Submitted by रानभुली on 31 January, 2021 - 10:44
सिंगिंग रिअॅलिटी शोज बद्दल इथे चर्चा करावी. डान्स शोज साठी वेगळ्या धाग्यावर चर्चा करावी. सध्या सोनी वाहीनीवर इंडीयन आयडॉलचा १२ वा सीझन चालू आहे. झी वाहीनीच्या शो ची वेब ऑडीशन्स संपली आहेत. त्यामुळे तो लवकरच भेटीला येणे अपेक्षित आहे. याशिवाय विविध शोज आता सुरू होतील
या व इतर शोजच्या ज्या सीझन्स वर यापूर्वी चर्चा झालेली नाही त्यातल्या उल्लेखनीय परफॉर्मन्स बद्दलही इथे चर्चा करू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज एकदम।महा पकाऊ एपिसोड,
आज एकदम।महा पकाऊ एपिसोड, मिमिक्री आर्टिस्ट नेहा तर ओव्हर ऍकटिंगची दुकान आहे, एकदम प्रचंड इरिटेटिंग आहे आणि चिरक्या आवाजात केकटत असते अखंड.
मला अनुष्काच्या चेह-यावरचे
मला अनुष्काच्या चेह-यावरचे भाव बघताना हसू आलं होतं.
नेहा रडत होती आणि तिला येणारं हसू ती दाबत होती.
त्या बंगाली एंगझायटी वालीला
त्या बंगाली एंगझायटी वालीला आता वाटत असेल उगाच स्टोरी बनवली डिप्रेशन आणि एंगजायटीची. आज नेहा तिच्या हात धुऊन मागे लागली होती तरी ती बया रडली नाहीच तो निळा जॅकेट वाला कोण आहे ? मागे पण एकदा आला होता.
ते हिंदीतले दवणे आहेत. मनोज
ते हिंदीतले दवणे आहेत. मनोज मुंताशीर.
☺️
☺️
नेहालाच घालवलं पाहिजे आता.
नेहालाच घालवलं पाहिजे आता. तिची रडारड पाहुन चॅनल बदलुन टाकलं.
मनोज मुंताशीरने खूप भारी भारी
मनोज मुंताशीरने खूप भारी भारी गाणी लिहिली आहेत अलीकडे. बाहुबली2 चं हिंदी स्क्रिप्ट पण लिहिलं होतं.
राजकीय मतांमुळे काहींच्या गनपॉईंटवर आला असावा तो
या धाग्यावर कृपया राजकारण आणू
या धाग्यावर कृपया राजकारण आणू नये. ट्रोलिंग साठी इतर अनेक धागे आहेत. इथे नकोच प्लीज.
महाराष्ट्राचा झेंडा आज वर
महाराष्ट्राचा झेंडा आज वर राहिला. आशीष आणि नचिकेतने आज खूप छान गायले. सायलीनेही छान गायले.
अंजलीने हसता हुआ नुरानी चेहरा थोडं वरच्या स्केलमधे गायला हवं होतं. खालच्या स्केलमधे नाही ते गाणं. त्यामुळे रंगलं नाही.
कान्हा ठीक होतं पण आर्तता नव्हती. लहान आहे म्हणा ती.
बॅनर्जीबै सुटल्यात. आज अरूणिता पेक्षा ती जोरदार होती.
पवन, निहाल आणि षण्मुख सुपर्ब !
इंडीयन आयडॉल वाले भावनांचा बाजार मांडतात. तरीही संतोष आनंदजींना पाहून टडोपा झालं. नेहा कक्कडने खैरात वाटताना मान ठेवायला हवा होता. तिचा उद्देश चांगला असतो पण खटकतंं ते.
आज मला आशीषचं गाणं
आज मला आशीषचं गाणं ऑर्केस्ट्रॉ टाइप वाटलं, नचिकेतचे अॅक्टिंग-दिसण-प्रेझेंटेशन छान होते पण त्यावरच जास्तं भर देणारं वाटलं.
ष्णमुखचे फॉरवर्ड केलं मी.
आज अंजलीचही नाही आवडलं.
पवनदीप, सायली-अनुश्का , अरुणिता, दानिश-सवाई चांगले गायले (विशालला तेवढ्यात सर्वधर्मसमभाव कॉमेण्टचा मोह आवरला नाही )
एक दुजे के लिए ची गाणी ऐकून मस्तं वाटलं, अवघड आहेत ती गाणी.
पवनदीप एकदम ब्लेस्ड, गुणी कलाकार आहे, कितीतरी गाण्यात ढोलक वाजवायला बसला होता आज ऑर्केस्ट्रॉ सोबत !
बाइई शो मधे भयंकर बोरिंग ड्रामा फार करतात, लाइव्ह बघणारे ऑडियन्स बन्द होतील हळुहळु !
