Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Mismatched चांगली आहे...
Mismatched चांगली आहे...
Bicchu का खेल सुरुवात चांगली आहे, नंतर फुसका बार आहे... कंटाळा येतो...
अंजू.. अगं फारच निराशा झाली.
अंजू.. इमली बद्दल अगं फारच निराशा झाली. पहिलाच एपिसोड बघून. एक बटबटीत (बहुतेक) बिहारी बाई मुलीला मुलगी झाली म्हणून वचावचा ओरडतेय बघून मुडच गेला पुढचं बघायचा. तरी पुढे ढकलली गश्मीरसाठी. तो असलेले -२-४ सिन्स बघितले. तो मस्त आहे पण सिरिअल फारच निराशाजनक आहे. मेन कॅरेक्टर इमली पण काही आवडली नाही. परत युपी, बिहार च वाटतेय. गश्मीरची फॅमिली बघून एकता कपूर टाईप्स फिल येत होता जे ढकलत बघितले. अजिबात नाही बघणार पुढचे एपि.
ओहह, ती मयुरी आहे त्यात
ओहह, ती मयुरी आहे त्यात वाचून नकोच बघायला वाट्लं, ते आता अजून दृढ झालं, thanks.
सुलू तुम्हालाही thanks, ती मयुरी आहे इमलीत सांगितलंत म्हणून.
अगं तुला एवढी आवडत नाही का
अगं तुला एवढी आवडत नाही का ती?
बादवे ही तिच मयुरी का जिच्या नवर्याने आत्महत्या केली?
हो तीच बहुधा.
हो तीच बहुधा.
मी पण एखाद्या मालिकेत ती आहे असं कळलं तर ती मालिका पाहणं नक्कीच अव्हॉईड करेन.
एक बटबटीत (बहुतेक) बिहारी बाई
एक बटबटीत (बहुतेक) बिहारी बाई मुलीला मुलगी झाली म्हणून वचावचा ओरडतेय बघून मुडच गेला पुढचं बघायचा. >>>>>> मुलगी झाली हो चा हिन्दी रिमेक आहे का? पण मी इमलीचा प्रोमो पाहिला, त्यात तर ती इमली चान्गली बोलत होती.
वरती मागून आता क्राऊन बघायला
वरती मागून आता क्राऊन बघायला सुरुवात केली आहे. आवडते आहे.
वर लिहिल्याप्रमाणे आश्रम
वर लिहिल्याप्रमाणे आश्रम दोन्ही भाग पाहिले आणि बॉबी देवलच्या अभिनयाची कमाल वाटली... म्हणजे हा माणुस अभिनय करु शकतो हे खरचं वाटत नव्हते... खुप सुंदर काम केलयम त्यानं आणि भोपा स्वामी नी पण... आदिती पोहनकर कमाल...पम्मी जिवंत केलीये तिने...
आता तिसरा भाग कधी येणार याची वाट पहाते ... तोवर बाबा जाने मनकी बात.... जपनाम जपनाम
बादवे ही तिच मयुरी का जिच्या
बादवे ही तिच मयुरी का जिच्या नवर्याने आत्महत्या केली? >>> हो. ते वाईट झालं मात्र. त्याने करायला नको होती.
पर्सन म्हणून चांगली आहे पण acting अजिबात आवडत नाही. सिरियल्समधे आपण acting बघणार ना.
बॉबी देवलच्या अभिनयाची कमाल
बॉबी देवलच्या अभिनयाची कमाल वाटली... म्हणजे हा माणुस अभिनय करु शकतो हे खरचं वाटत नव्हते >> म्हातारपणी का होईना .. शिकला..
बॉबी देओल च्या चेहऱ्यावर राग,
बॉबी देओल च्या चेहऱ्यावर राग, भीती, शांत प्रसन्नता, लोण्याचा गोळा मटकवलेल्या बोक्याची धूर्तता,वासनेने पेटलेला अंगार हे सर्व व्यवस्थित वेगवेगळ्या वेळी दिसतं.
भोपा स्वामी पण सॉलिड.'ती भाजीची पिशवी दे जरा' वाल्या नॉर्मल चेहऱ्यावरच्या भावांनी लोकांना भोसकतो सरळ.
आश्रम चे एपिसोड खूप वेळा पाहिले, आधी सर्वांबरोबर आणि मग एकटीने. आणि प्रत्येक वेळी नव्याने काही काही गोष्टी जाणवत गेल्या.
