दसर्याला नवीन घरातल्या नवीन देव्हार्यात नवीन देवांची स्थापना केली. गुरुजीही यंदा कोरोनामुळे नवीनच बोलावले. बायकापोरे नवीन कपडे घालून तयार होते. मी मात्र आजारी असल्याने जुनेच कपडे घातले होते.
गुरुजी आले. नमस्कार चमत्कार झाले. फारसे आदरातिथ्य करायची संधी न देता थेट कामाला लागले. ताट ताम्हाणात देव मांडले. आसन अंथरले. तीर्थ हळद कु़ंकू फुले सारे जागच्या जागी ठेऊन आम्हाला म्हटले चला या पूजा करून घेऊया. मला कल्पनाच नव्हती की असे पूजेलाही बसावे लागेल. अन्यथा आजारी असताना मी स्वत: न बसता आईवडिलांना बसवले असते. पण काही कळायच्या आधी पूजा सुरूही झाली होती.
मग प्रत्येक देवाचा अभिषेक, आधी पाण्याने, मग दूधाने, मग पंचामृताने, मग पुन्हा पाण्याने, मग हारफुले हळदकुंकू, सोबत मंत्रपठण, ते आपणही त्या गुरुजींच्या मागोमाग उच्चारायचे. दमछाक सुरू झाली. थोड्या वेळाने घश्यातून आवाज फुटायचा बंद झाला, कसे बसे पुटपुटू लागलो, देवाचा अभिषेक करताना चमचा उचलणेही ईतके जड वाटू लागले की अर्धाच भरू लागलो. तो देखील देवापर्यंत पोहोचेपर्यंत अर्धा सांडू लागला. देवाचा दिवा विझू नये म्हणून फॅनचा स्पीड मंदावला असल्याने आधीच आजारी असलेल्या मला उष्माघाताचाही भारी त्रास होऊ लागला. अगरबत्तीचा धूरही नकोसा वाटू लागला. गुरुजी काय बोलत होते ते डोक्यात शिरायचे बंद झाले. मग काहीतरी भलतेच करायचो, मग पुन्हा चूक सुधारून बरोबर करायचे, रिवर्कही वाढू लागले, आणि या सर्वात माझी अर्धांगिनी, माझी धर्मपत्नी,, माझी सहचारीणी, माझी कायद्याने असलेली आयुष्याभराची जोडीदार माझी बायको मात्र नुसते माझ्या हाताला हात लाऊन मनातल्या मनात मम म्हणत होती आणि गाल्यातल्या गालात हसत होती.
अखेर हि शिक्षा एकदाची संपली. आणि फायनल आरती सुरू झाली. ताम्हाणात कापूर टाकून भटजींनी दिवा पेटवला पण तोपर्यंत माझा दिवा मात्र विझला होता. मोठ्या कष्टाने ते आरतीचे ताट उचलले. बायकोने पुन्हा नावापुरते माझ्या हाताला हात लावला. आणि आरती सुरू झाली. मी कसेबसे ताट फिरवू लागलो. जसजशी आरती पुढे सरकत होती तसे माझा हात छातीच्या पुढे जातच नव्हता. जणू मी स्वतःचीच आरती ओवाळतोय असे वाटत होते. ते बघून अखेरीस बायको चिडली. तसे मी सुद्धा ते आरतीचे हात सॉरी ताट तिच्या हातात ठेवले आणि म्हटले आता तूच फिरव, ममगिरी मी करतो. मग ती आरती करू लागली आणि मी दाखवण्यापुरते तिच्या हाताला हात लावला. एकवार गुरूजींकडे पाहिले त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. तरीही एकदा विचारून कन्फर्म केले. तसे ते म्हणाले,
बंधू, देवाला सगळे समान !
बस्स त्याच क्षणाला ठरवले आता यापुढे घरातील सर्व पूजा अर्चा जिथे उगाच पुरुषाला पुढे ढकलले जाते तिथे बायकोला पुढे करायचे आणि आपण फक्त मम म्हणायचे. खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा
आता करून दाखवायचे !
