"हॅलो ऋचा, काय जेवलीयेस दुपारचं?"
"आई, फक्त शहाळ्याचं पाणी प्यायलीय."
दुपारचं जेवण म्हणून शहाळ्याच पाणी वाचून आश्चर्य वाटलं ना?
हा संवाद साधारण 2015 च्या जुलै ऑगस्ट मधला आहे.
ह्या सगळ्याची सुरवात 2015 ला झाली.2015 च्या फेब्रुवारी महिन्यात एके दिवशी संध्याकाळी खूप अस्वस्थ वाटायला लागलं आणि घशाशी अन्न आल्यासारखं वाटायला लागलं म्हणून उल्टी केली.
मी तेव्हा जॉब करायचे हिंजवडी स्थित मोठया MNC मध्ये (आता करत नाही. त्याची कारणे पुढील भागात काळातीलच ) खूप मोठी उल्टी झाली खाल्लेलं सगळं पडलं होतं.रात्री सगळ्यांसाठी स्वयपाक केला मी काही फार खाल्लं नाही. दुसऱ्या दिवशी उठून स्वतः ला रे टल आणि घरातलं सगळं आवरून आणि 1.5 तास प्रवास करून ऑफिस गाठलं. ऑफिस मध्ये ही उलटीचा त्रास झाला.
सुरवातीला वाटलं की घर ते ऑफिस होणारा प्रवास, ऑफिस पॉलिटिक्स, घरातील काही व्यक्तींमुळे होणारा त्रास त्यात माझा मुलगा तेव्हा 3.5 वर्षांचा होता त्याच्या साठी पुरेसा वेळ देता येत नसल्याचा गिल्ट ह्यातून हे सगळं होतय म्हणून सध्यापुरता नोकरीतून ब्रेक घेऊयात हा विचार केला.
मी ऑफिस मध्ये रिझाईन केलं मार्च मध्ये आणि इकडे दीनानाथ मध्ये माझ्या टेस्ट्स आणि फ़ॉलो अप च सत्र सुरु झालं.
आधी एन्डोस्कोपी झाली (एन्डोस्कोपी साठी सकाळी उठून स्वतः पाण्याचा एक थेंबही न घेता सकाळचं मुलाचं सगळं आवरलं आणि 10 ची अपॉइंटमेंट असताना 11:30 पर्यंत वाट बघत मी, नवरा आणि मुलगा बसलो. )
एन्डोस्कोपी झाली. त्याचा रिपोर्ट नॉर्मल आला.
डॉक्टरानी काही अँटासिड्स लिहून दिले.
त्यांना मी अगदी कळवळून सांगितलं मला उलट्यांचा फार त्रास होतोय पण ते अगदी निर्विकार चेहऱ्यानी औषधं लिहून देत होते आणि वाटेल बर एवढंच म्हणाले.
औषधं घेणं सुरु होतं पण उलट्या थांबायचं नाव घेत नव्हत्या. कसाबसा 2 महिने नोटीस पिरियड सर्व्ह केला.
लास्ट डे फॉर्मॅलिटी कंप्लिट करून घरी आले.
मला फार रिलॅक्स वाटलं.
ते रोज च जाण येणं मिळून 3 तासांचा प्रवास त्यात ऑफिस मधलं मला न आवडणार वातावरण ह्या पासून मी स्वतःला दूर सारलं होतं.आणि मला माझ्या कुटुंबासाठी (नवरा आणि मुलगा ) वेळ देता येणार होता
पण पण पण.. माझा उलट्यांचा त्रास काही केल्या कमी होईना.
दिवसेन दिवस माझी तब्येत खालावायला लागली.
डॉक्टरांची औषधं 2 महिना घेऊन सुधार नव्हता म्हणून सर्वानुमते आम्ही दीनानाथ मधल्याच एका दुसऱ्या गॅस्ट्रोटॅलॉजिस्ट ला दाखवायचा निर्णय घेतला.
