दसर्याला नवीन घरातल्या नवीन देव्हार्यात नवीन देवांची स्थापना केली. गुरुजीही यंदा कोरोनामुळे नवीनच बोलावले. बायकापोरे नवीन कपडे घालून तयार होते. मी मात्र आजारी असल्याने जुनेच कपडे घातले होते.
गुरुजी आले. नमस्कार चमत्कार झाले. फारसे आदरातिथ्य करायची संधी न देता थेट कामाला लागले. ताट ताम्हाणात देव मांडले. आसन अंथरले. तीर्थ हळद कु़ंकू फुले सारे जागच्या जागी ठेऊन आम्हाला म्हटले चला या पूजा करून घेऊया. मला कल्पनाच नव्हती की असे पूजेलाही बसावे लागेल. अन्यथा आजारी असताना मी स्वत: न बसता आईवडिलांना बसवले असते. पण काही कळायच्या आधी पूजा सुरूही झाली होती.
मग प्रत्येक देवाचा अभिषेक, आधी पाण्याने, मग दूधाने, मग पंचामृताने, मग पुन्हा पाण्याने, मग हारफुले हळदकुंकू, सोबत मंत्रपठण, ते आपणही त्या गुरुजींच्या मागोमाग उच्चारायचे. दमछाक सुरू झाली. थोड्या वेळाने घश्यातून आवाज फुटायचा बंद झाला, कसे बसे पुटपुटू लागलो, देवाचा अभिषेक करताना चमचा उचलणेही ईतके जड वाटू लागले की अर्धाच भरू लागलो. तो देखील देवापर्यंत पोहोचेपर्यंत अर्धा सांडू लागला. देवाचा दिवा विझू नये म्हणून फॅनचा स्पीड मंदावला असल्याने आधीच आजारी असलेल्या मला उष्माघाताचाही भारी त्रास होऊ लागला. अगरबत्तीचा धूरही नकोसा वाटू लागला. गुरुजी काय बोलत होते ते डोक्यात शिरायचे बंद झाले. मग काहीतरी भलतेच करायचो, मग पुन्हा चूक सुधारून बरोबर करायचे, रिवर्कही वाढू लागले, आणि या सर्वात माझी अर्धांगिनी, माझी धर्मपत्नी,, माझी सहचारीणी, माझी कायद्याने असलेली आयुष्याभराची जोडीदार माझी बायको मात्र नुसते माझ्या हाताला हात लाऊन मनातल्या मनात मम म्हणत होती आणि गाल्यातल्या गालात हसत होती.
अखेर हि शिक्षा एकदाची संपली. आणि फायनल आरती सुरू झाली. ताम्हाणात कापूर टाकून भटजींनी दिवा पेटवला पण तोपर्यंत माझा दिवा मात्र विझला होता. मोठ्या कष्टाने ते आरतीचे ताट उचलले. बायकोने पुन्हा नावापुरते माझ्या हाताला हात लावला. आणि आरती सुरू झाली. मी कसेबसे ताट फिरवू लागलो. जसजशी आरती पुढे सरकत होती तसे माझा हात छातीच्या पुढे जातच नव्हता. जणू मी स्वतःचीच आरती ओवाळतोय असे वाटत होते. ते बघून अखेरीस बायको चिडली. तसे मी सुद्धा ते आरतीचे हात सॉरी ताट तिच्या हातात ठेवले आणि म्हटले आता तूच फिरव, ममगिरी मी करतो. मग ती आरती करू लागली आणि मी दाखवण्यापुरते तिच्या हाताला हात लावला. एकवार गुरूजींकडे पाहिले त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. तरीही एकदा विचारून कन्फर्म केले. तसे ते म्हणाले,
बंधू, देवाला सगळे समान !
बस्स त्याच क्षणाला ठरवले आता यापुढे घरातील सर्व पूजा अर्चा जिथे उगाच पुरुषाला पुढे ढकलले जाते तिथे बायकोला पुढे करायचे आणि आपण फक्त मम म्हणायचे. खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा
आता करून दाखवायचे !
हेमंत, आधी समानता म्हणजे काय
हेमंत, आधी समानता म्हणजे काय हे सांगा तुम्ही. कारण या प्रत्येक क्षेत्रात अजूनही असमानता आहे असे मला वाटते. फक्त मलाच नाही इतर अनेकांना वाटते. तुम्ही मला समानता म्हणजे काय ते सांगा आणि त्याची पुष्टी करणारा विदा द्या.
