शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही नाही.
५ हे जरा 'टिमकी' या अंगाने जाणारे वाटते.

सर्व उत्तरे
१. पडकेस
२. सकृतदर्शनी
३. सांप्रदायिक अर्थशास्त्र >>> नीतिभेद
४. दरुनीमहाल

५. लवलवाट
६. प्रसिद्धी /गप्पांचे आगर (७) >>> टमटमनगरी
७. रीतभात
८. चपळ (५) >>> तडकसार
९. मौल्यवान वस्तू ; प्रकाशाचा संबंध >>> रत्नदीप
………………….
सर्वांना धन्यवाद !

९ अक्षरी मराठी शब्द उपशब्दांसह ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही उपशब्दांची शोधसूत्रे अशी :

३७ पाझर
४१ ध्यास.

९५ वारंवार होणाऱ्या गोष्टीबद्दलच्या एका म्हणीतील शब्द
७८ लहानाला प्रेमाने संबोधणे

६ एका भारतीय भाषेच्या नावातील पहिले अक्षर
२ एका व्यंजनावरील ह्रस्व वेलांटी

पूर्ण शब्द : आर्थिक दुर्बलता

पान्हा
२ णि
दोन्ही नाही. पूर्ण शब्दाशी जुळणार नाही.

फक्त हे राहिले :

९५ वारंवार होणाऱ्या गोष्टीबद्दलच्या एका म्हणीतील शब्द

६ एका भारतीय भाषेच्या नावातील पहिले अक्षर

द रि द्र ना ५ ६ व त्स ९
द रि द्र ना म सं व त्स र

सं संस्कृत
र म मनाने टाकले.

हो खरं !
मी र म , र म करत होते. मरमर केलं असतं तर मरे लगेच आलं असतं.

एकाच शब्दाचे ७ विविध अर्थ ओळखायचे आहेत. या प्रत्येकासाठी वेगळे शोधसूत्र दिले आहे. प्रत्येकाच्या कंसात अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या.
ते सर्व ओळखल्यावर शेवटी मूळ शब्द (जो यात नाही तो )ओळखा.

1. नव्या कल्पना (3)
2. छाया (३)

3. सार्वजनिक बांधकामात वापरतात (2)
4. ज्योतिष प्रांतातले (3)

5. यांचा रुबाब फार (४)
6. मज्जा आहे बुवा ! (3)
7. नशिबाची परीक्षा (३)

टीप : शब्दाचे पर्यायी उत्तर मूळ शब्दाचा अर्थ असल्यासच बरोबर.

सर्व नाही.

३ साठी रस्ते बांधकाम पाहा.
थापी >> याचा खूप मोठ्या स्वरुपात विचार करा

६ एखाद्याची मज्जा असणे म्हणजे ....... असणे

२ शेवटी ठेवा. बराच वेगळा आहे.

Pages