Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
NCIS खूपच मस्त आहे . मलाही
NCIS खूपच मस्त आहे . मलाही खूप आवडली . माझे सगळे seasons बघून झाले .. आणखी तेवढेच बघायला आवडतील !!
आर्याचा सातवा भाग फार थरारक
आर्याचा सातवा भाग फार थरारक होता.
मला आर्याचा भाऊ, त्याची gf दिसायला आवडले. तिने कामही छान केलंय. पल्लवी झालेली मुलगी ओळखीची वाटते, मराठी आहे का ती, गार्गी सावंत म्हणून एक नाव येतं, ती आहे का ती.
सिकंदर खेरने काम छान केलंय पण त्याला फार एकसुरी काम दिलंय. जवाहर मस्त, तो एका कॉमेडी सिरीयलचा हिरो होता, तेव्हाही आवडलेला. भारती आचरेकर आई होती का त्याची त्यात, सोनीवर असायची. बाकी बरंच काही आवडलं नाही.
>> व्हर्जिन रिव्हर नेटप्लिक्स
>> व्हर्जिन रिव्हर नेटप्लिक्स वर पाहिली, सुंदर !!! >>> दोनही सिझन्स पाहिले का? ते टाऊन एवढं सुंदर आहे. व्हिज्युअल ट्रीट आहे.
या रेकमेंडेशन साठी अनेक धन्यवाद. एकदम छान आणि रिलॅक्सिंग आहे अजुन पर्यन्त आणि खरोखर बघताना छान वाटत डोळ्यांना.
मला खरतर रोमँटिक सेरिजेस आवडत नाहीत म्हणून माझ्या एका मित्रानी यात काम करुन सुद्धा मी इतके दिवस पाहीली नव्हती. पण या दोन कमेंट्स मुळे पाहिली आणि छान वाटल.
नेटफ्लिक्स वरची भाग बिनी भाग
नेटफ्लिक्स वरची भाग बिनी भाग बघितली का कोणी? मी थोडी बघितली पण फार बोरं झाली
हा तिकडच्या धाग्यावरचा
हा तिकडच्या धाग्यावरचा प्रतिसाद इकडे देतेय.. कुणीतरी सांगा ...
मी आज्च पाहिली. खूप आवडली. केके मेनन, आणि फारुख मस्त एक्दम..!
त्या मंत्री दाखवल्या आहेत त्या कोण आहेत? म्हण्जे तेव्हाच्या कुणी मंत्री आहेत प्र्त्य्क्श?
त्या हिंम्मत सिंग वर अटॉक करण्यासाठी माणसं पाठवतात?
मग हाफिज च्या मोबाईल मध्ये एकदा हिंम्मत सिंग चा, त्याच्या बायको मुलीचा फोटो दाखवला आहे तो का?
धनुडीने Virgin River season 2
धनुडीने Virgin River season 2 बद्दल विचारलं होतं.
Park seon Jun आवडतो मला (what is wrong with Secretary Kim, fight my way, she was pretty , Itaewon class, चा हिरो)
आता 27 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.>>>>> थँक्यू मीरा, आठवणीने सांगितल्याबद्दल. मी बघितला दुसरा सिझन आणि आता तिसऱ्या सिझन ची वाट बघतेय. एक मुव्ही बघितला Netflix वर Falling Inn Love, हा बघताना virgin river ची खुपच आठवण होत होती. पण virgin river सिरीज जास्त छान आहे.
बाकी मी अजूनही kdrama बघतेय. आता माझा फेवरेट हिरो बदलला
ह्या आधी "सो जी सब" हे हिरोच नाव जे लक्षात राहिलेलं . तो मला oh my venus मुळे आवडायला लागला. अजून एक आहे Ji change Wook जो हिलर , आणि suspicious partner चा हिरो आहे. मला तिघांची ही acting आवडते.
कोरियन मुव्ही पण छान असतात my little Bride, Innocent Steps हे दोन्ही पिक्चर खुप छान आहेत
क्रिमिनल जस्टीसचा नवा सिझन,
क्रिमिनल जस्टीसचा नवा सिझन, नवी कथा आली आहे. पहिला एपिसोड संपवला आत्ताच.
*Spoiler*
*
*
*
*
2 रस्ते आहेत accused ला वाचवण्यासाठी:
एक तर accused ची मानसिक स्थिती आणि दुसरा महत्वाचा मार्ग म्हणजे accused वर victimने केलेला spousal unnatural rape. स्वसंरक्षणासाठी केलेला खून. पण accused ने स्वतः vaseline आणि मर्डर वेपन सोबत आणणे केससाठी धोकादायक ठरेल. बघू मिश्राजी काय डोकं लावतात...
