चंद्र आहे साक्षीला

Submitted by Ajnabi on 27 October, 2020 - 06:00

कलर्स टीव्हीवर लवकरच ........चंद्राच्या साक्षीने करणार सुबोध भावे नवी सुरुवात

Start Date: 11 November 2020
TV Channel: Colors मराठी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाच उजेड पडायचा होता तर सुरवातीला कुमले ची कथा फक्त सुबोधच्या resume मध्ये वेगळ्या शेड च्या रोल ची भर घालण्यासाठी घुसडली होती असं वाटतंय!

सुभाने आधी केलीय की नकारात्मक भूमिका कुलवधूमध्ये. मला वाटते श्रीधर आणि काळवीट बाई (लंडन रिटर्न) मिळून स्वातीला त्रास देतील अर्थात सुभाला वेळ असेल तर. सुभा आणि ही कुंजिका त्या चित्रपटात पण एकत्र होते नाही का. कुंजिकाची बहीण जीव झाला येडापीसा मध्ये होती आणि वडील मोलकरीण बाईमध्ये. स्वातीची आई नांदा मधली आता सासू होणार.

हाच उजेड पडायचा होता तर सुरवातीला कुमले ची कथा फक्त सुबोधच्या resume मध्ये वेगळ्या शेड च्या रोल ची भर घालण्यासाठी घुसडली होती असं वाटतंय!>>+१

ही ती मालिका >>> अरे यात त्या हरीश दुधाडेला कित्ती म्हातारा दाखवला आहे.

ही त्या हिंदी बंदिनी, मराठी कुंकू सारखी असावी.

तिथे तो चांदणे शिंपित जा मध्ये संचित बघा (प्रोमो बघितला आत्ताच), तसा वयाने मोठा असून एकदम यंग भूमिका आणि हरीश यंग असून एजेड एजेड, तो चांगला अभिनय करेल मात्र, त्याचे डोळे फार तेजस्वी आहेत. ती नायिका फार कोवळी वाटतेय.

सुभाने आधी केलीय की नकारात्मक भूमिका कुलवधूमध्ये. >>>>>>> नकारात्मक नाही, पण ग्रे शेड होती. नन्तर तो सुधारतो. कळत नकळत, मायलेक हया सिरियल्समध्ये तो व्हिलन झाला होता.

काळे दाम्पत्य गायब आहे. ओरिजनल स्टोरी गायब आहे. सन्ग्रामची फॅमिली बोर पात्र आहे. कुठे नेऊन ठेवली हि सिरियल?

तिथे तो चांदणे शिंपित जा मध्ये संचित बघा (प्रोमो बघितला आत्ताच), तसा वयाने मोठा असून एकदम यंग भूमिका आणि हरीश यंग असून एजेड एजेड >>>>>>> अगदी अगदी ती हिरवीण मुग्धा वैशंगपायन वाटली आधी मला.

हो UP मागच्या पानावरची तुमची कमेंट वाचलेली, दीक्षा केतकर तिचं नाव. ती तिच्या वयाच्या मानाने फार लहान दिसतेय, अगदी 15, 16 वर्षाची दिसतेय म्हणून कोवळी लिहिलं.

श्रवु हो ती सुमी आहे.

समहाऊ संचित, सुमी वाली सिरीयल आणि ही वरची सौभाग्यवती दोन्ही प्रोमोजनी मला इंप्रेस केलं नाहीये, बोअर वाटलेत. त्यामुळे नेटवर बघणार नाही. टीव्हीवर मी फक्त फ्री चॅनेल्स घेतली आहेत.

तसंही हरिश mmtz मध्ये जेवढा प्रचंड आवडला तेवढा नंतर नाही भावला पण तो चांगला अभिनेता आहे. तो कुठल्या सीनला कसा react होईल हे पाठ झालं असल्याने, मजा नाही येत बघायला.

आज श्रीधरची पाठमोरी एण्ट्री दाखवली. सन्ग्रामच्या घरापर्यन्त स्वातीचा पाठलाग करत होता. आजची स्वातीची साडी छान होती. ती प्रिया नेहमी गुलाबी शेडचेच कपडे का घालते?

