उंचीची भीती, ट्रेकिंग, अनुभव, सल्ले

Submitted by म्हाळसा on 7 March, 2021 - 21:59

मूळ विषयाकडे वळण्यापूर्वी २०१५ पर्यंत मी केलेल्या ट्रेकिंगविषयीची माहिती-
लहानपणापासूनच मला उंचावरून खाली पहायची भिती नव्हती.. त्यात बाबांना डोंगर, किल्ले चढायची आवड होती त्यामुळे ते बऱ्याचदा मला व भावालाही ट्रेकिंगसाठी घेऊन जायचे..त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातल्या राजमाची, नानेघाट, घनचक्कर शिखर सारख्या व इतर बऱ्याच ट्रेक्स केल्या आहेत.. २०१२ ला अमेरीकेत आल्यावर इथेही नवऱ्याबरोबर Utah मधली delicate arch, mt. Rainer मधल्या काही ट्रेल्स व भावाबरोबर २०१५ मधे Zion national park मधली angels landing सारखी डेंजरस ट्रेक केलेली आहे.. त्यानंतर ३ वर्षे एकाही ट्रेकला गेले नाही.. २०१८ मधे दुसरी मुलगी झाली तेव्हा वर्षभरासाठी मेक्सिकोत होते.. त्यावेळेस मेक्सिको सिटीपासून दिड तासाच्या अंतरावर असलेल्या sun pyramid(65.5 meter height) वर जायचा विचार होता.. sun pyramid बऱ्यापैकी steep आहे व त्यात नुकतच माझं बाळंतपण झालेलं असल्याने sun pyramid ला जाण्याआधी moon pyramid चढले .. moon pyramid ची उंची आठवत नाही पण sun pyramid त्याच्या पंधरा एक पटीने मोठा असेल..moon pyramid चढले तेव्हा डोकं गरगरलं होतं.. फिजिकल फिटनेस पार गंडला होता.. त्यानंतर पुन्हा अमेरीकेत आले पण मुली झाल्यानंतर नवऱ्याने ट्रेकिंगला रामराम ठोकल्यामुळे माझेही ट्रेकिंग जवळपास बंदच झाले..
लॅाकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात थोडाफार व्यायाम सुरू केला, ५ किलो वजन कमी केले.. पुन्हा ४ महिन्यांचा ब्रेक घेतला व गेले दोन महिने आठवड्यातले किमान तीन दिवस हाय इंटेंसिटी व दोन दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग असा व्यायाम चालू ठेवला.. अजूनही हवा तसा फिटनेस नाही, पण गेल्या आठवड्यात भाऊ आणि वहिनी ट्रेकचा प्लॅन करत होते तेव्हा मी त्यांच्याबरोबर जायची तयारी दाखवली..

ट्रेकिंग करून पाच एक वर्षांचा गॅप झाला होता व त्यात moon pyramid चा एक खराब अनुभव होता म्हणून त्यातल्या त्यात कमी अंतर असलेली ट्रेल करायचं ठरवलं आणि grandfather mountain मधल्या macrae peak trail चा स्लॅाट बुक केला..

थोडंसं macrae peak बद्द्ल सांगायचं म्हटलं तर समुद्रसपाटीपासून उंची- १८१० मिटर, ट्रेलचा सुरूवातीचा रस्ता खाच खळग्यातून व मोठमोठे दगड चढून जाण्याचा असला तरी उरलेला अर्धा रस्ता म्हणजे कडा, हा केबल्स व लॅडरच्या मदतीने पार पाडावा लागतो.. एकूण ७ लॅडर्स आहेत..सुरूवातीच्या ३ लॅडर्स सोडल्या तर उरलेल्या ४ लॅडर्स दरीच्या दिशेने आहेत..त्यात कालचं तापमान 0c. व वाऱ्याचा वेग 118mph.

वर म्हटल्याप्रमाणे, macrae peak पेक्षा बऱ्याच जास्त अंतराच्या व उंचीच्या ट्रेल्स पूर्वी केलेल्या आहेत. पण परवा जेव्हा macrae peak ट्रेलची चौथी लॅडर चढले तेव्हा अचानक कान व डोकं दुखायला लागलं.. १५ मिनिटे ब्रेक घेत पाचवी लॅडर चढले व त्यानंतर गरगरणं सुरू झालं .. तीथेही पुन्हा १५ मिनिटे ब्रेक घेतला तरी ब्रेक दरम्यान नजर सारखी डावीकडे असलेल्या दरीच्या दिशेने वळत होती.. अचानक कॅान्फिडंस पूर्णपणे डाऊन झाला आणि उरलेली ट्रेल पूर्ण न करताच मागे वळण्याचा निर्णय घेतला.. लॅडर वरून उतरणे हे लॅडर वर चढण्यापेक्षा कितीतरी पटीने कठीण असतं हे तो पर्यंत माहित नव्हते.. पण लॅडर उतरण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता म्हणून कसेबसे उतरले..

आता विषयाकडे वळूयात-
लॅडर ट्रेलचा पहिलाच अनुभव असला तरी खरा प्रॅाब्लेम भीतीमुळे होतोय व त्यामुळे माझ्या ट्रेकिंगच्या लिस्टमधे बरीच ठिकाणं असली तरी लगेच ट्रेक करायचं धाडस होत नाहीए.. भावाला बऱ्यापैकी ट्रेकिंगचा अनुभव आहे पण अशी उंचावरून खाली बघायची भीती बसण्याचा अनुभव नाही.. इथल्या ट्रेकर्स किंवा इतर ॲडवेंचर्स करणाऱ्यांचे अनुभव व सल्ले वाचायला आवडतील.
एखाद्या गोष्टीविषयी अचानक निर्माण झालेली भीती कमी होते का ? मुली मोठ्या झाल्या की त्यांनाही ट्रेकिंगला घेऊन जायची इच्छा आहे..पण जर मीच घाबरले तर त्यांना कॅान्फिडंस कसा देणार?
मेडिटेशन, योगाचा काही उपयोग होईल का?
सल्ले येऊ द्यात.

Macrae peak trail-
https://youtu.be/yAbXkOR6zAA

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Pages