
अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====
माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो
======
आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे
======
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
========
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
======
मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
====
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
====
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते
काय एकेक लोकं असतात.
काय एकेक लोकं असतात.
मी तो मानव ने इथे लिंक दिलेला
मी तो मानव ने इथे लिंक दिलेला लेख वाचला आणि मला फायदा झाला.आज डेक्कन ला मथुरा च्या इथे फुटपाथवर एक थोडं स्वच्छ मेंटेन दिसणारं कुत्रं आलं.गळ्यात पट्टा नव्हता.त्याने हाताचा वास घेतला.त्याला म्हटलं अरे काही खाणं नाही माझ्याकडे.मग त्याने काळं ओलं नाक हाताला लावलं.मग माझ्या अंगावर 2 पाय ठेवून उभा राहिला आणि हात चाटायला लागला.एरवी मी कुत्रा हात चाटतो म्हटल्यावर घाबरून किंचाळायला लागले असते.पण कुत्र्याच्या सभ्यतेवर विश्वास ठेवून शांतपणे बोलत राहिले.चाट बाबा, फक्त चावू नकोस, खूप कामं आहेत मला वगैरे.मग त्याला थोडं हात लावून,थोपटून प्रेम केलं.मग निघून गेला.ऑफ व्हाईट आणि ब्राऊन हॅण्डसम कुत्रा होता. फक्त डिफेनसिव्ह होऊन चावला असता तर सर्व कामं सोडून राबीप्युर आणि डॉ शोधत बसावे लागले असते
वाह अनु तुम्ही खूप म्हणजे
वाह अनु तुम्ही खूप म्हणजे खूपच मोठी स्टेप घेतली की
चक्क स्ट्रीट डॉग ला जवळ येऊन देऊन चाटायला परवानगी दिली म्हणजे खरंच कमाल आहे
त्यासाठी तुम्हाला खरंच सलाम
तुम्ही घेणार लवकरच आता एक भुभु घरी
तर लोकहो जरा कोतबो परिस्थिती
तर लोकहो जरा कोतबो परिस्थिती झालीये ! ऑलरेडी इथल्या दोन मेंब्रांशी बोललो आहे पण तरीही हा पोस्ट प्रपंचः
सर्वप्रथम गेल्या बुधवारी 'ज्योई' घरी आला ! दहा आठवड्यांचा 'मॉर्की' (मॉल्टीस आणि यॉर्की ह्यांचा क्रॉसब्रीड) आहे. तीन भावांमधला सगळ्यात तुडतुड्या. गोड आहे आणि तसा गुडबॉय आहे. म्हणजे रात्री झोपतो नीट. पहिले पाच सहा दिवस रेस्टरूम ब्रेक नंतर १०-१५ मिनीटे ओरडत बसला पण काल एकदम लगेच झोपून गेला. सकाळी उठला की भयंकर एनर्जेटीक असतो. घरभर सैरावैरा पळतो आणि उड्या मारतो. त्याची एकंदरीत भिरभिर बघून आम्हांला दमायला होतं. सध्या शॉट्स झालेले नसल्याने बाह्रे नेता येत नाही. पण आम्ही शीशू साठी गॅलरीत नेतो. एखाद दोन प्रसंग वगळता गॅलरीत जाऊन शीशू करतो. ब्रिडरने सांगितलं की सकाळी साडेआठ आणि संध्याकाळी सहा अश्या दोनच वेळांना जेवतो. पण आम्हांला वाटतय की त्याची भूक भागत नाही आणि त्यामुळे भिरभिर करतो. म्हणून आज सकाळी त्याला लवकर खायला दिलं. एकंदरीत आम्हांला अजून तरी खूप छान / भारी वगैरे काही वाटत नाहीये. ते काय म्हणतात ते "अनकंडीशनल लव" वगैरे कुठे दिसलं नाहीये. कदाचित आमचं लव कमी पडतय की काय असं वाटतय कारण आम्ही त्याला किचनमध्ये आणि बेड/सोफ्यावर येऊ देत नाही. प्रचंड स्ट्रेस वाटतोय. काल रात्री व्यवस्थित झोप होऊनही मी आज दमलेलाच आहे. (पूर्वी मला ऑफशोर कॉल्स असायचे रोज रात्री, तेव्हा जसा थकवा असायचा दिवसभर, तसं वाटतय). आम्ही सहसा 'इंपल्सिव्ह' निर्णय घेत नाही. ह्याही वेळी जवळ जवळ सहा माहिने विचार करत होतो. तीनचार फॅमिलींशी बोललो होतो तरीही घाई केली की काय असं वाटतय. मुलगी एकदम खुष आहे. ज्योईबरोबर खेळते. ती आणि तो तिच्या एका चेअरवर कोण बसणार ह्यावरून (गंमतीत) भांडत असतात. तो कधी कधी तिच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपतो पण तिला खूप प्ले-बाईट्स पण देत असतो. ते बाईत्स कमी करण्याचं ट्रेनिंग आम्ही सध्या देत आहोत.