इथे शेवटची पोस्ट लिहून गेले
इथे शेवटची पोस्ट लिहून गेले होते, मात्र माझ्या साठी स्त्री-पुरुष समानता हा मानवी हक्काचा भाग आहे, सवंग टिआरपी खेचायचा विषय नव्हे. कामाच्यानिमित्ताने एक दुवा मिळाला.
https://www.firstpost.com/living/widows-of-vidarbha-highlights-the-lesse...
मी वर दिलेली आकडेवारी या वरच्या लेखात मिळेल.
स्वाती२, तुमच्यात भलता पेशंस
ऑक्सफॅम ही जागतिक संघटना भारतात काम करते - https://www.oxfamindia.org/women-empowerment-india-farmers ही त्यांची आकडेवारी. तुम्ही लिहीले त्याशी सुसंगतच आहे. महिला अन्न पिकवण्यात मोठा वाटा उचलतात.
(आकडेवारीवर सुई अटकली तर कुणीही मला हाक द्या. जमेल तशी मदत करेन.)
इथे एक विचार असा वाचला की "१
इथे एक विचार असा वाचला की "१ मुलगा आणि १ मुलगी असेल तर पालकांनी स्वकष्टाचे पैसे दोघांना निम्मे-निम्मे द्यायलाच पाहिजेत, याच्याशी मी सहमत नाही. स्वकमाई असेल तर त्यांना पाहिजे ते करता आले पाहिजे."
आता बहुतेक देशात कायद्यानुसार पालकांना स्वकमाईचे वाटप कसेही करता येते. त्यात नवीन काही नाही. पण पूर्ण कायदेशीर स्वातंत्र्यासह येणारी नैतिक जबाबदारी काय आहे? स्थळ-काळ परत्वे जमेल तसे समान वाटप करावे. काही घरात मुलाला रहाते घर तर मुलीला पैसा-दागिने दिले जातात. क्वचित मुलीऐवजी तिच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे ठेवतात. अगदी रूपयाला रूपया मॅच केला नाही तरी मुलीला ही आधार वाटेल असे करावे. आपण मृत्यूपत्र न करता गेलो तर मुलीला अधिकार आहे याची जाणीव ठेवून तजवीज करावी. तिला अधिकार असताना आपणच आपल्या मृत्यूपत्रात तिचा अधिकार हिरावून घ्यायचा ह्यात काय भूषण? कायद्याने स्वातंत्र्य आहेच, तो मुद्दा नाही. पण ते स्वातंत्र्य कसं उपभोगणार हा खरा प्रश्न आहे.
(डिस्क्लेमर: आग्रह नाही, जजमेंट नाही. केवळ सुचवणे आहे.)
<< नैतिक जबाबदारी >>
<< नैतिक जबाबदारी >>
ओह, Now we are opening Pandora's box. सविस्तर लिहिले असते, पण फेमिनिष्टांना आवडणार नाही.
उपाशी बोका, वेळ मिळेल तेव्हा
उपाशी बोका, वेळ मिळेल तेव्हा लिहा. एखादा शब्द अयोग्य वाटला असेल तर सुधारायची तयारी आहे. नैतिक ऐवजी भावनिक जास्त बरोबर बसत असेल कदाचित. पण एकूणात - सम-समान वाटणी असावी ह्यात दुमत नसावे असे वाटले.
)
(फेमिनिष्टांचे फेमिनिष्ट बघून घेतील..
स्वाती २
स्वाती २
८० टक्के कामाची लिंक दिली छान केले. ईतके ईंग्लिश वाचायला अवघड जाते पण त्या आकड्याच्या अनुषंगाने वाचल्या आजूबाजूच्या ओळी.
