वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

The Flight Attendent (HBOMAX) बघितलि .. BBT मधली Penny आहे म्हणुन विशेषतः....
एकदा बघायला हरकत नाही.. चांगली आहे.....
८ भाग आहेत... ती सोडली तर बाकीचे कुणी ओळखीचे नाहीत ( माझ्या दृष्टीने)..

World War II in Color - नेटफ्लिक्सवर. अतिशय एंगेजिंग डॉक्युमेण्टरी आहे.

श्रीकांत बशिर बघून संपवली एकदाची . मध्ये मध्ये पळवत पळवत बघितली . ईबोला आल्यावर काहि काहि भाग चांगले झालेत , पण overall बाळबोधच आहे . शेवट कै च्या कै वाटला . सीजन २ ची पण सोय केली आहे .

बर्याच गोष्टींना हात घातलाय , पण अर्ध्याच सोडून दिल्यात .
तो रॉबी कुठे गेला , अमित च काय झाल?
रूबिना जर CI असते तर रवीनाला तिची माहिती काढण्यात का सांगितली जाते ?
शेवटचे ५-६ भाग फारच ताणले आहेत . आटोपशीर करण्यात आले असते .

गश्मिर is show stealer overall. त्याचा वावर फारच सहज आहे .
तो त्याचा रोल पूरेपर जगला आहे . carefree,corrupt , bad guy kind.
त्याचं मध्ये मध्ये सहज मराठी बोलणं मजा आणतं .
त्याचा आणि अलेक्साचा एक सीन मस्त आहे .
दूसरा लक्शात रहाणारा माणूस म्हणजे - पार्कर ( आर. जे . मन्त्रा ) .
बाकी कोणी ईतके आवडले नाही .
ही सिरिज बघायचीच असेल तर गश्मीरसाठी बघा . बाकी सगळं कंटाळवाण आहे .

जुना सौदागर पाहिला. कसला सुंदर चित्रपट आहे! अमिताभ नूतन दोघेही सहज आहेत. नूतनची कमाल आहे.

गश्मीर इतकाही स्टार नाहीय की त्याच्यासाठी फालतू सिरीज झेलावी... आय होप इथे तरी तोंड उघडून डायलॉग म्हणत असेल...

क्रिमिनल जस्टीस 2 पाहिली.
सग्ळ्यांचे काम म्स्त झाले आहे. आणि पंकज त्रिपठी तर व्वा..!
एकूण सिरिज चांगली आहे पण शेवट थोडा खटकतो. म्हणजे नेमकं नाही सांगता येत आहे पण खुप घाईत केलाय असं वाट्तं.
* spoiler*

तिच्या वडिलांपासून, विक्रम्ने तिला लांब ठेवलं.. हा मुद्दा कोर्टात कुठेही येत नाही..
तिचं डॉ़क्टर सोबत चे संबंध ही पटत नाही.
शेवट गोड दाखवला पण डॉ़क्टर च्या करियर आणि कुटुंबाची वाताहत झाली..ते कुठेही दाखवलं नाही..!
ते मुल तिचं आणि डॉ़क्टर च आहे ..मग ते कॉम्प्लिकेशनच ना..!

HBO hotstar वर निकोल किडमनची The Undoing पाहिली. सायकॉलॉजीकल थ्रिलर, एक मर्डर मिस्ट्री आहे. आवडली.

आमच्याकडे पण पौरुषपूर ट्रेलर बघून सहमूल बघण्याचा प्लॅन रद्द झाला.फॅमिली मॅन मध्ये बऱ्याच शिव्या असूनही तो सकुसप पाहिला गेला(एरवी मुलं बॉलिवूड फिल्म्स मध्ये अचानक आला तर बराच आचरट कंटेंट बघतात.)

एकदमच दळभद्री सिरीज आहे म्हणून मी तशी कमेंट टाकली Proud
बाकी या आठवड्यात पाहिलेली भारी सिरीज म्हणजे चार्ल्स शोभराज वरची 'द सर्पन्ट' (no sarcasm here)
https://www.imdb.com/title/tt7985576/
पण ही भारतातून पाहता येत नाही सो टोरेंट जिंदाबाद

एरवी मुलं .... आचरट कंटेंट बघतात. >>>
आचरट वेगळा.... हिडीस वेगळा ना. सह-सहचर सुद्धा बघावा का? मुळात का बघावा? असा कंटेंट वाटला ट्रेलरवरून.

सह सहचर नक्की बघावा किमान मिलिंद सोमण साठी
अजून पाहिला नाही.
मी लक्ष्मी आणि हाऊसफुल्ल 4 आणि एके व्हर्सेस एके पचवलाय. फार फार तर यापेक्षा वाईट असेल Happy
1 भाग पाहिल्यावर ठरवता येईल पुढे जायचं का ते.

कुणाला निसर्ग/जंगल/ प्राणी बघण्याची आवड असेल . 'वाइल्ड कर्नाटका' बघा. IMDB वर आहे. मी युट्युबर पाहिली पण आता तिथे नाही. अप्रतिम आहे. सगळे बघू शकतात. David Attenborough यांचे narration आहे. सुरेख प्राणी ,पक्षी , अगदी नयनरम्य आहे.