आत्ता मागे फिरलो तर मुलीसमोर चुकीचं उदाहरण ठेवलं जाईल की काय असं वाटतय ( एखादी गोष्ट नाही आवडलं / जमली तर द्या सोडून) पण तासाठी त्या मुक्या प्राण्याचे आणि स्वतःचे हाल करून घ्यावे का असही वाटयत.
हे असं होणं / वाटणं कॉमन आहे की आम्ही / ज्योई अॅबनॉर्मल आहोत ?
१) कुत्र्यांना रेग्युलर
१) कुत्र्यांना रेग्युलर एक्झरसाइज लागतो. तो नाही मिळाला तर हमखास असे झूमीज येतात ( भिरभिर / हायपर मस्ती). ते नॉर्मल आहे.
कुत्र्यंच्या वजन, साइज प्रमाणे रोज किती वेळ व्यायाम हवा हे सर्च करता येईल. दिवसातून दोन तीन वेळा तरी घरातच का होईना खेळून थकला पाहिजे. बॉल, दोरी वगैरे वापरून टग ऑफ वॉर किंवा पळापळी/ पकडा पकडी.
२) फूड - दिवसाला त्याच्या वयाला किती फूड हवे ते नेट वर सापडेल. पपी असताना १ की दीड कप किबल्स (दिवसाला) आम्हाला त्या दिवसातून ३ वेळा थोड्या थोड्याअसे डिव्हाइड करून द्या असे सांगितले होते. मोठे झाले की २ वेळा खाणे.
akc.org वर किंवा अजून बर्याच चांगल्या साइट्स वर थोडा अभ्यास करा असे सुचवेन. वेगवेगळ्या डॉग बिहेवियर्स चा अर्थ समजून घ्यायला मदत होईल.
एन्जलसाठी वाइट वाटले, बहुधा
एन्जलसाठी वाइट वाटले, बहुधा तिच्या घरचे तिच्यावर तेवढि माया करत नसावेत, त्यामूले ति चावत असेल.
माझ्या कॉलेजच्या फ्रेन्डने डॉग केनेल सुरु केले आहे, अतिशय पॅशनने तो हे करतो .त्याच्यामते सध्या पूण्या-मुबैत जॉब करण्यारा बर्याच लोकाकडे भरपुर पैसा आहे आणि विभक्त कुटुन्ब पद्धती,एकच मुल यामुळे असलेला जास्तिचा पैसा, त्यामुळे आपली आवड-निवड आणी जॉब प्रायारोटीज न बघता लोक फक्त स्टेटस म्हणून कुत्रा आणतात मग झेपत नसले की अॅडॉप्शनच्या जाहिराती देतात, यालासुद्धा गळ घालतात मधल्या मधे कुत्र्याचे हाल होतात.
