मायबोलीवर अजून कोणकोणत्या इमोशन्ससाठी स्मायल्या हव्यात?

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2021 - 13:30

विषय खूप सिंपल आहे
शाहरुखच्या गालावर डिंपल आहे
जेव्हा ती कळी खुलते
तेव्हा तो लाजलाय हे कळते
मायबोलीवर सुद्धा हे दाखवायला एक स्माईली आहे
अग बाई ईश्श Blush

तसे तर मायबोलीवर ईतरही काही स्माईलीज आहेत,

राग आला की तो असा देऊ शकतो Angry
हसायला आले की असे दात दाखवू शकतो Biggrin
जास्तच आले तर असे जबडे फाडू शकतो Lol
त्याहून अनावर झाले तर गडाबडा लोळू शकतो Rofl

एखादी व्यक्ती आवडली तर तिला असे स्मितहास्य देऊ शकतो Happy
जास्तच आवडली तर असा डोळाही मारू शकतो Wink

पण ते तिला नाही आवडले तर लगेच हा दिवा Light 1 दाखवत हलक्यातच घ्या हं म्हणू शकतो

तरीही तिने रागच दिला तर असे उदास होऊ शकतो Sad
किंवा आपल्याला काही कळलेच नाही असेही दाखवू शकतो Uhoh

पण जगात काय ईतकेच ईमोशन्स आहेत का? यापेक्षा जास्त भाव तर मायबोलीकरांच्या लाडक्या स्वप्निल जोशीच्या चेहर्‍यावर दिसतात.
मग आपल्या खर्‍या आयुष्यात तर कित्येक असतील.
तर ते व्यक्त करायला तितक्याच विविध ईमोशन्सच्या स्माईली नको का?

जसे की माझा अजून एक धागा आलेला बघून कोणाला कपाळ बडवावेसे वाटले तर ती भावना व्यक्त करायची सुविधा मायबोलीने पुरवायला नको का? Happy

तिथे व्हॉटसप दर तासाला एक नवीन स्माईली एक नवीन ईमोजी मार्केटमध्ये आणतेय, मायबोलीकर तरी कधीपर्यंत आहे त्यातच समाधान मानणार.

प्रशासन आपली मागणी मान्य करेल तेव्हा करेल. पण तोपर्यंत आपल्याला कोणकोणत्या स्माईली हव्यात हे तरी आपण या धाग्यात गोळा करूया..
चला तर मग.... माझी पहिली मागणी.. जी कोणालातरी मागणी घालताना कामी येऊ शकते.. मला डोळ्यात बदाम बदाम बदामवाली स्माईली हवी आहे Happy

तळटीप - विषय मायबोली आयडी रानभुली यांनी सुचवला आहे Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे चांगलंय. अगं अगं म्हशी (मी नाही) मला कुठे नेशी Lol
सुचवला नसता तर नसता काढला नाही का धागा ? Rofl

बरं
मला या स्मायल्या हव्या आहेत
:डोकं आपटून घेणारी बाहुली:
:लपून धागा वाचणारी बाहुली:
:कानावर हात ठेवून नही असं ओरडणारी बाहुली:

आणि त्या वेळी सुचलेल्या नंतर प्रतिसादात सांगते
(वर ठेवायचाय ना धागा ?)

अहो रानभुली श्रेय देतोय ओ.. तुम्हाला जिम्मेदार ठरवत नाहीये Wink
धागा लोकोपयोगी आहे, मी सुद्धा उद्या भर टाकतो.
आता झोप आलीय..
अरे हो, झोप आल्याची, जांभई दिल्याची, घोरण्याची वगैरे एखादी स्माईली हवी च आहे..
सोबत टाटा बाय बाय, खुदा हाफिज असल्यासही उत्तम.. मला बरेचदा ईथे रात्री दोन तीन वाजता ऐन चर्चेच्या मध्ये अमेरीकेतल्या सभासदांना जातो झोपायला असे सांगून झोपायला जायची सवय आहे. तेच स्माईली टाकली की काम झाले, भावनाही ऊत्तम पोहोचतील.