क्रमश :
मलाही अधून मधून ऍसिडिटीचा खूप
मलाही अधून मधून ऍसिडिटीचा खूप त्रास होतो. अर्थात तुमच्याइतकी परिस्थिती अजून ओढवलेली नाही. तुमचे पुढचे अनुभव वाचायला आवडतील. भराभर पुढचे भाग, मोठे भाग टाका.
मी ही या भयानक त्रासातुन गेले
मी ही या भयानक त्रासातुन गेले आहे. तुमच्या पुढल्या लेखनात कळेलच सर्व. पण अती मसालेदार किंवा तळलेले पदार्थ, बेकरी पदार्थ, हिरव्या मिर्चीचे अती सेवन ( काही लोकांना पोहे, भाज्या , आमटी या मध्ये मिर्चीच लागते, लाल तिखट म्हणजे पावडर आवडत नाही ) रात्रीचे जागरण, आंबवलेले पदार्थ उदा. इडली, डोसा वगैरे याने हा त्रास सुरु होतो. कमी पाणी पिणे हा सर्वात मोठा पॉईंट.
आयुर्वेदीक सूतशेखर व कामदुधा या गोळ्या अॅसिडीटी साठी खूप परीणामकाऱ आहेत. तसेच दोन्ही जेवणांनंतर झंडु पंचारीस्ट घेणे हे खूप लाभदायक आहे.
आता यात 'क्रमशः' कशाला??? काय
आता यात 'क्रमशः' कशाला??? काय ते लवकर सांगाल का? कारण सध्या मलाही अधूनमधून हा त्रास होतो आहे. Sonography करून झाली आहे, आता CT Scan सांगितले आहे.
दिक्षीत डाएट फॉलॉ केलं
दिक्षीत डाएट फॉलॉ केलं तेव्हापासुन अॅसिडिटी गेलीच.. दोन्ही वेळेस कडकडुन भूक लागते अन अॅसिडिटी निर्माण करणारे अधले-मधले खाणे बंद झाल्यामुळे सगळा त्रासच संपला...
मला पण आहे ऍसिडिटीचा त्रास..
मला पण आहे ऍसिडिटीचा त्रास.. गव्हाचे सगळे पदार्थ एकदम कमी केले. आणि आंबवलेले पण ..आता नाही फारसा त्रास होत..
मला पंधरावीस दिवसांपासून खूप
मला पंधरावीस दिवसांपासून खूप त्रास होतोय अॅसिडिटीचा. खरंतर कोरोनामुळे मार्चपासून बाहेरचे खाणे पूर्ण बंद आहे. आता तर पंधरा दिवस झाले, गव्हाचे पदार्थ, डोसे, पोहे हेदेखील खूप कमी केलेय पण रोज सकाळी उठल्यावर उलटीतून कडू पित्त पडते. रोज सकाळी उलटी होतेच. गोळ्यांनी तात्पुरता फरक वाटतो पण दुसर्या दिवशी पुन्हा तोच त्रास.
झोप पूर्ण होत नसेल तुमची..
झोप पूर्ण होत नसेल तुमची..
कडु पित्त आणि आंबट पित्त
कडु पित्त आणि आंबट पित्त (आम्ल पित्त) यातील अॅसिडिटी बहुतेक आंबट पित्त ही असेल. कडु पित्त बाईल सिक्रीशन जास्त झाल्यामुळे उद्भवतं अन त्याची उलटी महाभयंकर अनुभव देणारी असते.. येता येत नाही अन शक्यतो पहाटे पहाटे होते. एकदा झाली की मग २-३ दिवस मेंदु हलल्यासारखे वाटते अन खाली वाकले, एका कुशीवर जरी झाले तरी मेंदु कवटीला आपटुन दुखत आहे असा भास होतो (निदान मला तरी
).
आम्ल पित्त हे त्यामानाने सरधोपट वाटते. छातीत जळजळ होऊन जास्त पाणी पिले तरी पटापट आंबट उलट्या होऊन त्याचा निचरा होतो असा अनुभव आहे.
