खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा आता करून दाखवायचे !

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 October, 2020 - 05:05

दसर्‍याला नवीन घरातल्या नवीन देव्हार्‍यात नवीन देवांची स्थापना केली. गुरुजीही यंदा कोरोनामुळे नवीनच बोलावले. बायकापोरे नवीन कपडे घालून तयार होते. मी मात्र आजारी असल्याने जुनेच कपडे घातले होते.

गुरुजी आले. नमस्कार चमत्कार झाले. फारसे आदरातिथ्य करायची संधी न देता थेट कामाला लागले. ताट ताम्हाणात देव मांडले. आसन अंथरले. तीर्थ हळद कु़ंकू फुले सारे जागच्या जागी ठेऊन आम्हाला म्हटले चला या पूजा करून घेऊया. मला कल्पनाच नव्हती की असे पूजेलाही बसावे लागेल. अन्यथा आजारी असताना मी स्वत: न बसता आईवडिलांना बसवले असते. पण काही कळायच्या आधी पूजा सुरूही झाली होती.

मग प्रत्येक देवाचा अभिषेक, आधी पाण्याने, मग दूधाने, मग पंचामृताने, मग पुन्हा पाण्याने, मग हारफुले हळदकुंकू, सोबत मंत्रपठण, ते आपणही त्या गुरुजींच्या मागोमाग उच्चारायचे. दमछाक सुरू झाली. थोड्या वेळाने घश्यातून आवाज फुटायचा बंद झाला, कसे बसे पुटपुटू लागलो, देवाचा अभिषेक करताना चमचा उचलणेही ईतके जड वाटू लागले की अर्धाच भरू लागलो. तो देखील देवापर्यंत पोहोचेपर्यंत अर्धा सांडू लागला. देवाचा दिवा विझू नये म्हणून फॅनचा स्पीड मंदावला असल्याने आधीच आजारी असलेल्या मला उष्माघाताचाही भारी त्रास होऊ लागला. अगरबत्तीचा धूरही नकोसा वाटू लागला. गुरुजी काय बोलत होते ते डोक्यात शिरायचे बंद झाले. मग काहीतरी भलतेच करायचो, मग पुन्हा चूक सुधारून बरोबर करायचे, रिवर्कही वाढू लागले, आणि या सर्वात माझी अर्धांगिनी, माझी धर्मपत्नी,, माझी सहचारीणी, माझी कायद्याने असलेली आयुष्याभराची जोडीदार माझी बायको मात्र नुसते माझ्या हाताला हात लाऊन मनातल्या मनात मम म्हणत होती आणि गाल्यातल्या गालात हसत होती.

अखेर हि शिक्षा एकदाची संपली. आणि फायनल आरती सुरू झाली. ताम्हाणात कापूर टाकून भटजींनी दिवा पेटवला पण तोपर्यंत माझा दिवा मात्र विझला होता. मोठ्या कष्टाने ते आरतीचे ताट उचलले. बायकोने पुन्हा नावापुरते माझ्या हाताला हात लावला. आणि आरती सुरू झाली. मी कसेबसे ताट फिरवू लागलो. जसजशी आरती पुढे सरकत होती तसे माझा हात छातीच्या पुढे जातच नव्हता. जणू मी स्वतःचीच आरती ओवाळतोय असे वाटत होते. ते बघून अखेरीस बायको चिडली. तसे मी सुद्धा ते आरतीचे हात सॉरी ताट तिच्या हातात ठेवले आणि म्हटले आता तूच फिरव, ममगिरी मी करतो. मग ती आरती करू लागली आणि मी दाखवण्यापुरते तिच्या हाताला हात लावला. एकवार गुरूजींकडे पाहिले त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. तरीही एकदा विचारून कन्फर्म केले. तसे ते म्हणाले,
बंधू, देवाला सगळे समान !

बस्स त्याच क्षणाला ठरवले आता यापुढे घरातील सर्व पूजा अर्चा जिथे उगाच पुरुषाला पुढे ढकलले जाते तिथे बायकोला पुढे करायचे आणि आपण फक्त मम म्हणायचे. खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा
आता करून दाखवायचे !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाळणाघरांमधे सांभाळणारे पुरुष असतील तर आपण आपल्या बाळांना तिथे सोडून ऑफिसला जाऊ शकू का??
>>
का नाही? मला मुद्दाच कळला नाही.
पुरुष काही त्रास देतील म्हणून का? की पुरुष मुलांचं नीट पाहून शकत नाहीत म्हणून?
शिकवले , समजावून घेतले तर लग्न न झालेले, मूल बाळ नसलेले पुरुषही नीट सांभाळू शकतील की. पाळणाघरात बायकाही हलगर्जीपणा करू शकतात.
हलगर्जीपणा ही काही फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही.

