भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
माणूस मरण (३) पावला की
माणूस मरण (३) पावला की त्याच्या फक्त आठवणी उरतात, असं युरीपिडीसचं म्हणणं होतं, तर ’ देह (२) संपला की आत्माही नष्ट होत’ असं डेमोक्रिटस स्पष्टपणे म्हणत असे. अशा प्रकारे ग्रीक तत्वज्ञांमध्ये आत्म्याबद्दल मत-मतांतरं होती.
रोमन लोक जीवनाभिलाषी (६) होते. साम्राज्य (३) वाढवावं, संपत्ती मिळवावी, चांगल्या गोष्टींचा उपभोग (४) घ्यावा अशी त्यांची वृत्ती (२) होती. आत्मा आणि मरणोत्तर (५) स्थिती याच्यासंबंधी त्यांनी फार विचार केला नव्हता. प्राचीन चीनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मृत्यूनंतरच्या (६) जीवनाबद्दल आणि आत्म्यासंबंधी वेगवेगळ्या समजुती प्रचलित (४) असल्याचं दिसतं. मात्र चिनी तत्वज्ञ कन्फ्युशियसही आत्मा मानत असावा असं दिसत नाही." मृत्यूपश्चात (५) आपलं काय होतं?" या प्रश्नावर "जिवंतपणी आपलं काय होणार हे जर आपल्याला नीटसं कळत नाही, तर मरणानंतर (६) आपलं काय होणार याचा विचार करण्यात काय फायदा आहे?" असा प्रतिप्रश्न (४) तो करत असे.
पारशी लोकांमधील समजुतींनुसार (७) मृतात्मा तीन दिवस प्रेताभोवती वावरत / घोटाळत (४) असतो. अखेरीस या देहाचा उपयोग नाही अशी घुटमळणार्या (६) आत्म्याची खात्री पटली की मगच तो आत्मा त्याच्या मृतदेहापासून (७) दूर हटतो. त्यामुळे पारशी लोकांमध्ये माणूस मेल्यानंतर त्याचा मृतदेह तीन दिवस ठेवून मगच त्याच्यावर अंत्यसंस्कार / प्रेतसंस्कार / और्ध्वदेहिक (५) करण्याची प्रथा पडली.
आपल्याकडे अतृप्त (३) आत्म्यांची जी भुतं बनतात ती विलक्षण / काल्पनिक (४) आहेत. भारतात वेगवेगळे धर्म, जाती, जमाती यानुसार भुताखेतादींचे / भूतपिशाच्चांचे (६) अनेक प्रकार कल्पिलेले असून मुंजापासून ब्रह्मसमंधापर्यंत (८) त्यांच्या श्रेणीही पाडलेल्या आहेत. अशा प्रकारे प्राचीन काळापासून विविध संस्कृतींमध्ये आत्म्यांविषयी विविध समजुती प्रचलित असल्याचं आढळून येतं. थोडक्यात सांगायचं तर आत्मा ही संकल्पना पूर्वापार (४) चालत आल्याचं दिसतं. साहजिकच सर्वदूर सर्वपरिचित अशा या आत्म्याचं गूढ उकलण्याचे, आत्म्याचं अस्तित्व (३) तपासून पहाण्याचे प्रयत्न झाले नसते तरच नवल!
गेले शतकभर शास्त्रीय प्रयोगांच्या / कसोट्यांच्या (४) आधारे आत्म्याच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी (४) चालवला आहे. त्यातला पहिला प्रयत्न असा.
इ. स. १९२१ मध्ये डंकन मॅक्डुगल या वैद्यक/शरीरशास्त्रतज्ज्ञाने (८) "२१ ग्रॅम" या नावाने प्रसिद्ध असलेला प्रयोग केला होता. एखादी व्यक्ती मेल्यानंतर (५) तिचं वजन किती कमी होतं हे बघण्याचा त्याच्या प्रयोगाचा हेतू होता. त्याने अशा सहा व्यक्तींची तपासणी केली होती. तेव्हा या व्यक्तींचं मृत्यूपूर्व (४) वजन आणि मरणोत्तर (५) लगेचच केलेलं वजन यात ११ ते ४३ ग्रॅमचा फरक पडतो, असं त्याला दिसलं. हे कमी झालेलं वजन आत्म्याचे (३) असणार असा त्याने निष्कर्ष काढला. वृत्तपत्रांनी बातमी देताना य सर्व वजनांची बहुधा सरासरी (४) काढून "आत्म्याचं वजन २१ ग्रॅम" असा सनसनाटी / चमत्कारिक / बिनबुडाचा (५) मथळा छापला होता. यानंतर इतर शास्त्रज्ञांनी जेव्हा असेच प्रयोग केले तेव्हा मॅक्डुगलच्या प्रयोगांना दुजोरा देणारे निष्कर्ष मिळू शकले नव्हते. त्यामुळे मॅक्डुगलना प्रसिद्धी मिळाली तरी त्या प्रयोगांना "प्रमाण" म्हणून मानायला वैज्ञानिक समुदायाने / बुद्धिवाद्यांनी / अभिजनांनी (५) नाकारलं.