स्वीट होम म्हणून एक कोरियन
स्वीट होम म्हणून एक कोरियन आली आहे कोणी पहात आहे का? 3 भाग बघितलेत , मॉनस्टर्स वर आहे.
आर्या बघून झाली. काही ठिकाणी
आर्या बघून झाली. काही ठिकाणी फार रडू आलं. आर्या काही सीन्समध्ये एकदम छान दिसलीय, सॉलिड personality, मला तशी सुश्मिता फार आवडत नाही. काही सीन्स छान केले तिने. छोट्या मुलाने फार सुरेख काम केलंय.
शेवट असा का केला, श्या. वाईट वाटलं. कशाला पुढचा सिझन आणायचा, पहिलाच एन्ड positive करायचा ना.
परत तीच मारामारी, खुनाखुनी दाखवत रहाणार.
क्रिमिनल जस्टीस संपली पाहून..
क्रिमिनल जस्टीस संपली पाहून.. predictable असली तरी पाहायला मजा आली.. पंकज त्रिपाठी हिरा आहे हिरा
खरंच हिरा आहे. कुठल्याही
स्वीट होम म्हणून एक कोरियन
स्वीट होम म्हणून एक कोरियन आली आहे कोणी पहात आहे का? 3 भाग बघितलेत , मॉनस्टर्स वर आहे.>>>>हो का? मी सद्ध्या the k2 बघतेय. हि बघते शोधून. नाही ऐकलं नाव. एक साईट आहे fangurl verdict म्हणून.भरपूर Kdrama reviews आहेत इथे. चांगले असतात. सुरवातीला मला नीट समजायचं नाही काय चाललय,तेव्हा ह्या रिव्ह्युचा उपयोग झाला.
AK vs AK जबरदस्त झालाय
AK vs AK जबरदस्त झालाय
धनुडी ही डिसेंम्बरातच रिलीज
धनुडी ही डिसेंम्बरातच रिलीज झाली आहे.
हिंदी वेबसेरीज मध्ये अश्लील
हिंदी वेबसीरीज मध्ये अश्लील शिव्या देणे compulsory आहे का ?
शिव्यांना एवढे सेन्सिटिव्ह का
शिव्यांना एवढे सेन्सिटिव्ह का आहोत आपण मराठी लोक? आपण असे वागतो की आजूबाजूला कधी शिव्या ऐकूच येत नाहीत.. घराच्या बाहेर पडलं की शिव्या ऐकू येतात प्रत्येक कोपऱ्यावर कोणत्याही शहरात.
इंग्रजीतला फकफकाट ऐकताना आपली तेवढी हरकत नसते.
क्रिमिनल जस्टिस हि मालिका
क्रिमिनल जस्टिस या मालिका मुंबईतले फिल्दी तुरुंग आणि कैदि दाखवणे या फाउंडेशन वर बनवल्या आहेत याची खात्री मला हळुहळु पटायला लागली आहे. एपिसोड्स्मधुन येणारे बाकि घिसेपिटे प्लॉट्स म्हणजे सांगाड्यावरची निस्तेज त्वचा...
sonalisl धन्यवाद (गेम ऑफ
sonalisl धन्यवाद (गेम ऑफ थ्रोन्सचे धागे दिल्याबद्दल)...
@अजिंक्यराव - आजूबाजूला
@अजिंक्यराव - आजूबाजूला शिव्या ऐकू येतात नाही असे नाही पण अगदी रोज बोलायच्या प्रत्येक वाक्यात याचा वापर होत नाही पण या वेबसीरीज मध्ये संवाद कमी आणि शिव्यांचा जास्त भडीमार आहे असे वाटते ... असो आणि इंग्रजी वेबसीरीजबद्दल म्हणाल तर जेवढ्या मी बघितल्या त्यात तरी असे संवाद अगदी क्वचितच होते .
वेबसिरीजना आता सेन्सॉर येणार
वेबसिरीजना आता सेन्सॉर येणार आहे असं ऐकलं मधे. उत्तम होईल. काही घाण शिव्या ऐकायची आणि सीन्स बघायची वेळ येणार नाही. सीन्स तरी पुढे ढकलता येतात पण काही घाण डायलॉग्ज पटकन येतात तेव्हा आधी माहीती नसतं मग कानावर पडतात. मला हे दोन्ही बघायला ऐकायला आवडत नाही.
इंग्रजी वेबसिरीज बघत नाही.
बाय द वे आर्यामधे तिच्या वडलांचं काम जयंत कृपालनीने केलं आहे का. खानचं काम कोणी केलंय, त्याला बघितल्यासारसखा वाटतं कुठेतरी.
कोणी नेटफ्लिक्सवरची ‘डाऊन टू
कोणी नेटफ्लिक्सवरची ‘डाऊन टू अर्थ विथ झॅक एफ्राॅन ‘ बघितली आहे का?