क्रमश: आहे. कथा आहे। सल्ला
क्रमश: आहे. कथा आहे। सल्ला विचारलेला नाही. पण काही स्वस्त आयुर्वेदिक औषधे रोगास मूळातून हटवतात.
वाचतेय!
वाचतेय!
Srd,औषधे नक्कीच सांगा.
Srd,औषधे नक्कीच सांगा.
मला 4-५ दिवसांपूर्वी बराच त्रास झाला.उलट्या नाही,पण जळजळणे.सोलांचे पाणी पिऊन कमी झाला.1 चहा त्यामुळे कमी झाला आहे.
ऋचा छान केलंत तुमच्या
मी_ऋचा छान केलंत तुमच्या अनुभवाचा उपयोग होईल बऱ्याच जणांना !
इथे पित्तावर चर्चा आहे. कुणाला हवी असल्यास बघू शकता.
रोज एकच आहार घेऊ नये.आज फक्त
रोज एकच आहार घेऊ नये.आज फक्त पोळी, उद्या भात ,परवा भाकरी,कधी नुसतंच सुप वगैरे,दहा दिवसामधून एकदा उपवास असे केल्याने आतड्यातले फ्रेंडली बॅक्टेरीया खूप डाय्वर्स तयार होतात व पोटाचा अनेक तक्रारी कमी होतात.हा माझा व्यक्तीगत अनुभव आहे.
माझ्या बायकोला भयानक त्रास
माझ्या बायकोला भयानक त्रास व्हायचा पित्ताचा. आम्ही नगरच्या आयुर्वेदवाल्या कोर्टीकरांची आणि पुण्याच्या थोरातांची ट्रीटमेंट घेतली होती पण विशेष फरक नाही जाणवला. नंतर अमृतबिंदु, इसबगोल सत्व, मोतीयुक्त प्रवाळ पंचामृत आणि सूतशेखर रसाच्या गोळ्या वापरल्या (दोन्ही धुतपापेश्वरच्या). आता बऱ्यापैकी संपलाय तो त्रास
अगदी थोडक्यात सांगायचे तर
अगदी थोडक्यात सांगायचे तर शरीर झाडासारखे आहे. घेतलेले अन्नपाणी आणि न वापरलेले काढून टाकणे ( निचरा) दोन्हीही महत्त्वाचे. वय वाढते तसे दुसरा भाग व्यवस्थित होईनासा होतो. तसेच अति तिखट मसाल्यांनी शरीराच्या आतल्या भागास इजा होऊ नये म्हणून आवरण घातले जाते. अन्न शोषले जात नाही म्हणून अधिक पाचक रस ( =असिड) पोटात उतरतात. हे तात्पुरते निराकरण ( neutralise)करण्यासाठी antacid. लिवर आणि इतर अवयवही अधिक पाचक रस सोडतात. सर्वांचेच निराकरण एकाच औषधाने होइलच असे नाही. त्रास कमी होत नाही.
चिकट मैद्याचे पदार्थ आणि तिखट मसालेदार खाऊ नका/ टाळा सांगणे अवघडच आहे.
प्रत्येक खाण्यानंतर एक दोन चिमुट हिरडा चूर्ण तीन चार दिवस चांगला रिझल्ट दाखवेल.
( स्वप्रयोग गंभीर त्रास असलेल्यांनी करू नये. शिवाय वैद्यकीय औषधोपचार घेत असतानाही प्रयोग टाळावेत.)
छान पोस्ट शरदजी.
छान पोस्ट शरदजी.
मी ऋचा..तुम्हाला सकाळी
मी ऋचा..तुम्हाला सकाळी उठल्यावर पाणी प्यायची सवय आहे का?
@श्रवू, मुलगा लहान असल्याने
@श्रवू, मुलगा लहान असल्याने झोप पूर्ण होत नाही.
@Dj, माझेही उलटीनंतर डोके भयंकर दुखते.