>>लॉन मोईंग करतात, बर्फ साफ करतात, घराच्या छपरावर चढून गटर्स साफ करतात?>>
गटर्स साफ करायला रोज लागत नाहीत. वर्षातून एकदा सर्विस प्रोवायडर ते काम करतो. सध्या वर न चढण्याचे कारण गुढगे. लॉन मोइंग आणि स्नो रिमुवल रुटिन काम, त्यात स्त्रीला न जमण्यासारखे काय आहे? तसे बघायला गेले तर तुम्ही बहूतेक कामे आउटसोर्स करु शकता. प्रश्न पैसे देवूनही सेवा मिळवणे शक्य नाही असे होते तेव्हाचा आहे. त्यातही काही गोष्टी जरा जास्तच आवश्यक असतात. उदा. अन्न.
लॉन मोइंग आणि स्नो रिमुवलमधेही गवत चार दिवस उशीरा कापून चालेल, ड्राईव वे मधल्या स्नोचे तसे नाही. तुम्हाला बाहेर जायचे असेल तर तो काढता येणे गरजेचे. दर वेळी लगेच स्नो रिमुवल सर्विस उपलब्ध होईलच असे नाही.
नवरा-बायकोनी मिळून घर कसे चालवावे तो शेवटी त्यांचाच प्रश्न आहे. रुचेल ते काम केले आणि बाकी आउटसोर्स हे देखील ठीकच. मात्र घर आणि नोकरी या दोन्ही आघाड्यांवर लढायला लागल्याने स्त्रीची फरफट होत असेल, स्त्रीला संधी गमावायला लागत असेल, तर कामाच्या वाटणीचा विचार गरजेचा.

>पाळणाघरांमधे सांभाळणारे पुरुष असतील तर आपण आपल्या बाळांना तिथे सोडून ऑफिसला जाऊ शकू का??>> तुम्हाला बाळासाठी पुरुष डॉक्टर चालतो ना? मग प्रशिक्षित पुरुष बाळ संभाळायला का चालणार नाही? इथे डेकेअर सेंटरला प्रशिक्षित स्त्रीया आणि पुरुष दोन्ही असतात.

पाळणाघर चालवणारे पुरुष कुठे बघितले नाहीत..जर असतील तर त्या पाळणाघरांंना ग्राहक मिळतील का? असा प्रश्न आला मनात म्हणून विचारले इतकेच.

पाळणाघर चालवणारे पुरुष कुठे बघितले नाहीत>>
हीच धारणा बदलली जायला पाहिजे अशी चर्चा सुरू आहे ना.
बाळाला स्त्रीच सांभाळू शकते , पुरुषांमध्ये त्या भावना कमी आहेत या गैर समजुतीने पाळणाघर चालवणं बायकांचं काम ठरलंय.
जसं आधी स्त्रियांचे केस कापणे , फेशिअल पुरुष करत नसत, पण त्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळाल्यावर, प्रोफेशनालिझम आल्यावर स्त्रियांनी पुरुषांकडून केस कापून घेणे, मॅनीक्यूअर, पेडीक्युअर करून घेणे वगैरे नॉर्मल वाटायला लागले तसेच पाळणाघरांच्या बाबतीतही होऊ शकते.
आज चहा, वडापाव, भेळ यांच्या दुकानांच्या चेन्स निघतात, त्या व्यवसायाचं स्वरूप बदलून गेलंय तसंच पाळणाघरांचंही होऊ शकतं.

मृणाली,
माझ्या ओळखीत दोन घरगुती पाळणाघरे होती. कर्त्या पुरुषाची नोकरी गेली (कंपनी बंद पडली) म्हणून नवरा-बायको मिळून चालवायचे. मुलांच्या जेवणाचीही सोय होती. सकाळच्या वेळात बायको मुलांच्या स्वयंपाकात गुंतलेली असे आणि नवरा मुले संभाळत असे. त्यातल्या एकांचे छान पुढे वरांडा आणि अंगणवाले घर होते . एक छोटे बाळ आणि बाकीची ३ + वयाची मुले संभाळत. बरेचदा ते काका बाळाला कडेवर घेवून बाहेर बसलेले आणि मोठी मुलं अंगणात खेळताना असे दिसायचे. एकटी स्त्री , घरगुती पाळणाघर चालवते या सेटअप पेक्षा काका सतत लक्ष द्यायला असतात, मुलांना खेळवतात या कारणास्तव दोन्ही पाळणाघरांना जास्त डिमांड होती.

