दसर्याला नवीन घरातल्या नवीन देव्हार्यात नवीन देवांची स्थापना केली. गुरुजीही यंदा कोरोनामुळे नवीनच बोलावले. बायकापोरे नवीन कपडे घालून तयार होते. मी मात्र आजारी असल्याने जुनेच कपडे घातले होते.
गुरुजी आले. नमस्कार चमत्कार झाले. फारसे आदरातिथ्य करायची संधी न देता थेट कामाला लागले. ताट ताम्हाणात देव मांडले. आसन अंथरले. तीर्थ हळद कु़ंकू फुले सारे जागच्या जागी ठेऊन आम्हाला म्हटले चला या पूजा करून घेऊया. मला कल्पनाच नव्हती की असे पूजेलाही बसावे लागेल. अन्यथा आजारी असताना मी स्वत: न बसता आईवडिलांना बसवले असते. पण काही कळायच्या आधी पूजा सुरूही झाली होती.
मग प्रत्येक देवाचा अभिषेक, आधी पाण्याने, मग दूधाने, मग पंचामृताने, मग पुन्हा पाण्याने, मग हारफुले हळदकुंकू, सोबत मंत्रपठण, ते आपणही त्या गुरुजींच्या मागोमाग उच्चारायचे. दमछाक सुरू झाली. थोड्या वेळाने घश्यातून आवाज फुटायचा बंद झाला, कसे बसे पुटपुटू लागलो, देवाचा अभिषेक करताना चमचा उचलणेही ईतके जड वाटू लागले की अर्धाच भरू लागलो. तो देखील देवापर्यंत पोहोचेपर्यंत अर्धा सांडू लागला. देवाचा दिवा विझू नये म्हणून फॅनचा स्पीड मंदावला असल्याने आधीच आजारी असलेल्या मला उष्माघाताचाही भारी त्रास होऊ लागला. अगरबत्तीचा धूरही नकोसा वाटू लागला. गुरुजी काय बोलत होते ते डोक्यात शिरायचे बंद झाले. मग काहीतरी भलतेच करायचो, मग पुन्हा चूक सुधारून बरोबर करायचे, रिवर्कही वाढू लागले, आणि या सर्वात माझी अर्धांगिनी, माझी धर्मपत्नी,, माझी सहचारीणी, माझी कायद्याने असलेली आयुष्याभराची जोडीदार माझी बायको मात्र नुसते माझ्या हाताला हात लाऊन मनातल्या मनात मम म्हणत होती आणि गाल्यातल्या गालात हसत होती.
अखेर हि शिक्षा एकदाची संपली. आणि फायनल आरती सुरू झाली. ताम्हाणात कापूर टाकून भटजींनी दिवा पेटवला पण तोपर्यंत माझा दिवा मात्र विझला होता. मोठ्या कष्टाने ते आरतीचे ताट उचलले. बायकोने पुन्हा नावापुरते माझ्या हाताला हात लावला. आणि आरती सुरू झाली. मी कसेबसे ताट फिरवू लागलो. जसजशी आरती पुढे सरकत होती तसे माझा हात छातीच्या पुढे जातच नव्हता. जणू मी स्वतःचीच आरती ओवाळतोय असे वाटत होते. ते बघून अखेरीस बायको चिडली. तसे मी सुद्धा ते आरतीचे हात सॉरी ताट तिच्या हातात ठेवले आणि म्हटले आता तूच फिरव, ममगिरी मी करतो. मग ती आरती करू लागली आणि मी दाखवण्यापुरते तिच्या हाताला हात लावला. एकवार गुरूजींकडे पाहिले त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. तरीही एकदा विचारून कन्फर्म केले. तसे ते म्हणाले,
बंधू, देवाला सगळे समान !
बस्स त्याच क्षणाला ठरवले आता यापुढे घरातील सर्व पूजा अर्चा जिथे उगाच पुरुषाला पुढे ढकलले जाते तिथे बायकोला पुढे करायचे आणि आपण फक्त मम म्हणायचे. खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा
आता करून दाखवायचे !
उदाहरण तरी ध्या.
उदाहरण तरी ध्या.
नवीन Submitted by Hemant 33>> द्या असे हवे.