बाकी गुप्त, सोल्जर, अजनबी मध्ये गाणी नाच वगैरे बघण्यात चांगला वेळ गेला त्यामुळे बॉबी चा अभिनय वगैरे नीट आठवत नाहीये
बॉबी देओल हा नेहमी चेहर्
बॉबी देओल हा त्याच्या चेहर्यामुळे कायम गोंधळलेला अभिनेता वाटायचा. त्याला स्वतःलाही प्रेमकथा कराव्यात की अॅक्शनपट करावेत हे कळत नसावे म्हणून गोंधळलेला असावा. त्याचे काही चित्रपट मात्र आवडले होते उदा: गुप्त, सोल्जर, हमराज, टॅन्गो चार्ली. पण ते केवळ बॉबीमुळे नसून पुर्ण टीममुळे आवडले होते. त्यामुळे बॉबीच्या अभिनयाकडे तितके लक्ष गेले नव्हते. पण आश्रम मधला त्याचा रोल पाहून थक्क झालो. मी_अनू यांनी म्हणल्याप्रमाणे त्याच्या चेहर्यावरचे विविध भाव वेळच्या वेळी व्यवस्थित दिसतात. बॉबी मुळेच ही सिरीयल बघायची उत्सुकता वाढली.
परवा कुठल्यातरी चॅनल वर गुप्त लागला होता. परत पाहिला. आश्रममुळे बॉबीच्या अभिनयाकडे लक्ष गेले. आणि बर्यापैकी अभिनय, नाच, फायटींग करायचा असे वाटून गेले. उगाचच हा खानावळीमुळे मागे पडला असेही वाटले.
विषयांतर आहे पण बॉबी चे
विषयांतर आहे पण बॉबी चे बरेचसे चित्रपट करीना ने शाहिद ला द्यायला लावले असे वाचले होते... जब वी मेट मधला रोल बॉबी करणार होता पण करिनाच्या हट्ट मुळे त्याला रिप्लेस करण्यात आले...
काही चित्रपट हातातून गेले आणि त्याचे करियर बसले...
हो का?
हो का?
मला तसा तो अगदी फ्लॉप नाही वाटला तेव्हा पण. उलट धर्मेंद्र आणि सनी चे नाच पाहिले असल्याने 'धर्मेंद्र सनी चे तसेच मसल्स वाले पण बर्यापैकी चांगले नाचणारे व्हर्जन' म्हणून बोनस वाटले.
आता सारखे ट्विटर इन्स्टा फॉलोईंग, लोकप्रियता मिळत नसेल तेव्हा.काही ठराविक निर्माते आणि फिल्म मॅगझिन्स कोणाला वर आणायचे ते ठरवत असतील बहुतेक.
बॉबी देओल च्या चेहऱ्यावर राग,
बॉबी देओल च्या चेहऱ्यावर राग, भीती, शांत प्रसन्नता, लोण्याचा गोळा मटकवलेल्या बोक्याची धूर्तता,वासनेने पेटलेला अंगार हे सर्व व्यवस्थित वेगवेगळ्या वेळी दिसतं. >>> अगदी अगदी.
किती थंड वावरतो तो.
मी Mentalist वर अडकलेय. 2nd season संपला. किती वाईट वाटलं शेवटी.Your heart goes for Patrick .
Dialogues are just too crispy. Light humour.
The worlld is too small . अगोदर भेटलेली लोक नंतर परत कुठल्यातरी भागात भेटतात.
Cho is tooo good .
अनु.... किती ते बॉबीचे कौतुक
अनु....
किती ते बॉबीचे कौतुक!
आधी तर आपल्या खिजगणतीतही नसायचा!
अभय देओल पण मस्त आहे खरे म्हणजे!
आश्रम आत्ता सुरु केली आहे इथली चर्चा वाचून. पहिला सिझन संपत आला.

पम्मी ची भाभी गोड आहे. भाई अगदीच चम्या! त्या सामुदायिक विवाहाच्या वेळी एक दुसरीच बाई त्याच्या समोर येऊन उभी राहते..त्या वेळचे त्याचे भाव बघण्यासारखे!
बाबाज्जी की सदा इजय! जपनाम जपनाम!
बंदीश बँडीट्स पाहिली. आवडली.
