Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Prime वर Elementary बघतेय.
Prime वर Elementary बघतेय. जुनी सिरीज आहे.
नविन शेरलॉक आणि त्याची companion Dr. Watson.
ओटीटीवर अश्लील, आक्षेपार्ह
ओटीटीवर अश्लील, आक्षेपार्ह गोष्टी दाखवता येणार नाही. >> सेंसॉर R (A) सर्टिफिकेट देऊ शकत नाही का? आक्षेपार्ह गोष्टी ज्यांना बघायच्या नाहीत त्यांनी रिस्ट्रिक्टेड कंटेंट नाही बघितला की झालं. सर्टिफिकेशन अँगल असेल तर उत्तम आहे. क्लिअरली काय प्रकारचा कंटेंट आहे हे अपफ्रंट समजलेलं सगळ्यात उत्तम. संस्कृतीरक्षण प्रकार असेल तर मग प्रश्नच मिटला.
तीन महिन्यांत कळेल नक्की काय
तीन महिन्यांत कळेल नक्की काय ते. मी tv mute ठेवलेला आणि वरचं वाक्य वाचलं होतं. ते लगेच लिहिलं. नंतर अजून सोशल मिडियाबद्दल पण सुरु होतं पण मला वेळ नव्हता बघायला.
सर्टिफिकेशन अँगल असेल तर उत्तम आहे. क्लिअरली काय प्रकारचा कंटेंट आहे हे अपफ्रंट समजलेलं सगळ्यात उत्तम. >>> खरं आहे.
१९६२ चा पहिला भाग पाहिला.
१९६२ चा पहिला भाग पाहिला. मस्तंच आहे. अभय देओलला बघणे ही ट्रीट आहे. सैराटचा हिरो पण आहे यात. नाव विसरले.
पूजा सावंत आहे. मोठीच फौज आहे. बरेच चेहरे वेबसिरीजमधून ओळखीचे झालेत. सर्वांची कामं सुंदर आहेत.
दिग्दर्शन छान आहे. बॉर्डर प्रमाणे सुरूवातीची हाताळणी वाटते.
या युद्धाची माहिती नाही फारशी त्यामुळे बघणार आहेच.
१९६२ कुठं आहे?
१९६२ कुठं आहे?
जिन्दगी इन शॉर्ट -
जिन्दगी इन शॉर्ट - नेटफ्लिक्स वर बघते आहे. शॉर्ट स्टोरीज आहेत, सगळे कलाकार छान आहेत, नीना गुप्ता, दिव्या दत्ता, वगैरे. त्यामुळे अॅक्टिंग मस्तच. स्त्रीवादी गोष्टी, निगेटिविटी आणि रडारड असे काही नाही तर अगदी खुसखुशीत प्रकारे सांगितल्या आहेत. मला आवडतायत. ३ बघून झाल्यात. दिव्या दत्ताची तर फारच आवडली
१९६२ - हॉटस्टारवर. आजच रिलीज
१९६२ - हॉटस्टारवर. आजच रिलीज झालीये.
गुल्लक २ बघितली. काय गोड
गुल्लक २ बघितली. काय गोड सिरीज आहे.
सगळे आपापल्या रोलमध्ये एकदम फिट्ट.
दृष्यम 2 मल्याळम मध्ये प्राईम
दृष्यम 2 मल्याळम मध्ये प्राईम वर आहे इंग्रजी सब टायटल सोबत कुणी पहिला आहे का...?
महेशकुमार , मी पाहिलाय दृश्यम
महेशकुमार , मी पाहिलाय दृश्यम इंग्रजी सब टायटल सोबत.
जाई कसा आहे पहिल्या ऐवढाच
जाई कसा आहे पहिल्या ऐवढाच उत्कंठा वाढवणारा की...
बरा आहे..!?
जाई कसा आहे पहिल्या ऐवढाच
नाही म्हणजे सब टायटल वाचत चित्रपट बघणं म्हणजे सर्कसच असते
दृष्यम 2 - पाहिला छान आहे .
दृष्यम 2 - पाहिला छान आहे .
आताच जस्ट नेटफ्लिक्सवरची
आताच जस्ट नेटफ्लिक्सवरची Behind Her Eyes ही लिमिटेड एपिसोड्सची ( केवळ ६) थ्रिलर सिरीज पाहिली. अफलातून आहे. जास्त लिहीत नाही आणि इतर कोणी बघितली असेल तरी लिहू नका कारण ती गोष्ट उलगडत जाते ते अनुभवायला हवं. एक एक कॅरेक्टर जबरा आहे. अॅडम तर भारी गोड आहे. आणि अॅडेल चे ड्रेसेस ... एकदम भारी. हायली रेकमेंडेड.