जाहिरात क्षेत्रात पुरुषंच्या
जाहिरात क्षेत्रात पुरुषंच्या बरोबर अन्याय होत आहे .
कोणते ही उत्पादन असू द्या जाहिरात स्त्री च करणार.
हवाई सुंदरी म्हणून विमान सेवेत फक्त स्त्रिया
ना संधी दिले जाते तिथे पुरुषानं संधी नाही.
Reception मध्ये स्तिया च असतात पुरुष मंडळी वर अन्याय.
फक्त स्त्रिया साठी बस,ट्रेन असतात फक्त पुरुषानं साठी अशा सेवा दिल्या जात नाहीत.
बिचारा पुरुष किती सहन करणार.
ही पुरुष म्हणून उदाहरण मी दिली तसे तुम्ही उदाहरणे द्या
कोणते ही उत्पादन असू द्या
कोणते ही उत्पादन असू द्या जाहिरात स्त्री च करणार.चूकहवाई सुंदरी म्हणून विमान सेवेत फक्त स्त्रियाचूकReception मध्ये स्तिया च असतात पुरुष मंडळी वर अन्याय.चूकमजा मिस झाली की इथली.
फक्त स्त्रिया साठी बस,ट्रेन
फक्त स्त्रिया साठी बस,ट्रेन असतात फक्त पुषांसाठी अशा सेवा दिल्या जात नाहीत.
बिचारा पुरुष किती सहन करणार. >> कारण बस, ट्रेन मधे बॅड टच हा प्रकार स्त्रियांच्या वाट्याला जास्त येतो.. पुरूषांच्या वाट्यालाही येतो हे मान्य आहे पण तो दुसऱया पुरूषाकडूनच येण्याचे प्रमाण जास्त असावे. माझा अंदाज.
<< मांजर आणि बोका.
<< मांजर आणि बोका.
अशा बऱ्याच प्राण्यात नर हा शारीरिक takati मध्ये मादी पेक्षा वरचड असतो.
दिसण्यात नर हा रुबाबदार असतो मादी पेक्षा . >>
आमची मांजर दिसायला अधिक सुंदर आणि तब्बेतीने जास्त गुटगुटीत आहे. कृपया सरसकटीकरण टाळा.
<< फक्त स्त्री ल समान संधी नाही एवढे एक वाक्य बोलले नी झाले.
उदाहरण तरी ध्या. >>
मायनिंग क्षेत्रात स्त्रियांना संधी मिळत नाही.
आता जरा वेगळा ट्रॅक पकडलाच
आता जरा वेगळा ट्रॅक पकडलाच आहे तर एक मनात आलेली एक शंका दूर करतो
ईतर जनावरांमध्ये स्वयंपाक कोण करते?
नर की मादी?
सर्वच घरात गृह खाते हे स्त्री
सर्वच घरात गृह खाते हे स्त्री कडेच असते घरा अंतर्गत जे काही निर्णय असतात त्या निर्णय वर स्त्री ची मक्तेदारी असते.
मग तिचा नवरा शिपाई असू नाही तर आयएएस,नाही तर उद्योगपती.
पण पर राष्ट्र खाते हे पुरुष मंडळी कडेच असते.
शेजारी असणाऱ्या व्यक्ती शी कसे संबंध ठेवायचे,नातेवाईक शी कसे संबंध ठेवायचे .
घरा बाहेरील निर्णयात पुरुष आपली मत स्त्री वर लादतात.
इथे समानता नाही.
अरे अजून चालूच आहे का हा धागा
अरे अजून चालूच आहे का हा धागा? मला वाटलं नवीन धागा काढल्यावर हा थंडावेल. नाहीच बहुतेक.
