मूळ विषयाकडे वळण्यापूर्वी २०१५ पर्यंत मी केलेल्या ट्रेकिंगविषयीची माहिती-
लहानपणापासूनच मला उंचावरून खाली पहायची भिती नव्हती.. त्यात बाबांना डोंगर, किल्ले चढायची आवड होती त्यामुळे ते बऱ्याचदा मला व भावालाही ट्रेकिंगसाठी घेऊन जायचे..त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातल्या राजमाची, नानेघाट, घनचक्कर शिखर सारख्या व इतर बऱ्याच ट्रेक्स केल्या आहेत.. २०१२ ला अमेरीकेत आल्यावर इथेही नवऱ्याबरोबर Utah मधली delicate arch, mt. Rainer मधल्या काही ट्रेल्स व भावाबरोबर २०१५ मधे Zion national park मधली angels landing सारखी डेंजरस ट्रेक केलेली आहे.. त्यानंतर ३ वर्षे एकाही ट्रेकला गेले नाही.. २०१८ मधे दुसरी मुलगी झाली तेव्हा वर्षभरासाठी मेक्सिकोत होते.. त्यावेळेस मेक्सिको सिटीपासून दिड तासाच्या अंतरावर असलेल्या sun pyramid(65.5 meter height) वर जायचा विचार होता.. sun pyramid बऱ्यापैकी steep आहे व त्यात नुकतच माझं बाळंतपण झालेलं असल्याने sun pyramid ला जाण्याआधी moon pyramid चढले .. moon pyramid ची उंची आठवत नाही पण sun pyramid त्याच्या पंधरा एक पटीने मोठा असेल..moon pyramid चढले तेव्हा डोकं गरगरलं होतं.. फिजिकल फिटनेस पार गंडला होता.. त्यानंतर पुन्हा अमेरीकेत आले पण मुली झाल्यानंतर नवऱ्याने ट्रेकिंगला रामराम ठोकल्यामुळे माझेही ट्रेकिंग जवळपास बंदच झाले..
लॅाकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात थोडाफार व्यायाम सुरू केला, ५ किलो वजन कमी केले.. पुन्हा ४ महिन्यांचा ब्रेक घेतला व गेले दोन महिने आठवड्यातले किमान तीन दिवस हाय इंटेंसिटी व दोन दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग असा व्यायाम चालू ठेवला.. अजूनही हवा तसा फिटनेस नाही, पण गेल्या आठवड्यात भाऊ आणि वहिनी ट्रेकचा प्लॅन करत होते तेव्हा मी त्यांच्याबरोबर जायची तयारी दाखवली..
ट्रेकिंग करून पाच एक वर्षांचा गॅप झाला होता व त्यात moon pyramid चा एक खराब अनुभव होता म्हणून त्यातल्या त्यात कमी अंतर असलेली ट्रेल करायचं ठरवलं आणि grandfather mountain मधल्या macrae peak trail चा स्लॅाट बुक केला..
थोडंसं macrae peak बद्द्ल सांगायचं म्हटलं तर समुद्रसपाटीपासून उंची- १८१० मिटर, ट्रेलचा सुरूवातीचा रस्ता खाच खळग्यातून व मोठमोठे दगड चढून जाण्याचा असला तरी उरलेला अर्धा रस्ता म्हणजे कडा, हा केबल्स व लॅडरच्या मदतीने पार पाडावा लागतो.. एकूण ७ लॅडर्स आहेत..सुरूवातीच्या ३ लॅडर्स सोडल्या तर उरलेल्या ४ लॅडर्स दरीच्या दिशेने आहेत..त्यात कालचं तापमान 0c. व वाऱ्याचा वेग 118mph.
वर म्हटल्याप्रमाणे, macrae peak पेक्षा बऱ्याच जास्त अंतराच्या व उंचीच्या ट्रेल्स पूर्वी केलेल्या आहेत. पण परवा जेव्हा macrae peak ट्रेलची चौथी लॅडर चढले तेव्हा अचानक कान व डोकं दुखायला लागलं.. १५ मिनिटे ब्रेक घेत पाचवी लॅडर चढले व त्यानंतर गरगरणं सुरू झालं .. तीथेही पुन्हा १५ मिनिटे ब्रेक घेतला तरी ब्रेक दरम्यान नजर सारखी डावीकडे असलेल्या दरीच्या दिशेने वळत होती.. अचानक कॅान्फिडंस पूर्णपणे डाऊन झाला आणि उरलेली ट्रेल पूर्ण न करताच मागे वळण्याचा निर्णय घेतला.. लॅडर वरून उतरणे हे लॅडर वर चढण्यापेक्षा कितीतरी पटीने कठीण असतं हे तो पर्यंत माहित नव्हते.. पण लॅडर उतरण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता म्हणून कसेबसे उतरले..