१९६२ मधे धक्का मिळाला. इंडीयन
१९६२ मधे धक्का मिळाला. इंडीयन आयडॉल १२ फेम पवनदीप राजन पण यात एक भूमिका करतोय. चार भाग झाले. अजिबात कंटाळा नाही आला. अभय देओल कसला नैसर्गिक आहे. अरिफ झकेरिया नेहरू म्हणून अजिबातच शोभत नाही. इंदिरा गांधीच्या भूमिकेत कोण आहे ते समजलं नाही. यशवंतराव चव्हाणांचं नाव शिंदे का केलंय ? अशा ऐतिहासिक घटनेत एव्हढ्या महत्वाच्या पात्रांची नावे बदलून काय फायदा ? ती तर सर्वांना माहीत असतात. की खरंच शिंदे नावाचे कुणी डिफेन्स मिनिस्टर पण होते ?
JL50 सुरू केली आहे.. चांगली
सोनी लिव वरची JL50 सुरू केली आहे.. चांगली वाटतेय.. तगडी स्टारकास्ट आहे.. अभय देओल, पंकज कपूर, पीयुष मिश्रा etc
आताच जस्ट नेटफ्लिक्सवरची
आताच जस्ट नेटफ्लिक्सवरची Behind Her Eyes ही लिमिटेड एपिसोड्सची ( केवळ ६) थ्रिलर सिरीज पाहिली.>>>>>>>>>>>>>> मी पण बघतेय. शेवटच्या एपि वर आहे. मस्त कॅची आहे एकदम.
आताच जस्ट नेटफ्लिक्सवरची
आताच जस्ट नेटफ्लिक्सवरची Behind Her Eyes ही लिमिटेड एपिसोड्सची ( केवळ ६) थ्रिलर सिरीज पाहिली.>>>>>>>>>>>>>> मी पण बघतेय. शेवटच्या एपि वर आहे. मस्त कॅची आहे एकदम.>>> मी पण बघतेय. शेवटचे २ भाग राहिलेत.
Jl 50 चांगली आहे...
Jl 50 चांगली आहे...
काल Netflix वर Girl on the
काल Netflix वर Girl on the train दिसली...कुणी बघितली आहे का? कशी आहे?
परिणीती दिसते आहे.
महेशकुमार , टोटल रेकमेंडेड .
महेशकुमार , टोटल रेकमेंडेड . बघाच. सबटायटलने फार फरक पडत नाही. मोहनलालने मस्त काम केलंय. चांगला थ्रिलर आहे.
धन्यवाद जाई...
धन्यवाद जाई...
१९६२ (हॉटस्टार) सुरू केला पण
१९६२ (हॉटस्टार) सुरू केला पण अर्धा तासाने बंद केला... कधी बघेन माहित नाही . एल. ओ. सी. कारगील, बॉर्डर सारखी सुरूवात वाटली. याची आई, त्याचा भाऊ, याची/त्याची प्रेयसी फलाणा ढिकाणा... यापुढे नाच, गाणि , विरहगीतं, सुहागरात वगैरे मधे अर्धा अधिक चित्रपट संपेल असे वाटायला लागले.
एकादा चित्रपट मधे सोडून द्यावासा वाटला, तर तो आपल्याला कधीच आवडणार नाही, असे माझे मत...
मामी, मी पण सुरु केलीये पण
मामी, मी पण सुरु केलीये पण अगदीच पहिला भागच चालुये. पहाते आता.
परदेसाई, +1 मलाही 1962 चाकोरी
परदेसाई, +1 मलाही 1962 चाकोरी बद्ध युद्ध पट वाटला. काही स्पार्क वाटला नाही अणि बंद केला.
काल Netflix वर Girl on the
काल Netflix वर Girl on the train दिसली...कुणी बघितली आहे का? कशी आहे? >>> चित्रपट आहे, छान आहे. रहस्यपट आहे आणि शेवटपर्यंत रहस्य उलगडत नाही. अगदी शेवटी थोडा अंदाज येतो पण तरी मस्त आहे.
थँक्यू माधव. मला चित्रपटच
बघते.
The Girl on the Train (2016)
The Girl on the Train (2016) : https://www.imdb.com/title/tt3631112/ हा इंग्रजी सिनेमा देखिल आहे. याच नावाच्या पौला हॉकिन्सच्या कादंबरीवर आधारीत आहेत हे दोन्ही सिनेमे.
जिंदगी इन शॉर्ट एकदम मस्त आहे
जिंदगी इन शॉर्ट एकदम मस्त आहे. फारच आवडल्या त्यातल्या शॉर्ट स्टोरीज खास करून स्वरूप सम्पत आणि ती छज्जूजी के भल्ले.
छज्जू के bhallle मस्त होती...
छज्जू के bhallle मस्त होती...
Pages