आज श्रीधरची पाठमोरी एण्ट्री दाखवली. सन्ग्रामच्या घरापर्यन्त स्वातीचा पाठलाग करत होता. >>पण तो सुबोध भावे नव्हता..कोणी तरी दुसराच होता... पाठमोरी entry म्हणून च चालून गेली... काहितरी रहस्यमय घडणार घडणार असं दाखवायच्या नादात हे 1 मिनट साठी काहितरी अस दाखवायचं हे चाललं आहे... काही घडणार म्हणता म्हणता सुबोध भावेच replace व्हायचा

काही घडणार म्हणता म्हणता सुबोध भावेच replace व्हायचा >>>>>> अगदी अगदी. पण अजूनही सिरियल चालू होताना पोस्टरवर सुभा आणि ऋजुताचे फोटो दाखवतात. कदाचित स्वातीच्या लग्नानन्तर स्वाती सन्ग्रामचा फोटो लागेल.

आस्ताद काळे आश्चर्य कारक रीत्या उत्तम काम करीत आहे. त्याने सुबोध भावेचा विसर पाडला आहे. प्रिया आणि तिची बहीण (डॉक्टर ची बायको )यांचे बेअरिंग चुकले आहे त्यामुळे त्या भयंकर बावळट आणि नाटकी वाटतात , ही दिग्दर्शकाची चूक .संग्रामाने दम देऊनही आत्याबाइन्ची खुमखुमी अजून गेली नाही. या ना त्या निमित्ताने पाणी घालण्याचे व इपिसोड वाढवायचे काम चालू आहे . नन्ना आता शेवटीच येईल असे वाटते . सध्या श्रीधर काळे ची फ्रंट शांत आहे. मामाची टोळी , काळे टोळी आणि आत्याबाइ ही दोस्त राष्ट्रे होऊन महायुद्ध पुढे चालू राहील का. ? मूळ सत्य घटना पुण्यात १९८६ ला घडली . त्यावर कुसुम मनोहर लेले हे सुखांत , मेलोड्रामा नाटक आले. मूळ tragedy घटनेत बदल करून . सत्य घटने तील पीडीतेचा शेवट सुखांत झाला नाही . तिने अखेरचे दिवस अनाथाश्रमात काढले. कुमले मध्य ती घटस्फोटीता असते व तिची फसवणू क होते , तिला मुलंही होते. ते मूळ श्रीधर काळे चा तत्कालीन अवतार ताब्यात घेऊन तिला हाकलून देतो. विवाह संस्थेच्या चालीकेच्या मदतीने तिचे गिरीश ओक या वरकरणी गुंड वाटणार्या माणसाबरोबर लग्न होते व पुनर्वसन होते . पण हा गिरीश ओकच तिचा मूळ नवरा असतो व त्याला पश्चाताप होऊन तो तिला पुन्हा स्वीकारतो. व सुखांत शेवट होतो. मूर्ख कथानक ! त्या नाटकाच्या लेखिका विनिता ऐनापुरे होत्या. आता त्यांच्या मदतीनेच चिन्मय मांडलेकर आणि आणखी एक यांनी त्या बेगडी कथेची वाटेल तशी फाफला-फाफली सुरु केली आहे. मूळ सत्यकथा तर सोडाच पण कुमलेच्या कथेची वाट लावली आहे. विनिता ऐनापुरे यांचीच कथा असल्याने त्या कथेची वाटेल ती मोडतोड करण्याचा त्याना हक्क आहे पण त्यात काही मेचुरिटी असावी ना. ७० वर्शापूर्वीच्या हाहाहा करून हसणाऱ्या खल प्रवृत्तीच्या पात्रांचा बाज आहे या पात्रांचा . नुसते मोठ मोठ्या अर्वाचीन गाड्या , मोबाईल एवढ्या पुरताच समकालीन पणा आहे त्यामुळे बहूतेक पात्रे बावळट , बेअक्कल वाटतात .
मात्र सर्वच पात्रांचा अप्रतिम अभिनय यामुळे मालिका तगली आहे. अर्थात त्या पात्रांच्या रेखाटलेल्या स्व्भावाविशेशामुळे ती डोक्यात जातात हे वेगळे. स्वाती(ऋतुजा बागवे) आणि तिच्या आईचे चे काम अप्रतिम. आस्ताद काळे , त्याचा वावर , आणि सहज सुंदर अभिनय ही या मालिकेची जमेची बाजू आहे . त्याची डायलॉग डिलिव्हरी अभ्यासनीय आहे. आस्ताद काळे या घडीला मोठा रिलीफ आहे मालिकेत.
मूळ घटनेत , तसेच कुमले मध्ये पीडीतेला मूल होते . इथे स्वाती प्रेग्नंट असल्याचे दिसत नाही , तसे ध्वनित ही केलेले नाही. त्यामुळे यात बाळासाठी काळे टोळीचा काही संघर्ष उरलेला नाही. आता आत्याबाइचा घरासाठी संघर्ष आणि त्यासाठीच्या कारवाया असे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्वाती प्रेग्नंट नाही म्हटल्यावर श्रीधर काळे तिचा नाद सोडून देणार आणि आस्ताद मियांची वाट सोपी होणार . ह्या घडीला स्वाती प्रेग्नंट आहे असा हास्यास्पद बॉम्ब फोडला तर नाटय वाढू शकते. पण ती प्रेग्नंट असती तर हॉस्पिटल मध्ये लक्षात आले असते . स्वातीच्या सुहाग रातीला आता काही महिने लोटले असावेत . मालिकेत घटनांची टाईम फ्रेम लक्षात येत नाही त्यामुळे मांडलेकर बुवा मालिका लांबवण्यासाठी अथवा गुण्डाळण्यासाठी कोणत्याही क्षणी काहीही घोषित करू शकतात कारण स्टोरीला काही चौकटच राहिलेली नाही .
तिसरे असे की, कोणत्याही कलाकाराची नावे हे टाय्टल मध्ये दाखवत नाहीत त्या मुळे त्या नट नट्यावर अन्याय होतो त्याण्ची ओळख निर्मान होत नाही अर्थात त्यामुळे त्या व्यक्ती ती पात्रेच वाटतात हेही खरेच.
आणखी चीड आणनारी बाब म्हनजे मालिका चालू असता खालून पॉप अप होणार्या जाहिराती . त्या इतक्या मूर्खपणाच्या असतात की मालिकेत गम्भीर प्रसन्ग अथवा रडारड चालू असली की खालून सुमीत राघवनच्या विनोदी शो ची जाहिरात भसकन वर येते किन्वा भरत जाधवच्या सुखी माणसाचा सदरा ची ! त्यामुळे रसभन्ग होतो...

