मी ऑस्टिनला आल्यापासून तीन मंदिरांना भेट दिली आहे. पैकी 'ऑस्टिन पब्लिक लायब्ररी' तुमच्या पर्यंत पोहंचवली आहे. राहिलेले दोन मंदिरांन पैकी एक होते व्यंकटशाचे मंदिर. मुलाकडे गाडी आहे ती पाच आसनी, म्हणजे एक ड्राइव्हर आणि चार पॅसेंजर्स. आम्ही आल्याने आमचे कुटुंब सहा जणांचे झाले. मुलगा, सून, जुळ्या मुली, आणि आम्ही दोघे. आपल्या येथे लेकरं मांडीवर घेऊन गाडीत बसता येत नाही. लहान मुलांसाठी विशेष सोय असलेली डीट्याचेबल सीटिंग अरेंजमेंट असते. ती गाडीतील सीटला जोडता येते. त्यातच लहान मुलं बसवावे लागतात, हे लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी केलेला कायदाच आहे. आणि तो सर्वजण पाळतात.
यावर उपाय म्हणून मुलाने आम्हाला उबर कॅब करून दिली. आणि तो कारने आला. जाण्यासाठी जो, दिवस आम्ही निवडला त्याला एक कारण हि होते. तेथे त्या वीकेंडला फेयरवेल, म्हणजे छोटीशी जत्रा, काही स्टॉल्स लाइटिंग वगैरे होते. लाइटिंग साठी आम्ही घरातून संध्याकाळी निघालो.
कॅब अगदी वेळेवर आली. ड्राइव्हरच्या सीटवर एक गुटगुटीत सोनेरी केसाची तरुणी पाहून मला नवल वाटले. पोरी कार चालवताना पहिल्या कि मला खूप कौतुक वाटते. तिने अगदी व्यंकटेश मंदिराच्या मुख्य दाराशी सोडले.
मुलगा पोहचायला उशीर दिसत होता. आम्ही बूट,चप्पल काढून मंदिरात घुसलो. पहिले इम्प्रेशन झाले ते, या मंदिरात आपल्यीकडचा मंदिराची भव्यता (म्हणजे आपल्या हेमाडपंती देवळात असतो तो, एक गंभीर 'रिचनेस') आणि गलिच्छपणा येथे नाही. थोडक्यात सांगायचे ते मंदिर म्हणजे एक विशाल महागडा स्टुडिओ सेट असल्या सारखे वाटले. आपल्या मंदिरात पाऊल टाकले कि आपण (किमान मी तरी) किंचित अंतर्मुख होता, अगदी खेड्यातले गावाबाहेरचे मारोती मंदिर असले तरी! तसा फील येथे आला नाही. थोडं थांबा! म्हणजे हे मंदिर वाईट होते असे मुळीच नाही! अत्यंत सुरेख बांधणीचे होते. गाभाऱ्यात लाल गालिच्या पसरलेला होता. गाभारा खूप मोठा होता. आता विविध देवतांचे,जसे गणपती, महालक्ष्मी, देवी,याचे छोटी-छोटी मंदिर(-त्यांना मंदिर म्हणण्यापेक्षा देवघर म्हणता आले असते) भिंती लागत होती. सर्व देवतांना ताज्या फुलांची मनमोहक आरास! मध्यभागी बालाजीची सालंकृत माध्यम आकाराची मूर्ती, त्याभोवती लाईटिंगची नेत्रदीपक आरास होती. या सर्वात मिससिंग फक्त धूप/किंवा उदबत्तीचा घमघमाट! येथे, म्हणजे अमेरिकेतच आगीची खूप काळजी घेतली जातेय, असे दिसते. जळावू लोकांना, व्हिसापण, याच कारणामुळे मिळत नसावा, असे आता मला वाटायला लागले आहे!(असो. इतकं जळवण बर नव्हे!)
अश्या या रम्य गाभाऱ्यात भरपूर भाविक होते. त्यात हि पारंपरिक वेशातील दाक्षिण्यात्य मंडळी बरीच. चारसहा लुंगी धारकपण होते. भरपूर गाजरे घातलेल्या भडक साड्यातल्या 'आम्मा', कथक करताना घालतात तश्या नऊवार साडीतल्या तरुणी, आंबाडा घातलेल्या. छान वाटत होत.
त्या अमेरिकन बालाजीचे, डोके टेकवून दर्शन घेतले. तीर्थ घेतले.(म्हणजे त्या 'आप्पा'नेच दिले.), डोक्यावर बालाजीचा आशिष, म्हणून टोप ठेवून घेतला. आरतीवर हाताचे तळवे धरून स्वतःच्या चेहऱ्यावर, ते तळवे हलकेच फिरवले. पुन्हा तो बालाजी डोळ्यात साठवून घेतला. त्याच्या पायथ्याशी असलेल्या चकचकीत पितळेच्या 'डोनेशन'च्या पेटीवर माझी नजर स्थिरावली. या विश्वेश्वराला मी काय 'डोनेशन' देणार? दाता तोच, मी याचक! पण एक दान त्याने न मागता दिल होत, त्याचा दर्शनाचा 'योग' त्याने, या पामराच्या झोळीत टाकला होता, म्हणून मी आज याच्या पुढे उभा आहे! मागून बायकोने ढुसणी मारली.
