Submitted by अतुल. on 2 February, 2021 - 01:50

पहिले प्रेम, पहिला पगार, पहिला पाऊस, नोकरीचा पहिला दिवस... ह्या आणि अशा अनेक गोष्टी पहिलेपणाच्या न विसरण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
पण ह्या व्यतिरिक्त अनेक "पहिल्या" अविस्मरणीय गोष्टी असतात कि ज्या आपण कधीतरी पहिल्यांदाच केलेल्या, पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या असतात. आणि तेंव्हा हे पहिल्यांदाच असल्याने आपल्याला त्याविषयी काही माहित नसते त्यामुळे कधी थरार तर कधी गोंधळ अशा गमतीजमती घडत असतात. आणि आता आपण जेंव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा ह्या मजेशीर आठवणी आपल्याला गालातल्या गालात हसायला लावतात. इथे अशाच काही मजेशीर आठवणी आपण शेअर करूया...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धमाल किस्से आहेत एकेक.
धमाल किस्से आहेत एकेक. लिफ्टचा जबरी आहे किस्सा.
मस्तंय धागा. वाचतेय.
मस्त धागा...
मस्त धागा...
घरी वॅक्सिंग करण्याचे प्रताप केले आहेत. कोणाचं तरी ऐकून ते साखर, पाणी, लिंबू असं काहीतरी आटवलं बराच वेळ. जुन्या कॉटन साडीचे तुकडे फाडून मी आणि माझी चुलत बहीण बसलो करायला. पहिल्यांदाच करत असल्याने काहीच अंदाज नव्हता. इतकं चिकट प्रकरण झालेलं ते की बस रे बस. ते कापडाचे तुकडे पण चिकटून बसले स्किनवर आणि चांगले भाजल्याचे डाग पडले. त्यानंतर कधी फंदात पडलो नाही
जीनच्या जाड कापडाने तशा
जीनच्या जाड कापडाने तशा प्रकारचे वॅक्सिंग होते.
हो ना ते खूपच उशिरा कळलं
हो ना ते खूपच उशिरा कळलं
रेडा सोडून दुचाकी हातात घेतली
>>>रेडा सोडून दुचाकी हातात घेतली तर पंचाईत होणारच
Submitted by हरचंद पालव>>>
अरे मानवा !!! आम्हाला ही अद्ययावत (अपडेट) व्हावे लागते. तसाही आता रेडा ऐकेणासा झालाय.
पहील्यांदा बर्फ हातात घेतला.
पहील्यांदा बर्फ हातात घेतला. डेलावेअरला. विमानातून खाली पांढरे दिसत होते पण कळत नव्हते मग अचानक विमान बरच खाली आल्यावरती म्हटलं अरे हा तर बर्फ. लेकीला म्हटलं तू घे आधी बर्फ हातात मग मी घेते. तेव्हा तिने माझ्याआधी बर्फ अनुभवला
अजुनही बर्फ फार आवडतो. भुरभुरणारा पांढरा धोप. एकदा कारमधून चाललो होतो व अचानक हिम वर्षाव सुरु झाला आम्ही म्हणतोय अरे हे काय एवढी राख उडतीये रस्त्यात मग नवरा म्हणाला अगं हा बर्फ आहे.
या दोन आठवणी आहेत पहील्या वहील्या बर्फाच्या.
चालत्या विमानातून हात बाहेर
चालत्या विमानातून हात बाहेर काढू नये. मागून दुसर विमान आलं तर हात तुटायचा...
(सामो, नक्की काय नेमकं झालं? एअरपोर्टवर बर्फ दिसला का पहिल्यांदा??)
चालत्या विमानातून हात बाहेर
चालत्या विमानातून हात बाहेर काढू नये. मागून दुसर विमान आलं तर हात तुटायचा...>>>

पण मगं खारमुरे/संत्रा गोळी कसे घ्यायचे ??
जेव्हा पहिल्यांदा कळालं की विमानाच्या खिडक्या उघडत नाहीत. माझी फार निराशा झाली होती . ढगांना हात लावता येत नाही ना.
चालत्या विमानातून हात बाहेर
चालत्या विमानातून हात बाहेर काढू नये >> हो, मलाही कळलं नाही काय झालं ते.
बादवे, घराच्या खिडकीतूनही हात बाहेर काढू नये, पृथ्वी फिरतीये.
चालत्या विमानातून बर्फ हातात
चालत्या विमानातून बर्फ हातात घ्यायला मिळाले?
एकदम लकी आहात.