नव्या धाग्याला टीआरपी मिळाला
नव्या धाग्याला टीआरपी मिळाला नाही
फुसका बार निघाला
<<<<जाहिरात क्षेत्रात
<<<<जाहिरात क्षेत्रात पुरुषंच्या बरोबर अन्याय होत आहे . कोणते ही उत्पादन .......पुरुष मंडळी वर अन्याय...बिचारा पुरुष किती सहन करणार.>>>
अहो हे खरे म्हणजे पुरुषांसाठीच केल्या जाते! त्यांना बरे वाटते सुंदर स्त्रिया पाहून म्हणून बिचार्या किती झटतात! विचार करा - कुठे बाहेर जायचे असेल तर पुरुषाला तयार व्हायला किती वेळ लागतो नि स्त्रियांना किती? कुणासाठी करतात एव्हढे सगळे प्रसाधबघाबघून पुरुषांना बरे वाटावे म्हणूनच ना! पुरुषांवर अन्याय काय म्हणता? पुरुषांवर उपकार म्हणा!
<<ईतर जनावरांमध्ये स्वयंपाक कोण करते? नर की मादी?>>
मी ऐकले की सिंहांमधे मादीच शिकार करते!
<<<मला वाटलं नवीन धागा
<<<मला वाटलं नवीन धागा काढल्यावर हा थंडावेल. >>>
कुठे आहे हा धागा? कृपया कळवा.
नव्या धाग्याला टीआरपी मिळाला
नव्या धाग्याला टीआरपी मिळाला नाही
फुसका बार निघाला Wink
>>>
किंवा कदाचित तिथे लिहिणे सोयीचे नसावे.
ते तसे होते म्हणून मी तो मुद्दा गडद करायला वेगळ्या धाग्यात टाकला
हा तो नवीन धागा
हा तो नवीन धागा
https://www.maayboli.com/node/77180
विचार करा - कुठे बाहेर जायचे
विचार करा - कुठे बाहेर जायचे असेल तर पुरुषाला तयार व्हायला किती वेळ लागतो नि स्त्रियांना किती? >> दोन मिनीटात तयार होणारी हवी असेल तर बाईशी कशाला मॅगीशी लग्न करा म्हणावं....
( हा प्रतिसाद उगाच रून्मेष धाग्याच्या टीआरपी साठी... होत असेल चार शब्दात कुणी खूष तर करावं कधी कधी म्हणून ).
दोन मिनीटात तयार होणारी हवी
दोन मिनीटात तयार होणारी हवी असेल तर बाईशी कशाला मॅगीशी लग्न करा म्हणावं....
>>>>>
मॅगी आमच्याकडे मलाच करायला लागते. आणि ती दोन मिनिटात बिल्कुल होत नाही. पण तेव्हा कोणालाही ईथे समानता आठवणार नाही.
येनी वेज,
आता राजूचाचा पिक्चर चालू आहे, बी फोर यु मूवीजवर
त्यात अजय देवगण उसवलेले शर्ट शिवत असतो. आणि ते त्याला जमत नसते. तेव्हा त्याला एक लहान पोरगा म्हणतो, अगर औरत का काम एक आदमी करेगा तो ऐसाही होगा.. आणि मग काजोलची एंट्री होते.. रिडीक्युलस.. असे डायलॉग चित्रपटात खुल्ले टाकले जात आहेत आणि ते सुद्धा लहान पोरांच्या तोंडात. त्यामुळे अमुक तमुक काम पुरुषाचे आणि अमुकतमुक स्त्रियांचे अशी विभागणी होत आहे.
त्यामुळे होते काय तर मग जेव्हा माझ्यासारख्या एखाद्या पुरुषाला शिवणकामही जमत नसेल तर त्याच्यावर पुन्हा स्त्री पुरुष असमानतेचा शिकक मारला जातो.
जगात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट नाही येऊ शकत. भले ती गोष्ट दैनंदिन आयुष्यातली का असेना तो त्यात निष्णात असेल असे नसतेच. त्यावर तो काहीतरी सोल्युशन काढतोच. आपली समाजव्यबस्थाही यावरच आधारीत आहे.
स्वयंपाकाचे चालू आहे तर आपण आपले अन्न शिजवतो. पण पिकवत मात्र नाही. ते काम शेतकर्यावर सोडतो.
शेतकर्याच्या घरात कामाची विभागणी कशी होते कोणी पाहिले आहे का? म्हणजे तिथे तो आणि त्याची बायको शेताची कामे कशी वाटून घेतात..