पग्या, माझ्याकडे पेट नाही
पग्या, माझ्याकडे पेट नाही त्यामुळे अनुभव नाही पण अनकंडिशनल लव का काय ते एकदम लगेच कसं वाटेल? घरात लहान मूल येतं तेव्हा त्यांच्याबरोबर रुळायला वगैरे वेळ द्यावाच लागतो ना? तेव्हा आपण त्यांना परत कुठे नेऊन द्यायचा विचार थोडीच करतो. जरा धीर धर आणि प्रयत्न करत रहा.
पराग - अजिबात काळजी करू नका
पराग - अजिबात काळजी करू नका
ही ट्रान्झिशन फेज आहे थोडे काळ राहील
मला प्रचंड आवडतात भुभु पण ओडीन आणला तेव्हा पूर्ण वेळची जबाबदारी आल्यावर कुठून आपण हा निर्णय घेतला असं वाटून गेलेलं
तोही सेम प्रचंड एनर्जी, खायच्या प्यायच्या वेळा, शु शी सगळं करून दमायला व्हायचं, आणि पपी ला दात येत असतात आणि ते चावतात त्यामुळे जे सगळं अनुभवत आहात ते पूर्णपणे नॉर्मल आहे
सगळेच जण या फेजमधून जातात
आपलं मूल हायपर चाईल्ड असेल तर आया पण वैतागून जातात कधी कधी
हे बाळ च आणलं आहे असं समजा
आमच्याकडे ही ओडीन ला बेड आणि सोफ्यावर येऊ देत नाही आणि त्यालाही सवय झालीये
सुरुवातीला तो उडी मारून यायचा पण स्पष्ट आवाजात नो असे म्हणून त्यांना खाली उतरायला लावायचे, न मारता न ओरडता
आणि खाली उतरला की लगेच ट्रीट द्यायची
ते लगेच शिकतात
भुभु च्या ब्रेन मध्ये अल्फा मेल ला नाराज करायचं नाही हे हार्ड वायर्ड असतं त्यामुळे अल्फा मेल बना आणि तुम्हाला काय हवं आहे हे पेशन्स ने त्याला दाखवून द्या
लवकर शिकतात, पॉटी ट्रेनिंग पण लवकर सुरू करा म्हणजे नंतर व्याप होणार नाही
त्याला बॉल फेच शिकवा म्हणजे तेच पळापळ करून दमतात
खायला देण्याबाबत प्रचंड मतांतरे असतात, दोन व्हेट सुद्धा वेगवेगळे सांगतात
त्यामुळे तुम्हीच अंदाज घेऊन एक फिक्स शेड्युल बनवू शकता
ओडीन आधी पहाटे पाच सहा वाजता खायला द्यायला गोंधळ करायचा पण मी ती वेळ हळूहळू साडेआठ नऊ वर आणली
त्याला एकदा व्यवस्थित खायला मिळतंय हे कळलं की ते शांतपणे वाट बघतात
ते वेळेला खूप काटेकोर असतात त्यामुळे तुम्हाला सोयीस्कर अशी एक वेळ ठरवा आणि ती रुटीन मध्ये आणा
ते बरोबर ऍडजस्ट करून घेतात
अजून एक म्हणजे सगळं लोड एकट्याने उचलू नका
मुलीला त्याची काही कामे करायला लावा, अगदी पाण्याचा बाउल भरून ठेवणे पासून सुद्धा
चावा चावी कमी करायला भरपूर च्यु टोईज मिळतात ते आणून ठेवा म्हणजे चपला, बूट मोजे यांची वाट कमी लागेल
कितीही गुड बॉय असला तरी थोडेफार उद्योग करतात ते शांतपणे घ्या, ओकी करतात कधी कधी तेही ओके आहे
पराग,
पराग,
मलाही अनुभव नाही पण सासरी सगळे श्वानप्रेमी आहेत .
जस्ट एक आठवडा झाला असेल तर अजून थोडा वेळ द्या- महिना दोन महिने गेले की bonding होईल.