पाळणाघर स्त्री-पुरुष कोण चालवत आहे याने फरक पडू नये. कशाप्रकारे चालवले जाते ते महत्वाचे.

<< लॉन मोइंग आणि स्नो रिमुवल रुटिन काम, त्यात स्त्रीला न जमण्यासारखे काय आहे? >>
बरोबर. स्वयंपाकपण रुटीन काम, त्यात पुरुषाला न जमण्यासारखे काय आहे?

<< नवरा-बायकोनी मिळून घर कसे चालवावे तो शेवटी त्यांचाच प्रश्न आहे. >>
हे इतकेच म्हणणे होते. धन्यवाद.

>>हे इतकेच म्हणणे होते. धन्यवाद.>>

नाही. तुम्ही फेमिनाझी वगैरे लिहिलेत आणि माझ्या लेखनातला
>>घर आणि नोकरी या दोन्ही आघाड्यांवर लढायला लागल्याने स्त्रीची फरफट होत असेल, स्त्रीला संधी गमावायला लागत असेल, तर कामाच्या वाटणीचा विचार गरजेचा.>> हा भाग सोईस्करपणे गाळून त्यातला अर्धाच भाग डकवलात.

असो.

मोठ्या प्रमाणात जिथे जेवण बनवले जाते ते पुरुष च बनवतात अपवाद म्हणून स्त्री चे एकदोन उदाहरण असू शकतात.
पण हॉटेल,लग्न समारंभ,मोठ्या पार्ट्या इथे पुरुष च जेवण बनवतात.
ह्याचे काय कारण असावे.
सर्व च्या सर्व हॉटेल चे कूक पुरुष च असतात.
सुतार काम,गवंडी काम, प्लंबर,वायरमन,अशा क्षेत्रात तर स्त्रिया जवळ जवळ नाहीतच.
एसी repair,freeze repair, गाड्या रिपैरींग ह्या क्षेत्रात पण नाहीत.
कष्टाची कामं टाळण्याचा हा प्रकार आहे काय?

२०१३ ची आकडेवारी सांगते की ८०% शेतीची कामे स्त्रीया करतात
>>>>>
मला कुठे बघायला मिळतील हे आकडे.
ईटरेस्टींग आहेत. कदाचित लावणी पेरणी कापणी वगैरे ठराविक कामासंदर्भात आहेत का?

बातमी शेतकर्‍याच्या आत्महत्येची येते कारण शेतीवर नाव त्याचे असते.
>>>
स्वाती, मला हे वाक्य समजले नाही. बातमी शेतकर्‍याच्या आत्महत्येची येते कारण आत्महत्याही तोच करतो ना? त्याच्या नावावर शेती आहे म्हणून तो आत्महत्या करतो म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे? फार तर त्याच्या नावावरची शेती जप्त होईल. त्याला तुरुंगवास होईल. मग आत्महत्या का करावी त्याने?

तसेही क्विंटलची गोण तर पुरुषही आणत नाहीत पाठीवरुन. तसे ओझे उचळणारे वेगळे कामगार असतात ते घरी आणून देतात.

>>>>

आणि मला वाटते हे वेगळे कामगारही कोणाचे तरी नवरे असतात, बायका नाही Happy

ऋन्मेष,
मी जिथे वाढले त्या भागात स्त्री-पुरुष दोघेही हे काम करत . संघटीत माथाडी असा प्रकार नव्हता. एकट्याला जमत नसे, दोन कामगार लागत. आधीच गरीबी त्यात मजूरी विभागली जाऊ नये म्हणून बरेचदा नवरा-बायको किंवा दोघं भाऊ असे मिळून काम करत.

आत्महत्येच्या बाबतीत पिडीत शेतकरी म्हणून नोंद होण्यासाठी सरकारात कागदपत्रे द्यावी लागतात. मदत मिळवण्यासाठी बरेच हेलपाटे घालावे लागतात. स्त्रीच्या (पत्नीच्या) नावावर शेतच नसेल तर तिची आत्महत्या पिडीत शेतकरी म्हणून कशी नोंदतील? फारतर गरीबीला कंटाळून आत्महत्या म्हणतील.

तुम्हाला शेतीकामाबद्द्ल आकडेवारी हवी असेल तर महाराष्ट्रात याबाबत काम करणार्‍या संस्था/संघटना सद्य स्थिती सांगू शकतील. मध्यंतरी ऊसतोडणी करणार्‍या महिला कामगारांची करुण कहाणी वाचली. https://www.newindianexpress.com/nation/2019/aug/29/over-13000-female-su...