मागच्या वेळी मी विमानाच्या पायलट बरोबर विमान ३५००० फुट उंचावर गेले त्यावेळी गप्पा मारत होतो. त्यावेळी सहज त्याला ३५००० फुटावरची हवा मला अनुभवायची आहे असे म्हणालो तर माझ्यावर तो रागावला. तो म्हणाला हवे तर विमान चालव पण पुढची काच उघडू देणार नाही. असे म्हणून स्वतः जबरदस्तीने माझ्याकडे विमान सोपवले आणि मस्त झोपुन गेला. मी तो झोपल्यावर काच उघडायचा प्रयत्न केला तर त्याने तिथे लॉक मारले होते. झक मारत मग विमान चालवत बसलो.
चहा बनवायला शिकले होते.
चहा बनवायला शिकले होते. प्रमाण एका कपाला दोन चमचे साखर, एक चमचा चहा पत्ती हे माहीत होतं. एकदा आईच्या तीन मैत्रिणी आल्या तर मी म्हणाले मी चहा करते. आई नको नको म्हणत असताना मी करायला घेतला.
एकीला कप दिला. तिने कौतुक केले. मग पाच मिनिटांनी दुसरीला, त्यानंतर पाच सहा मिनिटांनी तिसरीला आणि नंतर आईला विचारलं @आई तुला ठेवू चहा ?
त्या तिघींनी विचारलं "अगं एकदमच आणायचा ना चहा ?'
मी संगितलं , " प्रत्येक वेळेला मी एक कप चहा बनवलाय "
एकीने विचारलं " असं का ?"
मी म्हणाले " मला एक कप चहाचं प्रमाण माहीत होतं म्हणून "
मला एक कप चहाचं प्रमाण माहीत
मला एक कप चहाचं प्रमाण माहीत होतं म्हणून >>>
भारिए रानभुली चहा बनवायची
भारिए रानभुली चहा बनवायची पद्धत
एकसे बढकर एक किस्से. धमाल
एकसे बढकर एक किस्से. धमाल धागा आहे हा.
एकतर तेव्हा हॉटेलिंग मोठ्या शहरात गेल्यावर वगैरे व्हायचे वर्षातून एकदाच.
सान्वी, ते टीप दिलेले 5 रु मी पण उचलुन आणून हॉटेलमधून बाहेर पडल्यावर दाखवलेले शाबासकीच्या अपेक्षेने
सहावी की सातवीत ते साखरेपासून कार्बन करायचा धडा शाळेत शिकवला होता. घरात कुणी नाही बघून मस्तपैकी एक छोटा कुंडा घेतला आणि साखर जाळली. मला वाटलेलं कार्बनचे पापुद्रे मिळतील किंवा स्फटिक होतील. पातेलं तळाशी करपलं आणि ते कितीही घासले/खरवडलं तरी निघेना. आता आई आल्यावर गॅस का चालू केला मोठी माणसं नसताना म्हणून ओरडणार त्याला घाबरून मागच्या अंगणात गेले आणि जरा कोपऱ्यात खड्डा खणला आणि त्यात ते भांड पुरलं.
तिथे जवळच भांडी घासायची जागा होती. मग सगळी घरात गेल्यावर मी भांड्यांपाशी जाऊन कुंडा बघितला , मातीने बरबटलेला होता. तसाच ठेऊन घरात पळाले.
एक दोन दिवसात कुंडा कुठं बघितला का याला सगळ्यांबरोबर मी पण माहीत नाही म्हणून ठाम सांगितलं. दोन तीन दिवस खड्डा लांबून बघत होते ठाकठीक आहे ना. मग विसरून गेले.
आठ पंधरा दिवसांनी घुशीनं बरोब्बर त्या खड्ड्याच्या तिथे उकरलं. सकाळी सूर्याची किरणं त्या खड्ड्यातल्या स्टीलच्या कुंड्यावर पडून ते चमकत होतं. बाबांना झाडांना पाणी घालताना ते दिसलं आणि त्यांनी काठी घालून तो कुंडा बाहेर काढला आणि घरात आवाज दिला कुंडा सापडला म्हणून. आता काय सांगायचं हा विचार करत होते पण तेवढ्यात आईच तणतणली या घुशीनी वैताग आणलाय नुसता, आता भांडी पण पळवायला लागलीत.
आता भांडी पण पळवायला लागलीत
आता भांडी पण पळवायला लागलीत
(No subject)
आणि एक मजेशीर आठवण आहे.