114.gif
.
mad0235.gif
.
popcorn-and-drink-smiley-emoticon.gif
.
smile.png
.
smiley-1.jpg
.
smiley-angry021.gif
.
smiley-angry030.gif
.
smiley-confused005.gif
.
smiley-confused013.gif
.
smiley-Glasses.png
.
smiley-happy093.gif
.
smiley-sad001.gif
.
smiley-sad031.gif
.
smiley-shocked028.gif
.
smiley-confused005.gif
.
smiley-confused013.gif
.
smiley-Glasses.png
.
smiley-happy093.gif
.
smiley-sad001.gif
.
smiley-sad031.gif
.
smiley-shocked028.gif
.
smiley-sport011.gif
.
smiley-sport011.gif
.
smiley-sport029.gif
.
smiley-star_0.png

या मी खाजगी जागेत अपलोड करून ठेवल्यात.
खाजगी जागेतून जसा फोटो देतो तशा या द्यायच्या.

या शिवाय दुसरा मार्ग आहे, खाजगी जागेत अपलोड न करता इथे वर दिल्या आहेत त्यावरून देता येतील. त्याचा सिंटॅक्स मात्र मी नेहमी विसरतो.

जास्तच आवडली तर असा डोळाही मारू शकतो .... Wink >>>>>
डोमा चा अर्थ असा नाही , आपली गंमत/ द्वयर्थी बोलणे/ लपलेला अर्थ/ उपरोध ई सूचित करणे आहे.

मानवदादा +1
वैयक्तिक पातळीवर मी जे हवं ते आंतरजालावरून डालो करते , एका फाइलमध्ये ठेवून हवं तेव्हा फोटोसारखं वापरते. लहानमोठे करता येते , गिफ करता येते. मला गिफ जास्त इन्टरँक्टिव वाटतात. आम्ही असंबद्ध गप्पा धाग्यावर मनमुराद वापरतो.. त्याने खेळात रंगत येते.गुगलवर हवं ते सगळं शोधता येते. तरीही टाळ्या(कौतुक) व हग्ज(केअर) इमोजी असता तर सोपे गेले असते.

मला तर अजूनही याहू मेसेंजरच्या इमोजीच अजूनही अपिलिंग वाटतात. आताच्या युनिकोड इमोजी ज्या व्हाट्सएपवर आहेत (मला वाटते पहिल्यांदा त्या Apple ने आणल्या) त्यातल्या फार कमी वापरल्या जातात. बाकीचा नुसताच भरणा आहे. याहू च्या बहुतांश ईमोजी वापरल्या जात. तेंव्हा जर शक्य असेल तर त्या मायबोलीने वापराव्यात. तसेही आता याहू एकावर चार फुकट देईल.

हि कल्पना चांगली आहे
"वा छानच. पण हे नसते तर अजूनच छान वाटले असते"
आशा अर्थाचा इमोजी. बहुउपयोगी आहे. धागा, प्रतिसाद, गाणे, नृत्य, चित्र, खाद्यपदार्थ, रिसीपी इत्यादी इत्यादी कशालाही उपयोगी होईल Lol

: वा छानच. पण ही प्रतिक्रिया नसती तर अजूनच छान वाटले असते ची इमोजी :

इमोजीच अजूनही अपिलिंग वाटतात. >>>
हे appealing पहिल्यांदा देवनागरीत वाचलं. आणि सगळं मराठीत असल्याने क्षणभर कळलंच नाही, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुसकलिंग नाही, हे कोणते नवे लिंग, LGBT ला मराठीत हा नवा शब्द आला आहे की काय? एवढं सगळं काही क्षणांंकरता वाटून गेलं. मग ट्युब पेटली.
mad0235.gif

छान लिहिलं आहेस ऋन्मेष.
मला अंगठा आणि तर्जनी जोडून आपण 'वा, वा, मस्त ' असं म्हणतो तशी सोय हवी आहे. Whatsapp वर असते ती.

जास्तच आवडली तर असा डोळाही मारू शकतो .... Wink >>>>>
डोमा चा अर्थ असा नाही , आपली गंमत/ द्वयर्थी बोलणे/ लपलेला अर्थ/ उपरोध ई सूचित करणे आहे.
>>>>

अरे देवा, आणि मी ईतके दिवस याचा अर्थ आंख मारे ओ लडकी आंख मारे समजत होतो Sad
आणि आंख मारणार्‍या लडक्यांपासून लांब राहात होतो...

पण माझी तरी काय चूक.. त्या स्माईलीच्या वर्णतात तर सऱळसरळ डोळा मारा लिहिले आहे..

