शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोब्बर... सोलकढी ला विभागून धन्यवाद.

गूढकोडे. सगळे शब्द ४ अक्षरी. उत्तराबरोबर त्याच्या शोधसूत्राची उकल / कसे सोडवले हेही द्यायचे आहे.
अन्यभाषिक संदर्भ / सूचना शोधसूत्रातच दिले आहेत.

१ आपला नाही तो वृक्ष पण हाल त्रास मात्र आहेत --- परवड
४ फिरंगी चैतन्य संगे दह्याचा चेडू खा दणकून पचेल रिचवून दोन गडू (चेडू = मुलगी) -- सोलकढी
५ नाकावरच्या रागाची पगडी हरवल्यामुळे शेतकरी पस्तावला का --- नाकतोडा
६ नजर भिरभिरू देऊ नका मग पाचोळ्यात लपलेला चोरही दिसतो --- पाठलाग
७ बघावे तेव्हा एकच इंग्रजी मुळाक्षर मिरवणारी गोरीगुलाबी मुलगी --- सदाफुली

आता उरलेले.
२ रंगाला ताजगीची टिकली असो नसो खाणे तिथेच बेधडक निर्णय नसल्याने
३ थोडासा ओलांडून थांबलाय सूर्य कन्येच्या विलायती मखमली वस्त्रावर
८ पौष्टिक कच्ची खायची शेंग गिळून बसलेला भाल-चंद्र
९ टोकेरी शस्त्र पकडून पकडून ठणका लागेल हाताला
१० पाच फुटी, पिवळट रंगात, पट्टेधारी तरीही लोक फारसे घाबरत नाहीत ?

नाही silk/ satin / velvet नाही. वेगळेच आहे काही पण स्पर्श तोच सुखद मखमली

2 >> यात ‘बिनधास्त’ चा भाग आहे काय ? >>> हो आहे पण ....

२ बिनतोड ..../ धोक.... ? >>>> नाही.... खाणे कुठाय? बिनधास्त नाही पण त्याचा भाग आहे तिथेच घोडे पेंड खाते

२. लालफीत ? >>> नाही रंग चुकला, आणि टिकलीचा संदर्भही सुटलाय यात.

३. दमास्कस.... असे काही ? >>> नाही...... पूर्ण वेगळा ट्रॅक झाला. कन्या ओळखली का ? दमास्कस, लंडन, डेन्मार्क, अमेरिका, न्यूझीलंड कुठेही गेले तरी हेच एक मखमली वस्त्र लागते तिला. भारतातही.

२ (रंगाला ताजगी)ची टिकली असो नसो // खाणे तिथेच // बेधडक निर्णय नसल्याने
यावरून काही सुचते का पहा

2 >> मौजमजा .. मौजमस्ती ... .या प्रकारचे ? >>>
नाही खाणे सुस्पष्ट हजर आहे. रंग = मजा नव्हे. रंगच.

२ (रंगाला ताजगी)ची टिकली असो नसो // खाणे तिथेच // बेधडक निर्णय नसल्याने
रंग आहे..... रंगाला ताजगी आहे.......ताजगीला टिकली आहे.........खाणे तिथेच
भले टिकली पडली..........खाणे तिथेच
असं का बरं......बेधडक निर्णय नसल्याने

8 मुरुगन आहे का?
कच्ची शेंग - मूग >>>> नाही केया. शेंग गिळायची आहे मूग नाही.
मुरुगन आणलाच आहे तर भाल-चंद्र वरून काही सुचते का बघा.

८ पौष्टिक कच्ची खायची शेंग गिळून बसलेला भाल-चंद्र

दोन अक्षरी शंकराच्या नावा मध्ये दोन अक्षरी शेंगेचे नाव? उत्तर पौष्टिक पदार्थ किंवा पौष्टीकला समनार्थी शब्द?

२. हिरवळ / हिरवाई >>>>
उकल काय ?
टिकलीसह टिकलीविना
खाणे तिथेच..... हिरवळीवर का? टेबलावर खा, समुद्रकिनारी खा, चालता चालता खा
बेधडक निर्णय नसल्याने

शोधसूत्र म्हणते की -- ४ अक्षरी शब्दाचे २ भाग करा.
एक बदलतोय; एक अविकारी आहे
तयार होणारी दोन्ही शब्दरूपे एकाच कारणाकडे निर्देश करतात.