मुळात बायकांना चूल मूल यातच अडकवले जाते असे जे म्हणतात त्या पार्श्वभूमीवर ते आकडे ऐकून नवलच वाटलेले. किंबहुना आपणही आपल्या पोस्टमध्ये हेच लिहिले होते की आपल्यालाही ते वाचले तेव्हा नवल वाटले होते. मग ते मलाही वाटले त्यात नवल काय.
उलट आपण हे आकडे ईथे देऊन चांगलेच केले.
वर त्या हेमंत यांनीही आपल्या आकडेवारीला दुजोरा देत म्हटलेले की,
शेतीची बरीच काम ही पायावर बसून किंवा खाली वाकून करावी लागतात .
आणि ह्या दोन्ही कामात स्त्री ची शारीरिक क्षमता पुरुषानं पेक्षा खूप जास्त आहे.
त्यावरही मी म्हटलेले की ज्या कामात स्त्रिया अग्रेसर आहेत त्यावर स्वतंत्र धागा निघायला हवा.
पण उगाच शारीरीक क्षमतांबाबतही स्त्रिया नैसर्गिकपणे पुरुषांच्या तोडीस तोड आहेत हे वदवायच्या हट्टाला काही अर्थ नाही. निसर्गाचे भेद मान्य करूनच समानता येऊ शकते.
मला सांगा तुम्ही कधी कोणी विचार केला आहे. जर स्त्री पुरुष शारीरीक क्षमता आणि बळात समान आहेत तर हे वर्षानुवर्षे पुरुषांनी स्त्रियांचे हक्क डावलले, त्यांच्यावर अन्याय केला आहे, ते कश्याच्या जीवावर? पुरुषप्रधान संस्कृती का तयार झाली? स्त्रियांनी ती का खपवून घेतली? कडू असले तरी आधी सत्य स्विकारणे गरजेचे आहे. मगच हि परिस्थिती बदलायचा उपायही मिळेन.
स्त्री पुरुष समानता पुरुषांच्या वरचढ स्वताला सिद्ध करून नाही तर त्यांना सोबत घेऊनच होऊ शकते.
ती कामाच्या समसमान वाटणीने नाही तर एकमेकांच्या कामाप्रती समसमान आदरानेच येऊ शकते. मग कोणीही आपल्याला जमेल ते काम आनंदाने करायला तयार होईल आणि आपसूकच अमुक काम स्त्रियांचेच आणि अमुक काम पुरुषांचेच हे शिक्केही मिटले जातील.
तसेच काहींसाठी स्त्री पुरुष समानता म्हणजे स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देणे ईतकेच असते. पुरुषांचा तिथे विचारच केला जात नाही.
अव्वल उदाहरण म्हणजे हा धागा.
माझ्यासारख्या एखाद्या नास्तिकाला पूजा अर्चा देव धर्माचा कंटाळा आहे. पण शास्त्रानुसार एखादी पूजा पुरुषालाच करायची आहे. म्हणून मग धरा वेठीस. अश्यावेळी त्याने ती टाळून ते काम आपल्या धार्मिक बायकोवर सोपवले तर यातून सुटका हवी तर स्वयंपाक तुलाच करावा लागेल हा आग्रह. त्यातही ऑर्डर करता येणार नाही. दुसरया बाईला सांगता येणार नाही. त्याबदल्यात तुलाच स्वयंपाकच करावा लागेल. आणि नसेल जमत तर बस्स मुकाट्याने पूजेला.
म्हणजे बाई तिला जे काम शारीरीक क्षमतेअभावी जमत नाही ते आऊटसोर्स करू शकते.
पण पुरुषाने एखादे स्त्रियांचे समजले जाणारे काम जमत नसेल तर आऊटसोर्स करू नये तरच तो समानता जपतोय नाहीतर ते ढोंग.
असो, धागा स्वयंपाकाच्या चर्चेवर गेला ते एका अर्थी चांगलेच झाले. हा मुद्दाही प्रकर्षाने पुढे आला.
तो स्वकमाईच्या वाटणीचा मुद्दा
तो स्वकमाईच्या वाटणीचा मुद्दा मध्येच कुठे आला?