आता विषयाकडे वळूयात-
लॅडर ट्रेलचा पहिलाच अनुभव असला तरी खरा प्रॅाब्लेम भीतीमुळे होतोय व त्यामुळे माझ्या ट्रेकिंगच्या लिस्टमधे बरीच ठिकाणं असली तरी लगेच ट्रेक करायचं धाडस होत नाहीए.. भावाला बऱ्यापैकी ट्रेकिंगचा अनुभव आहे पण अशी उंचावरून खाली बघायची भीती बसण्याचा अनुभव नाही.. इथल्या ट्रेकर्स किंवा इतर ॲडवेंचर्स करणाऱ्यांचे अनुभव व सल्ले वाचायला आवडतील.
एखाद्या गोष्टीविषयी अचानक निर्माण झालेली भीती कमी होते का ? मुली मोठ्या झाल्या की त्यांनाही ट्रेकिंगला घेऊन जायची इच्छा आहे..पण जर मीच घाबरले तर त्यांना कॅान्फिडंस कसा देणार?
मेडिटेशन, योगाचा काही उपयोग होईल का?
सल्ले येऊ द्यात.
Macrae peak trail-
https://youtu.be/yAbXkOR6zAA
प्रश्न रास्त आहे. भीती जाते
प्रश्न रास्त आहे. भीती जाते का? ट्रेकिंग करावे का?
पहिले म्हणजे आपण डोंगरात राहात नसल्याने सवय पार गेलेली असते. शारिरिक दम लागणे हे तर लगेच जाणवते.
दुसरे म्हणजे तुलना होण्याने मानसिक त्रास होत असतो. म्हणजे ग्रुपमध्ये जाताना किंवा स्वतंत्रपणे जात असतो पण इतर गर्दी असते तेव्हाही मनातल्या मनात तुलना होत राहाने. मानसिक दडपण. तो/ ती माझ्याच वयाची /मोठीही किती पटापट जात आहेत, मी मागे !!
उपाय - स्थानिक गाइड घेणे. आपण याच ट्रेकलो गेलो आहे अगोदर, वाट माहीत आहे, चुकणार नाही तरीही तो गाइड म्हणून नाही तर एक आश्वासक पणा देतो. बडबड करतो, माहिती देतो, गुंगवतो, आणि मुख्य म्हणजे पोहोचोवतो. त्याची जबाबदारी आपल्याला व्यवस्थित पोहोचवण्याची असते. ती तो पार पाडतो आणि भिती राहातच नाही. कोण कुठे चुकतो आणि काय खबरदारी घ्यायची ते तो सहज सांगतो. आपण चालायला शिकतो लहानपणी तसे ते गाइड डोंगर चढाउतरायला शिकलेले आसतात. आश्वासकपणा येतो आणि ट्रेकिंगमधली गंमत कमी होत नाही.
शेवटी - Rhinos Meissner ,नावाचा प्रख्यात सोलो ट्रेकर म्हणतो तसे " मी mountaineer नाही, मी mountainman आहे.
Peak scaling वेगळं wandering in mountains वेगळं.
-–---------
बाकी व्यायामाबद्दल माहिती नाही पण १) काही खाल्ल्यावर दीड तासानंतर ट्रेक सुरू करावा. नंतर दोन तासांनी वाटेत केळी, फळं खावीत.
----------
पाचवी लॅडर चढले व त्यानंतर गरगरणं सुरू झालं
टेस्ट - शाळेतला खेळ आठवतो का? एक काठी जमिनीत पुरलेली असते. त्यास वाकून एकाहाताने विळखा घालून कान ( आपलाच) पकडायचा. पाच/दहा प्रदक्षिणा घालून मग लगेच उभे राहून थोड्या अंतरावरच्या काठीकडे चालत जायचे. चक्कर येणारा सरळ जाऊ शकत नाही. किंवा सवयीने हे काम जमते किंवा किती फेऱ्या घालू शकतो यावरून आपला ब्यालन्स कळतो.
