भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५० पोस्टी कसल्या ते बघून उत्सुकतेने आले पण निराशा झाली. लहान, मोठ्या सग्गळ्या कुत्र्यांना भयंकर घाबरण्यात काही दशकांचे आयुष्य गेले आहे त्यामुळे दुसरी बाजू समजतेय. तेव्हा मला "अगं चावत नाही, काही करत नाही" म्हणणार्‍या श्वानापालकांचा राग ही यायचा. आता माझ्या तोंडून तेच शब्द येतात अन दुसर्‍या व्यक्तीची रीअ‍ॅक्शन बघताना जुन्या स्वतःलाच पाहिल्यासारखे वाटते!असो.
ट्रीट साठी घंटी Lol सोयिस्कर अर्थ काढला की ओडीन ने Happy तुम्ही "पॉटी" किंवा तत्सम शब्द वापरता का त्याला बाहेर नेताना? घंटी वाजवून बाहेर नेताना दर वेळी तो शब्द पण म्हणुन पहा!
बाकी लव अ‍ॅट फर्स्ट साइट आणि इतर पण थ्रोबॅक फोटो मस्त!

नाही ना
आम्हाला त्याला वेगळं पॉटी ट्रेनिंग करावं लागलाच नाही
तोच पॉटी आली की दारात कुई कुई आवाज करत चुळबुळत बसतो
मग दार उघडून अंगणात नेलं की प्रोग्रॅम करून परत
आता त्याला हा वास तो वास करत हिंडण्याची लहर येते मग आवाज चढवून आता बास घरी चला म्हणलं की येतो मुकाट

घंटी वाजली की बाहेर न्यायचं हे आता सारख करून पाहिलं पाहिजे
असाही मागच्या अंगणाला गेट आहे त्यामुळे तिथे तो केव्हाही जा ये करत असतो
वरती गच्चीत पण मोकळा हिंडत असतो
त्यामुळे बाहेर म्हणजे फिरायला किंवा खेळायला एवढं एकच कळतत्याला

या भुभु लोकांचे गार गार नाक मला जाम आवडते. लावील थंड उटी वाळ्याची असे म्हणून मी ते माझ्या कपाळाला लावतो.

आपण ओडिनचे फ्यान झालो आहोत. एक्दम गुड बॉय आहे बघूनच कळतंय.
बोटीवर हसणारा आणि समुद्रात पळणारा फोटू तर एकदमच आवडतो. अधूनमधून येऊन ते दोन फोटो बघतो.

होय कॉमि,
आशु ओडिन चे ते दोन्ही फोटो वरती धाग्यात सामील करशील का

ही तिरामिसू ब्रिड कोर्गी , जुन्या धाग्यावर टाकला होता. पुन्हा टाकतेयं. भाचीचे भुभु म्हणून ती म्हणे तिच्या आईची आणि माझी नात आहे ही. दिवाळीला / वाढदिवसाला भाची हिलाही (कुंकू, अक्षता) ओवाळायला लावते. Happy हिला सगळे मिसू म्हणतो. हळूहळू भारतीय कोर्गी होत आहे. खूप थाट आहे.. लाडोबाई झाली आहे एकदम !

IMG-20200823-WA0001_0.jpg

आता बरीच मोठी दिसायला लागली आहे .
20201129_090856.jpg

मस्त धागा. अतुल तुमच्याकडे एक कुत्रा व एक मांजर आहे ना, सही धमाल येत असेल.
कॅट-डॉग व्हिडीओ बघणे मला प्रचंड आवडते. मला वाटतं दोघं बरोबरीने वाढले असले तर कुत्रा मांजरात मैत्री होऊ शकते नाहीतर Happy

सारे भूभू से अच्छा .... भू भू हमारा । टिंब टींब च्या जागी समोर आलेल्या भुभुचे नाव घालायचे. फक्त या भुभु चे त्या भुभुला कळू द्यायचे नाही. ही ट्रिक मी खूप दिवस वापरतो.

भुभु लोकांचे गार गार नाक मला जाम आवडते>>>>

अचानक अंगाला लागलं की दचकायला होतं, आणि ओड्या अगदी हमखास उभे असताना मागून येऊन आपल्या गुढग्याच्या मागे नाक लावतो, एकदम थंड शॉक बसतो
त्याला हे असले गुपचूप उद्योग भारी जमतात

धन्यवाद जाई, कॉमि आणि हर्षद Happy
खरंच या एकदा भेटायला शक्य असेल तर
तो असाही जगन्मित्र आहे

अरे ही तिरामीसु लैच गोंडुल आहे
कसली नजर आहे
Happy

हो डोळे खरंच खूप बोलके आहेत

फक्त या भुभु चे त्या भुभुला कळू द्यायचे नाही.>>>>
भुभूना कळलं तरी ते दाखवणार नाहीत, त्यांचं लै म्हणजे लै प्रेम असतं आपल्या व्यक्तीवर
खऱ्या अर्थाने unconditional love

आम्ही ओड्याचा आणि मांजराचा समेट घडवून आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, शेवटी आम्ही त्या मांजरीला आता घरी आणतो का काय या रागाने त्याने भुंकून आणि नाचून घर डोक्यावर घेतले
मधल्या मध्ये मांजर तिला दिलेलं बशीभर दूध पिऊन पसार झाली

मिसू फार क्यूट नाव आहे! ती पण तेवढीच गोड आहे.
माउई चा पहिला ख्रिस्मस ट्री Happy आम्हाला वाटले ओर्नामेन्ट्स इ. फेकाफेक करेल पण जवळ बसून मुलांच्या प्रत्येक हालचालीचे बारकाईने निरीक्षण चालले होते Happy
xms.jpg

सो क्युट माउई ला काय गिफ्ट आणली आहे? हा फारच गोड आहे.

आमच्याकडे काल बेबी योडा प्लश टॉय गिफ्ट आले. त्याचे एलिअन प्रमाणे मोठे काळे कुळकुळीत डोळे आहेत. त्यामुळे बहुतेक स्वीटीला त्याची भीत्ती वाटते आहे. दुरून बघत आहे. तसेच आम्ही आमच्या फर्स्ट डॉग वीनी चे एक आर्टि स्ट कडून पेंटिंग करून घेतले आहे. ते पण काल आले. आता ते फ्रेम करून घेणार.

आमच्याकडे ओडीन च्या पहिल्या वाढदिवसाचे जोरदार प्लॅनिंग सुरू झालं आहे
सगळ्यात गंमत म्हणजे माझ्या पोराचा आणि ओडीन चा वाढदिवस एकाच ऐतिहासिक दिवशी आहे 6 डिसेंबर
आम्ही जेव्हा ही पिल्ले बघायला गेलो आणि कळलं की यांचा जन्म 6 डिसेंबर चा आहे तेव्हाच ठरवलं की घ्यायचं तर हेच
भन्नाट योगायोग जुळून आला

आता मग ओडीन ची मित्रमंडळी आणि पोराची मित्रमंडळी कशी आणि कुठं जमतील, केक कुठून आणायचा, खायला काय यावर जोरदार चर्चा सुरू आहेत
माझ्या डोक्याला मुंग्या आल्यात ते ऐकून Happy

आणि या अशा पद्धतींनी दोन काड्या लावल्या कि आम्ही त्याला पार करू शकत नाही. घाबरतो आम्ही त्या काड्यांना
funtru sticks.jpeg

फुंतरु कसला गरीब डोळ्यांनी बसलाय त्या काठयांसमोर.'बंदिवान मी या संसारी' वगैरे गाणी वाजायला लागली डोक्यात.

Pages