चंद्र आहे साक्षीला

Submitted by Ajnabi on 27 October, 2020 - 06:00

कलर्स टीव्हीवर लवकरच ........चंद्राच्या साक्षीने करणार सुबोध भावे नवी सुरुवात

Start Date: 11 November 2020
TV Channel: Colors मराठी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वामींनीमधेही ती तशीच बोलते. तोच अभिनय बघून घेतलं असेल. श्रीधर आता कसा मी आपल्या होणाऱ्या संसारासाठी राबतोय याची दर्दभरी कहाणी सांगेल आणि स्वाती त्याच्या सुटलेल्या पोटाला मिठी मारेल.
रच्याकने, घर स्वातीचे बाबा आणि आत्याच्या नावावर आहे म्हणजे उमा आणि स्वाती या दोघींचाही घरावर हक्क आहे. आत्या घराबाहेर काढायची धमकी या दोघींना कशी देऊ शकते.

रच्याकने, घर स्वातीचे बाबा आणि आत्याच्या नावावर आहे म्हणजे उमा आणि स्वाती या दोघींचाही घरावर हक्क आहे. आत्या घराबाहेर काढायची धमकी या दोघींना कशी देऊ शकते. >>>>>>> अगदी अगदी. पण तिचे श्रीधर आणि स्वातीच्या लग्नाबाबतीतले मुद्दे ( पत्रिका बघणे सोडून) पटणेबल आहेत.

ती पौर्णिमा रायकर >>>>>>> ही तुपारे मध्ये पण होती का? ईशाची पुण्यातली मावशी झालेली, विक्रान्तकडे लाल ताबण्डी साडी लग्नात मागणारी? का दोन्ही वेगवेगळ्या बायका आहेत?

श्रीधर आणि सुमन ची दुखभरी दास्तान सांगून त्याला अँटी हीरो बनवला आहे..म्हणजे सध्या सहानभूति श्रीधर सुमन ला मिळतेय... >>>>>>> ते कुमले नाटक पाहताना एक विचार मनात येत होता, कुमले ज्यान्च्या सत्य कथेवर बेतल आहे त्या जोडप्याला काहीच वाटल नसेल का त्या मुलीला फसवताना? इव्हन नाटकात सुद्दा त्यान्ची बाजू दाखवली नाही.

मूल व्हावे म्हणून कसले-कसले बळी घेण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या टोकापर्यंत लोक जाऊ शकतात. तेव्हा आपण काय करतोय ते चूक की बरोबर, चांगले की वाईट, नैतिक कि अनैतिक हा विचारही त्यांच्या मनात येत नसेल.

ती सुमन सारखी रडत असते, कंटाळा आला बघून. कधी प्रसन्न नाहीच, सतत चेहेऱ्यावर ताण आणि श्रीधर म्हणतो काहीच ताण नाही. नाटकातली त्याची बायको अगदी जहांबाज दाखवली आहे आणि तेच योग्य वाटतं. त्याची बायको एव्हडी संवेदनशील असती तर ते दोघे असे वागलेच नसते.
श्रीधर लग्न न करताच मूल जन्माला घालणार Uhoh यांनी तर फारच बदलली कथा. एका दिवसात सगळा कार्यभाग साधणार? स्वाती पोट लपवू शकणार नाही आणि म्हणून घाईघाईत लग्न. तसं तर तसं, लवकर मालिका पुढे गेल्याशी मतलब.

ती सुमन सारखी रडत असते, कंटाळा आला बघून. कधी प्रसन्न नाहीच, सतत चेहेऱ्यावर ताण >>>>>>> +++++१११११११११ अस वाटत की श्रीधर सुद्दा तिच्या रडण्याला वैतागून स्वातीकडे जाईल एक दिवस. Lol म्हणेल, एक वेळ स्वातीचे शेजारी आणि आत्या परवडली. पण हिच सततच रडगाण नको. परवाच्या भाण्डणात त्याने चान्गल सुनावल तिला, 'तुलाच मूल हवय म्हणून मी हे सगळ करतोय' म्हणून.

श्रीधर लग्न न करताच मूल जन्माला घालणार Uhoh यांनी तर फारच बदलली कथा. एका दिवसात सगळा कार्यभाग साधणार? स्वाती पोट लपवू शकणार नाही आणि म्हणून घाईघाईत लग्न. तसं तर तसं, लवकर मालिका पुढे गेल्याशी मतलब. >>>>>>> कुमले मध्ये सुद्दा सुमो लग्नाआधी प्रेगनण्ट दाखवली होती.