मस्तच कारवी.
मस्तच कारवी.
थोड्यावेळाने मूळ उतारा देतो.
जास्त लोकांनी भाग घ्यावा म्हणुन हा विषय निवडला होता आणि पेपर सोपा ठेवला होता. पण आता वाटतेय जास्तच सोपा ठेवला होता का?
मूळ उतारा: श्री. निरंजन घाटे यांच्या 'संभव असंभव' या पुस्तकातला आहे:
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
माणूस मरण (३) पावला की त्याच्या फक्त आठवणी उरतात, असं युरीपिडीसचं म्हणणं होतं, तर ’देह (२) संपला की आत्माही नष्ट होत’ असं डेमोक्रिटस स्पष्टपणे म्हणत असे. अशा प्रकारे ग्रीक तत्वज्ञांमध्ये आत्म्याबद्दल मत-मतांतरं होती.
रोमन लोक व्यवहारवादी (६) होते. साम्राज्य (३) वाढवावं, संपत्ती मिळवावी, चांगल्या गोष्टींचा उपभोग (४) घ्यावा अशी त्यांची वृत्ती (२) होती. आत्मा आणि मरणोत्तर (५) स्थिती याच्यासंबंधी त्यांनी फार विचार केला नव्हता. प्राचीन चीनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मृत्यूनंतरच्या (६) जीवनाबद्दल आणि आत्म्यासंबंधी वेगवेगळ्या समजुती प्रचलित (४) असल्याचं दिसतं. मात्र चिनी तत्वज्ञ कन्फ्युशियसही आत्मा मानत असावा असं दिसत नाही. "मृत्यूनंतर (५)आपलं काय होतं?" या प्रश्नावर "जिवंतपणी आपलं काय होणार हे जर आपल्याला नीटसं कळत नाही, तर मरणानंतर (६) आपलं काय होणार याचा विचार करण्यात काय फायदा आहे?" असा प्रतिप्रश्न (४)तो करत असे.
पारशी लोकांमधील समजुतींनुसार (७) मृतात्मा तीन दिवस प्रेताभोवती घोटाळत (४) असतो. अखेरीस या देहाचा उपयोग नाही अशी देहविरहीत (६) आत्म्याची खात्री पटली की मगच तो आत्मा त्याच्या पूर्वदेहापासून (७) दूर हटतो. त्यामुळे पारशी लोकांमध्ये माणूस मेल्यानंतर त्याचा मृतदेह तीन दिवस ठेवून मगच त्याच्यावर अंत्यसंस्कार (५) करण्याची प्रथा पडली.
आपल्याकडे अतृप्त (३) आत्म्यांची जी भुतं बनतात ती सर्वश्रुत (४) आहेत. भारतात वेगवेगळे धर्म, जाती, जमाती यानुसार भूतपिशाच्चांचे (६) अनेक प्रकार कल्पिलेले असून मुंजापासून ब्रह्मराक्षसापर्यंत (८)त्यांच्या श्रेणीही पाडलेल्या आहेत. अशा प्रकारे प्राचीन काळापासून विविध संस्कृतींमध्ये आत्म्यांविषयी विविध समजुती असल्याचं आढळून येतं. थोडक्यात सांगायचं तर आत्मा ही संकल्पना पूर्वापार (४) चालत आल्याचं दिसतं. साहजिकच सर्वदूर सर्वपरिचित अशा या आत्म्याचं गूढ उकलण्याचे, आत्म्याचं अस्तित्व (३) तपासून पहाण्याचे प्रयत्न झाले नसते तरच नवल!
गेले शतकभर शास्त्रीय कसोट्यांच्या (४) आधारे आत्म्याच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न शास्त्रंज्ञांनी (४) चालवला आहे. त्यातला पहिला प्रयत्न असा.