दुसरं म्हणजे तुमच्याकडे किंवा मिसेसकडे लहानपणी डॉग होता का? माझ्या नवऱ्याकडे लहानपणी डॉग होते. आता अमच्याकडे डॉग नाही. पुण्यात दिराने नवीन डॉग घेतला तर नवरा पहिल्याच भेटीत त्या डॉगशी अगदी मस्ती कर, तो चाटतोय हात पाय तर चाटू दे -असा कनेक्ट झाला आणि प्लुटोही सोडेना त्याला. छान गप्पा सुरु होत्या. मी मात्र डॉग्ज आवडतात तरी अनुभव नाही त्यामुळे जरा मागेमागेच राहिले आणि तो एकदम अंगावर धावून येतो असं वाटून घाबरलेही.
सो लहानपणीचा अनुभव नसेल तर मोठेपणी थोडा स्ट्रगल होऊ शकतो असं माझं मत झालंय आता.
बहुधा तिच्या घरचे तिच्यावर
बहुधा तिच्या घरचे तिच्यावर तेवढि माया करत नसावेत, त्यामूले ति चावत असेल>>>
नुसती माया नाही केली तरी एकवेळ चालेल पण ज्या पद्धतीने ते मारत होते ती क्रूर होती
एंजल त्यामुळे सेल्फ डिफेन्स मोड मध्ये गेली आहे
मनुष्यप्राण्याची तिला भीती आणि राग वाटत असावी
खायला प्यायला देत असल्याने ती कदाचित त्यांना सहन करत असेल आणि वय लहान असल्याने काय करावं हे कळत नसेल
पण लवकर त्यांनी बदल घडवून आणला नाही तर ती पार बिघडेल आणि मग ते देऊन टाकतील किंवा ती स्ट्रेस मध्ये जाऊन हिंसक बनेल अशी भीती आहे
उद्या आता आले तर बघतो एकदा बोलून
अरेरे वाईट वाटलं एंजल बद्दल.
अरेरे वाईट वाटलं एंजल बद्दल. होप ती लोकं ताळ्यावर येवो.
परागः पेशन्स इज द कि >>> मलाही सुरवातीला आमच्या २ मांजराबद्दल असं च वाटलं होतं. कुठून आणलं यांना घरात अगदी असंच फिलिंग. थोडे दिवस जावे लागले मलाही त्यांच्याशी रुळायला आणि भुभु तर अजूनच लाघवी असतात मांजरांपेक्षा. होईल सगळं ठिक.
सायो+१ ,
सायो+१ ,
पराग! ज्योइ साठी खुप अभिनदन, माझ्याकडे पेट नाही पण माझ्या खुप जवळच्या मैत्रीणिकडे भलाथोरला डॉग आहे अन तिच्या मते साइझ डझन्ट मॅटर, इट्स बेबी फॉर लाइफ टाइम .त्याना भरपुर लाड करुन घ्यायला आवडत.
मला माझ्या साडे तीन वर्षाच्या
मला माझ्या साडे तीन वर्षाच्या मुलाला पाहताना आमच्या वान्याची आठवण येत असते. येस दे आर बेबी फॉर द लाइफ.
पग्या, जर मुलगी आनंदी असेल आणि तिला स्ट्रेस येत नसेल तर अजून थोडे दिवस कळ काढ. तुला लळा लागला नाही तरी सवय होईल. (जशी मला स्वतःच्या मुलाची आता झाली आहे
वान्याचा मला पहिल्या दिवसापासून लळा होता). एव्हडी वर्षे तू ऑफशोअर कॉल घेण्यात घालवलीस, तो दिवसाचा थकलेपणा सोसलास. काही आठवडे हा सोसायला जड जाणार नाही!