बघायलाही जायची गरज नाही.. बातम्या शेतकर्यांच्या आत्महत्येच्या येतात त्यांच्या बायकोच्या नाही कारण समाजाने कुटुंबाची जबाबदारी देखील पुरुषावर टाकली आहे. ती घेण्यास आपण असमर्थ ठरलो या भावनेतून हे टोकाचे पाऊल उचलले जाते.
ते थ्री ईडियटसमध्ये आमीर खान बोलतो ना.. ये सुसाईड नही मर्डर है.. जो प्रेशर दिमाग पे आता है वो गिणने के लिये कोई मशीन नही बनी है..
ज्या घरात पुरुष कमावता आहे आणि स्त्री घर सांभाळते तिथे घरकामाची वाटणी निम्मी निम्मी हवी हि अपेक्षाच हास्यास्पद आहे.
मग ती वाटणी २०-८० वा ३०-७० वगैरे काहीही होऊ शकते. मग आता या आपल्या वाटणीच्या २५-३० टक्के कामात पुरुष आधी तेच घेणार ना जे तो चांगले करू शकतो आणि त्याची बायको तितकेसे चांगले करू शकत नाही. उगाच समानता राखायला तिला चांगले येणारे काम करायला घेतले तर त्याच्या वाटणीचे काम बायकोला जाईल. मग पुन्हा आरडाओरडा. म्हणजे बायको तांदळाची गोणी उचलून आणताना दिसली तर अरेरे कसा हा निष्ठूर नवरा जे बायकोला ईतके अवघड काम दिले. एखाद्या पुरुषानेच हे काम करायला हवे. तर हा बसलाय घरात सोफ्यावर बसून मटार सोलत. आणि बायकोला पाठवले उन्हातान्हात किराणा आणायला….
एकूणच या धाग्यावर स्त्री पुरुष समानतचे सरसकटीकरण करून प्रतिसाद येत आहेत. सगळी उदाहरणे एकाच तागडीत तोलल्यासारखे.
बरं, पण मूळ मुद्दा काय आहे?
बरं, पण मूळ मुद्दा काय आहे? बायकोला पूजेला बसवलं म्हणजे समानता होते, असं म्हणणं आहे ना? ते चुकीचं आहे, इतकंच म्हणायचं आहे.
शिवणकामाबद्दल बोलायचे तर साधे
शिवणकामाबद्दल बोलायचे तर साधे तुटलेले बटण लावणे, कामचलावू उलटी टीप इतपत येत असेल तर बरे पडते. नसेल येत तर अर्थात आउटसोर्स करता येतेच पण ते तुम्ही कुठे रहाता त्यावर किती सोईचे ते ठरते. आमच्या इथे तरी प्रवासात देखील मंडळी सोबत छोटा किट ठेवतात.
>>शेतकर्याच्या घरात कामाची विभागणी कशी होते कोणी पाहिले आहे का? म्हणजे तिथे तो आणि त्याची बायको शेताची कामे कशी वाटून घेतात..
बघायलाही जायची गरज नाही.. बातम्या शेतकर्यांच्या आत्महत्येच्या येतात त्यांच्या बायकोच्या नाही कारण समाजाने कुटुंबाची जबाबदारी देखील पुरुषावर टाकली आहे. ती घेण्यास आपण असमर्थ ठरलो या भावनेतून हे टोकाचे पाऊल उचलले जाते.>>
तुम्हाला शेतीचा कितपत अनुभव आहे मला माहित नाही पण मी देशात होते तेव्हा आमच्या भागात भातशेतीत लावणीला पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीया असत.
२०१५ चे आकडे सांगतात की ९८,०००,००० स्त्रीया या शेती सेक्टरमधे काम करतात . २०१३ ची आकडेवारी सांगते की ८०% शेतीची कामे स्त्रीया करता मात्र त्यापैकी १३ टक्के स्त्रीयांच्या नावावर शेती आहे. बातमी शेतकर्याच्या आत्महत्येची येते कारण शेतीवर नाव त्याचे असते. नवरे आत्महत्या करुन मोकळे झाल्यावर अपार कष्ट करुन या स्त्रीया कुटुंब सांभाळतात. काहींनी तर तिच शेती फायद्यात आणून कुटुंबाला गरीबीतून बाहेर काढले.