नेटफ्लिक्सवर ज्युलिया क्वीनसच्या पुस्तकावर आधारित पुस्तकाच्याच नावाची 'ब्रिजsटन ( Bridgerton) ' वेबसिरिज आज पाहुन संपवली. सिझन 1 चे 8 एपिसोडस आहेत.

जसं 2021 मध्ये शारदा नाटक पाहिल्यावर आपल्याला सगळंच अविश्वसनीय, अतार्किक आणि कैच्याकै वाटेल, exactly तेच फिलिंग आलं. पण म्हणजे कथेत खोट नाही, तर 1800 च्या काळातल्या चालीरीती, mannerisms पहाताना सगळंच कसं कालबाह्य आणि आता पहायला weird वाटतं.

कथेची सुरुवातच अशी आहे की, लंडनमधला उच्चभ्रू समाज प्रत्येक उन्हाळ्यात, लग्नाच्या बाजारात पदार्पण करणाऱ्या तरुण तरुणींसाठी आधी राणीसमोर पेशकश आणि मग वेगवेगळे बॉल्स (नृत्याचे कार्यक्रम), कॉन्सर्टस, लंचची आमंत्रणं किंवा एकूणच त्यांना भेटवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमांमध्ये भेटुन, एकमेकांशी बोलून मग आपापला जोडीदार निवडायचा. भारतीय मनाला लगेच हे किती उदात्त आणि आधुनिक वाटेल, नै? पण नाही.

ही निवड प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे आईवडिलांनी थोपवलेलीच असते. कोणाला समाजातील स्थान उंचावण्यासाठी, कोणाला आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, कोणाला लग्नाआधीची प्रेग्नन्सी लपवण्यासाठी. अशीच विविध कारणं, पण शेवटी ती निवड दडपणाखालीच करावी लागते. अँट लिस्ट मुलींना तर नक्कीच.

यासाठी especially मुलींचं ग्रुमिंग, त्यांचे कपडेपट तयार करणे, मॅनरिझम शिकवणे यासाठी मुलींच्या आया अतिशय कष्ट घेतात कारण अंतिम ध्येय मुलगी राजघराणे, सरदार किंवा उच्च खानदानातल्या मुलाला पसंत पडुन लगेचच एंगेजमेन्ट व्हावी.नाहीतर पुढच्या उन्हाळ्यात परत नवीन सिझनपर्यंत वाट पहाण्याची अपमानास्पद वेळ येईल. पदार्पणातच एंगेजमेन्ट न होणं म्हणजे खानदान की नाक कट जाना. ते होऊ नये म्हणून मग मुलीने फ्लॉलेस असायला हवं, मग कोर्सेट्स घट्ट आवळणे, केशरचना, पार्टी गाऊन्स बनवुन घेणे, चालणे बोलणे याची प्रॅक्टिस या गोष्टी ओघानेच आल्या. यासाठी फार सुयोग्य शब्द वॊपरला आहे - pretendence.

हे सगळं बघताना भारतीय लग्नपद्धतीला नावं ठेवायची नेहमीची उर्मी आणि पहिला पॅरा वाचुन युरोप किती आधुनिक, असं वाटलेलं फिलींग वाहुन जातं. कधी काळी लंडनमध्ये भारतापेक्षा फार काही वेगळी परिस्थिती नव्हती हे कळुन चुकतं. आणि अगदीच आपण मागास असल्याचा न्यूनगंड कमी होतो. अर्थात त्यांच्या 1800 शतकातील चालीरीती आपल्याकडे अजुन चालु आहेत हे आपलयातील सिक्रेट.

त्यात एक उमराव मुलीला हसुन दाखव, दात सरळ आहेत का पहायचं आहे असं सांगतो तेव्हा वाटलं अरे ही पण प्रथा प्राचीन भरताकडुन उचलली की काय? नाही म्हणजे हल्ली पद्धत आहेच की, सगळं भारतात होतंच, आम्ही प्रगत होतोच, इथुन तर सगळ्या जगाने कॉपी केलं असं म्हणुन अभिमान वाटुन घ्यायची Wink

बाकी कथा उपकथा छान आहेत. काही संवाद आवडले. त्यांची घरं/कॅसल्स बघताना युरोपची आठवण येत राहिली. कपडेपट मस्त. पण बायकांचे ड्रेस बघताना ब्रेस्ट push up करणारे ड्रेसेस बघुन हसु आलं. काहीच्या काही फॅशन होती Proud

इथे बरेच जण न्यूडीटी आणि स्वेअर वर्ड्स मुळे अस्वस्थ (uncomfortable) होतात, असं वारंवार बोललं गेलं आहे, त्यामुळे सुरुवातीचे काही एपिसोडस बघुन वाटलं की चला अगदीच स्वच्छ मालिका आहे. इंग्लिश सिरीज असुन अगदी किसिंग सुद्धा नाही (इन फॅक्ट एका किसमुळे हिरो-हिरॉईनला लग्नच की करावं लागतं मनाविरुद्ध, एवढी टोकाची पवित्रता Wink ) मला वाटलं माबोवरच्या टिनएजर मुलींच्या आया मुलीबरोबर सिरीज बघुन जुन्या प्रथांना हसतील. त्यांना बदललेल्या काळाचे फायदे कसे उपभोगता येतात आणि आताच्या आईवडिलांचे विचार प्रगत आणि प्रगल्भ आहेत हे दाखवुन थोडा भाव खातील.