भटक्या कुत्र्यांमधेही काही
भटक्या कुत्र्यांमधेही काही प्रस्थापित,काही होतकरु, काही विक्षिप्त,काही उपेक्षित गावकुसाबाहेरील असे सर्वप्रकारचे भुभुलोक असतात. या उपेक्षित भुभुंमधे माणुसलोकांबद्द्ल एक प्रकारची भीती अविश्वास ओतप्रोत भरलेला असतो. त्यांच्याकडे प्रेमाने पाहिले तरी ते लांब पळतात. एकदा माळरानावर काही मुल खेळत होती. त्यातील एक जण त्यातल्या एका भुभुला यु यु करुन प्रेमाने बोलावत होता. त्या भुभुच्या चेहर्यावर प्रचंड अविश्वास होता. हा माणूस नावाचा प्राणी आपल्याला प्रेमाने बोलावतो आहे म्हणजे काहीतरी काळबेर असल पाहिजे असे त्याच्या डोळ्यात वाचता येत होते. पण हा मुलगा प्रेमाने बोलवत राहिला. मग त्या भुभुच्या डोळ्यात जरा विश्वास निर्माण होउ लागला होता. सगळीच माणस वाईट नसतील नाही? हा मुलगा जरा बरा वाटतोय. बघा त्याच्या बोलावण्यात किती आर्जव आहे ते! पण माणसाबद्द्ल भीतीचा पुर्वग्रह म्हणा पुर्वानुभव म्हणा त्याला पुढे येउ देत नव्हता. तो तसाच स्तब्ध उभा राहिला. मग त्या भुभुला वाटले जावे पुढे आणि तो पुढे येण्याच्या बेतात होता. तो पर्यंत तो मुलगा बोलावून कंटाळला होता. येवढ प्रेमाने बोलवतोय तर हा साला शिष्ट येत नाहीये. ह्यॅ तिच्यायला या कुत्ताल्ड्याच्या.....असे म्हणुन त्याने भुभुच्या दिशेने दगड भिरकावला. भुभु केकाटत लांब पळाला व आपल्या बांधवात गेला. बरं झाल आपण गेलो नाही या माणसाकडे नाही तर पेकाटात दगड बसला असता.हुश्य! इथून तिथून सगळी माणसे सारखीच! इथून पुढे कानाला खडा या माणूसलोकांकडे जायच नाही.
ज्योईचा फोटो टाक पराग.
ज्योईचा फोटो टाक पराग.
पराग,
पराग,
वेगळा धागा काढण्याइतकं कोतबो नाही झालं ह्यातंच सगळं काही आलं
बाकीच्यांनी लिहिलं आहेच तसं होईल सगळं सुरळीत
हे असं होणं / वाटणं कॉमन आहे
हे असं होणं / वाटणं कॉमन आहे की आम्ही / ज्योई अॅबनॉर्मल आहोत ? >>>> हे असं वाटलं नसतं आणि पहिल्या दिवशी प्रेम ओथंबुन वाहिलं असतं तर नक्कीच अबनॉर्मल आहात असं वाटलं असतं
कित्येक नवीन बापाना सुरुवातीला आपल्या बाळाची भीती वाटते. एवढंच कशाला, बऱ्याच आयांना सुद्धा आपल्या नवीन बाळाची जबाबदारी नकोशी वाटते. दडपण येतं. मग पपीचं तर येणारच. थोड्याच दिवसात तो एवढा लाडोबा झाला असेल की हॉस्टेल नको म्हणून तुमचे वेकेशन प्लॅन सुद्धा बदलतील बघा.
आमच्याकडे इतक्यातच एक सिरीयस
आमच्याकडे इतक्यातच एक सिरीयस प्रसंग होऊन गेला. सगळ्या डॉग्जच्या आईबाबांना अलर्ट देऊन ठेवते.