आजची सकाळ मी फ्युचर फार्मर्स ऑफ अमेरीका या संघटनेची आमच्या शेजारच्या गावातल्या हायस्कूलची शाखा आहे, त्या मुलामुलींसोबत घालवली. कुठल्याच कामात मुली कमी पडत नव्हत्या. उलट त्या ग्रूपमधे शेतीकामाच्या जोडीला पशूपालन देखील करणारी एकमेव सदस्य ही मुलगी होती. काउंटीच्या अॅग्री डेमोसाठी नव्या कोंबडीच्या खुराड्याची गरज आहे कळल्यावर ती मुलगी सिनीयर प्रोजेक्ट म्हणून चिकन कूप बांधून देणार आहे. ५ एकराच्या ऑर्गॅनिक फार्म ते ४०० एकर सोयाबिन्/फिड कॉर्न शेती स्त्रीया सहज करतात.
>>आपल्या वाटणीच्या २५-३० टक्के कामात पुरुष आधी तेच घेणार ना जे तो चांगले करू शकतो आणि त्याची बायको तितकेसे चांगले करू शकत नाही. उगाच समानता राखायला तिला चांगले येणारे काम करायला घेतले तर त्याच्या वाटणीचे काम बायकोला जाईल.>>>
जगाला समानता दाखवायला नव्हे तर प्रसंगी जोडीदाराला आधार देता यावा म्हणून आणि आपलीही पर्सनल ग्रोथ म्हणून . जे काम आपल्याला चांगले जमते ते देखील काही उपजत येते असे नसते. कुणीतरी शिकवलेले असते , सरावाने चांगले जमू लागते. नेहमीच्या वाटणीपेक्षा वेगळे काम अधून मधून करायला सुरुवात केली की सुरवातीला कठीण वाटते, पण हळू हळू आपल्या जोडीदारा एवढे नाही तरी बर्यापैकी जमायला लागते. आपल्याला काही कारणाने नाही जमले तर जोडीदार वेळ निभावून नेइल , त्याचे काम अडून रहाणार नाही ही जाणीव मनावरचा भार हलका करते.
>>तांदळाची गोणी उचलून आणताना दिसली तर अरेरे कसा हा निष्ठूर नवरा जे बायकोला ईतके अवघड काम दिले. एखाद्या पुरुषानेच हे काम करायला हवे. तर हा बसलाय घरात सोफ्यावर बसून मटार सोलत. आणि बायकोला पाठवले उन्हातान्हात किराणा आणायला….>> हे देखील कंडीशनिंगच. कितीतरी स्त्रीया किराणा आणणे करतात. काय कुणी बोल लावत नाही पुरुष मंडळींना. नवरा घरी येइल मग किराणा आणेल म्हणून थोडेच कुणी वाट बघत बसते. तसेही क्विंटलची गोण तर पुरुषही आणत नाहीत पाठीवरुन. तसे ओझे उचळणारे वेगळे कामगार असतात ते घरी आणून देतात.
स्वाती2 यांच्या मताशी सहमत.
स्वाती2 यांच्या मताशी सहमत.
म्हणूनच राजूचाचा फ्लॉप झाला.
म्हणूनच राजूचाचा सुपर डुपर फ्लॉप झाला.
Fossil of 9,000 Years Old
Fossil of 9,000 Years Old Female Hunter Challenge Misguided Assumptions Around Gender Roles in Early Humans
https://weather.com/en-IN/india/science/news/2020-11-07-scientists-disco...
Interesting and important
Interesting and important discovery.
स्वाती२,
स्वाती२,
तुमच्या पोस्ट्स खूप छान आहेत.
यातला सराव हा मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटतो. लाईफ स्कील म्हणून ज्या गोष्टी आहेत , त्या सर्वांना जमायला हव्यातच आणि त्याचा सरावही हवा.
पुरुषांना स्वयंपाकाची, इतर घरकामांची सवय नसेल तर ऐनवेळी, अडचणीच्या काळात सुचत नाही. मग तेल- तिखट- मीठाचा अंदाज चुकून पदार्थ चवीला योग्य न बनणे, डाळ-भात -भाजी पुरेशी न शिजणे, रोज न लागणारी औषधे कुठे आहेत ते माहिती नसणे, घराची मॅनेजमेंट व्यवस्थित न जमणे, स्वतःला, मुलांना इस्त्रीचे कपडे नसणे अशा छोट्या मोठ्या बऱ्याच गडबडी होतात.
