खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृ.स. तै
तुम्ही काय सुपारी घेतलीय काय. नुसते भारी भारी ताट वाढुन इथे परोसताय.

कझुमी तै/भाई,
यांनी पण कहर करणं लावलय.
डायबिटीस करवाकेही मानोगे क्या?

मनावर ताबा मिळवणारा (ज्यांना अध्यात्मात रस आहे त्यांना अध्यात्माकडे चार पावलं) घेऊन जाणारा धागा आहे हा.
इथले फोटो पाहुन तोंडात पाणी तर सोडाच, मनात खाण्याची इच्छा ही उत्पन्न व्हायला नको. निर्जली उपवसाच्या दिवशीही हा धागा निर्विकारपणे पहाता यायला हवा, मनात भूकेची किंचितही लालसा येऊ न देता त्यावर कॉमेंट देता आले पाहिजेत.

वेळ लागेल, प्रयत्न करत रहा, निश्चय ढळु देऊ नका.
फोटो देणाऱ्यांनी फोटो देत रहा.

जय जय मनोवीर समर्थ.

Lol

मला तर इतरांचे फोटो बघून कुकिंगच्या आयडिया क्लीक होतात..
आता कालचाच कुझुमी यांचा गुलाबजाम चा फोटो बघून आठवलं,मुलगा एक महिन्यापासून मागे लागला होता, मा गुलाबजाम बनव म्हणून मग आज सकाळी सकाळी सगळे उठायच्या आधीच गुलाबजाम तय्यार Happy

20150728_200449.jpg20201107_123523.jpgखुप दिवसापासून सगळ्यांचे फोटो पाहुन फोटो टाकायचा विचार होता. पण कसे टाकायचे कळत नव्हते. हे आईने अधिक महिन्यात कृष्णा साठी केलेला 56 भोग चा नैवेद्य. खुप दिवस झालेत पण तरिही टाकत आहे20150728_200459.jpg20150728_200504.jpg

अंकु एका ग्लास मध्ये नारळाचे पाणी आहे आणी एका मध्ये मठा आहे. आणी स्टील च्या पेल्यात पाणी आहे.

धन्यवाद अंकु मानव चिमु झंपी mrunali.
सगळे चटणी पापड भजी etc धरुन 56 +आहेत.
1.उकडीचे मोदक 2.तळलेले मोदक 3.दहीवडे 4. पापड 5.गुळपोळी,
6.पुरण पोळी 7. सांजाची पोळी 8.साधी चपाती 10.भोपळ्याचे घारी अणि लोणी 11. रसगुले 12. भाजणीचे वडे 13. केळ्या चे रायते. 14. वाटाण्याची उसळ 15. मटकी उसळ 16. सुपारी पान वेलची बडिशेप
17. गोड शिरा 18. लोणी साखर 19. लिंबू 20. चटणी ओल्या खोबर्यची 21.लिंबू लोणचे 22. आंबा लोणचे 23.शेंगदाण्याची चटणी 24. फुटाण्या ची चटणी 25. काकडीची कोशिंबिर.
26. कोथिम्बीर वडी 27. बटाटा भजी 28. वांगे भजी 29. कोबी भजी 30. साखर भात 32. गोड शेवया 33.गुलाबजाम 34.गुळाचे खाजे 35.बेसन लाडु 36.तिळाचा लाडु 37. शेंगदाणा लाडु 38. खोबर्यच्या वड्या 39. श्रीखंड 40. दुधी हलवा 41. दडपे पोहे 42. साखरेचे पोहे 43.गुळ पोहे 44.पुरणचे कडबू 45. ओल्या नारळा च्या करंज्या
46. वरण भात 47. वरी चा भात शेंगदाण्या ची आमटी 48. दही भात 49. मसाले भात 50. डाळीची आमटी 51. पूरी 52. अनारसे
53. नारळाचे पाणी 54. मठा 55. केळ्या चे शिकरण
56. बटाटा भजी 57. मोकळे तिखट 58. श्रावण घेवडा भाजी 59. कच्या टोमेटो चटणी 60. सांजाची खीर

अरे बापरे! एवढे पदार्थ तुमच्या आईने केले तरी कसे? मला तर नावे वाचतानाच दमायला झालं! मानलं आईसाहेबांना!

एवढी मोठी केळीची न फाटलेली पानं पण कमाल>>>> +१. मलाही पदार्थांपेक्षा ते वाढलेले पान जास्त आवडले.
रच्याकने,तुमच्या आईचा उरक दांडगा आहे.

अमुपरी-- फार सुंदर पान मांडलंय.
रच्याकने,तुमच्या आईचा उरक दांडगा आहे.>>>दंडवत त्यांना.

धन्यवाद cuty देवकी वर्णिता श्रध्दा .. गोड सुक्के पदार्थ एक दोन दिवस आधी केले होते. मुद्दामून केळीची मोठी पाने आणली होती.

अमुपरी-- फार सुंदर पान मांडलंय.
रच्याकने,तुमच्या आईचा उरक दांडगा आहे.>>>दंडवत त्यांना.
मानवदादा Lol
जिभेचे चोचले आहेत सगळे Wink , असं म्हणत रहायचं.
इकडे येऊन पुन्हा माकाचु गल्लीकडे वळावं लागायचं. त्यापेक्षा मनोबल वाढवलेले बरे.

सगळेच्या सगळे गुलाबजाम मनाने गट्टम केले !! Wink

Pages

Back to top