पण कालचा प्रिकॅप बघून गोन्धळ उडालाय. श्रीधर आणि सुमनचा नक्की प्लॅन काय होता? लग्नाआधी कार्यभाग साधायचा की डायरेक्ट लग्न करण्याचा? Uhoh कारण प्रि़कॅप मध्ये सुमन स्वातीला 'लग्नासाठी शुभेच्छा, कस वाटल दादाच सरप्राईज' म्हणते. नवीन प्रोमोसुद्दा लग्नाचा आहे.

सुभाला आता एखाद नवीन प्रोजेक्ट मिळाल असेल.किंवा पिक्चर डायरेक्ट करणार असेल.म्हणून आता पळवतील आणि संपवून टाकतील.आणि तसही एप्रिल मध्ये बिगबॉस 3येईल, तेव्हा 9.30पासूनच्या सगळ्याच सिरियल एकतर संपवतील किंवा टाईम बदलतील.त्यामध्ये त्याच्या प्रॉडक्शनची ती शुभमंगल पण संपवतील,म्हणजे सुभा मोकळा पिक्चर्स करायला.
आता मालिकेत मात्र लवकर येउ नये.

घटस्फोट मिळायच्या आधीच लग्न करता यावा म्हणून महाबळेश्वरला जाऊन तिला जाळ्यात ओढायचा प्लॅन आहे वाटतं. त्याचा घटस्फोट नसेलच झाला तर यांचं लग्न आपोआपच बेकायदेशीर ठरेल

सुभा एवढ्या लवकर बिबॉंमध्ये येणार नाही असे वाटते. पुष्कर श्रोत्री येऊ शकतो.
सरप्राईज म्हणून लग्न Uhoh लग्नाला स्वातीची आई, माधवी कोणीच नाही आणि स्वाती तर बाशिंग बांधूनच तयार आहे.

यावर्षी बिग बॉसला बरेच मोठे लोक हजेरी लावू शकतात!
बाकी इंडस्ट्रीत सध्या स्लॅक सुरु आहे.... त्यामुळे सिनेमावाले, नाटकवाले येवू शकतात!

त्याचा घटस्फोट नसेलच झाला तर यांचं लग्न आपोआपच बेकायदेशीर ठरेल>>> नाहीच झालाय. मुळात तो घटकस्फोट घेणार असे फक्त बोलतो पण Decree चा विषय निघाला कि कारणे देऊन विषय टाळतो.
रात्री ती लग्नाशिवाय शारिरीक जवळीक नको म्हणते म्हणून सकाळी लग्न लावायला रडकी सुमन आली आहे. तिथे माधवी, स्वातीची आई, आत्या यांचे नसणे त्यांच्या फायद्याचे आहे. आता गुपचूप लग्न करू आणि नंतर योग्य वेळ आली की सगळ्यांना सांगू नाहीतर रायकर आपल्याला कधीच लग्न करू देणार नाही असे सांगून तिला फसवतील.

आता मोस्टली मराठीवाले सगळे हिंदी सिरीयल मध्ये दिसतायत.. गश्मीर महाजनी, मयुरी देशमुख, किशोरी शहाणे, गुरुनाथ सुभेदार ची आई..आणखीन बरेच मराठी सिरिअल्स वाले स्टार प्लस वर आले आहेत..उलट चालती असेल मराठी कलाकारांची.. वोकल फॉर लोकल ..

हो.बरेच मराठी कलाकार हिंदीमध्ये आहेत.त्यातली गुम है किसी के प्यार मे,ही सिरियल मी बघते.त्यात तर हिंदी कमी आणि मराठी कलाकारच जास्त आहेत.त्यात मुळात मराठी कुटुंब दाखवल आहे.
मला आवडते ती सिरियल.
ईमली पण चांगली आहे तशी.गश्मीर आवडला.

मायलेकी आगाऊ आहेत. ती माधवी काहीतरी चांगलं सांगायला जाते तर तिला उलट उत्तर देतात. आत्या उगाचच घेतली आहे, भाग वाढवायला. आत्या जर महाबळेश्वरला धडकू शकते तर सुमन आणि अश्विन कोण आहेत हे नक्कीच शोधू शकते, पण ती नाही शोधणार कारण नाहीतर स्वाती कशी फसवली जाणार.

