प्रचलित हिंदी शब्द व रचना आणि त्यांना मराठी उपलब्ध पर्यायी मराठी शब्द व रचना.

Submitted by मिरिंडा on 5 November, 2020 - 09:03

हिंदी. मराठी
--------. -----------
१). सतर्क १) जागरुक
२). हट्टी जिद्दी दाग. २) चिवट डाग
(न जाणारे )
३) सुरक्षा. ३) सुरक्षितता
४). गरम. ४) कढत,ऊष्ण ऊन
५). थंड. ५) गार,
६). थंड होते. ६) निवणे
७). बिनधास. ७) निर्धास्त
८). खूप सार. ८) खूप, बरंच
९). उलगडवून. ९) उलगडून
१०) परतवून (तेलावर). १०) परतून
(तेलावर)
११). पलटल्याने. ११)उलटल्याने
( मूळ शब्द:पलटना). मूळशब्द: उलटणे
बाजी पलटना बाजू उलटणे
------. ---------

१२) मिटवणे (मूळ हिंदी १२) खोडणे,हरताळ
शब्द: मिटाना त्याचे फासणे ( पूर्वीलिहीलेले
मराठीकरण ). खोडण्यासाठी हरताळ
नावाच्या वनस्पतीचा
वापर करीत) नाहीसं
करणे,

१३) सर्वदूर (मूळ हिंदी. १३) सगळीकडे
शब्द: सबदूर त्यांचे
मराठीकरण)

१४)तसंही (मूळ हिंदी. १४) नाहीतरी
शब्द: (वैसेभी चे
मराठीकरण)

१५) दाग सोडत नाही १५) डाग राहातं नाही
(मूळ हिंदी रचना :
दाग छोडता नही चे
मराठीकरण)

१६) आत्मसम्मान. १६) स्वभिमान

१७) बाबा कुठे राहिले १७) "बाबा कुठे गेले ( " बाबा कहॉं किंवा बाबा कुठे
गये ?". आहेत "
(मूळ हिंदी रचनेचे भाषांतर).

१८) "तू तिथे जाणार नाहीस ". १८) " तू तिथे जाऊ नकोस
( इथे विकल्प ऑप्शन इथे थेट आज्ञा आहे.
विकल्प
आहे, म्हणजे कदाचित. म्हणजे ऑप्शन नाही.
जाशीलही.

ही यादी पूर्ण करण्याचं काम चालू आहे. किती शब्द व रचना मिळतील , माहित नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिरिंडा यांच्या विनंतीस मान देऊन पुढची जोडी: (हिंदाळलेलं मराठी - मराठी)
जसं की तुम्ही पाहू शकता - हे पहा.

मी ऐकेल/करेल/बोलेल वगैरे चुकीचं आहे हे अनेकांना पटत नाही....मी करेन (करीन). ती/तो करेल. कर्त्याप्रमाणे क्रियापद चालतं.

विरार आणि त्यापुढील भागातील मुले सर्रास 'मी आला, मी गेला, मी जेवला, मी झोपला' असे म्हणतात!
aalo.JPG

एक निवेदन /नम्र विनंती
कृपया विषयाच्या अनुषंगाने लिहावे असे वाटते. यादी वाढेल तेवढी हवी आहे. खरंतर लंपन व प्रज्ञा ९ व इतर बऱ्याच जणांचे प्रतिसाद ज्ञानात भर टाकणारेच आहेत. पण त्यासाठी " मराठीत दुसऱ्या भाषांमधून आलेले शब्द " असा लेख लिहावा लागेल. स्पष्ट लिहील्याबद्दल राग आला असल्यास क्षमस्व.

>> उलटी हा शब्दही मराठी-हिंदीत दोन्हीकडे वापरला जातो. अस्सल मराठी शब्द काय असेल? वमन हा संस्कृत शब्द आहे. आमच्याकडे वांती हा शब्द वापरला जातो जो मी बऱ्याच दाक्षिणात्य लोकांकडून/सिनेमात ऐकला आहे.

Submitted by जिद्दु on 6 November, 2020 - 07:57>>

उलटी = ओकारी

काय फरक पडतो हिंदी शब्द वापरले तर?
मराठी माणसाने हिंदी शिकावी खरे तर.. नॉर्थ साईड ला उपयोगी पडते...
शुद्ध मराठी नसली तर पुण्याबाहेर कोणाला फरक पडत नाही...

मला ६२च्या पुढचे प्रतिसाद दिसत नाहीत. आणी मी पाठवलेले ही दिसत नाहीत. असं कि होतंय, कोणी सांगेल का.

सीमंतिनी , मला तर चावी शब्द हिंदी चाबी पासून आला आहे असं वाटून मी किल्ली हा शब्दच वापरते. पण खात्री नाही.

मच्छर (हिंदी) --डास (मराठी)

मिरिंडा , काही नेटचा इश्यू असेल का , स्लो वगैरे....
पेज रिफ्रेश करून बघा. मलाही लक्षात येत नाहीये हे...