घराबाहेर न पडलेल्या मराठी
घराबाहेर न पडलेल्या मराठी लोकांसाठी शिव्या सेन्सिटिव्ह असू शकतात..
हॉस्टेल मध्ये राहिलेले, जॉब साठी घराबाहेर दुसऱ्या शहरात रूम share करून राहणार्यांना विशेष वाटत नसावे... नॉर्थ साईड ला शिव्या अत्यंत कॉमन आहेत... भाषा वेगळीच आहे...एखादी मुलगी सुंदर दिसत असेल तर क्या माल लग रही है असे मुली देखील एकमेकांना सहज म्हणतात जे आपल्याला खूप सेन्सिटिव्ह वाटू शकते...
https://www.inmarathi.com
https://www.inmarathi.com/110134/different-portrayal-of-men-women-behind...
क्रिमिनल जस्टीस 2 संदर्भात हा लेख?? वाचण्यात आला.
बंद दाराआड नवरा बायकोमध्ये चालणारे लैंगिक शोषण चव्हाट्यावर आणू नये असा साधारण सूर या लेखकाचा आहे. कथेच्या दृष्टीने पहिल्याच एपिसोड पाहिल्यावर मी इथेच टाकलेली कमेंट म्हणजे संपूर्ण कथेतला विक पॉईंट होता, तो भाग अलाहिदा.
पण बंद दाराआडची अन्यायाची गोष्ट मांडूच नये असे म्हणणे कितपत योग्य आहे?
क्राऊन बघायला सुरुवात केली
क्राऊन बघायला सुरुवात केली आहे. बेस्ट आहे . राणी चं काम केलेली नटी सुंदर आहे. तिचा कपडेपटही उत्तम.
सगळे प्रसन्ग अगदी अस्सल ! ब्रिटीश राज घराण्याचं कौतुक..की त्यान्नी इतके बारकावे दाखवायची परवानगी दिली... तीही पात्रं अजून जिवंत असताना..!!
फॅमिली मॅन पाहिली.
फॅमिली मॅन पाहिली.
सुंदर आहे.
आता पौरुषपूर आज आलीय
नव वर्ष वीकेंड टारगेट.
आता पौरुषपूर आज आलीय >>> काल
आता पौरुषपूर आज आलीय >>> काल ट्रेलर बघायचा प्रयत्न केला . झेपला नाही . मिसो कै च्या कै भयानक दिसतोय .
शेवटी मेन्टलिस्ट बघून संपवली .
मला वाटल सहावा सिझन शेवटचा आहे , पण खरतर सातवा सीझन शेवटचा आहे .
this season is more about love, life, friends ,family.
या सीजन मध्ये बर्याच aaaa.....wwww moments आहेत .
पॅट्रीक चा वेडेपणा थोडा कमी होतोय आणि जरा माणसासारखा वागायला लागला शेवटी
चो माझा hot favourite या सीजन मध्ये ही .
चो , डेनिस , पॅट्रीक , टेरेसा , ग्रेस आणि वेन सगळ्यांच भलं झालेलं पाहून शेवटी डोळे भरून आले .
आता २ दिवस पोकळी निर्माण झालीय - काय बघू म्हणून .
काही रूचतच नाहीये . पॅट्रीक आणि टेरेसाचा पगडा काय उतरत नाहीये
जाई , तुझ्या रेको नुसार NCIS बघायला सुरुवात केली , पण मजा येत नाही आहे . त्या तिघांपैकी कोणीच आवडत नाहीये .
आणि ती फॉरेन्सिक वाली तर अजिबातच आही . डॉ तारिका ची आठवण आली . पण तारिका बर्यापैकी नीट असते .
काय बघू ते सांगा कोणीतरी आता पुढे .
तो पर्यन्त " simple murder" बघतेय . सुशांत सिन्ग वेगळाच दिसतोय आणि ती प्रिया आनन्द गोड दिसते खूप .
आता पौरुषपूर आज आली >>> कुठे
आता पौरुषपूर आज आली >>> कुठे ?
झी पाच वर
झी पाच वर
नक्षलवादी म्हणून सिरीज पण झी
नक्षलवादी म्हणून सिरीज पण झी पाच वर आलीय ना. मी बघणार नाहीये पण राजीव खंडेलवाल मेन दिसला, खुप वेगळा दिसतोय इथे. मला तो कही तो होगा पासून आवडतो, सुजल होता. तेच नाव तोंडात आहे माझ्या. (सुजल कशिश जाम आवडायचे. मे बी सिरीयलचं नाव चुकत असेल पण ह्या दोघांची नावं चुकणार नाही आणि विसरणार नाही) .
साईकिंत कामत आणि हरीश दुधाडे आहेत त्या सिरीजमधे.
फॅमिली मॅन २ ?
फॅमिली मॅन २ ?
Pages