बंदीश बँडीट्स पाहिली. आवडली. यातली सर्व गाणी परत परत ऐकावी अशी आहेत. शास्त्रीय संगीत एरवी मी बसून ऐकलं नसतं. पण सिरियल च्या व्हिज्युअल आठवणींमुळे परत परत ऐकतेय. विरह आणि लब पर आये गीत सुहाने. आवेद अली आणि सर्व गायकांचे आवाज मस्त आहेत आणि तो राधे मुलगा ह्रितिक भौमिक अभिनयात पण छान आहे. हावभाव गायकाचे वाटतात.मुलगी सुंदर आहे(श्रेया कोणीतरी). तिचे कपडे पण तिला सूट होतात. राधेची आई म्हणजे हम दिल दे चुके सनम मध्ये भरतबरोबर पळून जाणारी आणि सलमान ऐश च्या ब्रेकअप साठीची ठिणगी पाडणारी अनु फार जबरदस्त आहे यात. शिवाय राधेचा बाप आणि काका पण. आणि थ्री इडियट्स मधला मिलीमीटर म्हणजे राधेचा मित्र. फक्त तो सारखी फ ची बाराखडी बोलणारा कुणाल कपूर चं पात्र डोक्यात गेलं.
त्रिधा चौधरी ला फार काम दिलं नाहीये पण जितकं दिलंय त्यात गोड दिसते. (शेवटचा जंप सूट मात्र सूट नाही झालेला. )
अतुल कुलकर्णी नसीरुद्दीन शाह नेहमीप्रमाणे ग्रँड. फक्त अतुल कुलकर्णी चे गातानाचे डोळे बघून दर वेळी जरा हसू येतं.
शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी यातली गाणी मेजवानी आहेत.
आंबट गोड..किसी पे दिल आ गया तो आ गया
बॉबी आधी मला त्याच्या केसांमुळे आदीमानव वाटायचा. (नंतर त्या हेअर्स्टाईल हॉट मानल्या जातात असं कळलं.)
चार्जशीट - इनोसंट ऑर गिल्टी -
चार्जशीट - इनोसंट ऑर गिल्टी - अमिता कुलकर्णीस+ सईद मोदी + संजय सिंह - प्रेमत्रिकोण + हत्या - छान आहे पण बोल्ड सीन्स + अंगावर येते.
चुडैल्स - पाकिस्तानी महिला बचाव समिती - अनेक संदर्भ सुटलेत बोल्ड सीन्स + अंगावर येते.
हक से - लिटिल वुमेन ची व्यवस्थित वाट लावलीये बोल्ड सीन्स + अंगावर येते.
बॉबीच्या अभिनयाचं क्लास ऑफ ८३
बॉबीच्या अभिनयाचं क्लास ऑफ ८३ मध्ये चीज झालंय.
अनु:-) जपनाम !
अनु:-) जपनाम !
बंदिश bandits मस्त आहे. ए री सखी ..अप्रतिम!! सगळे कलाकार मस्त! मला तर त्याचे वडील, काका पण आवडले...
बंदिश bandits >>> मला सिरीज
बंदिश bandits >>> मला सिरीज नाही आवडली इतकी पण मला
'लब पर आए' आणि ' लट उलझी ' आवडली .
बंदिश बँडिट्स- नाव मोठं लक्षण
बंदिश बँडिट्स- नाव मोठं लक्षण खोटं. विषय चांगला होता पण राधे आणि तमन्नाची पॅरलल लव स्टोरी चालू करुन माती केली. अगदी गंडलेलं डायरेक्शन. अतुल कुलकर्णी आल्यानंतर किंचित बघण्यायोग्य झाली. राधे करणार्या मुलाऐवजी कुणी बरी अॅक्टींग करणारा अगदीच मिळालेला दिसत नाही.
मला आवडला राधे
मला आवडला राधे
(स्पॉयलर्स, ज्यांना चालत नाहीत त्यांनी पुढे वाचू नका)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
या कथेत एकच आवडलं नाही ते म्हणजे बायकांना सगळीकडे अत्यंत दुय्यम रोल देणे.शेवटच्या भागात कशीबशी सून एकत्र जेवायला बसते.इतकी महान गायिका इतक्या वर्षांनी तंबोऱ्यावर साथ करत असून तिचा जजेस कडून उल्लेख नाही.बाप पखवाज वाजवतो त्याचा प्रेमाने उल्लेख.
राधे आला नाही आणि आईचं काम कळलं तर नायिका थेट ग्रुप तोडून युट्युब सोडून मोकळी. सिगरेट पिणारी आणि एरवी बनियान हॉट पॅन्ट घालणारी नायिका नायकाच्या घरच्यांशी संबंध येईल तिथे थेट 5 मीटर लांबीचा अंगभर शरारा घालणार.अगदी पंजाबी ड्रेस किंवा जीन्स लॉंग कुर्ता पण नै.नायक तिला इतका चांगला ओळखत असून पण व्हिडीओ मध्ये सगळ्यांसमोर मुद्दाम अपमान करणार आणि ही परत रडत त्याच्या मिठीत.