नाही नाही म्हणता..बराच twist आला मालिकेत... स्वाती ला कळत की श्रीधर आणि सुमन/अन्जू नवरा बायको आहेत..आणि तिला फसवत आहेत... श्रीधर चा ओरिजिनल मोबाइल तिच्या हाथी लागतो त्यात श्रीधर सुमन च्या लग्नाचे फोटो ती बघते..स्वाती चा अभिनय मस्त होता...

स्वातीला दिवस आहेत की त्या आधीच कळतं तीला? श्रीधर टेम्भे वाड्यात का आलेला असतो. मी पूर्ण भाग नाही बघू शकले.

स्वाती चा अभिनय मस्त होता... >>>>>>>>> +++++++११११११११

स्वातीला दिवस आहेत की त्या आधीच कळतं तीला? श्रीधर टेम्भे वाड्यात का आलेला असतो. >>>>>>>> त्या आधीच कळतं. अजून प्रेगण्ट नाही झाली ती. श्रीधर नाही आला टेम्भे वाड्यात, स्वातीने तो फोन त्याच्या घरी बघितलेला असतो. आज ती जाब विचारायला आली होती श्रीधरकडे.

तिने आणखी एक मूर्खपणा केला, तो फोन स्वत: जवळ ठेवायला हवा होता तिने पुरावा म्हणून. पण नाही, दाखवला फोन श्रीधरला आणि तिथेच फसली. आता घेतला ना त्याने फोन.

आता नन्ना तिला मदत करणार आहे.

तिने लगेच त्याला जाब विचारायलाच नको होता. त्या फोन मधेही तिला हवे ते काहीच पुरावे नव्हते. त्यामुळे पुढेही तो तिने माझा फोन चोरला असेच बोलला असता.
त्याच्याशी गोड बोलत त्याच्या विरोधात पुरावे जमा करायला हवे होते आणि त्याला जाम गुंडाळायला हवे होते. पण तेव्हढी ती स्मार्ट नाही आहे हे बघूनच त्याने तिला हेरले होते.

त्याच्याशी गोड बोलत त्याच्या विरोधात पुरावे जमा करायला हवे होते आणि त्याला जाम गुंडाळायला हवे होते. >>>>>>>> म्हणजे तुपारेसारख

बादवे, सिरियलमध्ये आस्ताद काळे येणार आहे अस म. टा. मध्ये वाचलय.

म्हणजे तुपारेसारख>>> ईबाळ बदला घेतं? मी तर अर्ध्यातच ती मालिका बघणे सोडून दिले होते. ती फार डोक्यात जायची.

स्वातीने नाटक चालू ठेवायला हवे होते. पण मूळ कथेला एवढं वळण देण्याचं कारण काय, सुभा सोडून नाही ना जाणार. आस्ताद कदाचित वकील म्हणून येईल. काल पोलीस स्थानकात फार संथ चालले होते सगळे, एकेकाची प्रतिक्रिया, मध्येच भूतकाळ सविस्तर.

ईबाळ बदला घेतं? >>>>>>>> हो. पण विक्रान्त स्वत: आत्महत्या करतो.

पण मूळ कथेला एवढं वळण देण्याचं कारण काय, सुभा सोडून नाही ना जाणार. >>>>>> नही ( कानावर हात ठेवून पळणारी बाहुली). Lol जोक्स अपार्ट, सिरियलची गोष्ट छोटी आहे, त्याला फुगवून फुगवून किती वाढवणार. मेबी त्यान्ना कळल असेल की मूळ कथानक तसच दाखवल तर कदाचित लोक बघणार नाही. सध्या ह्या टविस्टमुळे सिरियल इण्टरेस्टिन्ग झाली आहे. कीप इट अप.

आस्ताद कदाचित वकील म्हणून येईल. >>>>>> _++++++११११११ श्रीधरचा वकील म्हणून येईल कदाचित. स्वातीचा वकील घरचाच आहे, नन्ना.

प्रि़कॅप बघितला, स्वातीने श्रीधरशी पॅचअप केल. Uhoh कदाचित ती नाटक करत असेल.

स्वातीने श्रीधरशी पॅचअप केल. Uhoh कदाचित ती नाटक करत असेल. >>>तसे असेल तर चांगले आहे नाहीतर परत फसवणूक झाली म्हणत रडायला नको. बघावे तेव्हा सुमन सारखी रडायची, अजुनही रडते. आता त्यात स्वतीची भर. तिकडे अग्गंबाई सासूबाई मधे आसावरी सतत रडत असते. नशीब आकुकाक मधे अरूंधती ढसाढसा रडत नाही.

Pages