भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
३ थोडासा ओलांडून थांबलाय
३ थोडासा ओलांडून थांबलाय सूर्य (संध्या) कन्येच्या (छाया) विलायती मखमली वस्त्रावर
(संध्याछाया)
७ बघावे तेव्हा एकच इंग्रजी
७ बघावे तेव्हा एकच इंग्रजी मुळाक्षर मिरवणारी ( बी बी )गोरीगुलाबी मुलगी >> चांदबीबी
७) बदामबी ?
७) बदामबी ?
4 जीवदया ? ??दया
4 जीवदया ? ??दया
6. सालपट ?
6. सालपट ?
७) बदामबी ?...........4
७) बदामबी ?...........4 जीवदया ? ??दया........6. सालपट ? >>>> सर्व नाही
४चा जीवदया भूतदया कुठल्याच दयेशी संबंध नाही. तट्ट खा आणि पचवा. फिरंगी चैतन्य संगे दह्याचा चेडू आहे मदतीला.
३ थोडासा ओलांडून थांबलाय सूर्य (संध्या) कन्येच्या (छाया) विलायती मखमली वस्त्रावर
(संध्याछाया) >>>>> नाही; सूर्य कर्ता नाही संदर्भ आहे. शोधसूत्राचा आणि उत्तराचाही.
७ बघावे तेव्हा एकच इंग्रजी मुळाक्षर मिरवणारी ( बी बी ) गोरीगुलाबी मुलगी >> चांदबीबी >>> नाही
चांदबीबी मोठी होईल हो मुळाक्षरांसाठी. दुसरे कुठले इंग्रजी अक्ष्रर मराठीतून मिरवता / गिरवताही येईल.
आणि ते अक्षर उत्तरात उपस्थित नाहीये पण सूचित होतेय.
गूढकोडे. सगळे शब्द ४ अक्षरी.
गूढकोडे. सगळे शब्द ४ अक्षरी. उत्तराबरोबर त्याच्या शोधसूत्राची उकल / कसे सोडवले हेही द्यायचे आहे.
अन्यभाषिक संदर्भ / सूचना शोधसूत्रातच दिले आहेत.
१ आपलानाही तो वृक्ष पण हाल त्रास मात्र आहेत --- परवड२ रंगाला ताजगीची टिकली असो नसो खाणे तिथेच बेधडक निर्णय नसल्याने
३ थोडासा ओलांडून थांबलाय सूर्य कन्येच्या विलायती मखमली वस्त्रावर
४ फिरंगी चैतन्य संगे दह्याचा चेडू खा दणकून पचेल रिचवून दोन गडू (चेडू = मुलगी)
५ नाकावरच्या रागाची पगडी हरवल्यामुळे शेतकरी पस्तावला का
६ नजर भिरभिरू देऊ नका मग पाचोळ्यात लपलेला चोरही दिसतो
७ बघावे तेव्हा एकच इंग्रजी मुळाक्षर मिरवणारी गोरीगुलाबी मुलगी
८ पौष्टिक कच्ची खायची शेंग गिळून बसलेला भाल-चंद्र
९ टोकेरी शस्त्र पकडून पकडून ठणका लागेल हाताला
१० पाच फुटी, पिवळट रंगात, पट्टेधारी तरीही लोक फारसे घाबरत नाहीत ?
7 सदाफुली ?
7 सदाफुली ?
७ सदाफुली, बरोबर. उकल ?
७ सदाफुली, बरोबर. उकल ?
५ नाकावरच्या रागाची पगडी
५ नाकावरच्या रागाची पगडी हरवल्यामुळे (चिड >> चड )शेत(फड) करी पस्तावला का
>>> चडफड (पस्तावला)
....
सदाफुली समजले : पुणेकर सांगतीलच !
६ नजर (न ) भिरभिरू देऊ नका मग
६ नजर (न ) भिरभिरू देऊ नका मग पाचोळ्यात लपलेला चोरही (पान) दिसतो >>> पानगळ (पाचोळ्यात)
६ नजर (न ) भिरभिरू देऊ नका मग
दु प्र का टा
पानगळ, चडफड दोन्ही नाही.
पानगळ, चडफड दोन्ही नाही.
(चिड >> चड )शेत(फड) करी पस्तावला का >>>
नाही खरा शेतकरी पस्तावणार आहे. रागाची पगडी आधी पाडा मग त्याला नाकावर जागा द्या. तयार होईल ते शेतकर्याला भारी पडते. पण शब्दात शेत नाही.
६ नजर (न ) भिरभिरू देऊ नका मग पाचोळ्यात लपलेला चोरही (पान) दिसतो >>> पानगळ (पाचोळ्यात) >>>>
पाचोळा हवा चोरही हवा .......नजरेच्या टप्प्यात मात्र ठेवा, भले कुठेही जाऊ दे.
६ नजर भिरभिरू देऊ नका मग
६ नजर भिरभिरू देऊ नका मग पाचोळ्यात लपलेला चोरही दिसतो >>> पाठलाग = पाला + ठग (चोर)
५ नाकावरच्या रागाची पगडी
५ नाकावरच्या रागाची पगडी हरवल्यामुळे शेतकरी पस्तावला का?
राग: तोडी, पगडी काढुन तोडा
नाकतोडा लागल्याने शेतकरी पस्तावला.
४ फिरंगी चैतन्य संगे दह्याचा चेडू खा दणकून पचेल रिचवून दोन गडू (चेडू = मुलगी)
मग हे असे होईल फिरंगी चैतन्य संगे दह्याचा मुलगी.... ? दह्याचा मुलगी?