प्रत्येक वेळी मुलगा मुलगी असाच विचार का केला पाहिजे?
आमच्याकडे विषय निघाला की मी म्हणतो पोरगी माझी स्मार्ट आहे. मला तिच्या भविष्याची चिंता नाही. पोरगा जरा येडा आहे. गरज पडलीच तर त्याच्या भविष्याची तरतूद करावी लागेल.
समानता म्हणजे दोघांना ईक्वल असे मला वाटत नसून जो कमी पडतोय त्याला मदतीचा जास्त हात देऊन सोबत आणणे. मग ईथे कोण मुलगा आहे आणि कोण मुलगी याचा संबंधच काय. दोन्ही आपलीच लेकरे. आपल्या पैश्याची गरज कोणाला जास्त हे बघावे. आणि त्यानुसार ती भागवावी.
पोरगा..
पोरगा..
>> असे शब्द वापरू नये रे.
दोन्ही आपलीच लेकरे. >> बरोबर,
दोन्ही आपलीच लेकरे. >> बरोबर, म्हणून अधिकाराच्या दृष्टीने ते समान आहेत. आपण मृत्यूपत्र न करता गेलो तर मुलीला समान अधिकार आहे याची जाणीव ठेवून तजवीज करावी. तिला कायदेशीर अधिकार असताना आपणच आपल्या मृत्यूपत्रात तिचा अधिकार हिरावून घ्यायचा ह्यात काय भूषण?
(डिस्क्लेमर: आग्रह नाही, जजमेंट नाही. केवळ सुचवणे आहे.)
आज "एक अपत्य जरा येडे आहे" म्हणून... ते.... उद्या "तिच्या घरी मला थंड पाणी नाही दिले" म्हणून... भेदभाव करणार्याला कुठलेही कारण पुरते.
इथे जरा येडा म्हणजे कुठलीही
इथे जरा येडा म्हणजे कुठलीही विकलांगता नाही, बस्स जरा व्यवहाराला धीट/नेटका अजून झालेला नाही असा अर्थ मी केलेला आहे. (दिव्यांग/मानसिक आजार असलेले अपत्य असेल तर बरेच आडाखे बदलतात हे मान्य आहे.)
<< तिला कायदेशीर अधिकार
<< तिला कायदेशीर अधिकार असताना आपणच आपल्या मृत्यूपत्रात तिचा अधिकार हिरावून घ्यायचा ह्यात काय भूषण? >>
किती पूर्वग्रहदुषित विचार. मुलीला ८०% आणि मुलाला २०% अशी वाटणी मिळू शकते, असा विचार मनात आला नाही का?
अहो पण मी म्हणतोय वाटणी
अहो पण मी म्हणतोय वाटणी करताना मुळातच मुलगा मुलगी हा भेद कश्याला?
एकतर ५०-५० करावी
किंवा यापेक्षा वेगळी करायची असल्यास कोणाला जास्त गरज आहे हे बघून करावी. मग जास्त वाटा मुलाला मिळेना वा मुलीला. मुलगा-मुलगी हा निकषच कशाला ईथे?
हो पण आता गंमत अशी आहे की मुलाला जास्त गरज आहे म्हणून जास्त वाटा दिला तर जग बोलणार बघा यांनी मुलीवर अन्याय केला
>> आपल्यालाही ते वाचले तेव्हा
>> आपल्यालाही ते वाचले तेव्हा नवल वाटले होते.>>
शेतीकामातील स्त्रीयांचा सहभाग मला नवा नाही. मला नवल वाटले ते मालकीहक्काचे प्रमाण इतके कमी आहे त्याचे!