मला कळालेली माबोवरची
मला कळलेली माबोवरची स्त्रीपुरुष समानतेची व्याख्या-
स्त्रीने करियर केलेच पाहिजे.
पुरूषांना स्वयंपाक आलाच पाहिजे.
. ज्या व्यक्तीला मायबोलीवर
. ज्या व्यक्तीला मायबोलीवर १५० हून अधिक चाहते आहेत ती व्यक्ती जर इतकी टोन डेफ बेजबाबदार विधाने करत असेल तर ते कोणी तरी point out केले पाहिजे.>>>>>
त्यालाही तेच हवंय, प्रत्यक्ष तो असा विचार करत असेलच असे नाही
पण मायबोलीकरांना खेळवायला तो मुद्दाम अशी काडी टाकतो आणि मजा बघत बसतो किती जण गळाला लागतात
तुम्ही त्याला कितीही विरोध करा, त्याच्या बोलण्यातली विसंगती दाखवून द्या, ते कधीच मान्य करणार नाही उलट तुमच्या पोस्टमधून त्याला सोयीस्कर असेल एवढे उचलून त्यावर हातभर पोस्ट टाकेल
हीच त्याची मोडस ऑप्रेन्दी आहे
मी देखील अनेकदा फसलो मग लक्षात आलं की आपण जितके त्याला विरोध करू तितके जास्त तो एन्जॉय करतो किंबहुना आपण जास्तीत जास्त विरोध करावा हीच त्याची मानसिकता आहे
त्यासाठीच तो असले लिहीत असतो
त्याला इथे प्रतिसाद करत बसण्यापेक्षा नवा धागा काढावा
त्याला त्रासदायक अशी ती एकच गोष्ट आहे
टीआरपी न मिळणे
त्या साठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो
ऋ - तू ओला की सुका
ऋ - तू ओला की सुका
>>>
थोडा दमट असेल अजून. असण्यात काही वाईट नाही. पण आपला प्रवास नेहमी सुक्याकडेच असावा. >>>
अवघड आहे बाबा तुझे
का म्हणून विचार
नाव बाबा नाव
कितीही वेगवेगळे ड्युआय्डी घेतले तरी मूळ नाव म्हणजेच डोक्यावर संततधार
कधी होणार सुका
Submitted by जिज्ञासा on 31
Submitted by जिज्ञासा on 31 October, 2020 - 13:23
>>>>
मॅम आपल्या या अ ब क वाल्या पोस्टमधील बेसिक गण्डले आहे.
मी माझे पूजा करायचे काम बायकोच्या अंगावर टाकत नाहीये तर आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीने जो पूजा करायचा मान पुरुषाला दिला आहे तो मी तिला सोपवत आहे. अर्थात यात काही जबरदस्ती नाहीये कि तिने हे केलेच पाहिजे.
आणि दुसरे म्हणजे यामुळे तिचे स्वयंपाकाचे काम मग कोण करणार हा मुद्दा पुन्हा एकदा बेसिकलीच गण्डला आहे.
कारण मी पूजा करतानाही ती ममगिरी करत माझ्या बाजूलाच बसून होती. याचा अर्थ त्यावेळी ती सुद्धा स्वयंपाक करत नव्हतीच
किंबहुना हा मुद्दा तर असा आहे की हि चर्चा जिथून सुरू झाली तिथूनच सारी गंडली म्हणू शकतो..
असो,
आता या कर्रेक्ट इनपुट सह ती अ ब क पोस्ट एडीट करता येईल का
घ्या
घ्या
बोललो होतो ना मी
सप्रमाण सिद्ध केलं बघा
ऋन्मेष, नूतन वास्तूच्या
ऋन्मेष, नूतन वास्तूच्या तुम्हाला शुभेच्छा...
तुमच्या ह्या लेखावरून तुमच्या लाडक्या हिरोची आठवण आली. महिला दिनाच्या निमित्ताने शाहरुख खानने त्याची मुख्य भूमिका असतानाही प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला श्रेयनामावली मध्ये चित्रपटातील अभिनेत्रीचे नाव प्रथम टाकायला सुरुवात केलीयं...
तुम्ही स्वतःला गरिबांचे शाहरुख खान समजातात म्हणून मला लेख वाचून आठवलं फक्त..
Runmesh ची टोटल किती घर झाली
Runmesh ची टोटल किती घर झाली आता पर्यंत.
प्रतेक धाग्यात तो नवीन घरात असतो.
आशुचँप, आलं लक्षात!
आशुचँप, आलं लक्षात!
