भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या दोन माऊंनी पहिल्याच दिवशी लावलेले ख्रिसमस ट्री अर्ध तोडून टाकले. चावून आणि त्यावर खरं झाड समजून उड्या मारत राहिले.

unnamed (3)_0.jpgunnamed_0.jpg

स्थळ: कर्वेनगर
माझी मैत्रीण तिच्या बुलेट नामक लॅब्राडोर जातीच्या कुत्र्याला घेऊन फिरत होती. एका शेजाऱ्याने बहुधा लॉकडाऊनमुळे असेल बऱ्याच दिवसांनी त्यांनी बुलेटला पाहिलं आणि प्रतिक्रिया:

"तुमच्या बुलेटचा तोफगोळा झालाय!"

थँक्यू स्वाती Happy

बुलेट चा तोफगोळा Lol

असाच एक किस्सा - जेव्हा माझ्या मैत्रिणीकडे छोटं कुत्र्याचे पिल्लू आणले होते. आमचा ग्रुप त्याला पहिल्यांदा भेटल्यावर नंतर मग गॅप झाली एकदम ५-६ महिन्याने परत भेटलो (तेव्हा ते बर्‍यापैकी मोठं झालेलं ब्रीड नाही माहित) तेव्हा सोबतची एक मैत्रीण एकदम ओरडली अगं त्यांच कुत्रंच झालं की एकदम! पिल्लू होतं ना? Lol


आंतरजालावरुन साभार Happy

आज ओडीन चा पहिल्यांदा एका बेडकाशी सामना झाला
लहान दिसतोय म्हणून गेला भुंकत
तो बेडूक शांतपणे बसून होता, अगदी जवळ येईपर्यंत हालचाल पण केली नाही आणि अगदी मोक्याच्या क्षणी जोरात उडी मारली
त्याचा हा पवित्रा ओडीन ला इतका अनपेक्षित होता की तो पार उलटा पालटा झाला आणि धावत धावत माझ्याकडे आला
म्हणलं धत लेका तुझी एक बेडूक नाही पकडता येत
पण कितीही उसकासावल तरी परत अजिबात त्या बेडकाच्या दिशेने गेला नाही Happy

Are my dog also barks in an ajeeb woo woo sound when shee sees a frog from a safe distance. But keep dog away from frogs because they can be poisonous and dog's mouth may swell.

अच्छा म्हणजे हे नॅचरल आहे तर
पण मांजर मारतात बेडूक मस्त, आमच्या कडे एक होती ती फटाफट मारायची बेडूक आणि ते उरलेलं टाकायचं काम माझ्याकडे यायचं

हो मस्त लिहिलं आहे, सगळेच मुद्दे पटले
स्पेशली एकटा ठेवण्याचा
त्याना अजिबात एकटेपणा आवडत नाही, तुम्ही भले खेळू नका पण तुम्ही जवळ पाहिजे बास

लहानपणच्या काही घटनांमुळे मी श्वानद्वेष्टा होतो, पण हा धागा वाचून वाचून त्यांच्यासोबत वागणे फार कठीण नाही असे वाटू लागले आहे. अर्थात वर्षातून चारपाचवेळा आठ आठ दिवस फिरत राहावे लागत असल्याने आणि एकंदरच आवश्यक तेवढी काळजी घेता येणार नसल्याने कुत्रा पाळणे जमणार नाही. पण पुढेमागे शेतावर घर बांधेन तेव्हा नक्की पाळेन

मानव, आर्टिकल खूप आवडले.
माझ्या मित्राचा भूभू होता तो पिल्लू असताना त्याच्या सोबत घरी यायचा, जरा मोठा झाल्यावर एकटा चक्कर मारायला लागला. आधी आवारात चक्कर मारुन मग घरात यायचा. त्याच्याशी गप्पा मारल्या, कुरवाळले की खुश व्हायचा. आम्ही गडबडीत असलो आणि लक्ष दिले नाही की भुंकून नाराजी कळवायचा. मग खाऊ दिला तरी मान फिरवायचा. आपला दादा दुपारी शाळेत जातो आणि या ताया घरी येतात हे लक्षात आल्यावर तर बरेचदा दुपारी आमच्या घरी यायचा. आमचा होमवर्क चालायचा आणि तो पायाशी शांतपणे झोपायचा. Happy

चांगले आहे आर्टिकल. बर्‍याचश्या गोष्टी वाचल्या होत्या आधी. आपल्या लक्षात येत नाहीत ते वेगळे.
माउई प्रोटेस्ट करत नाही म्हणजे त्याला हग्ज आवडतात असा समज आम्ही करून घेतला आहे! कडेवर बसायला तर फारच. उचलून घ्यायचा हट्ट पण करतो कधी कधी Happy
टिव्ही बद्दल मात्र अगदी खरंय Happy त्याच्याकडे लक्ष न देता कोणी टिव्ही बघत बसले आहे हे माउई ला झेपत नाही. काही ना काहीतरी करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो. दोन लोकांच्या मधेच उडी मारून येणे, बाहेर जाण्यासाठी घंटी वाजवणे, एखादा बॉल घेऊन पायापाशी ठेवून बघत बसतो आपल्याकडे. तो फेकावा आणि त्याने फेच करावा अशी अपेक्षा. आम्ही लक्ष नाही दिले तर जाऊन दुसरा बॉल किंवा टग ऑफ वॉर ची दोरी आणून ठेवतो पायाजवळ. म्हणजे ते नाही का आवडले, मग हे खेळू असं Happy तरी नाही ऐकले तर ( बहुधा तिथवर वेळ येतच नाही) जालीम उपाय म्हणजे एखादे पिपाणीसारखे वाजणारे खेळणे घेऊन अगदी डोक्याशी बसून ते ट्यँ ट्यँ करत वाजवत बसणे म्हणजे आम्हाला टिव्ही ऐकू येईनासा होण्याइतपत Lol

