विषय खूप सिंपल आहे
शाहरुखच्या गालावर डिंपल आहे
जेव्हा ती कळी खुलते
तेव्हा तो लाजलाय हे कळते
मायबोलीवर सुद्धा हे दाखवायला एक स्माईली आहे
अग बाई ईश्श
तसे तर मायबोलीवर ईतरही काही स्माईलीज आहेत,
राग आला की तो असा देऊ शकतो
हसायला आले की असे दात दाखवू शकतो
जास्तच आले तर असे जबडे फाडू शकतो
त्याहून अनावर झाले तर गडाबडा लोळू शकतो
एखादी व्यक्ती आवडली तर तिला असे स्मितहास्य देऊ शकतो
जास्तच आवडली तर असा डोळाही मारू शकतो
पण ते तिला नाही आवडले तर लगेच हा दिवा दाखवत हलक्यातच घ्या हं म्हणू शकतो
तरीही तिने रागच दिला तर असे उदास होऊ शकतो
किंवा आपल्याला काही कळलेच नाही असेही दाखवू शकतो
पण जगात काय ईतकेच ईमोशन्स आहेत का? यापेक्षा जास्त भाव तर मायबोलीकरांच्या लाडक्या स्वप्निल जोशीच्या चेहर्यावर दिसतात.
मग आपल्या खर्या आयुष्यात तर कित्येक असतील.
तर ते व्यक्त करायला तितक्याच विविध ईमोशन्सच्या स्माईली नको का?
जसे की माझा अजून एक धागा आलेला बघून कोणाला कपाळ बडवावेसे वाटले तर ती भावना व्यक्त करायची सुविधा मायबोलीने पुरवायला नको का?
तिथे व्हॉटसप दर तासाला एक नवीन स्माईली एक नवीन ईमोजी मार्केटमध्ये आणतेय, मायबोलीकर तरी कधीपर्यंत आहे त्यातच समाधान मानणार.
प्रशासन आपली मागणी मान्य करेल तेव्हा करेल. पण तोपर्यंत आपल्याला कोणकोणत्या स्माईली हव्यात हे तरी आपण या धाग्यात गोळा करूया..
चला तर मग.... माझी पहिली मागणी.. जी कोणालातरी मागणी घालताना कामी येऊ शकते.. मला डोळ्यात बदाम बदाम बदामवाली स्माईली हवी आहे
तळटीप - विषय मायबोली आयडी रानभुली यांनी सुचवला आहे
१. तुझ्या तं,
१. तुझ्या तं,
२. जीपीएल वाली
३. अस काय करु र्हायला बे
४. अस कुटं अस्त का कदी
५. ओ हे म्हंजे लैच झालं
६. ढुंगन (डुआयडी) उघडं पडायल बग तुजं
७. ती नटमोगरी बग कशी भारी भरायली
८. यांला पोकल बांबुचे फटकेच हवेत
या स्मायली हव्यात
ऋन्मेष, चांगला धागा.
ऋन्मेष, चांगला धागा.
Pages