इ. स. १९२१ मध्ये डंकन मॅक्डुगल या पदार्थवैज्ञानिकाने (८)"२१ ग्रॅम" या नावाने प्रसिद्ध असलेला प्रयोग केला होता. एखादी व्यक्ती मेल्यानंतर (५) तिचं वजन किती कमी होतं हे बघण्याचा त्याच्या प्रयोगाचा हेतू होता. त्याने अशा सहा व्यक्तींची तपासणी केली होती. तेव्हा या व्यक्तींचं मृत्यूपूर्व (४)वजन आणि मृत्यूनंतर (५) लगेचच केलेलं वजन यात ११ ते ४३ ग्रॅमचा फरक पडतो, असं त्याला दिसलं. हे कमी झालेलं वजन आत्म्याचं (३) असणार असा त्याने निष्कर्ष काढला. वृत्तपत्रांनी बातमी देताना य सर्व वजनांची बहुधा सरासरी (४) काढून "आत्म्याचं वजन २१ ग्रॅम" असा सनसनाटी (५) मथळा छापला होता. यानंतर इतर शास्त्रज्ञांनी जेव्हा असेच प्रयोग केले तेव्हा मॅक्डुगलच्या प्रयोगांना दुजोरा देणारे निष्कर्ष मिळू शकले नव्हते. त्यामुळे मॅक्डुगलना प्रसिद्धी मिळाली तरी त्या प्रयोगांना "प्रमाण" म्हणून मानायला वैज्ञानिक परिवाराने (५) नाकारलं.
पण आता वाटतेय जास्तच सोपा
पण आता वाटतेय जास्तच सोपा ठेवला होता का? >>>>
हो बर्यापैकी सोपा जाणवला. मृत्यू/मरण या शब्दाचीच रूपे आलटून-पालटून होती.
बाकी शब्द वाक्याच्या संदर्भाने जुळण्यासारखे होते. पुढच्यावेळी कठीण घाला.
मला २ वेगळेच प्रश्न पडलेत.
डंकन मॅक्डुगल physician म्हटले आहे नेटवर. तो पदार्थवैज्ञानिक (physicist) कसा? की १९०१ मध्ये संज्ञा वेगळ्या होत्या?
आणि त्यांचा अस्तित्वकाल १८६६-१९२० म्हटलय. मग २१ ग्रॅम प्रयोग इ.स. १९२१ मध्ये कसा होईल?
घाटेंच्या पुस्तकात इतक्या ठळक चुका?
हो, मलाही हाच प्रश्न पडला की
हो, मलाही हाच प्रश्न पडला की physician ला पदार्थवैज्ञानिक कसं म्हणलं.
मानव
मानव
वेगळ्याच विषयावरचा छान उतारा. आवडला.
सर्वांचेच प्रयत्न छान होते . उत्तरांमध्ये थोडीफार विविधता असावी. म्हणजेच खरी मजा येते.
धन्यवाद !
डंकन मॅक्डुगल physician
डंकन मॅक्डुगल physician म्हटले आहे नेटवर. तो पदार्थवैज्ञानिक (physicist) कसा >> खरंच की.
मी तो physician आहे असंच वाचलं पण माझ्या लक्षात नाही आलं
हा प्रयोग १९०१ साली त्याने केला होता, पुस्तकात १९२१ ही छापील चूक असावी.
अक्षरसांगड खेळ
अक्षरसांगड खेळ
खाली दिलेल्या अक्षरांपासून( किमान तीन अक्षरी) असे २० मराठी शब्द बनवा. त्यापैकी निदान ४ चार अक्षरी आणि १ पाच किंवा अधिक अक्षरी असावेत.
खेळ सादर केल्यापासून 4 तासांनी उत्तर (शब्दयादी) जाहीर करूया. एकेक शब्द प्रतिसादात लिहू नका.
न सं व
गा प्र र
स धा ण
.............
प्रसंगावधान
......
झाले का चार तास? उत्तर
झाले का चार तास? उत्तर लिहायचं का?
नको. दोनच तास झालेत.
नको. दोनच तास झालेत.
भाप्रवे १६.०० ला लिहा.
मी ७.३० वाजता लिहीन.
मी ७.३० वाजता लिहीन.
जरूर. मी सर्वात शेवटी !
जरूर.
मी सर्वात शेवटी !
नवस
नवस
धारण,धावन(दंतधावनमधील)
प्रधान,प्रणव,प्रवण(?)
संधान
सरण
वसन,वरण
प्रवर,प्रसंग
४ अक्षरी..प्रसरण,नवरस,संधारण
५.अक्षरी..प्रसंगावधान
आता एवढेच सुचले आहेत.७.३० ला बाकीचे वाचायला येते.
छान फक्त..
छान फक्त..