एलिमिनेशनचा नक्की काय फॉरमॅट आहे ? गेले ३ आठवडे नो एलिमिनेशन
रविवार ची कॉन्सर्ट छान झाली.
रविवार ची कॉन्सर्ट छान झाली.
पवनदीप ची कमाल वाटते. पूर्ण वेळ गाणे नाहीतर कोरस नाहीतर ढोलक वर साथ करणे असे चालू असते त्याचे. गिफ्टेड!! सवाई आणि दानिश ची दोन्ही गाणी आवडली. सवाई चे माँ स्पेशल मधले गाणेही खूप आवडले. सायली आणि अनुष्काचा गाण्याचा चॉइस चांगला होता आणी चांगल्या गायल्या दोघी. अरुणिता ची गाणी छान झाली काल. ती बरीच पुढे येतेय आता. अंजलीचा गाण्यांच्या चॉइस नाही आवडला मला काल.
आशिष चं गाणं ऑर्केस्ट्रॉ टाइप वाटलं >>>+१ मला बर्याचदा त्याची गाणी तशी वाटतात. नचिकेत त्याच्यापेक्षा नक्कीच चांगला गायक आहे पण फॅन्सी ड्रेस आणि परफॉर्मन्स मधे त्याचे गाणे हरवत चालले आहे. पुढच्या काही काळात तो मराठी सिरियलीत अभिनेता म्हणुन आला तर आश्चर्य वाटणार नाही.
ष्ण्मुखप्रिया, निहाल ची डुएट्स फार लक्षात राहण्यासारखी नव्हती.
गोविंदा डे बर्यापैकी फ्लॅट
गोविंदा डे बर्यापैकी फ्लॅट वाटला. हिट गाणी असली तरी सगळ्यांनाच त्यातला जोश पकडता आला नाही. नचिकेत- आशिष चे उत्साह फार पण गाणे बेसूर वाटले काल. निहाल ने खालच्या पट्टीमधे गाऊन मजा घालवली. पवनदीप ने पण सेम . त्या गाण्यांमधली मस्ती घालवली.
त्या मानाने ष्ण्मुखप्रिया, अरुणिता, स्रीशा, आणि अंजली यांनी न्याय दिला गाण्यांना. अनुष्का पण बेसुरी.
सवाई- दानिश सगळ्यात आवडले.
हल्ली अंजली ला मुद्दाम जरा मागे ठेवले जात आहे असे दिसले. अरुणिता ला सगळ्यात जास्त प्रमोट करत आहेत.
सायली ह्या आठवड्यात पण मस्त
सायली ह्या आठवड्यात पण मस्त गायली, सहज गाते ती. सुभाष घई एपिसोड मध्ये पण मस्त गायली होती. अनुष्का सगळ्यात बोर आहे बेसुरी.
काय बोरिंग एपिसोड होता
काय बोरिंग एपिसोड होता गोविन्दा स्पेशल
सवाई दानिश ला चांगली गाणी सिलेक्ट करून देतात मेकर्स त्यामुळे गेले काही आठवडे ते दोघे भाव खाऊन जात आहेत, बाकी सगळीच गाणी ऑर्केस्ट्रॉ छाप !
मैत्रेयीजी, शंभर टक्के सहमत.
मैत्रेयीजी, शंभर टक्के सहमत. कालच पाहिला होता एपिसोड. खूप बोअर झाला.
आज एकूण एकाचे परफॉर्मन्सेस चांगले झाले. खूप दिवसांनी अंजलीचा परफॉर्मन्स नजर लागावा असा झाला.
आज ती जातेयशी भीती वाटली. पण अनुष्का गेली. नेमकी आजच ती जीव तोडून गायली.
आजच्या एपिसॉडमधे बोलवलेले मेडीसीन बाबा विशेष वाटले. बाकीचा मसाला एक तासापेक्षा जास्त होता.
स्कीप करून पहावा लागला एपिसोड.
पवनदीप राजन ने हॉटस्टारच्या १९६२ मधे विशेष भूमिका केलीय.
अजय अतुल एपिसोड मधे मजा नाही
अजय अतुल एपिसोड मधे मजा नाही आली, २ वर्षापूर्वी सिझन १० ला आउटस्टँडिंग झाला होता त्यांचा एपिसोड ॓
आता नाही म्हंटल तरी तीच ती गाणी , प्रेडिक्टेबल साँग सिकेशन्स मुळे एपिसोड काही खास नाही झाला.
काहींनी आपापल्या आवडीची गाणी गायली, काहींनी अजय अतुलची, एक थीम अशी मेन्टेन नाही झाली.
चॅनलचे फेवरेट्स दानिश, सवाई, अरुणिता, पवनदीप यांना चांगली गाणी मिळाली नेहेमीप्रमाणे !