कामाची सवय नसेल तर जास्त वेळ लागतो, वेळ पुरत नाही, लगेचच कंटाळा येतो. मग चिडचिड, संताप होतो. अडचणीची वेळ निभते , पण बरेच हाल होऊन.
(हे खरंतर प्रत्येक ठिकाणी लागू आहे - अभ्यास, व्यायाम, झोप वगैरे वगैरे )
पण त्याचं कारण पुरुषांना कामं येत नाहीत किंवा सवय नाही हे न मानता घरातली बाई तिथे नव्हती हे दिले जाते, मग तिची नोकरी किंवा इतर गोष्टींना नावं ठेवली जातात किंवा तीच घरातल्यांचे हाल होत आहेत, नुसती भांडणं होतं आहेत म्हणून आपणहून दोन पावलं मागे जाते, स्वतःचं किंवा नोकरीचं प्राधान्य घरानंतर ठेवते.
आजही सुशिक्षित घरांमध्ये सुद्धा बाई आजारी असली की डबा मागवला जातो किंवा घरी वरण भातच केला जातो.
हे होऊ नये म्हणून माझा एक मित्र आई आणि बायको नोकरी न करणाऱ्या असूनही एखादया दिवशी सगळा स्वयंपाक स्वतः करतो, बायकांना विश्रांती मिळते, चव बदलते, यालाही सवय राहते.
वर स्वाती2नी म्हटले आहे की
"आपल्याला काही कारणाने नाही जमले तर जोडीदार वेळ निभावून नेइल , त्याचे काम अडून रहाणार नाही ही जाणीव मनावरचा भार हलका करते."
त्यासाठी सराव , सवय फार महत्वाची आहे. आणि स्त्री पुरुष असमानता येते ती मुख्य अशा ठिकाणी. वर्ष सहा महिन्यातून एखाद्या वेळी स्वयंपाक घरातली कामे करून मला वेळ पडली तर निभावता येईल, अशी बढाई मारता येते, पण प्रत्यक्ष वेळ पडली की खूप गडबड होते.
तस्मात, प्रमुख जीवनावश्यक असलेली गोष्ट - स्वयंपाक - यासाठी नुसतं स्वयंपाकाचं ज्ञान, एखाद्या वेळी करून बघणे पुरेसे नाही तर सवय असणे हे स्वतःसाठीच नाही तर घरातल्यांसाठी गरजेचे आहे.
स्त्री पुरुष असमानता नसावी, स्त्रीला खुशीने हवे ते करण्याचं स्वातंत्र्य असावं, इतरांनी तिच्या स्वातंत्र्याची चौकट ठरवू नये, हे मत असणाऱ्या सर्वांनी हे करायला पाहिजे
हे घर ,घरकाम, स्वयंपाक करणे
हे घर ,घरकाम, स्वयंपाक करणे ह्या 3 गोष्टी स्त्री ,पुरुष समानतेच्या दुश्मन आहेत.
स्त्री आणि पुरुष नी ह्या तीन गोष्टी आयुष्यातून काढून टाकाव्यात..
मग बघा सर्वच ठिकाणी कशी स्त्री पुरुष समानता फोफवेल.
सहमत पिनी
सहमत पिनी
ऋन्मेष नविन धाग्याचा विषय
गल्ली चुकल्याने प्रकाटाआ
<<हे घर ,घरकाम, स्वयंपाक करणे
<<हे घर ,घरकाम, स्वयंपाक करणे ह्या 3 गोष्टी स्त्री ,पुरुष समानतेच्या दुश्मन आहेत. स्त्री आणि पुरुष नी ह्या तीन गोष्टी आयुष्यातून काढून टाकाव्यात..>>
हे काही नीट कळले नाही.
हे असे आयुष्यातून काढून टाकता येत नाही. शेवटी कुणाला ना कुणाला हे सर्व करावेच लागते, लग्न झाले असले नसले तरी.