प्रसंग >>> नाही, कारण 'गा' आहे ; ग नाही दिलेला.
न सं व
न सं व
गा प्र र
स धा ण
प्रसंगावधान नवसंधारण (आहे का हा शब्द??) प्रसंगावर रसप्रधान
प्रसरण नवरस संधारण गानरस
संधान प्रधान धारण सरण वरण प्रवर प्रसव प्रणव नवस वसन
न सं व
न सं व
गा प्र र
स धा ण
प्रसंगावधान
प्रधानरस रसप्रधान रसप्रवण गावप्रधान
रणगान नवरस संधारण प्रसरण नवधार गानरस
वरण सरण प्रवर प्रसव प्रणव प्रधान प्रवण संधान धारण वरस
धागाप्रवण एक होऊ शकेल माबो-विशेष शब्द
नवधार -- भेंडीचे विशेषण असते
रणगान -- लाढाईवर जाताना स्फुरण आणणारे गीत
धागाप्रवण -- सतत धागा काढण्याकडे कल असणारा
नवसंधारण (आहे का हा शब्द??)
नवसंधारण (आहे का हा शब्द??) >>>> नाही बहुतेक, पण वनसंधारण होईल ना
वा ,सुंदर.
वा ,सुंदर.
नवसंधारण >>> नव नाही. जल लावतात आधी.
रसप्रधान, धागाप्रवण, नवधार >>> विशेष आवडले.
रणगान >> हा मीही काढला होता पण कोशात आहे ?
कोशाची कल्पना नाही. पण शब्द
कोशाची कल्पना नाही. पण शब्द आहे. हिंदी आहे.
रण व गान मराठीत आहेतच. मग हाही मराठीत चालेल तत्सम म्हणून? वीर-रसयुक्त गाणे.
धागाप्रवण-- मस्त
धागाप्रवण-- मस्त
कारवी, हरकत नाही.
कारवी, हरकत नाही.
हीरा यांची वाट पाहतो.
नंतर माझी फक्त भर. २०.०० वा.
संप्रधान, गानवर, नवधा (शतधा
संप्रधान, गानवर, नवधा (शतधा सारखे), गानप्रधान
शिवाय प्रसंगास, प्रसंगावर, संगास
हे वेगळे शब्द. फक्त प्रसव नव्हतं सुचलं.
छान.
छान.
माझी भर :
प्रवसर,
सवन (सूर्य), प्रसर, वगार, रवण
.....
प्रत्येकाच्या यादीत एखादा वेगळा असतोच. सर्व एकत्रित पाहिल्यावर सर्वांनाच फायदा होतो.
सर्वांचे आभार !
भरपूर झाले नवे पण. आणि अजून
भरपूर झाले नवे पण. आणि अजून मानव बाकी आहेत.
बरेच नवीन आले, कळले . छान.
बरेच नवीन आले, कळले . छान.
याचे अर्थ सांगा ना हीरा --
याचे अर्थ सांगा ना हीरा -- संप्रधान, गानवर, नवधा ( = नऊ तर्हेने, नवविधा का?)
समोर असलेले दिसत नाहीत. मला सनव आयडी आठवला पण नवस वसन नाही दिसले.
शतधा म्हणजे शत प्रकारे, शत
शतधा म्हणजे शत प्रकारे, शत तऱ्हांनी. तसेच नवधा म्हणजे नव प्रकारांनी. संप्रधान म्हणजे निश्चय, निग्रह. गानवर म्हणजे गाण्यातला श्रेष्ठ. मान्यवर, मुनिवर प्रमाणे.
छान.
छान.
या खेळाची वरची पायरी अशी असते. शब्द तयार करताना ९ पैकी एक ठराविक अक्षर सक्तीने घ्यायचे असते.
त्या प्रकारात संभाव्य शब्द संख्या एकदम कमी होईल. म्हणून अजून आपण तो प्रयोग केलेला नाही.
एकदा करून बघावा काय, यावर आपले मत नोंदवा.
एकदा खेळून बघूया. शब्दसंख्या
एकदा खेळून बघूया. शब्दसंख्या खूप कमी होईल. आता प्रत्येकाला सुचणारे शब्द वाचायला मजा येते.
किंवा अक्षर संख्या ९ ची १२/१५ करता येईल + ठराविक अक्षर सक्तीने.
धन्यवाद हीरा. मला गानवर मुनिवर प्रमाणे वाटले पण नेटवर जानवर शिवाय काही दावलेच नाही. काही वापराचे उदाहरण आहे का? संप्रधान = निश्चय याची काय फोड ? सम + प्र + ? = संप्रधान
Pages