जे इतरांना जमते ते आपल्याला नक्की जमेल पण स्पर्धा टाळा. गाईड अवश्य घ्या.
Srd ,
Srd ,
त्या खेळाबद्दल नीट लिहाल का प्लिज?
मला माहित नाहीये पण तो उपयोगी आहे असं वाटतंय.
बाकी उंचीच्या भीतीबद्दल काही लिहू शकत नाहीये पण चांगली माहिती वाचायला आवडेल.
सतत ट्रेकिंग सतत करून उंचीची
सतत ट्रेकिंग करून उंचीची भिती कमी होऊ शकते असं म्हणतात.. पण मला तरी तसा अनुभव येत नाही. प्रत्येक ट्रेक वेळी भितीचा अॅटॅक आल्याशिवाय रहात नाही. कुठून दुर्बुद्धी सुचली अन इथे आलो असं होतं. आता जगलो-वाचलो तर शेवटचाच ट्रेक.. पुन्हा कधीही येणार नाही असं प्रत्येक वेळी वाटतं पण घरी पोचल्यावर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न सुरुच रहातात.
वर्टिगो उत्पन्न झाला असेल तर
वर्टिगो उत्पन्न झाला असेल तर डॉक्टर औषध देऊ शकतील.
@सावली, तसा तो खेळ नाही फक्त
@सावली, तसा तो खेळ नाही फक्त टेस्ट आहे. मला आठवतंय - आठवीत असताना एनसीसी मध्ये प्रवेश देताना हे करत. ज्यांना सरळ चालता येत नाही ते बाद. मला हे जमलं पण पाय - तळपाय सपाट असल्याने बाद झालो.
सतत ट्रेकिंग सतत करून उंचीची
सतत ट्रेकिंग सतत करून उंचीची भिती कमी होऊ शकते असं म्हणतात.. पण मला तरी तसा अनुभव येत नाही.... DJ.....
बरोबर आहे. प्रत्येकाची एक पातळी असते भिती वाटण्याची.
शक्यतो अधिक किमी लांबीचे ट्रेक करावेत, पण कमी लांबीचे पण कुठे धोकादायक अरुंद वाट असेल तर खात्री आणि आत्मविश्वास नसेल तर टाळावे. कारण मनोरंजन महत्त्वाचे परीक्षा नव्हे.
हो.. तुम्ही म्हणता तेही खरेच.
हो.. तुम्ही म्हणता तेही खरेच. त्यामुळेच मी अजुनही अलंग - मदन - कुलंग करण्याचं अजुनही टाळलं आहे.
मी पण टाळलं कारण ते परावलंबी
मी पण टाळलं कारण ते परावलंबी आहे.
मधल्या प्रदीर्घ काळामुळे
मधल्या प्रदीर्घ काळामुळे कदाचित भीती वाटत असावी. सातत्य ठेवले तर भीती निश्चितच कमी होईल. कोणत्याही खेळासाठी/पोहण्यासाठी सराव असणे गरजेचे आहे. छान अनुभव कथन केला. महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
@Srd - प्रतिसादाबद्द्ल फार
@Srd - प्रतिसादाबद्द्ल फार फार धन्यवाद. अमेरीकेत स्थानिक गाईड मिळण्याबाबत जरा शंकाच आहे पण शोधायला हरकत नाही. इथे रेंजर्स असतात पण ते ट्रेक सुरू करण्याआधी आपल्याला हवी ती माहिती पुरवणे व एखाद्याला रेस्क्यू करणे यासारखी मदत करतात.
एक काठी जमिनीत पुरलेली असते. त्यास वाकून एकाहाताने विळखा घालून कान ( आपलाच) पकडायचा>> हा खेळ कधी खेळले नाही
@DJ -
प्रत्येक ट्रेक वेळी भितीचा अॅटॅक आल्याशिवाय रहात नाही. कुठून दुर्बुद्धी सुचली अन इथे आलो असं होतं. >> सहसा मी खात्री नसेल तर पुढे जायचं टाळते किंवा ब्रेक घेत स्वत:च्या पेसने पुढे जाते.. परवा पण तेच केलं.. पण परवाचा ट्रेक आधी केलेल्या ट्रेक्सच्या मानाने कमी चॅलेंजींग होता तरीही पूर्ण नाही करू शकले म्हणून थोडी निराशा झाली
एखादा माणूस उंचीवर उभा असला
एखादा माणूस उंचीवर उभा असला की मागे जाऊन त्याला एक हाताने धक्का मारतो आणि दुसऱ्या हाताने पकडतोसुद्धा. त्यामुळे तो माणूस खूपच घाबरून जातो आणि थोडक्यात वाचल्याची भावना त्यात निर्माण होऊन पुढच्या वेळी कितीही उंचावर उभा राहिला तरी त्याला काही वाटत नाही. असं मी अनेक जणांना या हाईट फोबियातून मुक्त केलंय.