मांडलेकर बुवा मालिका लांबवण्यासाठी अथवा गुण्डाळण्यासाठी कोणत्याही क्षणी काहीही घोषित करू शकतात >>> तुमचं ऐकलं की काय..? स्वातीला उलट्या(कोरड्या) सुरू झाल्या ...संग्रामशी होणाऱ्या लग्नाच्या 2 दिवस आधी

Lol तसेच हिचे गर्भारपण त्या जान्हवी सारखे महिनों महिने चालूही राहू शकते.
या स्वातीच्या नशीबात लेखकाने नवऱ्याच्या कोणत्याही बहिणीपासून कायमचा धोका लिहून ठेवलेला आहे. आधी बहिण म्हणून जीची ओळख करून दिली ती बायको निघाली. आताची मामे बहिण बायको व्हायची स्वप्ने बघते आहे.
ही मालिका बघताना ‘तू तिथे मी’ ची आठवण येते. त्यात प्रिया बापट अशीच हात धूऊन चिन्मयच्या मागे लागलेली असते.

तिसरे असे की, कोणत्याही कलाकाराची नावे हे टाय्टल मध्ये दाखवत नाहीत त्या मुळे त्या नट नट्यावर अन्याय होतो त्याण्ची ओळख निर्मान होत नाही अर्थात त्यामुळे त्या व्यक्ती ती पात्रेच वाटतात हेही खरेच. >>>>>>>> हे तर सगळयाच चॅनेलवर असत फक्त दुरदर्शन सोडून. दुरदर्शनवर अजूनही सगळया कलाकारान्ची नावे देतात.