राज कन्येचं गुपित कळल्यावर तिच्या होणाऱ्या नवऱ्याला विश्वासात न घेता थेट ब्लॅकमेल.
क्राऊन मागच्या आठवड्यात
क्राऊन मागच्या आठवड्यात सम्पवली. हा सिजन खुप आवडला, तिसऱ्या भागात हेच कलाकार आवडले नव्हते, पण ह्या भागात आवडले. अँडरसनची थॅचर बाई प्रचंड आवडली. Lithgo (चर्चिल) प्रमाणे हीला पण ह्या भूमिकेसाठी खूप ऍवॉर्ड मिळतील असे वाटत आहे. ह्या खऱ्या क्वीनने काय काय पाहिले आहे, एवढे पंतप्रधान, इतकी उलथापालथ.. आता पाचव्या सिजनची वाट बघणे आले जो 2022 मध्ये येणार आहे
फेसबुकवर मिर्झापूरचं खूप
फेसबुकवर मिर्झापूरचं खूप कौतुक वाचून पाहायला घेतली होती ... पहिल्या सिजनचे 5 एपिसोड कसेतरी पाहिले आणि थांबवली ..... आवडली नाही ..
बंदिश बँडिट्स- नाव मोठं लक्षण
बंदिश बँडिट्स- नाव मोठं लक्षण खोटं. >>> टोटली !!
{{{ या कथेत एकच आवडलं नाही ते
{{{ या कथेत एकच आवडलं नाही ते म्हणजे बायकांना सगळीकडे अत्यंत दुय्यम रोल देणे. }}}
उलट नीट पाहिलं तर जाणवेल स्वतःच्या इगोकरिता मोठा मुलगा (पहिल्या पत्नीपासून झालेला - अतुल कुलकर्णी) आणि त्याची प्रेयसी यांची प्रेमकथा संपवणारा, सूनेचे गाणे थांबवणारा नासिरच खर्या अर्थाने खलनायक आहे. आपण वाईट वागलो याची तो कबूली देतो देखील.
{{{ सिगरेट पिणारी आणि एरवी बनियान हॉट पॅन्ट घालणारी नायिका नायकाच्या घरच्यांशी संबंध येईल तिथे थेट 5 मीटर लांबीचा अंगभर शरारा घालणार.अगदी पंजाबी ड्रेस किंवा जीन्स लॉंग कुर्ता पण नै. }}}
शास्त्रीय संगीताच्या मैफलींकरिता ड्रेस कोड असतो - पुरुष देखील झब्बा पायजम / शेरवानी अशा वेशात येतात - जीन्स नॉट अलाऊड फोर बोथ मेन अॅन्ड वुईमेन.
{{{ नायक तिला इतका चांगला ओळखत असून पण व्हिडीओ मध्ये सगळ्यांसमोर मुद्दाम अपमान करणार }}}
मुद्दाम नाही - ते त्याच्याकडून चुकून घडतं आणि तो त्याबद्दल माफी देखील मागतो. उलट तीच त्याला अनेकदा हुडूत करते आणि संकटात टाकते ( रॅश ड्रायविंग - पोलिस लॉकअप इत्यादी)
अर्थात ओव्हरॉल सिरीज बंडल आहे यात दुमत नाही. इतकी वंगाळ बनविण्याचं काहीच कारण नव्हतं. कुणाल रॉय कपूरचे संवाद किंवा त्याचं संपूर्ण पात्रच डिलीट करायला हवं होतं.
बं. बॅ.. खूप आवडली... एका
बं. बॅ.. खूप आवडली... एका मागोमाग एक एपिसोड बघुन संपवले...
बिपीन, ड्रेस कोड चं पटलं.
बिपीन, ड्रेस कोड चं पटलं.
शेवटचा मुद्दाही बराचसा पटला.
तुम्ही पहिला मुद्दा जो 'उलट' म्हणून लिहिला आहे तो खरं तर माझ्या मुद्द्याला समांतर आहे. (जोधपूर मधले राधे सोडून नसिरुद्दीन शाह आणि बाकी बरेचसे पुरुष मालिकेतल्या स्त्री पात्रांना प्रचंड गृहित धरतायत असे वाटले, या अर्थाने लिहीले आहे.तो निमंत्रणपत्रिका द्यायला आलेला मुनिम पण..राधे बराच चांगला आहे.)
तेच तर अनू. व्हिलन आहेत मग
तेच तर अनू. व्हिलन आहेत मग वाईट दाखवणारच ना..
Pages