आणि एक मजेशीर आठवण आहे. नुकतीच कॉम्पुटर टीचर म्हणून जॉबला लागलेले. बरेच जण गेम्स खेळायचे पीसीवर , मी कधीच खेळत नव्हते. एकदा आमच्या इन्स्टिट्यूट ने सिनिअर्सना कॉम्पुटर हाताळायला यावा म्हणून बॅच केली होती एमएस ऑफिस आऊटलुक अशी . त्याचा फ्री डेमो दोन दिवस होता तासाभराचा. मग थोडं फार दाखवून त्यांना शेवटी 15,20मिनिटं तो rodrash गेम द्यायचा होता. एक आजोबा कीबोर्ड वरून गेम खेळताना त्या गेममधला बाईक वरचा माणूस पडला . मी त्यांच्या मागेच उभी होते. आता तो माणूस त्याचा तो उठून परत बाईकवर बसतो पण मला ते कधीच न बघितल्यानं माहीत नव्हतं . आजोबांनी विचारलं आता काय करू. मी तो माणूस उठायच्या आतच अप्पर की धरून ठेवली त्यामुळं तो बाईक मागे ठेवून तसाच पळायला लागला. मी म्हणलं आता पळत शर्यत पूर्ण करा.
वर्णिता, धमाल किस्से आहेत
वर्णिता, धमाल किस्से आहेत तुमचे दोन्ही

माझ्या एका मैत्रिणीने लहान असताना दुधाचं करपलेलं पातेलं साळसूदपणे बाहेरच्या कचराकुंडीत नेऊन टाकलं होतं. (आजीने बाहेर जाताना दुधाकडे लक्ष ठेवायला सांगितलं होतं आणि ही साफ विसरून गेली)
पहिल्यांदा ई मेल आयडी काढायला
पहिल्यांदा ई मेल आयडी काढायला मी आणि मैत्रीण गेलो होतो, सायबर कॅफेमध्ये. तेव्हा घरोघरी कॉम्प्युटर आणि इंटरनेटचं युग आलं नव्हतं. मला त्यातलं काहीच कळत नव्हतं. मैत्रिणीला थोडंफार माहीत होतं.
आम्ही आवडीचे आयडी तयार केले. पासवर्ड टाकायची वेळ आली, तेव्हा टाईप केल्यावर स्क्रीनवर स्टार दिसायला लागले. असं का होतंय, ते आम्हाला दोघींना कळतच नव्हतं. दोन - तीन वेळा पासवर्ड बदलल्यावरसुद्धा तसंच झालं. मग त्या कॅफेवाल्या दादाला बोलवून आमचा प्रॉब्लेम सांगितला. मग त्याने आम्हाला पासवर्ड सेफ राहण्यासाठी ते स्टार येतात हे समजावून सांगितलं. ते पण २-३ वेळा ऐकल्यावर आमच्या डोक्यात प्रकाश पडला.
आता आठवलं की जाम हसू येतं.
आता पळत शर्यत पूर्ण करा>>>>>
आता पळत शर्यत पूर्ण करा>>>>>
मला एक कप चहाचं प्रमाण माहीत
मला एक कप चहाचं प्रमाण माहीत होतं म्हणून >>>
आता पळत शर्यत पूर्ण करा >>
आता पळत शर्यत पूर्ण करा >> धमाल! मी हा प्रयत्न करायचो त्यात (जाणून बुजून), पण चुकून अप्पर की वरचा हात सुटला तर तो डायवर सगळं पळलेलं अंतर उलट पार करून बाईकवर येऊन बसतो.
पहिली किस, प्रेम, सेक्स असं
पहिली किस, प्रेम, सेक्स असं कुणी लिहिणार नाही इथे असा विचार आला मनात
सस्मित इश्श्य
इश्श्य

मी पहिल्यांदा स्काय डायव्हिंग
मी पहिल्यांदा स्काय डायव्हिंग केलं तेव्हा पॅराशुट न घेताच गेलो होतो. विमानातून उडी टाकल्यावर लक्षात आलं. मग डोक्यावर हात मारला नं काय.
>>>>>>>>पहिली किस, प्रेम,
>>>>>>>>पहिली किस, प्रेम, सेक्स असं कुणी लिहिणार नाही इथे असा विचार आला मनात Lol>>> सांगण्यासारखं काहीही नाही. ते फक्त कादंबरी व सिनेमात असतं. आणि त्या माध्यमांनी अपेक्षा अवाजवी फुगवुन ठेवलेल्या असतात. अर्थात आपला स्वतःचा स्वभाव कारणीभूत १००% असतोच.
मूळ धाग्यात "पण ह्या
मूळ धाग्यात "पण ह्या व्यतिरिक्त अनेक "पहिल्या" अविस्मरणीय गोष्टी " असं आल्यामुळे कदाचित कुणी ते लिहित नसावेत.
Pages