"व्हा कि पुढं! मागे लोक खोळंबलेत!" हिने हळू म्हणून ज्या आवाजात सांगितले, तो आवाज प्रदक्षणा मार्गावर असलेल्यांनि सुद्धा एकाला असेल! पण डरनेका काम नै! कोणालाच समजले नसेल! हा माझा गैर समज होता!
"पुण्याचे का?" शेजारचा टकलू मला विचारत होता!
"नाही! आम्ही नगरचे!"
"मग, बरोबर!" मला अजून शरमल्या सारखे झाले. साल, कुठंच काही गृहीत धरायची सोय, माझ्या नशिबी नसावी, म्हणजे काय?
तोवर मुलगा-सून-नाती आम्हाला जॉईन झाले. आम्ही देवदर्शन उरकून फेयरवेलच्या गर्दीत घुसलो. ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा होता. रात्र थंडीचे पलिते घेऊन घिरट्या घालू लागली होती. हॉलवीन( हा भुतांचा उत्सव्ह ) निमित्याने भरपूर रोषणाई केलेली होती. काही खेळण्यांचे स्टाल होते, काही खाण्याचे! बायको नातींना घेऊन खेळण्याच्या स्टालच्या गर्दीत घुसली. अस्मादिक 'इडली डोसा'ला लाईनीत उभे राहिले! चारदोन लोक दूर माझा नंबर आला. लोक कागदी चिटोऱ्या देऊन, इडली, डोसा घेत होते! इडलीची 'तात्काळ' सेवा होती! डोश्याला मात्र 'वेटिंग-लिस्ट'! दिसत होती. सोमोरच्या चारातले, दोन इडलीवाले निघाले. समोरच्या दोघांनी हातातील कुपन देवून माझी वाट मोकळी करून दिली. मी खिशात हात घालून शंभर डॉलरची नोट काढून त्या स्टालवाल्याला दाखवली! काय करणार दुसरे?
"ब्रिन्ग कुपन्स!" समोरचा स्टाल-वर्ड म्हणाला.
"फ्रॉम व्हेयर?"
दूर दिशेला त्याने बोट दाखवले. तेथे देवदर्शनापेक्षा (म्हणजे आपल्या कडल्या!) लांब लाईन! म्हणजे साधारण पहाटे दोन वाजता मला त्या लाईनीत उभारले असतेतर कुपन्स मिळाले असते! मी त्या दूरवरच्या रांगेकडे पहात असताना, मुलगा कुपन्स घेऊन आला! माझे या रांगेतले सत्तावीस मिनिटे सार्थकी लागली होती.
मी या 'इडली-डोश्या'च्या आजोळी वास्तव्य केलेला माणूस, या अमेरिकन इडली डोश्यांनंकडून फारश्या अपेक्षा नव्हत्याच. बेंगलोरला ९९प्रकारचे डोसे मिळतात! पण नेहमी प्रमाणे माझा अपेक्षाभंग झाला! अप्रतिम इडली-डोसा-आणि विशेषतः त्या सोबतची खोबरे-मिरचीची चटणी! त्या थंडीच्या 'झोंबत्या' मोसम मध्ये गरम डोश्याने 'बहार' आणली हे सांगणे नलगे!
"बाबा, अजून काही खायचय का?"
"अजून काय आहे?"
"सामोसा, वडापाव,आणि हो मिसळ पण आहे." समोसा माझा आणि मिसळ बायकोचा वीक पॉईंट! पण मी ठाम नकार दिला! कारण पुन्हा तेच, कूपनला लाईन, आणि सामोस्याला पण तितकीच,पण खरे कारण होते,वाढणारी थंडी आणि झोपीला आलेली बाळ! घड्याळाचा काटा आकरा वाजून गेल्याचे दाखवत होता. पोराने उबेर बुक केली. आम्हाला बसवले. पायपीट बरीच झाली होती. गाडी सुरु झाल्या बरोबर माझे डोळे मिटले. गाडीतल्या हीटिंग सिस्टीमची उब जाणवत होती.
(क्रमशः )
सु र कुलकर्णी .
छान लिहिताय. पुलेशु. पुभाप्र.
छान लिहिताय. पुलेशु.
पुभाप्र.
छान !पुभाप्र.
छान !पुभाप्र.
वाचतोय पुभाप्र
वाचतोय
पुभाप्र
ह्या वेळी लेख थोडा लहान आहे;
ह्या वेळी लेख थोडा लहान आहे; पण नेहमीसारखाच छान आहे!
होय मंदीरात सगळे देव असतात. अ
होय मंदीरात सगळे देव असतात. अॅसॉर्टेड चॉकलेट बॉक्स असतो तसे मंदीर अॅसॉर्टेड देवांचे असते. जिसको जो देव मंगताय वो मिलेगा. हाकानाका.
इथपर्यंत वाचून झाले आता भाग,
इथपर्यंत वाचून झाले आता भाग, सगळेच छान हलेफुलके, ओघवते आणि विनोदी शैलीत लिहिलेत. पुढचे पण वाचतेय एकेक.
जिसको जो देव मंगताय वो मिलेगा. हाकानाका.>> हे भारीच , मी हे बाबूभैय्याच्या आवाजात( हेराफेरी) वाचलं.
सामो, वर्णिता थँक्स
सामो, वर्णिता थँक्स