तुम्हाला शेतीकामाबद्द्ल आकडेवारी हवी असेल तर महाराष्ट्रात याबाबत काम करणार्‍या संस्था/संघटना सद्य स्थिती सांगू शकतील.
>>>>>
आपण वर लिहिलेली पोस्ट - २०१३ ची आकडेवारी सांगते की ८०% शेतीची कामे स्त्रीया करतात - मला फक्त या आकडेवारीबद्दल माहिती हवी आहे, ती आपण कुठे पाहिली तेवढी लिंक पुरेशी आहे.

आधीच गरीबी त्यात मजूरी विभागली जाऊ नये म्हणून बरेचदा नवरा-बायको किंवा दोघं भाऊ असे मिळून काम करत.
>>>
नवरा बायकोत वजन उचलणे ५०-५० टक्के व्हायचे का?

आपले बहुतांश प्रतिसाद आमच्याईथे असे म्हणून सुरू होत आहेत. मला तरी बहुतेक ठिकाणी कुठे माथाडी कामगार वा हमाल कुली वगैरे वा गेला बाजार सिलेंडर आणून देणरे महिला सापडले नाहीत.

आता मी नवीन घरात आलो आहे, त्या निमित्ताने किचन फर्निचर प्लास्टर सुतारकाम गवंडीकाम लाद्या बसवणे सेफटी डोअर … एक ना दोन हजारो काम केलेत, कुठेही महिलावर्ग आढळला नाही. अपवाद फक्त शेवटी सर्व काम झाल्यावर रूम साफ केली तेव्हा दोन पुरुषांसोबत एक बाई मदतीला होती. अर्थात तिने लादी पुसणे काम केले तर जिथे ग्रिल वगैरे वर चढून पुसायचे काम होते ते पुरुषांनी केले.

मुळात मला या वादात रसही नाही, कारण स्त्री पुरुष यांच्या शारीरीक क्षमतेतील फरक नैसर्गिक आहे हे उगाच हट्टाने ईथे अमान्य केले जाते आहे.

यात आणि मी तो फरक प्रामाणिकपणे दाखवताच मी या कारणास्तव स्त्रियांना कमी लेखतोय असाही त्या प्रतिसादांचा अर्थ काही लोकं घेण्याची शक्यता आहे Happy

ऋन्मेष ही मंडळी संघटीत माथाडी कामगार नव्हती हे मी वर लिहिलेच आहे. माझ्या आठवणी या जवळ जवळ ३० वर्षांंपूर्वीच्या एका लहान गावातल्या.
शेतीची मी दिलेली आकडेवारी मी जुनी आहे. मी वाचली होती तेव्हा मलाही नवल वाटले होते . सर्वच गोष्टींच्या लिंका जालावर असतातच असे नाही. शेतीचा मुद्दा तुम्ही मांडलात. तुम्हाला माहितीची गरज असेल तर तुम्ही शोधू शकता. नैसर्गिक क्षमतेतला फरक हे तुम्ही आत्ता म्हणत आहात आधी तुमचा मुद्दा शेतकरी आणि त्याच्या बायकोत कामाची वाटणी हा होता. तुम्हाला वाद घालायचाच असेल तर तुम्ही घालू शकताच.

बाकी घर दुरुस्तीच्या कामाबद्द्ल बोलायचे तर योग्य शिक्षण आणि संधी मिळाली तर ती कामे देखील स्त्रीया करु शकतात. तुम्ही बघितल्या नाहीत म्हणजे तशी कामे स्त्रीया करुच शकत नाहीत/ करत नाहीत असे नाही. मी माझ्या अनुभवातून सांगत असेल तर आमच्या इथे असेच म्हणणार ना!

मला वाटले तुम्हाला खरेच माहिती हवी आहे, पण माझा तो गैसमज होता. माझ्या बाजूने ही शेवटची पोस्ट!

स्वाती,
३० वर्षांपूर्वीच्या लहान गावातील आठवणींवरून आपण आपला मुद्दा मांडत आहात तर मला आणखी काही बोलायची गरजच नाही असे वाटते.

तुम्ही एखादी नवल वाटणारी ८० टक्के शेतीकामे कामे स्त्रिया करतात अशी बातमी लिहिली तर त्याची लिंक मी मागणे स्वाभाविक आहे.
त्यावर
"तुम्हाला माहितीची गरज असेल तर तुम्ही शोधू शकता आणि मला वाटले तुम्हाला खरेच माहिती हवी आहे, पण माझा तो गैसमज होता"
हि उत्तरे न पटणारी आहेत.