कृपया विषयाच्या अनुषंगाने लिहावे असे वाटते. >>> यस यस Happy जाते थे जापान पहुच गये चीन असे होउ लागले होते Happy

तो मुंबईत नेहमी ऐकू येणारा तिसर्‍या "माळ्यावर" - हे सुद्धा तीसरे माले पे वरून आले की, की मुळात तीसरे माले पे हेच भाषांतर आहे? इतरत्र "मजल्यावर" म्हणतात.

माळवद वरून माळा आले असावे का? माळा हा शब्द फार पूर्वीपासून मराठीत वापरात आहे. आपण नको असलेल्या वस्तू माळ्यावर ठेवतो. साधारणतः त्याला मेझनाईन मजला म्हणता येईल. हे मजला, मंझिल, मेझनाईन शब्द सारखे नाही वाटत?

बाप्रे. दिमागका दही धागा.
काय फरक पडतो एखाद्याने हिंदी शब्द किंवा हिंदी शब्दावरुन आलेले मराठी शब्द वापरले तर.
आणि हे मला खटकतं ते मला खटकतं हे काय प्रकरण म्हणे?
सगळ्यांची घरात बोलली जाणारी एक भाषा असते. प्रमाण मराठीच हवं असा आग्रह का? खरंतर दुराग्रहच.
रोजच्या भाषेत रुळलेले इंग्लिश शब्द चालतात. मग रुळलेले हिंदि शब्द का नाही.

भाषा संरक्षणाच्या दृष्टीने काही लोक फारच उदासीन आहेत असं दिसतं. त्यांचं म्हणणं " येऊ द्याना हिंदी शब्द मराठीत " मग मूळ मराठी शब्दांचं उच्चाटन झालं तरी हरकत नाही. एकदा का मराठी साहित्य बिघडायला लागलं की मग रसातळाला जाणं लांब नाही. बोली भाषा जगल्या पाहिजेत आणि प्रमाणित मराठी पण सगळ्यांना आली पाहिजे . प्रमाणित भाषा ही सुद्धा बोली भाषा शुद्ध करुन घेऊनच तयार झाली आहे. (पाहा प्रो. माशेलकरांचं संशोधन ).. बोली भाषेची गोडी वेगळी आहे. आपण वेळीच लक्ष दिलं नाही तर , एखाद दिवशी मराठी शिकलेला भय्या आपल्याला मराठी शिकवायचा .

त्याला मराठी शिकवायचा.

पण भय्या जी खरी मराठी इथे येऊन शिकला असेल ती तोपर्यंत बाहेरच्या जगात खरी मराठी राहिलेलीच नसेल तर?

रोजच्या भाषेत रुळलेले इंग्लिश शब्द चालतात >> हे ही चुकीचेच आहे. ज्या शब्दांना मराठीत पर्यायी शब्द नाहीत, तिथे शब्द इतर भाषांतून उसने घेणे भाग आहे, पण असलेले शब्द टाकून दुसरे शब्द का वापरावे?

धागा विषयाशी सहमत.
छान चर्चा.
* चावी शब्द हिंदी चाबी पासून आला आहे असं वाटून >>>
चावी (पोर्तुगीज) >> चावे (हिं).

>>आपण वेळीच लक्ष दिलं नाही तर , एखाद दिवशी मराठी शिकलेला भय्या आपल्याला मराठी शिकवायचा . >> त्यात नक्की वाईट काय आहे? उत्तमच आहे की!
कॅनडात पोराच्या शाळेत देसी फ्रेंच टीचर आहे, तसा मुंबईत भय्या मराठी शिक्षक.
तुमचा सुरुवातीचा हेतू चांगला होता आता मात्र गाडी घसरली आहे रुळावरुन!

आपण वेळीच लक्ष दिलं नाही तर , एखाद दिवशी मराठी शिकलेला भय्या आपल्याला मराठी शिकवायचा >> काहीतरी गडबड आहे ह्या वाक्यात. आपण लक्ष दिलं नाही तर भय्या मराठी भाषेत का बरं तरबेज होईल? बरं झालाच, तर चांगलंच आहे की अमितव म्हणतात तसं. आपण लक्ष द्यायचं ते कशावर? भय्याने मराठी शिकू नये याकडे की आपल्याला मराठीचा विसर पडू नये याकडे?

महाराष्ट्रात राहणार्‍या मराठी लोकांची मराठी दिवसेंदिवस भ्रष्ट होत चालली आहे हे खरे आहे. माझी एक मैत्रीण इंदौर ची असून नवर्‍याला यजमान म्हणते.

बाप रे! वयोगट काय आहे साधारण?>>वयोगटचा संबंध नाही. ते लोक कित्येक पिढ्यांपासुन इंदौर मधेच रहात आहेत. त्यामुळे ते बरीच जुनी मराठी बोलतात.

Pages