हरचंद पालव, एसटीत बसून रत्नागिरीला मधल्या आळीत गेलात की काय? >> वावे, बरोबर ओळखलंत. दोन वर्षांचा होतो मी तेव्हा Lol

तों पा सु
ही बाहुली हवी
>>>>>
हो, त्यातही क्युटशी पाणीवाली आणि बदाबदा लाळवाली अश्या दोन हव्यात

आजपर्यंत याहू मेसेंजरने दिल्या तितक्या सुंदर स्मायल्या कुणीही दिलेल्या नाहीत.

स्मायली जाउ द्या, मायबोलीवर याहूने दिलेली एक सोय हवीच असे मला फार वाटते. ती म्हणजे हव्या त्या यूजरला "इग्नोर" करणे. अर्थात, त्या/तीच्या पोस्ट दिसणार नाहीत अशी सोय. ही सोय मिळाली, तर माबो अ‍ॅडमिनला मी ओसाड गावची जहागीर नजराण्यात देईन!

>>>>:हेमाशेपो:>>> हाहाहा येस्स्स!!! = हाताची घडी घालून, दुसरीकडेच बघणारा, फुरंगटलेला+चिडका चेहरा.

बाय द वे ती पिटपिट डोळ्यांची 'सरोज खरे' बाहुली कशी आणायची? कसली गोडुली होती.

"क्या मै विजय से बात कर सकती हूं "
" जी मिस शीतल, कैसी हो आप ?"
" मै तो अच्छी हूं. क्या मै जान सकती हुं कि आप कैसे हो ?"
" बस आपके फोन का इंतजार कर रहा था "
" क्या मै जान सकती हूं कि आपको कैसे मालूम कि मै आपको फोन करने वाली थी ?"
"इसलिए की जो फूल मैने आप को भेजे वोह है तो हलके कलर के लेकीन आप गुस्से मे थी तो आपको लाल नजर आये . अब जब गुस्सा उतर गया है, इसलिए वह आपको गुलाबी नजर आ रहे है "
" क्या मै जान सकती हूं कि ये क्या बकवास है ? "
" बकवास नही मोहतरमा. आप का गुस्सा उतर गया होगा तो आप मुझे फोन करेगी ये मै जानता था "
" अच्छा ? तो क्या मै यह जान सकती हूं कि ये फूल क्युं भेजें थे ?"
" इसलिए क्युं की मै आपसे मिलना चाहता था "
" क्या मै ये जान सकती हू कि आप मुझ से क्युं मिलना चाहते है ?"
" देखिये मोहतरमा, इसके कई कारण हो सकते है. एक यह भी है कि मै आपको कुछ समझाना चाहता हूं. जो आप नही समझना चाहती. क्युं की मै जो समझ रहा हूं, वह आप नही समझ रही, आप कुछ और समझ रही है जो कि मेरी समझ से अलग है, इसलिए मेरी समझ और आपकी समझ आपस मे नही मिलती. इस वजह से जो नासमझी हम दोनों मे है उससे एक कन्फ्युजन हो रहा है, जिसकी वजह से हम एक अजीब से बवंडर मे फंस गये है, तो इस बवंडर से बचने के लिए हमे अपनी समझ को मिलाना होगा. ये तभी हो सकता है जब हम कही मिले "
" बवंडर ? माय फूट ! मै आपसे नही मिलना चाहती "
" क्या मै जान सकता हूं कि आपको यह झूठ बोलने की बीमारी कबसे हो गयी है "
" यू SSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS "

शेवटच्या एक्स्प्रेशनसाठी स्मायली हवीय.

>>अपिलिंग ... LGBT ला मराठीत हा नवा शब्द आला आहे की काय?
Lol

>> सोय हवीच असे मला फार वाटते. ती म्हणजे हव्या त्या यूजरला "इग्नोर" करणे

सहमत. कोणत्याही सोमि वर ही मूलभूत सोय असतेच. माबो मात्र अपवाद आहे. तशी सोय देणे तांत्रिकदृष्ट्या अवघड अजिबात नाही. पण माबो चालकांनी ती का दिली नाही हे कोडेच आहे. तरीही साईट तब्बल वीस वर्षे यशस्वी चालवली आहे हे सुद्धा लक्षणीय.

इथे एका दिवसात येणाऱ्या टोटल कमेंट्स फार जादा नसतात आणि तिथे असा ब्लॉकचा ऑप्शन दिल्यावर राहणारच काय वाचायला?

Pages