पूजा आणि स्वयंपाकाबद्दल - जर का बाहेरचा स्वयंपाक चालणार असेल तर प्रश्नच मिटला, आउटसोर्स करता येतो. आमच्याकडे तो घरचाच अपेक्षित असतो. पूजा झाली की नैवेद्याचे ताट मांडून आरती आणि मग सगळ्यांचे जेवण. त्यामुळे सकाळी लवकर उठून सगळे मिळून पुजेची तयारी आणि नैवेद्याचा स्वयंपाक करुन पूजा असे असते. यात कामाची वाटणी काटेकोर समानतेने व्हावी अशी अपेक्षा नसते, वयानुरुप कुवतीनुसार सहभाग असतो. स्वयंपाक म्हटला की मोदक वळणे, पुरणपोळ्या लाटणे अशी जास्त कौशल्य लागणारी कामे असतात तशीच तुलनेने सोपी आणि वेळकाढू अशीही कामे असतात. भाज्या चिरणे, उकडलेले बटाटे सोलणे, वाल सोलणे, कोथिंबीर निवडणे, खोबरे खवणणे/किसणे, पुरण यंत्रातून पुरण काढणे, गुळ चिरणे, कुकर लावणे, पापड्/पुर्या तळणे अशा तुलनेने सोप्या कामात घरातील पुरुष आणि १२+ मुले/मुली यांचा सहभाग असेल तरी खूप वेळ वाचतो आणि श्रमही विभागले जातात. घरातील स्त्रीयांनाही स्वयंपाक तयार असल्याने स्वस्थ चित्ताने पूजाविधी ऐकायला बसता येते. अन्यथा बरेचदा बाहेर पूजा सुरु आहे, पूजा ऐकत पुरुष मंडळी बसल्येत, स्त्रीया आत स्वयंपाक वेळेवर पूर्ण करायच्या घाईत आणि मग जेमतेम आरतीला त्यांची उपस्थिती असे होते. हा झाला सहृदयी दृष्टीकोन.
अजून एक मुद्दा - आपल्याकडे जेव्हा पूजा/सण वगैरे असतात, तेव्हा स्वयंपाकात स्त्रीचा सहभाग गृहित असतो. एक्सटेंडेड फॅमिलीत (यात वेगळे रहात असाल तर स्त्रीचे सासर/ माहेर हे देखील आले) जेव्हा एकत्र साजरे करणे असते तेव्हा प्रसंगी कार्यालयीन जबाबदारी मागे ढकलून स्वयंपाकघरात उपस्थिती आवश्यक धरली जाते. मला महत्वाची मिटिंग आहे तेव्हा आरतीपर्यंत पोहोचेन म्हणणार्या पुरुष सदस्यांच्या हुद्द्याचे, कार्यालयीन जबाबदारीचे कौतुक केले जाते आणि तिच गोष्ट स्रीने केल्यास तिला नावे ठेवली जातात, तिच्यावर राग धरला जातो, तिला अपराधी वाटावे असे वागवले जाते. या स्त्रीचा नवरा आरामात गप्पा मारत बसलेला असतो. त्याची केवळ उपस्थिती पुरेशी असते. थोडक्यात तिचे पाय खेचण्याचे होते. दबाव, अपराधी भावना यामुळे कार्यालयीन काम मागे टाकले की दुसर्या बाजूने सहकार्यांसमोर अपेक्षांना खरे उतरणे कठीण होते. फरफट होणार्या या स्त्रीया कुणी परक्या नसतात. आपलीच आई, बायको, वहिनी, बहीण आणि काही काळाने मुलगी थोड्याफार फरकाने ही असमानता अनुभवते. असमानता म्हटले की स्वयंपाकाचा मुद्दा येतो कारण त्यावरुन होणारी फरफट, गृहित धरले जाणे, दिला जाणारा गिल्ट स्त्रीच्या वाट्याला येतो.
स्वाती
स्वाती
कर्रेक्ट
पूजेच्या वेळी आपण म्हणालात ती फरफट होते स्त्रियांची. मी सुद्धा लहानपणी हे अनुभवले आहे.
स्त्री पुरुष अ-समानता तर आहेच या समाजात ती नाकारायचा प्रश्नच उद्भवत नाही.
