खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह.. हि भाजी इकडे पण मिळते.. नाव वेगळे असावे, मी भाजीवालीकडे बर्याचदा पाहिली आहे.माहीत नसल्यामुळे कधी घेतली नाही.. नाव विचारेन पुढल्या वेळी.
नॉर्मली मेथीची भाजी करतात तशीच करायची का?

ह्याला बारीक मेथीपण म्हणतात . कडवटपणा भरपूर असतो >> माझी सगळ्यात आवडती पालेभाजी.. कडवटपणा कमी करण्यासाठी जास्त कांदा घालायचा आणि एकदा का मेथी चिरून कांद्याच्या फोडणीत घातली की परतायची नाही.

नॉर्मली मेथीची भाजी करतात तशीच करायची का?.....हो लसणाची फोडणी करून भरपूर कांदा, ओल्या मिरचीवर चिरलेली मेथी घालायची.पाणी आटले की ओले खोबरे , चिम टीभर साखर घालायची.

एकदम सोप्पी कृती
अंडी उकडलेली, ब्राऊन/सैन्डवीच ब्रेड,
चटणीसाठी, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, ओले खोबरे लिंबू, मीठ.
सजावटीसाठी गोल कांदा कापून, गाजर किसून, टोमॅटो सॉस.
ब्रेड ला बटर/तूप लावून दोन्ही बाजूने तव्यावर भाजून घ्या
भाजलेल्या ब्रेडला एका साईडने पुदिना चटणी लावून घ्या मग एका अंड्याच्या चकत्या कापून मधे ठेवा, वर गाजराचा किस, गोल कांदा ठेवा, दुसऱ्या ब्रेडला पण एका बाजूने चटणी लावा आणि पहिल्या ब्रेडवट ठेवा. तिरके कापा आणि सॉसबरोबर खाऊन घ्या.. मस्त लागते Happy

सान्वी तुझ्यासाठी हा फोटो
IMG_20201116_171453.JPG

काय मस्त सैंडविच आहे.
पनीर वाटणा gravy मस्त दिसत आहे.
सूरणा चे काप पण मस्त. मला खुप आवडतात.

थँक्स अमुपरी

पनीर मटर मस्तच..
सुरण म्हणजे elephant's foot म्हणतात तेच का? मी त्याचे फक्त लोणचं खाल्ले आहे.. काप छान दिसताएत.

IMG_20201117_123639.JPG

होसुरची (जुगाडु) मिसळ Happy
खाऊगल्लीतल्या मिसळीच्या फोटोवरून प्रेरित होऊन बनवली..जाऊ द्या कशी का असेना..वाटलं जरा मिसळ पाव खाल्ल्यासारखे, Lol फक्त पाव जरा गोड होते पण इकडे असेच मिळतात..

२०००

पाणीपुरी दहीवडे मस्त.
चिकन बिर्याणी भारी झालीये.
Kazumi समोसा tempting आहे.
Mrunali जुगाडु मिसळ मस्त जमलीआहे.

सगळे पदार्थ एकाहून एक सरस आहेत..
आवडीचा दहिवडा पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलयं ...

मिळत तर काही नाही उगाच तोंपासु >> Lol
आणि आपण बघताना शेजारून कुणी डोकावलं की ' करत जा ना असलं काहीतरी ' हा फु स.

Pages