छान
छान
मी सुद्धा माझ्या आजारपणाचे निदान होण्याआधी तुफान उलट्यांचा अनुभव घेतला आहे. जुने दिवस आठवले. बरे वाटले. पुढील भागाच्या प्रतीक्षेत......
पुभाप्र..
पुभाप्र..
आजच यातले बरेच अनुभवले.काल
ऍसिडिटी हा लाइफस्टाइल रोग आहे.आता तुम्हाला पूर्ण बरं वाटलं असेल अशी अपेक्षा.
आजच यातले बरेच अनुभवले.काल (मूड आला म्हणून) 3 पर्यंत जागून केलेले काम, आज कार्तिकी चा उपास आणि काल जागताना भूक लागली म्हणून खाल्लेली कराचीची 2 बिस्किटं आणि संत्रे.
या सगळ्या कॉम्बिनेशन ने आज प्रचंड डोकेदुखी. मग 11.30 ला सरळ मेल करून लिव्ह टाकून झोपले.दिवसभर खूप उलट्या झाल्या.उरलेला वेळ झोप.त्यामुळे कार्तिकी चा उपास आपोआपच न खाता घडला.
व्यवस्थित झोप दिवसभर घेतली, आणि उपास सर्वांनी पूर्ण दिवसाचा न करता रात्रीच सोडून व्यवस्थित गरम वरणभात लावला आणि नवऱ्याने केलेली कांदा बटाटा भाजी खाल्ली.आता एकदम फ्रेश वाटतेय.आज जागून काम पूर्ण वगैरे करायच्या लफडयात न पडता लगेच झोपून उद्या शांत मनाने काम करेन.
मी आधी अशी नव्हते.कितीही बरं नसुदे, कमिटेड काम किंवा मीटिंग केलीच पाहिजे असं होतं.
बाप रे!! खूप त्रास झाला आहे.
बाप रे!! खूप त्रास झाला आहे.
वाचते आहे. तुम्हाला आराम पडलेला असावा हीच सदिच्छा.
माझी एक कलीग होती.. तिला
आयुर्वेद वैद्यांंकडून दीर्घकालीन उपचार घ्यावेत...खूप उपयोग होईल.
Pohe,batata,turdal, chinch,
Pohe,batata,turdal, chinch, shijlela tomato ajibat khau naye ani pani bharpur pit rahave
Ratri lavkar jevave, usher zala tar kam khave
Sorry mobile bar in marathi nahi type karata yet
पित्त होण्याची कारणे
पित्त होण्याची कारणे प्रत्येक व्यक्ती साठी वेगळी असतात. त्यामुळे सर्वसाधारण
कारणांपैकी आपली कारणे कोणती हे खूप निरिक्षण करून शोधावे लागते.
तसेच वापरलेल्र्या सर्व औषधांपैकी आणि पत्थ्यांपैकी आपल्याला कोणते उपयुक्त ठरते ते ही नीट निरिक्षण करून ठरवावे ....
इथे प्रतिसाद देणाऱ्या
इथे प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार.
माझी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन झाली होती त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
खरंतर हा सगळा प्रकार जरा वेगळा आहे /होता.
मी ह्या मालिकेचा अंतिम भाग लवकरच टाकणार आहे त्यात बर्याचश्या गोष्टींचा उलगडा होईल.
स्वानुभवावरून बोलते आहे खाणं
स्वानुभवावरून बोलते आहे खाणं पिणं सांभाळा, स्ट्रेस लेवल सांभाळा, too much hyper होऊ नका, ओव्हर excitement मुळे पण acidity trigger होते
पोहे ब्रेड इडली चिवडा तळकट पदार्थ बाहेरचं खाणं इत्यादी टाळाच
मुख्य म्हणजे स्वतःला काय चालत आणि काय चालत नाही ते नोट करा आणि ते करणं टाळा
ऍसिडिटी नाही होतं, मला ओमेझ ४० ची गोळी रोज घ्यावी लागत होती, पण हे सगळं follow करून आता जास्त
त्रास होत नाही