आम्ही स्टोन फेकायचा आणि त्याने तो धावत जाऊन आणायचा हा एकदम फेवरीट्ट गेम आहे. बॉलमागे धावतो, पण बॉल स्टोन सारखा फेच करत नाही, काय सायकॉलॉजी आहे कोण जाणे. आणि स्टोन आणताना पळत नाही, ओलमोस्ट उडत येतो, कान उडवत उंच उंच उड्या मारत एवढं हॅप्पी पळतो की उडतो आहे असं वाटतं
मागच्या आठवड्यात त्या हॅप्पी उड्या cum पळण्यामध्ये चुकून स्टोन गिळला गेला. पहिल्यांदा नाही, आधी एकदोनदा झालं होतं, पण मग त्याने उपाशी राहून उलटी करून तो स्टोन काढून टाकला.
यावेळी मात्र तो स्टोन पोटात अगदी intestine पर्यंत गेला. ओकी मधून किंवा पॉटीमधुन निघणार नाही अशा पोझिशनला अडकला. मग उलट्या चालु. जेवण बंद. कोपऱ्यात / दारामागे किंवा कुठेही लपून बसायचा आणि कुंकुं रडत रहायचा. पण स्टोन पोटात आहे हे माहीत नव्हतं त्यामुळे सगळ्या चुकीच्या ट्रीटमेंटस चालु होत्या. मग पोट दुखतं म्हणून xray काढल्यावर स्टोन दिसला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इमर्जन्सी ऑपरेशन ठरलं. पोट आणि मग intestine ला कट द्यायचा म्हणून बऱ्यापैकी मेजर सर्जरी होती. व्हेट मित्र आहे त्याला म्हटलं की काहीही कर पण प्लिज सर्जरी टाळ कारण ते स्टीचेस, दुखणं, जखम सांभाळणं मला फार मानसिक स्ट्रेस देणार आहे. तर तो म्हणे फक्त मिरॅकल झालं तरच स्टोन निघेल कारण फार विचित्र मध्यभागी आहे आणि मोठा आणि लांबट आकार आहे. तो म्हणे जा साईबाबा मंदिरात आणि म्हण जोरजोरात घंटा वाजवत आरती. कारण सर्जरी unavoidable आहे.
दुसऱ्या दिवशी पिल्लुला ऑपरेशनसाठी पूर्ण तयार केलं, OT तयार, सर्जन तयार आणि मग स्टोन पोझिशन मार्क करण्यासाठी परत Xray काढला तर आरती न करता मिरॅकल झालं होतं. स्टोन एकदम शेवटाला आला होता, एक पॉटी आणि तो बाहेर पडणार होता. व्हेट म्हणे हे कसं ते त्यालाही माहीत नाही. पण झालं.
आता नवीन प्रॉब्लेम असा होता की 3 दिवस न खाल्ल्याने पॉटी होत नव्हती. आणि व्हरायटी खायला देऊनही तो फूड बोल जवळ जातच नव्हता. खुप अशक्त झाला होता. मग IV, व्हेन न सापडणं सगळ्या करामती करून घरी आणलं तेव्हा ग्लुकोजमुळे तरतरीत झाला होता. त्या दिवशी फ्रेश वाटल्यामुळे कदाचित तो जेवला, संध्याकाळी पॉटी केली आणि आम्ही ज्या स्टोनची वाट बघत होतो तो शेवटी बाहेर आला (यक्क ! आणि हुश्श ! )
तुमची बाळं काय खेळतात याकडे प्लिज लक्ष द्या आणि नसता स्ट्रेस टाळा. त्यांना काहीही त्रास झाला की त्यांच्या दुप्पट आपल्याला त्रास होतो
आता आम्ही स्टोन फेकत नाही, फक्त बॉल. त्याला आवडत नाही, पण नकोच.
बापरे मीरा
बापरे मीरा
आता चांगला आहे ना तो?
अरे बापरे लैच रामायण झालं की,
अरे बापरे लैच रामायण झालं की, आता कसा आहे? खाणं पिणं ओके ना?
