चंद्र आहे साक्षीला

Submitted by Ajnabi on 27 October, 2020 - 06:00

कलर्स टीव्हीवर लवकरच ........चंद्राच्या साक्षीने करणार सुबोध भावे नवी सुरुवात

Start Date: 11 November 2020
TV Channel: Colors मराठी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुभाने शपथ घेतली आहे"गीतेवर हात ठेवून सांगतो,की करीन तर निगेटीव्ह रोल नाहीतर मालिका नाही"
स्प्लिट परस्नँलिटी वगैरे असेल तर ठीक नाहीतर पुन्हा तुपारेच नशिबी यायच

सुभाने "दोन हिरॉईनी पाहिजेत" अशी पण अट घातलेली असावी. तुपारेत होत्या. ह्या शोच्या ट्रेलरवरुन तसेच सूचित होते आहे.

सुभाचा मनोहर नाही भावला.आपले मोनेच छान होते.पहिला भाग तर नीरस वाटला.रुतुजा मात्र सुजाता चांगल करेल अस वाटत आहे.
भाच्या खोटे हे पात्र आणणार नाहीत.
विनिता ऐनापुरेच नाव दिलेल आहे,त्यामुळे जे खर घडल ते दाखवतील.

पहिल्या भागा पासूनच श्रीधर काळे म्हणजे सुभा चे इरादे नेक नाहीत हे दाखवून दिल आहे...तो एक सस्पेन्स तर संपलाच... आज तर बायकोला उद्देशून च म्हणताना दाखवलं आहे की पुढच्या दिवाळी पर्यंत सुख आपल्या घरी असेल.. त्याची सुरुवात मी केलिये...

हेमंत ढोमे चा किरकिर्या,अती शहाणा,पुणेकर शेजारी बरा वाटला..पण हे चालतय म्हणल्यावर तेच तेच नको दाखवायला ..मग तो ढोमे डोक्यात जाईल

हेमंत ढोमे चा किरकिर्या,अती शहाणा,पुणेकर शेजारी बरा वाटला..पण हे चालतय म्हणल्यावर तेच तेच नको दाखवायला ..मग तो ढोमे डोक्यात जाईल >>>>>>>> अगदी अगदी. ह्याच कॅरेक्टर कदाचित भाच्या खोटेसारख असेल. बाकी काही चुरचुरीत पुणेकर डायलॉग्ज छान वाटले.

इथेही सुभा नायिकेच्या घरातली बिघडलेली वस्तू दुरुस्त करुन देऊन तिला इम्प्रेस करतो. तिची आईसुद्दा छान लाडू बनवते म्हणे.

त्या बायका अशी काय साडी वाळवत असतात, दोरीवर टाकली तर नाही वाळणार का. स्वातीच्या आईला असा काय आजार असतो की ती आईला सोडून जाणार नाही, आई तर चांगली धडधाकट दिसते आणि वाड्यात एवढे शेजारी आहेत की काळजी घ्यायला.

सुबोध अगदी पोहोचलेला दाखवलाय, अर्थात त्याशिवाय एवढं मोठं कांड शक्यच नाही. रच्याकने, ही खरी घटना डोंबिवलीमध्ये घडली होती ना, पुणे कुठून आलं मध्ये.

त्या बायका अशी काय साडी वाळवत असतात, दोरीवर टाकली तर नाही वाळणार का. >>अगदी अगदी... Lol पण मग हीरो ची entry कशी दाखवली असती... आत साडी मध्ये गुन्तुन गेलेला..मग हेरोईन येऊन त्याला मदत करते हे दाखवता नसतं आलं ना.
.आता त्यामुळे पुणेरी पेठातल्या बायकांकडे खूप वेळ असतो साड्या सुकवायला असा समज होऊ शकतो.. किंवा वाड्यातल्या बायकां चा upper body workout चा प्लान असेल तो.. bdw त्यातही कंटिन्युटी मध्ये गड़बड जाणवली... हेरोईन येते तेव्हा सुकत आलेली साडी हीरो येतो तेव्हा साडी उडवतना पाणी उडत असत..जास्त ओली होते..पुणेरी हवा एकदम दमट कशी झाली

अगदी,अगदी,@तुरु..
मलाही खटकलं ते साडी..कोरडी-ओली-कोरडी..काहीही

तुरु, मॅक्स थँक यु.