पण विचार केलात तर याला जोडीने जबाबदार या प्रथाही आहेत,
" आमच्याकडे तो घरचाच अपेक्षित असतो. "
आता कदाचित तुमच्या घरात स्त्री पुरुष मिळूनही हा स्वयंपाक करत असतील, पण तुमच्या आधीच्या पिढ्यांमध्ये हे नक्कीच होत नसेल. चला तेव्हाच्या बायका बाहेर कामावर जाणार्या नसतील आणि घर सांभाळणार्याच असतील, म्हणून पूजेला स्वयंपाक घरचाच हवा या अपेक्षेची पुर्तता त्या करू शकत असतील. पण आता जेव्हा स्त्री पुरुष दोन्ही कामावर जाणारे असतात तेव्हा आजही पूजेला घरचाच स्वयंपाक असावा हा हट्ट का?
म्हणजे मग त्या स्वयंपाकासाठी घरच्या कमावत्या स्त्री पुरुषांना दोघांना आपले काम अॅडजस्ट करावे लागणार. मग ते कोण करणार यावरून वाद.
आणि याला दुसरी बाजूही असते बरे का, पूजेचे स्वयंपाकाचे मलाच बघायचे आहे सांगून ऑफिसातून स्त्रियांना लवकर सोडतातही. पण तेच पुरुषांनी हे कारण सांगितले तर त्यांना ती सूट सहजासहजी मिळत नाही.
आणि हे ऑफिस कल्चर आहेच, आमच्याकडेही आहे. पुरुषांनी घरगुती समारंभाची कारणे न देता, तसेच असेही रोज रात्री उशीरापर्यंत काम करणे अपेक्षित असते.
मला माझ्या मुलीच्या बारश्याला म्हणाले, तुला लवकर जाऊन काय करायचेय, आता बोला
घरचाच अपेक्षित असतो कारण
घरचाच अपेक्षित असतो कारण देवाला नैवेद्य अर्पण करायचा तर साधे मोजके चार पदार्थ असले तरी चालतील पण ते आपण घरी केलेले असावेत ही भावना त्यामागे असते. मनुष्य बळ कमी आणि अन्नाची गरज जास्त असे असते तेव्हा आमंत्रितांसाठीचे अन्न आउटसोर्स आणि साधा वरणा-पुरणाचा तासाभरात होणारा स्वयंपाक घरी करुन त्याचा नैवेद्य देवाला असेही केले आहे. आम्ही जिथे रहातो तिथे भारतीय सणांना सुट्टी वगैरे नसते. त्यामुळे गणपतीच्या दिवशी देवाच्या नैवेद्याला १० मिनीटात होणारी साधी शेवयांची खीर आणि मग सवडीने सुट्टीच्या दिवशी मोदक असे करतो. कार्यालयीन जबाबदार्यांमुळे शक्य नाही तर ओढाताण /वादावादी करुन तो सण त्या दिवशीच साजरा करायचा हट्ट आम्ही करत नाही. नवर्याचे काम पैशाचा मोबदला देणारे म्हणून महत्वाचे आणि माझे स्वयंसेवक म्हणून टाळले तरी चालेल असेही आम्ही करत नाही. जबाबदारी घेतली आहे तर पूर्ण करतो.
ईथे बरीचशी चर्चा पुरुषाच्या
ईथे बरीचशी चर्चा पुरुषाच्या (धागाकर्त्याच्या) स्वयंपाकप्रवेशाकडे वळल्याने म्हणून खाऊगल्लीवर टाकलेली पोस्ट या धाग्याशी संबंधित समजून ईथेही टाकतो.
विशेष काही नाही. गरीबाचा मसालेभात आहे.
पण याची खासियत अशी आहे की हा जवळपास मी बनवला आहे..
म्हणजे झाले असे की आईने मसालेभात करायला भाज्या चिरल्या आणि तिच्या हाताला चमक भरली. बायको तिच्या केक बनवण्यात बिजी होती. मग मी पुढाकार घेतला.
