेटल होतीये >>> हे मस्त.
विकली रिपोर्टस वाचून थोडं वैषम्यही वाटलं, मुलीकडच्या सर्वांना आणि विशेषत: आईला काय वाटलं असेल. त्यापेक्षा आधीच ग्रेसफुली नकार कळवता येत होता.
आईस्क्रीम किस्सा
आईस्क्रीम किस्सा अफलातून
आईस्क्रीम किस्सा अफलातून
किस्सा म्हणता येणार नाही पण
किस्सा म्हणता येणार नाही पण माझेही काका हे लग्न जमवायचे उपद्व्याप करत. एका मुलीला एक मुलगा सुचवला तर मुलीकडच्यांनी नकार दिला कारण मुलाला नोकरी नव्हती व तो एक लहानसा कारखाना चालवत होता. तीनेक वर्षांनी त्या मुलीचे एका डिप्लोमा धारकाशी लग्न ठरले आणी नवरा त्याच कारखान्यात नोकरीवर होता. रिसेप्शन मध्ये ओळख करून देताना अवघड झाले.
मस्त किस्से
मस्त किस्से
रानभुली आमच्याकडे सेम किस्सा झाला होता. फ़क्त जूना काळ असल्याने आणि गणपती मध्ये मुलाकडील लोक येणार असल्याने साखर फुटाणे देउ की शेंग दाणे देउ हा प्रश्न विचारला गेला.. 40 वर्षापूर्वी वगैरे पेढ़े वगैरे चैनीच्या गोष्टी असत गावाकडे. गणपती मध्ये आलेल्या गेलेल्या लोकांना प्रसाद म्हणून फुटाणे , शेंग दाणे वगैरे देत असत
खूप दिवसांनी माबोवर आले. मजा
खूप दिवसांनी माबोवर आले. मजा आली वाचून.
जुन्या हितगुजवर असाच एक धागा होता. कमाल किस्से होते.
जुन्या माबोवर होते त्यांना आठवेल कदाचित.
ऐश्वर्याच्या वर्गातल्या मुलाचा किस्सा आठवतोय का कुणाला? बहुतेक सुप्रियाने लिहिले होते ते.
एक लग्नातल्या गमतीजमती नावाचा
एक लग्नातल्या गमतीजमती नावाचा धागा होता तो आठवतोय. त्यातही भारी किस्से होते.
ऐश्वर्या रॉयच्या वर्गातला मुलगा , त्याला ती (हॉस्पिटलच्या?) लिफ्टमध्ये भेटली तो का? मला हा कुठेतरी वाचल्यासारखा वाटतोय. माबोवर की दुसरीकडे ते आठवत नाही.
नाही नाही. स्थळ म्हणून आलेला
नाही नाही. स्थळ म्हणून आलेला मुलगा ऐश्वर्याच्या वर्गात होता आर्किटेक्चरला. आणि त्याची आई ते काहीतरी भारी क्वालिफिकेशन असल्याप्रमाणे स्वतःही सांगत होती आणि मुलालाही ते सांग ते सांग करत होती. असा काहीतरी किस्सा होता.
ओह नाही मग हा नाही माहिती.
ओह नाही मग हा नाही माहिती.
त्याची आई ते काहीतरी भारी
त्याची आई ते काहीतरी भारी क्वालिफिकेशन असल्याप्रमाणे स्वतःही सांगत होती आणि मुलालाही ते सांग ते सांग करत होती
बाय द वे ते हॉस्पिटलच्या लिफ़्टमध्ये ऐश्वर्या भेटली हा किस्सा शिरीष कणेकरांनी लिहिला आहे त्यांच्या मुलाचा. खरा की खोटा माहीत नाही पण धमाल आहे. तो तिला बारावीला कोणते कोणते क्लासेस लावले होतेस असं विचारतो असं काहीतरी भयंकर फनी होतं
काणेकरांच्या मुलाचा किस्सा
काणेकरांच्या मुलाचा किस्सा मीही वाचलाय. बारावी सायन्सला प्रत्येक विषयासाठी काही खास शिकवण्या असतात आणि त्यांची फि पण भारी असते. अशाच खाजगी शिकवणीमध्ये ऐश्वर्या आणि अमर कणेकर एकत्र होते. अमर डॉक्टर झाला आणि तो ज्या हॉस्पिटल मध्ये शिकत/ काम करत होता तिथे एकदा ऐश्वर्या आली होती आणि लिफ्टमध्ये त्यांची भेट झाली. अमरला तिनेच ओळख दाखवली आणि तो तिच्याशी भाव खाऊनच वागला. घरी येऊन त्याने वडिलांना सांगितले की ती माझ्या क्लासमध्ये होती तर ते म्हणाले अरे तुला माहितीये का ती किती प्रसिद्ध आहे आणि लोक मरतात तिच्याशी बोलण्यासाठी.
राईट, मला शंका होतीच शिरीष
राईट, मला शंका होतीच शिरीष कणेकरांचा किस्सा असेल अशी. खूप वर्षांपूर्वी वाचला होता त्यामुळे खात्री वाटत नव्हती.
भारी धावतोय धागा. सध्या ते
भारी धावतोय धागा. सध्या ते रोमातच नाही तर अगदी कोमात असल्याने ईतके सारे किस्से वाचू शकत नाही. पण पुन्हा जोमात आल्यावर वाचायला म्हणून वाचणखूनात ठेवतो
धागा मुख्य पानावर आला आहे,
धागा मुख्य पानावर आला आहे, अडमीन विषयांतर प्रतिसाद उडवत आहेत बहुतेक...