दोन्ही बरोबर
दोन्ही बरोबर
दह्याचा /चो चेडू कोकणीत = दह्याची मुलगी मराठीत
९ करवत ?
९ करवत ?
नाही .......... टोकेरी ना
नाही .......... टोकेरी ना दातेरी नव्हे
4. दहीहंडी ?
4. दहीहंडी ?
बरोबर आलेले खोडाल काय यादीतून ?
४ फिरंगी चैतन्य संगे दह्याचा
४ फिरंगी चैतन्य संगे दह्याचा चेडू खा दणकून पचेल रिचवून दोन गडू (चेडू = मुलगी)
चैतन्यला इंग्रजी शब्द + लस्सी?
लस्सीचा प्रकार?
१०. X(वाघ)र?
करवत दहीहंडी नाही
करवत दहीहंडी नाही
पान बदलायची वाट बघतेय.... मग कोडे नव्याने डकवताना खोडते यादीत.
लस्सीचा प्रकार नव्हे पण दह्याचेच संस्कारित रूप
१०. X(वाघ)र? >>>> नाही. वाघाची वैशिष्ट्ये आहेत (दिलेली) , प्राणी आहे पण वाघ नाही. क्रूर नाही पण उपद्रवी असू शकतो. निरूपद्रवीही असू शकतो
४ योगहर्ट ?
४ योगहर्ट ?
मुलगी असल्याने दह्यापासून
मुलगी असल्याने दह्यापासून बनलेला पदाथ स्त्रीलिंगी असेल असे गृहीत धरतोय.
10 झेब्रा **
10 झेब्रा **
कारण रस्त्यावरच्या झेब्रा पट्ट्यांना कोणी घाबरत नाही !
दह्यापासून बनलेला पदाथ
दह्यापासून बनलेला पदाथ स्त्रीलिंगी असेल असे गृहीत >>> हो अर्थातच म्हणून तर चेडू नाहीतर झिल लिहीले असते
10 झेब्रा ** >>>> नाही (वर्णन जुळतेय तरीही --- हे माझ्या लक्षात नाही आले) सजीव आहे. चतुष्पाद नाही.
४ योगहर्ट >>>> नाही. फिरंगी चैतन्य असले तरी पदार्थ भारतीय, अगदी मराठमोळाही आहे.
गूढकोडे. सगळे शब्द ४ अक्षरी. उत्तराबरोबर त्याच्या शोधसूत्राची उकल / कसे सोडवले हेही द्यायचे आहे.
अन्यभाषिक संदर्भ / सूचना शोधसूत्रातच दिले आहेत.
१ आपलानाही तो वृक्ष पण हाल त्रास मात्र आहेत --- परवड२ रंगाला ताजगीची टिकली असो नसो खाणे तिथेच बेधडक निर्णय नसल्याने
३ थोडासा ओलांडून थांबलाय सूर्य कन्येच्या विलायती मखमली वस्त्रावर
४ फिरंगी चैतन्य संगे दह्याचा चेडू खा दणकून पचेल रिचवून दोन गडू (चेडू = मुलगी)
५ नाकावरच्यारागाची पगडी हरवल्यामुळे शेतकरी पस्तावला का --- नाकतोडा६ नजर भिरभिरू देऊ नका मग पाचोळ्यात लपलेला चोरही दिसतो --- पाठलाग७ बघावेतेव्हा एकच इंग्रजी मुळाक्षर मिरवणारी गोरीगुलाबी मुलगी --- सदाफुली८ पौष्टिक कच्ची खायची शेंग गिळून बसलेला भाल-चंद्र
९ टोकेरी शस्त्र पकडून पकडून ठणका लागेल हाताला
१० पाच फुटी, पिवळट रंगात, पट्टेधारी तरीही लोक फारसे घाबरत नाहीत ?
तुम्ही वर झिल लिहीहिलंय मी
तुम्ही वर झिल लिहीहिलंय मी फिरंगी चैतन्य = zeal = झिल घेऊन झिलमील पेय आहे का वगैरे बघत होतो.
मुलगी असल्याने दह्यापासून
मुलगी असल्याने दह्यापासून बनलेला पदाथ स्त्रीलिंगी असेल असे गृहीत धरतोय. >>>> याचे उत्तर होते ते.
स्त्रीलिंगीच म्हणून चेडू; बरं हा चेडू फक्त यमकापुरता नाहीये.
पुल्लिंगी = मुलगा असते तर दह्याचो झिल म्हटले असते.
अजून फिरंगी चैतन्य शोधा. पेय एकदम देखणे चविष्ट आणि बाकी विशेष तर दिलेले आहेतच.
त्यात मलाई .... असे काही
सोलकढी
सोल = चैतन्य
नाही, चैतन्य पूर्ण घ्यावे
नाही, चैतन्य पूर्ण घ्यावे लागणार आहे. बायनरी चैतन्य आहे. ० किंवा १ स्टेट. अधलेमधले नाही.
(फिरंगी चैतन्य संगे दह्याचा चेडू ) हे साधन आहे; { खा दणकून पचेल रिचवून दोन गडू } हे साध्य आहे
४. फिरंगी चैतन्य संगे
४. फिरंगी चैतन्य संगे दह्याचा चेडू खा दणकून पचेल रिचवून दोन गडू
फिरंगी चैतन्य= Soul = सोल
दह्याची मुलगी = कढी
सोलकढी.
Pages