ष्ण्मुखच्या गाण्याचा कंटाळा आला मला पण अजय अतुल स्टुडिओ मधे गेलेली दाखवली ती, आहे तिची स्टाइल युनिक त्यामुळे मिळेल काम तिला !
श्रीषाला ‘सैराट झालं जी‘ मराठी ओळी अजिबात गाता आल्या नाहीत, सायलीला द्यायला हवं होतं ते गाणं.
काल सगळेच आवडले. नचितेक खूप
काल सगळेच आवडले. नचितेक खूप आवडला. गाणी अशीच निवडत जा.
अरूणिता माझी फेवरिट आहे. दानिश खूप चांगला गातो पण त्याचा आवाज नाही आवडत. अलिकडे अशा घोग-या आवाजांना डिमांड आहे पण. पवनदीपच्या आवाजात सॉफ्ट गाणी का खटकतात त्याचं उत्तर काल अजयकडून मिळालं. त्यानेही कम्फर्ट झोनमधेच रहावं. सवाई भटची रेंज खूप हाय आहे पण आवाजात जादू नाही हे इथेच कुणीतरी नोंदवलेलं मत काल पटलं.
अंजली, निहाल, सायली यांना कमी व्होट्स मिळतात त्यामुळे त्यांना मागे ठेवलं जातं असा आरोप एका युट्यूब व्हिडीओवर होता. काल तिघांनाही संधी न देता इतरांना दोन दोन तीन तीन गाणी मिळाली. ते खरे आहे काय असे वाटू लागले. यातले जवळपास सर्वच स्पर्धक कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत आधी होतेच. त्यांचा फॅन बेस तयार झालेला आहे. त्याचा फायदा आयडॉलला पण होत असावा.
पण दुसरी बाजू म्हणजे (लहान असताना सोडून) सगळीकडे फिरून आलेले पुन्हा स्पर्धेत घेतल्याने लोकांना इंटरेस्ट नाही राहणार बघण्यात. एखाद्या फ्रेशरचा प्रवास बघताना जी मजा असते ती यात नाही.
मला पण त्या शन्मुखाचा कंटाळा
मला पण त्या शन्मुखाचा कंटाळा येतो. पण तिला फार म्हणजे फार चढवतात. गेल्या काही एपिसोड्स पासून पवनदीप ची गाणी सगळी अगदी फ्लॅट वाटताहेत मला. आवाज ,टॅलेन्ट आणि वर्सटाइलसुद्धा असला तरी इमोशन्स आणी फील नसतो त्याच्या गाण्यात असे त्याचे लिमिटेशन लक्षात आले आहे. पण त्यालाही चॅनल खूप प्रमोट करतंय. तीन तीन गाणी देतात, काल पण तसेच केले, अन शिवाय आज सोलोही आहे त्याचे. सायली, अंजलीला प्रमोट करत नाहीत हल्ली अजिबात. त्या काही कमी टॅलेन्टेड नाहीत. त्या शण्मुखाला अजय अतुल ऐवजी हेमा मालिनी स्पेशल मधे हवा के साथ साथ वगैरे वर इम्प्रोवाइज करायला घ्याय्चे होते ना. आणि अजय अतुल स्पेशल मधे अंजली आणि सायली ला द्यायची ना मराठी गाणी. निदान डुएट्स. पण त्यांना दूर ठेवलं.
यात चॅनल चे पॉलिटिक्स आहे यात शंका वाटत नाही. वोट्सचं असं आहे की एखाद्याला गाणीच सुमार दिली अन दुसर्याला सुपरहिट्स भाव खाऊ दिली, एपिसोड्स मधे एकाची सुरुवातीला गाणी अन दुसर्याला अगदी शेवटी ठेवले किंवा एकाला सारखे प्रोमोज मधे दाखवले, आणि दुसर्याला कुठेच प्रमोट न करता इन्व्हिजिबल ठेवले तर वोट मधे फरक आपोआप दिसेलच. तसेही वोट प्रमाणे एलिमिनेशन्स होतात का हाही प्रश्न च आहे.
काल दानिश चे गाणे मला आवडले. नचिकेतचे पण मस्त. पण खरं तर त्या गाण्यात त्याच्या आवाजापेक्षा त्या म्यूझिक कंपोझिशन ची जादू जास्त होती. अजून एखादे म्हणायला हवे होते त्याने. खेळ मांडला वगैरे.
आशिष ची गाणी अॅवरेज वाटली काल पण. सवाई, दानिश आणि आशिष ची कवाली मात्र मस्त झाली.
खेळ मांडला वरून आठवलं, तो
खेळ मांडला वरून आठवलं, तो युवराज येणार होताना परत ? वाइल्ड कार्ड साठी तयारी करत होता वगैरे दाखवले होते ना?
आता कसली वाइल्ड कार्ड राउंड होतेय, एलिमिनेशन्सच ३ आठवड्यांनी करतात !