असो, माझ्यासाठी ईतके पुरेसे आहे.
शुभरात्री Happy

शेतीकाम हे स्त्रिया च जास्त करतात हे सत्य आहे.
शेतीची बरीच काम ही पायावर बसून किंवा खाली वाकून करावी लागतात .
आणि ह्या दोन्ही कामात स्त्री ची शारीरिक क्षमता पुरुषानं पेक्षा खूप जास्त आहे.
पायावर जितक्या वेळ स्त्रिया बसू शकतात तितक्या वेळ पुरुष बसू शकत नाहीत.
त्याला कमरेची असलेली विशिष्ट ठेवणं जबाबदार असावी .
त्या मुळे शेती ची 80 टक्के काम स्त्रिया करतात ह्या मता शी सहमत.

दसरा संपून आता दिवाळी आली
कुछ नया हो जाये म्हणत सर्व पूजा वगैरे गोष्टीत एकमेकांचे रोल्स एक्चेंज करून एक नवीन धागा होवुन जाऊ दे आता.

भाकरी आलीच पाहिजे!
सध्याचे माबोवरचे दोनचार धागे वाचुन वाचुन माझ्या घरी भांडणं होऊ लागलेत.

"स्त्री पुरुष यांच्या शारीरीक क्षमतेतील फरक नैसर्गिक आहे" हा मुद्दा https://fairplayforwomen.com/biological-sex-differences/ या पानावर काही ठिकाणी सपोर्टींग लिंक्स देउन चांगला मांडला आहे.

जेव्हा आपण स्त्री आणि पुरुष या अतिशय ढोबळ Categories बोलत आहोत, तेव्हा अपवादात्मक उदाहरणं न वापरता व्यापक जनतेवरील सरासरी बघायला हवी ना. पुरुष सरासरी दृष्ट्या स्त्रीयांपेक्षा उंच असतात, पुरुषांमध्ये स्नायुंचं प्रमाण जास्त असतं, पुरुषांमध्ये Testosterone चं प्रमाण जास्त असतं.... आणि या अनुषंगाने येणार्‍या शारिरीक क्षमता पुरुषांमध्ये स्त्रीयांपेक्षा वेगळ्या असतात.

Disclaimer: हा धागा निव्वळ लोकांना उचकवायला काढला आहे याच्याशी सहमत.

शेतीची बरीच काम ही पायावर बसून किंवा खाली वाकून करावी लागतात .
आणि ह्या दोन्ही कामात स्त्री ची शारीरिक क्षमता पुरुषानं पेक्षा खूप जास्त आहे.
>>>>

रोचक
अजून जाणून घ्यायला आवडेल.
किंबहुना निसर्गाने स्त्रियांना कुठल्या बाबी पुरुषांपेक्षा जस्त क्षमतेच्या दिल्या आहेत यावर स्वतंत्र धागा हवा

शेतीची बरीच काम ही पायावर बसून किंवा खाली वाकून करावी लागतात .
आणि ह्या दोन्ही कामात स्त्री ची शारीरिक क्षमता पुरुषानं पेक्षा खूप जास्त आहे.
>>>>

रोचक
अजून जाणून घ्यायला आवडेल.
किंबहुना निसर्गाने स्त्रियांना कुठल्या बाबी पुरुषांपेक्षा जस्त क्षमतेच्या दिल्या आहेत यावर स्वतंत्र धागा हवा

शेतीची बरीच काम ही पायावर बसून किंवा खाली वाकून करावी लागतात .
आणि ह्या दोन्ही कामात स्त्री ची शारीरिक क्षमता पुरुषानं पेक्षा खूप जास्त आहे.
>>>>

रोचक
अजून जाणून घ्यायला आवडेल.
किंबहुना निसर्गाने स्त्रियांना कुठल्या बाबी पुरुषांपेक्षा जस्त क्षमतेच्या दिल्या आहेत यावर स्वतंत्र धागा हवा

शेतीची बरीच काम ही पायावर बसून किंवा खाली वाकून करावी लागतात .
आणि ह्या दोन्ही कामात स्त्री ची शारीरिक क्षमता पुरुषानं पेक्षा खूप जास्त आहे.
>>>>

रोचक
अजून जाणून घ्यायला आवडेल.
किंबहुना निसर्गाने स्त्रियांना कुठल्या बाबी पुरुषांपेक्षा जस्त क्षमतेच्या दिल्या आहेत यावर स्वतंत्र धागा हवा

300

Pages

Back to top