आम्ही पण दगड, फांदी फेकतो पण तो बॉल किंवा फांदी असेल तरच तोंडात घेऊन येतो, दगडाच्या मागे पळतो पण पडल्यावर उचलत नाही
पण यापुढे लक्षात ठेवेन कटाक्षाने
Thanks for your concern. हो
Thanks for your concern. हो हो आता एकदम fit and fine. परत हट्ट, मस्ती, रनिंग सगळं सुरळीत चालु झालं आहे. वजन पण पूर्वी एवढं वाढलं आहे.
आशु, तुम्ही मात्र फांदी टाकत असाल तर काळजी घ्या. कधी कधी स्वतःच्या तोंडाला किंवा बाजूने जाणाऱ्याला लागु शकतं. मी व्हिडीओ पाहिला. पात्रं एवढी मोठी काठी घेऊन चालत होतं.
बापरे,दोघांनाही खूप त्रास
बापरे,दोघांनाही खूप त्रास झाला.
हो ना देवकी. पण ऑपरेशन कॅन्सल
हो ना देवकी. पण ऑपरेशन कॅन्सल झाल्यावर जो काही प्रचंड आनंद झाला त्याची तुलनाच नाही.
नक्कीच.
नक्कीच.
बाप रे ..आता बरा आहे हे वाचून
बाप रे ..पण आता बरा आहे हे वाचून बरे वाटले..साधारण केवढ्या आकाराचा स्टोन गिळला होता ?
अनु...तुझा वर लिहिलेला अनुभव छान आहे.
एवढी मोठी काठी नाही टाकत, ही
एवढी मोठी काठी नाही टाकत, ही त्याची त्यानेच आणली होती
आम्ही जेमतेम दोन वित लांबीची काठी टाकतो
तेही बॉल नसला तर
ग्राउंड वरची वाळलेली झुडुपे असतात त्यातलीच एक घेऊन
ती काठी म्हणण्यापेक्षा काटकीच असते
इतर कुठे विचारू हे न
इतर कुठे विचारू हे न समजल्याने इथेच टाकते. आमच्या घरी एक 2-3 महिने वयाचे भू भू चे पिल्लू कुठून तरी आले आणि त्यानी अंगणात कब्जा केला आहे. 4 दिवस झालेत. खूपच aggressive आहे. अंगावर माराच्या खुणा आहेत.

सतत भुंकत असते. पण surprisingly माझी मुलगी (वय 4 वर्षे) अंगणात खेळायला आली की शान्त असते. अगदी शेपूट हलवून हलवून खूशी जाहीर करत आणि तिच्या मागे मागे फ़िरते. आणि इतर कोणी जवळ गेले की वसकन अंगावर धावून येते. अगदी खायला दिले तरीही तोंड लावत नाही.
घरी कधीच कुत्रा न्हवता त्यामुळे dog behavior बददल काही माहिती नाही. (बर्याच आधी दोन माऊ होत्या). तर आता हा प्रश्न आहे की या बिन बुलाया मेहमान चे काय करायचे. हात लावायला पण भिती वाटते. घर सोडत नाहीय तो. मला सध्या कसलीही जबाबदारी घेणे शक्य नाही. काय करू
मीरा, बाप रे तुमचा फारच
मीरा, बाप रे तुमचा फारच स्केअरी एपिसोड झाला की! काय तरी एकेक उद्योग करतात!
माउईने एकदा बारबेक्यू च्या वेळी नेमका बोन असलेला पीस पळवला आणि बोन चावून खाल्लं की गिळलं होतं तेव्हा असेच घाबरगुंडी झाली होती आमची! दुसर्या दिवशी नशीबाने सर्व ओके झालं तेव्हा हुश्श्य झालं!
बापरे मीरा! थोड्क्यात
बापरे मीरा! थोड्क्यात निभावले.
अनु, भारीच डेअरिंग केले.
मनिम्याऊ, मोठ्या माणसांची
मनिम्याऊ, मोठ्या माणसांची धास्ती असावी पिल्लाला. मुलीकडुनच खावयास द्या. हळुहळु रुळेल ते.
Pages