हा हा हा प्रत्येक गोष्टीसाठी अगदी अगदी हेच असं म्हणावं वाटतंय
ओडीन सेम प्रकार करतो, पिपाणी अफाट प्रकार आहे माऊई चा
ओडीन ची रिकामी प्लॅस्टिक बाटली आहे ती तो चावत बसतो आणि त्याचा प्रचंड इरिटेटिंग आवाज येतो
शेवटी चल खेळू आपण पण ती बाटली सोड म्हणावं लागतं

आज एक अजब भुभु पालक भेटले ग्राउंड वर
क्रॉस लॅब होती सहा महिन्यांची, एंजल नाव
पण तिचा मालक आणि मुलगा सटासट तिला मारत होते, भरीस म्हणून जाड साखळीने बांधला होतं
ते बघणं अक्षरशः अशक्य झाले तेव्हा मी आणि अजून एक जण मध्ये पडलो आणि त्यांना म्हणलं अहो असं मारू नका, मुका जीव आहे
तर म्हणे अजिबात ऐकत नाही, चावते खूप
म्हणलं पण मारुन ऐकणार आहे का ती
मी मग खाली बसलो आणि तिला जवळ बोलावलं, आधी आली पण जसा तिला मानेजवळ खाजवायला हात पुढे केला तसं एकदम घाबरली आणि चावायला बघू लागली
तिला माराची आणि एकंदर मनुष्यप्राण्याची प्रचंड दहशत बसली होती हे उघड होतं आणि सतत मार खाऊन तिने हा पवित्रा घेतला असावा
मग मी पार धुळीत मांडी घालून बसलो तिला हाताचा वास दिला शांतपणे, मग अलगद गुड गर्ल गुड गर्ल ये इकडे मी माया करतो असे अगदी हळुवार आवाजात बोलत राहिलो
तरीही तिच्या नजरेत साशंकता होती पण मी तसाच बसून राहिलो तिचे पालक पण बघत होते, त्यांना म्हणलं साखळी सोडा तिची
तर म्हणे नको ती चावेल म्हणलं मी घेतो जबाबदारी
त्यांनी मग नाखुषीने तिला मोकळं सोडलं
थोडा वेळ इकडे तिकडे वास घेऊन झाल्यावर मग माझ्याकडे आली तिला परत मानेला खाजवलं तेव्हा मग शांत उभी राहिली
मग कान मान गळा सगळं हळूहळू खाजवून दिलं ते आवडायला लागलं मग पार बाईने मातीत फतकल मारली माझ्या पुढ्यात आणि पोट पुढं केलं मग बेली रब पण केलं
त्या पालकांना म्हणलं घरी बांधूनच ठेवता का
तर म्हणे हो, घरी आजी आजोबा आहेत त्यांना एकदा चावायला गेली
म्हणलं शक्य असेल तिथे आणि तितका वेळ मोकळी ठेवा
आणि मारणे पहिले बंद करा
मारल्यामुळे ती अजून जास्त अग्रेसिव्ह आणि चावरी होईल
इथे रोज ग्राउंड वर आणा आणि ओडीन सोबत खेळायला सोडा, तेवढ्याने पण खूप फरक पडेल

त्यांना किती पटलं माहिती नाही पण काहीच बोलले नाहीत आणि तिला साखळी बांधून घेऊन गेले
बिचारी फार वाईट वाटलं तिचं

तोवर ओड्या माझं लक्ष नाहीये याचा फायदा घेऊन उनाडक्या करत फिरत होता, त्याला शून्य पझेसिव्हनेस आहे
जोवर त्याचे खाणे दुसऱ्या भुभु ला देत नाही तोवर त्याला काहीही घेणेदेणे नसते

ओह आशु
ते जर परत फटकवताना दिसले तर पेटा वाल्याना फोन करा सरळ.

अरेरे बिचारी एंजल! Sad काय बिनडोक पालक आहेत! पेटा किंवा तत्सम कोणा तरी ऑथॉरिटीज ना कळवले पाहिजे खरंच.

हो मलाही आता दिसले परत कधी आणि मारताना पाहिलं तर थेट ऍक्शन घेणारे, आमचा इथल्या लोकल भुभु पालकांचा एक व्हाट्सएप ग्रुप आहे
त्यावरही टाकून ठेवलं आहे
कारण ज्या पध्दतीने ते निघून गेले त्यावरून तरी त्याना मी असं बोललेलं किंवा वागलेल आवडलं नव्हतं, पण पब्लिक प्लेस होती आणि मी अजिबात भांडणाच्या सुरात न बोलता अगदी व्यवस्थितबोलत होतो म्हणूनही असेल
पण कितपत त्यांना पटलं असेल याबद्दल शंकाच आहे
कदाचित परत आणणार पण नाहीत ग्राउंड वर

Pages