चंपा घटना डोंबिवलीत घडली आहे का नाही, ते माहीती नाही पण लेखिका विनिता ऐनापुरे तेव्हा डोंबिवलीत रहायच्या. आता कुठे रहातात माहीती नाही, रहातही असतील डोंबिवलीत.

डीएनए टेस्ट करून मूल स्वातीचंच आहे हे सिद्ध नाही झालं का. मला आठवतंय त्याप्रमाणे नाटकात तिचं मूल दुसऱ्या बाईचं म्हणजे फसवणाऱ्याच्या बायकोचं आहे असं तिला सांगितलं गेलं. तेव्हा अशी टेस्ट अस्तित्वात नव्हती का. आश्रम मधली डीएनए टेस्ट बघून अचानक हा मुद्दा डोक्यात आला.

स्पृहा जोशी आहे बहुतेक >>>>> स्पृहा जोशी असेल तर हि तिची पहिलीच भूमिका असेल खलनायिका म्हणून. पण अर्चना निपाणकर नक्कीच शोभली असती श्रीधरची पहिली बायको म्हणून. स्पृहाला स्वातीला न्याय मिळवून देणारी वकिल म्हणून पाहायला आवडल असत.

कालच्या भागातल सुभाच काम आवडल. हेमन्त ढोमे काल गायब होता ते बरच आहे.

मालिका चांगली आहे असं दिसतंय, कुमले पाहिलं नसेल ज्यांनी त्यांच्यासाठी सस्पेन्स ...
बाकी सुभासाठी बघणारेही बरेच असतील, माझा पण त्यात नंबर Happy

कालच्या भागातल सुभाच काम आवडल. हेमन्त ढोमे काल गायब होता ते बरच आहे. >>> मी एक सीन का प्रोमो बघितला ते आठवत नाही मला पण ढोमे बरा वाटला त्यात सु भा पेक्षा. तिला सावध करत असतो, ती त्याच्याबरोबर बाहेर जात असते तेव्हा.

अर्थात तेवढं थोडं बघून काही म्हणणे हे बरोबर नाही म्हणा पण बरेचदा मी प्रोमोज बघते वेगवेगळ्या सिरियल्सचे , ते हल्ली news channels वर पण असतात किंवा youtube वर समजतं हल्ली प्रत्येक सिरीयलमधे काय होणार ते सांगतात, सगळं नेहेमी बघते असं नाही पण स्टोरी समजते मधेच कधी बघितलं तरी.

प्रत्येक सिरीयलमधे काय होणार ते सांगतात, सगळं नेहेमी बघते असं नाही पण स्टोरी समजते मधेच कधी बघितलं तरी. >>>>>> येस्स. हल्ली टिव्हीवर सुद्दा प्रोमोज बघून पुढे काय होणार ते कळत. सिरियल्स बघायची गरजच नाही. हा हा हा

Lol

त्यामुळे नवऱ्याला मी सांगतेय, आता फ्री channels ची केबल ठेव. फार tv बघितला जात नाही, उगाच पैसे भरायचे. त्यात फेवी स्टिक आहे आणि hotstar चा पण plan आहे. तिथून बघुया वाटलं तर नाहीतर तिथेही पैसे उगाच जातायेत. अर्थात तिथे कमी आहेत केबलपेक्षा तरी फार बघितलं जात नाही.

सर्व channels वरच्या सिरियल्सचे updates देण्यासाठी अनेक youtubers उगवले आहेत फक्त काही जणांचे मराठी फार वाईट असते. थोडं इथे तिथे समजून घेऊ शकतो, अगदीच प्रमाण मराठीची अपेक्षा करत नाही.

आमचं तर टीवी subscription कधी पासून बंद च आहे...ही serial सुभोध भावे ची म्हणुन voot किन्वा जियो टीवी ऐप्प वर बघते..नाहितर 7 ते 11 उगीजच टीवी चालू राहतो..एक सवय म्हणून serial बघितल्या जातात...त्या पेक्षा टीवी वर मूलाना हवं तेवढच यूट्यूब/नेटफ़्लिक्स वर लावता येत .. लोक जास्त mobile वरच बघतात..हळू हळू टीवी संकल्पना बदलते आहे

सगळच किती गुढ आहे या मालिकेमध्ये. अगदी संगीत जरी कानावर पडलं तरी गुढ वाटत.

सुभा च मुलीसमोर मोबाईल न वापरण्या मागे काय कारण असावं??
ते सोशल मीडिया अकाउंट काढल तर मद्दाम काढलेल असेल का?

Pages