दोन अक्षरी *** नावा मध्ये दोन अक्षरी शेंगेचे नाव? >>> हो, जवळपास
उत्तर पौष्टिक पदार्थ किंवा पौष्टीकला समनार्थी शब्द? >>>> होच

शंकर घ्या, गणपती घ्या चालेल....... भाल-चंद्र हवाय.

नाही......शेंग गिळली कुठे, हातात धरली फारतर
एका निश्चित धान्याच्या मागे नका लागू. भुईमुगापासून मटारपर्यंत कोणीही चालेल. शेंगेशी म्तलब.

सॉरी, रेंज नव्हती दिवसभर. नेहमी इंगजी मुळाक्षर म्हणून मी नेहमी वर भर दिला. त्यासाठी सदा. फुली म्हणजे X. म्हणून सदाफुली. ती असते गुलाबी.

नो प्रॉब्लेम....
आता नव्या दमाची / वेगळ्या टाईमझोनमधील कुमक --- कोणी खेळणार असेल तर मी आहे ११:३० पर्यंत क्ल्यू द्यायला. २ ३ ८ ९ १० बाकी आहेत. ९ सोपे आहे. २ ३ ८ ला भरपूर क्ल्यू दिले आहेत ते एकदा बघून घ्या वाटल्यास.

८ पौष्टिक कच्ची खायची शेंग गिळून बसलेला भाल-चंद्र
एकत्र क्ल्यू --
मूग नाही.
एका निश्चित धान्याच्या मागे नका लागू. भुईमुगापासून मटारपर्यंत कोणीही चालेल. शेंगेशी म्तलब.
दोन अक्षरी *** नावा मध्ये दोन अक्षरी शेंगेचे नाव? >>> हो, जवळपास
उत्तर पौष्टिक पदार्थ किंवा पौष्टीकला समनार्थी शब्द? >>>> होच
शंकर घ्या, गणपती घ्या चालेल....... भाल-चंद्र हवाय आपल्याला.

२ रंगाला ताजगीची टिकली असो नसो खाणे तिथेच बेधडक निर्णय नसल्याने
एकत्र क्ल्यू --
शोधसूत्र म्हणते की -- ४ अक्षरी शब्दाचे २ भाग करा.
एक बदलतोय; एक अविकारी आहे
तयार होणारी दोन्ही शब्दरूपे एकाच कारणाकडे निर्देश करतात.

२ (रंगाला ताजगी)ची टिकली असो नसो // खाणे तिथेच // बेधडक निर्णय नसल्याने
एक क्ष रंग आहे..... रंगाला ताजगी आहे.......ताजगीला टिकली आहे.........खाणे तिथेच
भले टिकली पडली.......... तरी खाणे तिथेच
असं का बरं...... तर बेधडक निर्णय नसल्याने

टिकली पडल्यावर शब्द बदलतो. चिता-चिंता / रग-रंग / राग-रांग / ढग-ढंग असा काहीसा.

३ थोडासा ओलांडून थांबलाय सूर्य कन्येच्या विलायती मखमली वस्त्रावर
एकत्र क्ल्यू ---
सूर्य कर्ता नाही संदर्भ आहे. शोधसूत्राचा आणि उत्तराचाही.
विलायती मखमली वस्त्र silk/ satin / velvet नाही. वेगळेच आहे काही पण स्पर्श तोच सुखद मखमली
कन्या ओळखली का ? दमास्कस, लंडन, डेन्मार्क, अमेरिका, न्यूझीलंड कुठेही गेले तरी हेच एक मखमली वस्त्र लागते तिला. भारतातही.

३ शाल ....शालिनी ?
किंवा वसुंधरा.... असे काही
Submitted by कुमार१ on 31 January, 2021 - 14:59 >>>
पूर्ण शोधसूत्र वापरले जायला हवे; विलायती वस्त्र हवे. बाकी दिशा ठीक.

2 कचखाऊ ?
हिरवाकंच मध्ये ताजगी आहे.
कंच ची टिकली काढली की कच. कच खाणे म्हणजे माघार घेणे -बेधडक निर्णय नसल्याने.
कच नसेल तरीही खाऊ खाणे आहेच

हुश्श.... बरोबर Happy
कंच (कोणते) खाऊ -- टिकलीसह
कच खाऊ -- टिकलीविना
दोन्हीही बेधडक निर्णय नसल्याने / न घेता आल्याने
टिकली असो नसो -- खाऊ = खाणे तिथेच ( दुसर्‍या स्थानावर)

Pages