कूकरमध्ये तेल कांदा टाकून आईने सांगितल्या प्रमाणानुसार फोडणी देत मग त्यात भाज्या तांदूळ पाणी वगैरे सारेच आईच्या मार्गदर्शनाखाली टाकून कूकर लावला, काढला, थंड केला आणि स्वत:च्या हाताने सर्वांना भात सर्व्ह केला.
या आधी कधी मसाल्याच्या रंग बघितल्यावर त्या पदार्थाची चवही न घेणारया मुलीने भात मी केला आहे हे ऐकल्यावर तो खाऊन बघितला आणि तिला तो चक्क आवडला. पुन्हा पुन्हा खाल्ला. थोड्यावेळाने तिखट लागला तेव्हा पाणी पिऊन थांबली. पोरगा मात्र तिखटाची पर्वा न करता हावरटासारखा तुटून पडला होता. त्याने पुर्ण पोटभर खाल्ले.
आपण केले आणि पोरांनी खाल्ले हे समाधान मॅगी, पास्ता, सूप वगैरे पदार्थांनी बरेचदा दिलेय. पण भातात ते जरा जास्त मिळाले
मस्तच!! पण आता खुसपट
मस्तच!! पण आता खुसपट काढायचंच म्हणून
- असा आफ्रिका खंडासारखा (continent) अचूक कसा काय वाढला? भातवाढीने वाढला तर डंपर ट्रक उपडा केल्यासारखा पडतो सहसा...
ते थोडा स्टीकी स्टीकी असतो ना
ते थोडा स्टीकी स्टीकी असतो ना.. त्यामुळे शिरयासारखा आला ताटात आणि गेला पोटात..
प्लेट छान आहे.
प्लेट छान आहे.
छान झालाय की ! तुम्ही
छान झालाय की ! तुम्ही पुढाकार घेवून आईला विश्रांती देवू शकलात , पत्नीचीही केक की भात अशी ओढाताण टळली हे फार छान झाले. शिवाय मुलांनी आवडीने खाल्ले, हा बोनस!
हो धन्यवाद आणि खरंय. काहीही
हो धन्यवाद आणि खरंय. काहीही शिकलेले कधीही फुकट जात नाही म्हणतात. दैनंदिन जीवनात आवश्यक अस्सते ते तर नाहीच नाही.
वयाची 30 वर्ष ओलांडून सुद्धा
वयाची 30 वर्ष ओलांडून सुद्धा साधा भात बनवता येत नसेल तर तुमच्या आई वडिलांना तुमचे पालन पोषण किती लाडात केले आहे हेच दिसून येते.
घरातील कोणती च जबाबदारी तुमच्या वर कधीच टाकली नाही हेच दिसून येते.
आणि आपण सुद्धा हीच चूक करत आहे.
मुलांवर कोणतीच घरातील जबाबदारी न टाकणे.
बाहेरची जबाबदारी न टाकणे .
त्या मुळे मुल फक्त मोठी होतात वयाने आणि शिक्षण नी पण ना त्यांना घरातील जबाबदारी काय माहित असते ना त्यांना बाहेरील व्यवहार समजत.
हो खरेय. एकुलता एक असल्याने
हो खरेय. एकुलता एक असल्याने लाड फार झाले. पण ते आईवडीलांनी नाही तर आज्जी आजोबांनी जास्त केले. आईवडील दोघे नोकरीला जायचे. बाकी शिकायला वय नसते. जे आवडते ते, वा गरजेचे वाटेल ते शिकावे, शिकत राहावे...
छान दिसतो आहे भात. वेळेला गरम
छान दिसतो आहे भात. वेळेला गरम अन्न घरचे ताजे मिळाले ना मुलांना बेस्ट झाले. तुम्ही पण एक पाउल स्वयंपाकाच्या दिशेने घेतले त हे बेस्ट.