बाकी त्या अंजलीकडून् नटरंगची गाणी आधी भलत्याच एपिसोड्स मधोइन २ दा म्हणून घेतली. काल त्याची झलक तरी का नाही दाखवली ?
कालच्या भागात नचिकेत सोबत तो
कालच्या भागात नचिकेत सोबत तो बासरीवादक. काय सुंदर बासरी वाजवली. हॅट्स ऑफ. अवधूत दादाच्या भाषेत 'तोडलंस मित्रा'
हेमा मालिनी स्पेशल एपिसोड
हेमा मालिनी स्पेशल एपिसोड छान झाला. अरुणिताने सगळी गाणी छान गायली.
नचिकेत सोबत तो बासरीवादक. >>>>>> हा बासरीवादक सुर नवा ध्यास नवा किव्वा कुठल्यातरी मराठी रिअॅलिटी शो मध्ये बघिल्यासारखा वाटतोय.
हेमामालिनी एपिसोड चांगला झाला
हेमामालिनी एपिसोड चांगला झाला. नेहमीच्या त्याच त्या गाण्यांपेक्षा वेगळी गाणी छान वाटली. हेमा मालिनी ७२+ आहे पण काय सुरेख दिसते अजून! फार तर ५५ ची वगैरे वाटत होती! अर्थात बोटोक्स वगैरे असेलच पण तरीही काय फिटनेस लेवल, एनर्जी! डान्स पण ग्रेसफुल अगदी. काल सायली , अंजली, अरुणिता ची गाणी सगळ्यात मस्त. निहाल अति फ्लॅट गाणी, आमच्या गल्लीतल्या गणेशोत्सवात यापेक्षा चांगली गाणारी पोरं होती. पवनदीप पण नथिंग इम्प्रेसिव. दानिश च्या मामाजींनी काल खरोखरच हशा मिळवला! स्क्रिप्टेड होते की कसे माहित नाही पण "मै आग दिल मे लगा दूंगा वो के पल मे गुजल जाओगे" ऐकून हहपुवा झाली.
हेमा मालिनी ७२+ आहे पण काय
हेमा मालिनी ७२+ आहे पण काय सुरेख दिसते अजून! फार तर ५५ ची वगैरे वाटत होती! अर्थात बोटोक्स वगैरे असेलच पण तरीही काय फिटनेस लेवल, एनर्जी! डान्स पण ग्रेसफुल अगदी. काल सायली , अंजली, अरुणिता ची गाणी सगळ्यात मस्त. >>>>>>>> ++++++२२२२२
हेमाजी खरंच आश्चर्य आहेत.
हेमाजी खरंच आश्चर्य आहेत. त्यांच्या मैत्रिणी किती वयस्कर दिसत होत्या. वहिदा रेहमान सुद्धा अजून तरतरीत दिसतात. पण त्या केस काळे नाहीत करत.
वरच्या सर्वांना +१
वहिदा रेहमान सुद्धा अजून
वहिदा रेहमान सुद्धा अजून तरतरीत दिसतात. पण त्या केस काळे नाहीत करत. >>>>>>> तरीही त्या ग्रेसफुल दिसतात.
या वीकेन्ड ला जीतेन्द्र आहे
या वीकेन्ड ला जीतेन्द्र आहे म्हणे. काय तेच तेच लोक अन तीच ती गाणी.
हेमा मालिनी फार सुन्दर दिसतात
हेमा मालिनी फार सुन्दर दिसतात अजुनही.
जीतेन्द्र बघवला नाही काल. काय
जीतेन्द्र बघवला नाही काल. काय करून ठेवलंय चेह-याचं समजत नाही.
नचिकेतने खूप सुंदर म्हटले गाणे. अरूणिता, पवनदीप आणि सायली नेहमीप्रमाणेच छान.
सवाई भटला विशाल ददलानीने योग्य तेच सुनावले. वरच्या पट्टीत गाणे एव्हढंच त्याचं क्वालिफिकेशन आहे.
अंजलीचा परफॉर्मन्स हरवून गेला गोंधळात. शेवटी असल्याने तिने काय गायलं हे समजलं नाही.
अंजलीचा नेहमी शेवटी ठेवतात
अंजलीचा नेहमी शेवटी ठेवतात परफॉर्मन्स. काल अरुणिताची गाणी छान झाली. नचिकेत पण छान.
निहाल ला हाकला लवकर. सोपी गाणी असली तरी पडेल सुरात गातो अन वाट लावतो.
जॅकी श्रॉफचा भाग मस्त झाला
जॅकी श्रॉफचा भाग मस्त झाला. सगळयान्नीच छान म्हटली गाणी. जॅकी स्वत: हून प्रत्येकाच्या गाण्यात भाग घेत होता, काय एनर्जी आहे त्याची!
Pages