दसर्याला नवीन घरातल्या नवीन देव्हार्यात नवीन देवांची स्थापना केली. गुरुजीही यंदा कोरोनामुळे नवीनच बोलावले. बायकापोरे नवीन कपडे घालून तयार होते. मी मात्र आजारी असल्याने जुनेच कपडे घातले होते.
गुरुजी आले. नमस्कार चमत्कार झाले. फारसे आदरातिथ्य करायची संधी न देता थेट कामाला लागले. ताट ताम्हाणात देव मांडले. आसन अंथरले. तीर्थ हळद कु़ंकू फुले सारे जागच्या जागी ठेऊन आम्हाला म्हटले चला या पूजा करून घेऊया. मला कल्पनाच नव्हती की असे पूजेलाही बसावे लागेल. अन्यथा आजारी असताना मी स्वत: न बसता आईवडिलांना बसवले असते. पण काही कळायच्या आधी पूजा सुरूही झाली होती.
मग प्रत्येक देवाचा अभिषेक, आधी पाण्याने, मग दूधाने, मग पंचामृताने, मग पुन्हा पाण्याने, मग हारफुले हळदकुंकू, सोबत मंत्रपठण, ते आपणही त्या गुरुजींच्या मागोमाग उच्चारायचे. दमछाक सुरू झाली. थोड्या वेळाने घश्यातून आवाज फुटायचा बंद झाला, कसे बसे पुटपुटू लागलो, देवाचा अभिषेक करताना चमचा उचलणेही ईतके जड वाटू लागले की अर्धाच भरू लागलो. तो देखील देवापर्यंत पोहोचेपर्यंत अर्धा सांडू लागला. देवाचा दिवा विझू नये म्हणून फॅनचा स्पीड मंदावला असल्याने आधीच आजारी असलेल्या मला उष्माघाताचाही भारी त्रास होऊ लागला. अगरबत्तीचा धूरही नकोसा वाटू लागला. गुरुजी काय बोलत होते ते डोक्यात शिरायचे बंद झाले. मग काहीतरी भलतेच करायचो, मग पुन्हा चूक सुधारून बरोबर करायचे, रिवर्कही वाढू लागले, आणि या सर्वात माझी अर्धांगिनी, माझी धर्मपत्नी,, माझी सहचारीणी, माझी कायद्याने असलेली आयुष्याभराची जोडीदार माझी बायको मात्र नुसते माझ्या हाताला हात लाऊन मनातल्या मनात मम म्हणत होती आणि गाल्यातल्या गालात हसत होती.
अखेर हि शिक्षा एकदाची संपली. आणि फायनल आरती सुरू झाली. ताम्हाणात कापूर टाकून भटजींनी दिवा पेटवला पण तोपर्यंत माझा दिवा मात्र विझला होता. मोठ्या कष्टाने ते आरतीचे ताट उचलले. बायकोने पुन्हा नावापुरते माझ्या हाताला हात लावला. आणि आरती सुरू झाली. मी कसेबसे ताट फिरवू लागलो. जसजशी आरती पुढे सरकत होती तसे माझा हात छातीच्या पुढे जातच नव्हता. जणू मी स्वतःचीच आरती ओवाळतोय असे वाटत होते. ते बघून अखेरीस बायको चिडली. तसे मी सुद्धा ते आरतीचे हात सॉरी ताट तिच्या हातात ठेवले आणि म्हटले आता तूच फिरव, ममगिरी मी करतो. मग ती आरती करू लागली आणि मी दाखवण्यापुरते तिच्या हाताला हात लावला. एकवार गुरूजींकडे पाहिले त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. तरीही एकदा विचारून कन्फर्म केले. तसे ते म्हणाले,
बंधू, देवाला सगळे समान !
बस्स त्याच क्षणाला ठरवले आता यापुढे घरातील सर्व पूजा अर्चा जिथे उगाच पुरुषाला पुढे ढकलले जाते तिथे बायकोला पुढे करायचे आणि आपण फक्त मम म्हणायचे. खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा
आता करून दाखवायचे !
खूप छान दिसतोय. किप इट अप
खूप छान दिसतोय. किप इट अप
बस्स आता रडवाल
बस्स आता रडवाल
छान दिसतोय म. भा. बाकी एक काम
छान दिसतोय म. भा. बाकी एक काम येतंय असं दिसल्यावर घरचे नेहमी करायला लावतात हे खरंय. याच कारणामुळे माझा भाचा आपणहून काही वेळा काम करत नाही.

बस्स आता रडवाल Happy -
मसाले भात बनवणे,पास्ता बनवणे
मसाले भात बनवणे,पास्ता बनवणे,आम्लेट बनवणे हे काय काम झाले.
असेच चालता फिरता tp करत हे सर्व बनवता येते.
बस्स आता रडवाल Happy >> अरे
बस्स आता रडवाल Happy >>
अरे तूच रडवलंस हा मसालेभात अपडेट देवून!! एवढ्या ३००-३०० पोस्टी होतात पण खर्या जगात काहीच बदलत नाही. पहिले पाढे पंचावन्न चालू... कुणीतरी असं एक पदार्थ केला, जमला अशी पोस्ट टाकणे म्हणजे मस्तंच वाटतं...
(हा मायबोलीवरचा नवीन ट्रेन्ड असावा. काही आठवड्यापूर्वी पण एका धाग्यावर एकीने बागकाम सुरू केले असा अपडेट दिला होता. करोनाकाळात असं काहीतरी चांगलं घडलं ऐकूनही बरं वाटतं)
मसाले भात बनवणे,पास्ता बनवणे
मसाले भात बनवणे,पास्ता बनवणे,आम्लेट बनवणे हे काय काम झाले.
असेच चालता फिरता tp करत हे सर्व बनवता येते
>>>>
खरंय आपले हेमंत
पुरुष मंडळी हाफिसात जाऊन करतात तेच खरे काम
@ सीमंतिनी,
@ सीमंतिनी,
३००-३०० पोस्ट कधीच फुकट जात नाहीत. येथील चर्चेने नक्कीच बदल घडतो. एखादी नवीन गोष्ट जी आजवर घडायची नाही ती कोणाला करायची असेल तर त्याच्या मनात पहिले हेच येते की लोग क्या कहेंगे. जर ती गोष्ट स्विकारली जात आहे वा तसाच ट्रेंड आहे असे जेव्हा त्या व्यक्तीला अश्या चर्चा वाचून कळते तेव्हा ती मनातली अढी निघून जाते आणि ती अजून एक पाऊल उचलते.
बाकी स्वयंपाकाच्या जबाबदारी बाबत स्त्री पुरुष असमानता बहुतांश समाजात आजही आहे हे मान्य आहेच.
ऋन्मेषसर,
ऋन्मेषसर,

बस्स आता रडवाल
मला नाही लोकांना......
Pages