कोशिंबीर, सलाड, भिजवून उकडलेली कडधान्ये , उकडलेले अंडे, फ्रुट सलाड हे पण मुलांना बनवून देता येइल चौरस आहारा साठी. नॉट मच कुकींग इन्वॉल्व्ड. पण तुम्ही बनवले म्हणून पिल्ले उत्साहाने खातील. केस छान होतील.
धन्यवाद अमा
धन्यवाद अमा
आमच्याकडे मी एक काम करू शकतो हे समजले की ते नेहमी मलाच करायला लावतात म्हणून मी जास्तीचे शिकायला आळस करतो. अन्यथा किचनप्रवेशाची आवडच आहे
तसेच मुलांचेही खाण्याचे बरेच नखरे आहेत. अन्यथा सलाड, सॅंडवीच उकडलेले अंडे किंवा हलकेसे तळलेले ऑमलेट विथ ब्राऊन ब्रेड वगैरे बरेच प्रकार मला सहज जमतात आणि मुले खाणार असतील तर अजूनही शिकायला आवडतील. पण ईटस ॲक्चुअली हाय टाईम. चौरस आणि सकस आहाराच्या सवयी आता त्यांना लावायलाच हव्यात. मी काही केले की मुले एक्स्ट्रा आवडीने खातात हे अनुभवलेय कारण मी ते करतानाच त्यांनाही सोबत घेतो. तर वरचे पदार्थ अधूनमधून बनवून खाऊ घालण्यात मलाच पुढाकार घ्यायला हवा आता...
मी काही उच्चभ्रू कुटुंबात
मी काही उच्चभ्रू कुटुंबात बघितले आहे.
मुलांना सर्व गोष्टी ची माहिती करून दिली जाते.
अगदी रेल्वे आणि बस ह्यांची आयुष्यात कधीच गरज पडणार नाही अशा आर्थिक स्थिती मधील मुलांना.
बस नी कसा प्रवास केला जातो.
तिकीट कसे मिळते,
बस मध्ये कसे उभे राहावे,कसे उतरावे हे प्रॅक्टिकल मध्ये शिकवले जाते.
त्याच प्रमाणे रेल्वे प्रवास,टॅक्सी प्रवास ह्याची पण माहिती दिली जाते.
मुलांना सर्वच आले पाहिजे ह्या मध्ये पोट भरेल एवढं स्वयंपाक सुद्धा आलाच पाहिजे.
छान. मुलांनी आवडीने खाल्ला
छान. मुलांनी आवडीने खाल्ला म्हणजे जमलंच की.
पुढच्या प्रयोगांना शुभेच्छा!
@ हेमंत - +७८६ अगदी सहमत आहे
@ हेमंत - +७८६ अगदी सहमत आहे
आमच्याकडे माझे हे रोज समजावणे असते. मागे मी या मुलांच्या लाडावर एक धागा काढणार होतो. बिजी शेड्यूलमुळे राहिला. घाईगडबडीत काढायचा नव्हता. जमल्यास या विकांताला काढतो.
पीनी धन्यवाद..
आणि हो, भात जमलेलाच. कारण प्रमाण सारे आई ईतकेच होते, सर्व सूचनाही बाजूला उभ्या राहून दिलेल्या आणि अनुवंशिकतेनुसार तिच्या हातची चवही माझ्या हाताला उतरली असेलच
चांगली गोष्ट आहे. आता शक्य
चांगली गोष्ट आहे. आता शक्य असेल तेव्हा काही तरी केलं स्वयंपाक घरात की हात बसेल. मग कमी तिथे आम्ही तत्वावर काम करता येईल.
हो..
हो..
आताच पाच जणांसाठी पास्ता बनवून आलो. पण हे नेहमीचे दोनचार हॉस्टेलाईटस टाईप पदार्थांवर समाधान मानण्यापेक्षा आणि तेच तेच करून बोअर होण्यापेक्षा वेगवेगळे करणे चांगलेच आहे माझ्यासाठीही... त्यामुळे नक्कीच आता या दृष्टीने विचार करेन.
धन्यवाद सर्वांचे हौसला अफजाई केल्याबद्दल
Pages