पण छे. लग्न झाल्याबरोबर बेडरूम, किचन, गार्डन, दिवसा, रात्री, दुःख झालं, आनन्द झाला, भांडण झालं, पॅच अप झालं की सेक्स आणि सेक्स. त्यामुळे गुमान मुलं झोपली की आपापल्या पार्टनर बरोबर किंवा मग एकेकट्याने आयपॅडवर पहा. नेटफ्लिक्स एकत्रित फॅमिली एंटरटेनमेंटसाठीं नाहीच हे आता पचवुन टाकूयात.

जरा वेगळी म्हणुन ही वेबसिरिज पहायला हरकत नाही.

क्राऊन पाहून संपवली . रॉयल फॅमिली आणि नेभळट प्रिन्स चार्ल्स डोक्यात गेला. परंपरा , प्रतिष्ठा , अनुशासनपायी तीन आयुष्य खराब झाली. तरीही ना सोयरसुतक.
यावेळचा सीझन थोडा स्लो आहे पण पकड घेतो.( स्लो असण्याचं एक कारण ब्रिटिश शो असावे. लाईन ऑफ ड्युटी शो पण आरामात वेळ घेऊन करतात) मार्गारेट थॅचरची भूमिका जिलीयन अंडरसनने चांगली केलीये. एकुणातच मागील सीझनप्रमाणेच हा सीझनही उत्तम झालाय. कलाकारांचा अभिनय, स्क्रीनप्ले , दिग्दर्शन सगळंच उच्च ! जरूर बघणे .

ट्रम्पतात्यानी अमेरिकन निवडणूक जोरदारपणे गाजवल्याने बरेच दिवस पेंडिंग राहिलेली House of Cards बघायला घेतलीये. तसेही क्राऊन संपल्यावर काय बघू हा प्रश्न होताच. तर तीन एपिसोड बघून झालेत. And it's gripping .
मायबोलीकरांचे काय मत या सिरीजबद्दल ?

नुकतेच च यतीम आणि डकैत बॅक टू बॅक पाहिले. दोन्ही प्रचंड आवडले. डकैत खूप सफाईदार आहे यतीम पेक्षा. पण यतीम मधला नायक इमोशनली आवड्ला. सनीने दोन्हीत सुंदर काम केले आहे. आता खूप काळ काही पाहू नये असं झालं.

मी चुडैल बघून संपवली . सुरुवात एका गोष्टीतून होते आणि मग वेगळचं वळण घेते. मध्ये मध्ये खूप स्लो होते तिथे पळवत पळवत पाहिली .
काही प्रसंग फार अंगावर येतात .

पाकिस्तानातली पार्श्वभूमी आहे. साफ उर्दू ची अपेक्शा होती . पण इथेही " F" words चा सढळ हस्ते वापर आहे .
पाकिस्तानात उचभ्रू लोकात ईतकं मोकळं वातावरण असेल याची कल्पना नव्हती .
ती "सारा" मला फार आवडली . तिला बघून हॅपी भाग जायेगी च्या झोयाची आठवण येते .
त्याव्यतिरिक्त झुबेदा आणि शम्स .

Unpaused - AMazon Prime छान आहे.. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ५/६ ..

Unpaused - AMazon Prime छान आहे..>>>> हो छान आहेत छोट्या कथा. मला पण मुव्ही आवडला.

बी एस.... क्रिमिनल जस्टीस 2 पाहिली.
सग्ळ्यांचे काम म्स्त झाले आहे. आणि पंकज त्रिपठी तर बेस्ट!
एकूण सिरिज चांगली आहे पण शेवट थोडा खटकतो.

तिच्या वडिलांपासून, विक्रम्ने तिला लांब ठेवलं.. हा मुद्दा कोर्टात कुठेही येत नाही..++
तिचं डॉ़क्टर सोबत चे संबंध ही पटत नाहीत..म्हणजे शेवटी ते बाळ त्या डॉक्टर चेच असते ना? मग त्यांचे आधीही संबंध होते की.....डॉक्टर खोटं बोलतो का, की फक्त खुनाच्या दिवशीच ते वहावत गेले..कारण ती त्याला pregnacy बद्दल सांगायला आलेली असते....मला हे clear झाले नाही.....
बाकी कीर्ती kulhari ने पण छान काम केलेय....
आणि abuse बद्दल चांगलं भाष्य केलय ... हे अगदी खरं आहे.....!!!!

Pages