एखादा माणूस उंचीवर उभा असला
एखादा माणूस उंचीवर उभा असला की मागे जाऊन त्याला एक हाताने धक्का मारतो आणि दुसऱ्या हाताने पकडतोसुद्धा. त्यामुळे तो माणूस खूपच घाबरून जातो आणि थोडक्यात वाचल्याची भावना त्यात निर्माण होऊन पुढच्या वेळी कितीही उंचावर उभा राहिला तरी त्याला काही वाटत नाही. असं मी अनेक जणांना या हाईट फोबियातून मुक्त केलंय.>> हॉरिबल...
फारच पुण्याचं काम करताय
फारच पुण्याचं काम करताय तुम्ही बोकलत
शरदजी खूपच छान आणि सविस्तर
शरदजी खूपच छान आणि सविस्तर माहीती दिलीत.
>>एक काठी जमिनीत पुरलेली असते
>>एक काठी जमिनीत पुरलेली असते. त्यास वाकून एकाहाताने विळखा घालून कान ( आपलाच) पकडायचा>> हा खेळ कधी खेळले नाही<<
बघायला मजेशीर पण खेळायला खतरनाक असा खेळ (डिझि इझि) आहे हा. याची इंप्रोवाय्ज्ड वर्जन्स टेलीमॅच मधे असायची...
Reinhold Messner चे उदाहरण
Reinhold Messner चे उदाहरण इथे अप्रस्तुत आहे. First ascent of Everest without supplementary oxygen करणारा तो माणूस म्हणजे सुपरह्युमन आहे.
शेवटी स्वतःचा जीव सांभाळणे सर्वात महत्त्वाचे. झेपत नसेल तर अट्टाहासाने असे कठीण ट्रेकिंग करायच्या फंदात पडू नये, असे माझे वैयक्तिक मत.
उदाहरण इथे अप्रस्तुत आहे ....
उदाहरण इथे अप्रस्तुत आहे ......उपाशी बोका
तो अतिप्रगत चढाई करतो हे मान्य. पण त्याचं वाक्य घेतलं आहे. की सहजपणे गाववाले फिरतात तसे फिरतो. तसा तोही सहजच करत होता लहानपणापासून कारण त्याच्या गावाला चुनखडीचे डोंगर होते. तिकडे फिरणे सामान्य होते. आपली पातळी पाहून डोंगरवाटा तुडवणे एवढेच राखून आनंद मिळवायचा.
<<एखादा माणूस उंचीवर उभा असला
<<एखादा माणूस उंचीवर उभा असला की मागे जाऊन त्याला एक हाताने धक्का मारतो आणि दुसऱ्या हाताने पकडतोसुद्धा. त्यामुळे तो माणूस खूपच घाबरून जातो आणि थोडक्यात वाचल्याची भावना त्यात निर्माण होऊन पुढच्या वेळी कितीही उंचावर उभा राहिला तरी त्याला काही वाटत नाही. असं मी अनेक जणांना या हाईट फोबियातून मुक्त केलंय.
Submitted by बोकलत on 8 March>>
अतिशय अयोग्य प्रतिसाद. इथे वाचून खरंच कोणी असं काही केलं तर फार महागात पडेल. दोघेपण खाली पडतील.
अतिशय अयोग्य प्रतिसाद +१
अतिशय अयोग्य प्रतिसाद +१
बोकलत, धागा वाचणारे सगळेच तुमच्या विनोदांना(?) परिचित असतील असे नव्हे. समजा एखादा नवा आयडी किंवा गुगल सर्च मधून इथे पोहोचलेला कॉलेजकुमार/कुमारी एका ट्रेकवर गेले आणि उंचीची भीती असणाऱ्या त्यांच्या मित्रावर असा प्रयोग केला तर ? त्यात चुकून काही बरेवाईट झाले, त्याला ह्यदयविकाराचा झटका आला किंवा त्यांची मैत्री तुटली तर ?