धन्यवाद अॅडमिन.
धन्यवाद अॅडमिन.
शिकायला अमेरिकेला आलेल्या एका
शिकायला अमेरिकेला आलेल्या एका मुला मुलीने अमेरिकेत लग्न ठरवलं. मुलगी मराठी आणि मुलगा राजस्थानी..
दोन्ही कडच्या आईवडिलानी परवानगी स्वखुशीने दिली.
मग पुढे साखरपुडा ठरला, मुलाचे आईवडिल मुलीच्या घरी आले, त्यांचे स्वागत वगैरे झालं. ते परत घरी जाताच त्यानी मुलीच्या वडिलांना फोन केला.
'तुम्ही तुमचे बघा, आम्ही आमचे.. हे लग्न होणार नाही..'
मुलिच्या आईवडिलांना काहीच कळेना.. शेवटी मुलीने मुलाला फोन लावला.. तेव्हा कळलं,
... ते आपल्या रिवाजाप्रमाणे साखरपुड्याला मिठाईचे थाळे भरभरून घेऊन आले होते... आणि मुलीच्या आईवडिलांनी त्याना देताना एकच लहान खोका (बॉक्स) भरून मिठाई दिल्याने त्यांचा अपमान झाला...'
शेवटी मुला मुलीने अमेरिकेत लग्न रजिस्टर केलं, आणि जोपर्यंत डिग्री पूर्ण होत नाही तोपर्यंत, 'तेरी भी चूप.. मेरी भी चूप...'
(मुलाला बाप त्याची फी भरतो....)
एकदा कांपोसाठी आई व मुलगा
एकदा कांपोसाठी आई व मुलगा दोघेच आमच्या घरी आले होते. आम्हाला दोघांना बोलायला वेळ दिला, तेव्हा मी त्याला कोणते व्यसन वगैरे नाही ना, असं विचारलं. ( माझे काही ठराविक प्रश्न असायचे नेहमीच ). तर त्याने मला व्यसन नाही, पण कधीतरी ताडी पितो आणि माझी आई पण पिते, असं सांगितलं. मी अवाक् झाले होते.
बोलून बाहेर आलो, तर पाहिलं की , माझ्या होऊ न शकलेल्या सासूबाई निवांत सोफ्यावर बसलेल्या, दोन्ही हात डोक्यामागे घेऊन. त्यांची पोझ बघून हसूच आलं होतं मला.
नंतर ते गेल्यावर समजलं की मी मुलासोबत बोलायला आत गेले होते , तेव्हा त्या मम्मी-पप्पांना , स्वतःच्या पतीने फॉरेस्ट डिपार्टमेंटला असताना, काहीतरी अफरातफर केली होती व त्यांना बडतर्फ केले होते, हे सांगत बसल्या होत्या.
शिवाय, आमचं नीट आवरलेलं, टापटीप घर बघून " आमच्या घरी मात्र खूप पसारा असतो" असंही म्हणाल्या.
माऊ मी इमॅजिन केलं hahahaha
माऊ मी इमॅजिन केलं hahahaha
हे तर मला 'सुन सुन सुन दिदी
हे तर मला 'सुन सुन सुन दिदी तेरे लिए' गायला फुल्ल चान्स देणारे स्थळ आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
(No subject)
ताडी
ताडी
मी एकदम असं इमॅजिन केलं की
मी एकदम असं इमॅजिन केलं की ताडीवाल्या आणि अंगात येणाऱ्या दोघी बहिणी बहिणी , त्या एका ठिकाणी स्थळ बघायला गेल्या आहेत. एक बहीण म्हणत आहे , 'वैईच ताडी द्या लय कोरड पडली आहे ' आणि दुसरीच्या अंगात आलंय आणि ती म्हणत आहे ' हिला ताडी दे नायतर कोप होईल ':)
प्रामाणिक स्थळ होतं माउमैया
प्रामाणिक स्थळ होतं माउमैया
(No subject)
हे तर मला 'सुन सुन सुन दिदी
हे तर मला 'सुन सुन सुन दिदी तेरे लिए' गायला फुल्ल चान्स देणारे स्थळ आहे>>>>>> हो सीमंतिनी,,,, नंतर माझं लग्न ठरल्यावर कळलं, तो माझ्या नवऱ्याचा बॅचमेट होता. आणि नवऱ्याने सांगितलं की, तो पान तंबाखू, गुटखा हे पण खायचा.
प्रामाणिक स्थळ होतं माउमैया>>> खरंय मानव.
ताडीवाल्या आणि अंगात येणाऱ्या दोघी बहिणी बहिणी>>>> हे भारी आहे लंपन....
ताडी
ताडी
(No subject)
ताडी
ताडी
ताडीवाल्या आणि अंगात येणाऱ्या दोघी बहिणी बहिणी>>>> हे भारी आहे लंपन. >>> अगदी अगदी
पवार फसले
पवार फसले
टपरीवर सिगारेट घेतो का गुडांग
टपरीवर सिगारेट घेतो का गुडांग का नुसती चहा कॉफी
>>> सिगारेट की गुंडांग? दोन्ही एकच नाही का...
Pages