आणखी चीड आणनारी बाब म्हनजे मालिका चालू असता खालून पॉप अप होणार्या जाहिराती . त्या इतक्या मूर्खपणाच्या असतात की मालिकेत गम्भीर प्रसन्ग अथवा रडारड चालू असली की खालून सुमीत राघवनच्या विनोदी शो ची जाहिरात भसकन वर येते किन्वा भरत जाधवच्या सुखी माणसाचा सदरा ची ! त्यामुळे रसभन्ग होतो... >>>>>>>> अगदी अगदी. त्या जाहिरान्तीचे बॅनर्स इतके मोठे असतात त्यामुळे महत्वाच्या सिनमध्ये कलाकाराच्या चेहर्यावरचे एक्सप्रेशन्सही दिसत नाही.

प्रिकॅपमध्ये स्वाती श्रीधरच्या घरी सुमनशी बोलताना दाखवली आहे. आता इतक सगळ होऊन हि त्या काळयान्कडे कशाला जाते?

पण हा गिरीश ओकच तिचा मूळ नवरा असतो व त्याला पश्चाताप होऊन तो तिला पुन्हा स्वीकारतो. >>>>>> नाटकात हेच आवडल नव्हत. आधी तिच्याशी वाईट वागून तिला घटस्फोटाच्या वळणावर आणायच आणि नन्तर मात्र पश्वाताप झाल्याच दाखवायच ह्याला काय अर्थ आहे. तिच्या आयुष्याची वाट तिच्या दोन्ही नवर्यान्मुळे लागली.

तिच्या आयुष्याची वाट तिच्या दोन्ही नवर्यान्मुळे लागली.>>नाही तिच्या स्वतःच्या मूर्खपणा मूळे लागलीये,
वुड बी चा डिओर्स झालेला नसताना त्याच्याबरोबर राहणे,वाहवत जाणे ही सर्वस्वी तिचीच चूक होती

हिला श्रीधरच्या घरात जाऊनच ओकाऱ्या काढायच्या होत्या काय?
आता मोबाईल फोन आहे तर तो वापरायला नको का? तसेच या आधी शंभर वेळा ती त्यांच्याशी बोलली असेल तर एकदाही ते बोलणं मोबाईल मधे रेकॅार्ड करून त्यांच्या विरोधात पुरावा जमा करायचे हिला सुचले नाही.

नाही तिच्या स्वतःच्या मूर्खपणा मूळे लागलीये,
वुड बी चा डिओर्स झालेला नसताना त्याच्याबरोबर राहणे,वाहवत जाणे ही सर्वस्वी तिचीच चूक होती >>>>>>>> सहमत

आस्ताद फारच आवडतोय Happy

रच्याकाने, काल त्याने पण चंद्रालाच साक्षीला बोलावले Proud

अजूनही सिरियल चालू होताना पोस्टरवर सुभा आणि ऋजुताचे फोटो दाखवतात. कदाचित स्वातीच्या लग्नानन्तर स्वाती सन्ग्रामचा फोटो लागेल.>>लग्न लागलं आणि पोस्टर पण बदललं... फाइनली श्रीधर काळे ची entry परत झाली श्रीरंग का काय तरी नाव सांगून... संग्राम च्या factory मध्ये नविन supervisor..लग्ना नंतर गोंधळ सुरु असताना अचानक प्रकट होतो.... त्याला बघून स्वाती बेशुद्द पडते...आणि फाइनली डॉक्टर दादाला कळते की स्वाती प्रेग्नेंट आहे... इकडे श्रीधर स्वाती ला धमकी देतो जर तिने संग्राम ला काही सांगितल तर तो त्याच्या आईला मारुन टाकेल... म्हणजे काहिही... संग्राम सारख्या पावरफुल माणसाला त्याच्या बायकोला अशी धमकी देऊन घाबरवणे हास्यास्पद आहे.... काहिही..

Pages

Back to top