त्यात चुकून काही बरेवाईट झाले
त्यात चुकून काही बरेवाईट झाले, त्याला ह्यदयविकाराचा झटका आला किंवा त्यांची मैत्री तुटली तर ?>> क्रेडीट गोज टू बोकलत
मी स्वतः वापरलेले नाही पण
मी स्वतः वापरलेले नाही पण झीरोफोबिया नावाचे अॅप आहे.
माझे काही फोटो देउ का इथे?
माझे काही फोटो देउ का इथे? ते बघुन कदाचित उंचीची भीती कमी होण्यास मदत होइल, "मी का नाही करु शकणारे हे?" असे वाटुन.
>>>मी का नाही करु शकणारे हे?>
>>>मी का नाही करु शकणारे हे?>>
तुलना टाळा. मग आनंद वाढतो. मी तर अवघड जागी ( रॉक क्लाइमिंग) जातच नाही. दोन चार लोक आपल्याला दोरीने ओढणार, " वा काका, छान जमतंय तुम्हाला" हे नकोच.
सर्वात आधी
सर्वात आधी
__/\__
घ्या!!!
हॅट्स ऑफ!
SRD तुलना कधी टाळायची असते तर
SRD तुलना कधी टाळायची असते तर कधी करायची असते.
अनेक भीती, भीड, लाज वगैरेंवर माणुस इतर उदाहरणे पाहून मात करतो आणि पुढे जातो. सतत तुलना टाळली तर जिथे आहे तिथंच राहील.
म्हाळसा, बाकी कुठल्या high
म्हाळसा, बाकी कुठल्या high rise building च्या छतावर देखील जाताना भीती वाटली असा अनुभव आला आहे का? May be it's just an impression from your last experience with moon pyramid. हळूहळू सुरूवात करता येईल. हा इतक्यात केलेला ट्रेक वर्णनावरून बराच strenuous conditions मध्ये केला असं वाटतंय. Keep as many factors in the comfort range as possible and then start building your capacity for heights. हा कायमस्वरूपी फोबिया वगैरे वाटत नाहीये मला तरी. खूप खूप शुभेच्छा तुला
>>>>सर्वात आधी __/\__ घ्या!!!
>>>>सर्वात आधी __/\__ घ्या!!! हॅट्स ऑफ!
+१
सीमंतिनी- थॅंक्स..ॲप बघितलंय.
सीमंतिनी- थॅंक्स..ॲप बघितलंय..चांगलं वाटतंय..VR च्या मदतीने फोबिया कमी होईल बहुतेक.
माझे काही फोटो देउ का इथे? ते बघुन कदाचित उंचीची भीती कमी होण्यास मदत होइल>> द्या बिनधास्त
तुलना टाळा. मग आनंद वाढतो >> ट्रेकच्या वेळेस तुलना होणं हे साहजिकच आहे..पण आत्तापर्यंत मला अशा तुलनेने ट्रेक पूर्ण करायला हुरूपच मिळाला आहे आणि तसंही मी जीवाला फार जपते त्यामुळे जेव्हा कॅान्फिडंस कमी असतो तेव्हा ब्रेक घेत पुढे जाते किंवा पुढे जातच नाही.
बाकी कुठल्या high rise building च्या छतावर देखील जाताना भीती वाटली असा अनुभव आला आहे का? >> तसा अनुभव नाही.. ठाण्यातलं घर २५व्या मजल्यावर आहे आणि तीथे असते तेव्हा मी उटसूट बाल्कनीतच पडलेली असते
हळूहळू सुरूवात करता येईल. हा इतक्यात केलेला ट्रेक वर्णनावरून बराच strenuous conditions मध्ये केला असं वाटतंय>> हो असू शकतं.. आधी काही छोटे ट्रेक करायचा विचार आहे..झीरोफोबिया ॲप वापरून बघणार आहे.. बघूया फरक पडतो का
(No subject)
फोटो म्हणून छानच आहे पण आई
फोटो म्हणून छानच आहे पण आई-बाबांना दाखवला का हा फोटो त्या काळात? पॉकेटमनी बंद व्हायचा....
Pages