आता जगात स्त्री नि पुरुष दोघेहि रहातात तर समजून उमजून रहाणे आवश्यक आहे. ज्याला जे काम जमेल, आवडेल ते त्याने करावे. नि काही कामे कुणालाच आवडत नाहीत तरी करावीच लागतात, हे लहानपणापासून माहित असायला पाहिजे.
खरी गोष्ट अशी आहे की जगात दादागिरीच चालते. इतके दिवस पुरुषांची चालली - तशी बायकांची पण चालू शकेल.
तर प्रश्न असा आहे की दादागिरी हीच पद्धत चालू ठेवायची की थोडा समजूतदार पणा दाखवायचा?
<< तर प्रश्न असा आहे की
<< आता जगात स्त्री नि पुरुष दोघेहि रहातात तर समजून उमजून रहाणे आवश्यक आहे. ज्याला जे काम जमेल, आवडेल ते त्याने करावे. >>
<< तर प्रश्न असा आहे की दादागिरी हीच पद्धत चालू ठेवायची की थोडा समजूतदार पणा दाखवायचा? >>
एकदम बरोबर, माझे पण मत असेच आहे. पुरुषांना स्वयंपाक आला(च) पाहिजे म्हणणार्या किती फेमिनाझी बायका घरात लॉन मोईंग करतात, बर्फ साफ करतात, घराच्या छपरावर चढून गटर्स साफ करतात? असमानता (डिसक्रिमीनेशन) आणि प्राधान्य (प्रेफरन्स) या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या बाबतीत ऋन्मेऽऽषचे आणि नन्द्या४३ यांचे म्हणणे पटते की त्याला जे जमेल, आवडेल, रुचेल त्याने ते करावे. स्वतः जमत नसेल, आवडत नसेल तर पैसे टाकून दुसर्याकडून करून घ्यावे. घरातील नवरा-बायको काय ते बघून घेतील, इतरांनी मत द्यायची काही गरज नाही.
स्त्री-पुरुष यांच्यामधील असमानता कमी करायची असेल, तर सर्वांना संधी उपलब्ध करून देणे इतपत मागणी योग्य आहे आणि ती नक्कीच करावी. म्हणजे केवळ मुलगी आहे म्हणून गर्भपात करायचा किंवा मुलगी सासरी जाणार आहे म्हणून तिच्या शिक्षणावर खर्च करायचा नाही, हे योग्य नाही. पण जिकडेतिकडे निम्मी-निम्मी व्यवस्था करावी या मताशी मी बिलकुल सहमत नाही. १ मुलगा आणि १ मुलगी असेल तर पालकांनी स्वकष्टाचे पैसे दोघांना निम्मे-निम्मे द्यायलाच पाहिजेत, याच्याशी मी सहमत नाही. स्वकमाई असेल तर त्यांना पाहिजे ते करता आले पाहिजे. एखाद्या मुलीने लग्नानंतर नोकरी करून पैसे आई-वडिलांना देईन, असे म्हटले तर तिला ते स्वातंत्र्य हवे. याउलट मी नोकरी सोडून घरी बसेन, असे म्हटले तर ते स्वातंत्र्य पण हवे. नवरा-बायको काय ते बघून घेतील, इतरांनी टीका-टिप्पणी करू नये, रादर त्यांना तो हक्कच नाही.
माझी एक शंका-
माझी एक शंका-
पाळणाघरांमधे सांभाळणारे पुरुष असतील तर आपण आपल्या बाळांना तिथे सोडून ऑफिसला जाऊ शकू का??
घरातील नवरा-बायको काय ते बघून
घरातील नवरा-बायको काय ते बघून घेतील, इतरांनी मत द्यायची काही गरज नाही.
100 टक्के बरोबर आणि सहमत .
दुसऱ्याच्या घरात डोकवयची गरज नाही.
नवरा ,बायको समजुती नी काम वाटून घेत असतात पण शेजारी राहणारे,आणि नातेवाईक
ह्याच लोकांना अडचण असते.
बघा ना अमकी तमकी चा नवरा भांडी घासत होता अशा प्रकारची गॉसिप चालू असते.
उपाशी बोका यांच्या
उपाशी बोका यांच्या प्रतिसादाशी सहमत
Pages