100
100
मला कळलेली माबोवरची
मला कळलेली माबोवरची स्त्रीपुरुष समानतेची व्याख्या-
स्त्रीने करियर केलेच पाहिजे.
पुरूषांना स्वयंपाक आलाच पाहिजे.
Proud
नवीन Submitted by mrunali.samad on 31 October, 2020 - 15:32
>>>>>>>
हो. बरेचदा असे वाटते की ठोकळेबाज पद्धतीने स्त्री पुरुष समानतेची व्याख्या होते.
कुटुंब आणि सहजीवनाची व्याख्या कोणाला समजूनच घ्यायची नाही असे वाटते.
एक अजून उदाहरण आठवले,
माझे गणित चांगले आहे, बायकोचे ईंग्लिश चांगले आहे. त्यामुळे मुलीचा अभ्यास घेताना आम्ही हे विषय वाटून घेतले आहेत. त्याचप्रमाणे तिच्या अॅक्टीव्हिटी असतात त्यातही तिचे ड्रेसिंग करायचे असेल किंवा काही ड्रॉईंग करायचे असेल तर त्यात बायको पुढाकार घेते, ईतर धावपळ आणि तांत्रिक बाबींना मी बघतो. आता समानतेच्या हट्टापायी मी मुलीचा मेकअप आणि ड्रेसिंग करायला बसलो वा ईंग्लिश शिकवायला गेलो तर या आमच्या हट्टापायी तिचे नुकसान नाही का होणार? कि मी आता ईंग्लिश शिकायचे ती समानता जपायला?
सेम हियर ऋन्मेष, माझ्या ही
सेम हियर ऋन्मेष, माझ्या ही नवर्याचे गणित माझ्या पेक्षा चांगले आहे, नवरा गणित शिकवतो मुलाला. मी सायन्स आणि इंग्लिश शिकवते
आशूचॅम्प माझ्या पोस्ट वाचून
आशूचॅम्प माझ्या पोस्ट वाचून मुद्दा खोडणे अवघड आहे पण तेच योग्य आहे.
आम्ही मुद्दा खोडला तरी तू मान्य करणार नाही ही पळवाट सोयीची आहे पण ती चुकीची आहे.
माझ्या त्या अ ब क ला दिलेल्या उत्तरावर काही बोलता आले तुम्हाला तर आवडेल.
बाकी जे वाचक तटस्थपणे वाचतात त्यांना काय ते कळतेच. त्यामुळे तुम्ही काहीही बोललात तरी मला फरक पडत नाहीत. तुमच्याच भाषेत एक प्रतिसाद वाढतो त्याच आनंदच आहे
या वेळी मला रुन्मेष चे
या वेळी मला रुन्मेष चे 100prcnt पटते आहे की उगाच का life कॉम्प्लिकेटेड करायचे,माझ्याही नवऱ्याला पूर्ण स्वयंपाक करण्यात आजिबात इंटरेस्ट नाही पण मॅगी,ऑम्लेट इतर झटपट होणारे चटर पटर तो माझ्या पेक्षा छान बनवतो.राहता राहिला नैवेद्यासाठी स्वयंपाक करण्याचा प्रश्न तर दोघांनाही आवड नसेल तर स्वयंपाकी घरी बोलावून तो प्रश्न पटकन मिटू शकतो,त्यात कसली आलेय असमानता
खालचा प्रतिसाद वाचून मला पण आठवले की मला सुद्धा मुलीच्या शाळेत ptm किंवा पुस्तके आणणे,फी भरणे या कामांसाठी तसेच सोसायटी मिटिंग मध्येही जायला आजिबात आवडत नाही आणि त्यासाठी मला सुट्टी असली तरीही मी जात नाहीत ते नवराच ऍडजस्ट करतो
धागा trp खेचण्यासाठी असेलही पण लॉजिक तर बरोबर आहे
ते माहितीच आहे आनंद होतोय ते
ते माहितीच आहे आनंद होतोय ते
सो घेत रहा आनंद या अजून एका वाढीव प्रतिसादाचा
शेवटी टीआरपी चा सवाल आहे
जोड्याने हाणा पण xxx म्हणा
हीच तुझी गत आहे
मृणाली, आमच्याकडे आधी सायन्स
मृणाली, आमच्याकडे आधी सायन्स दोघांनी अर्धे अर्धे शिकवायचे असे ठरलेले कारण ते दोघांना जमते. पण सध्या वेळेचे गणित बघता बायकोच तिचा जास्त अभ्यास घेते. माझे वर्क फ्रॉम होम चालू असताना तिचे ऑनलाईन क्लास मग बायकोलाच मॅनेज करावे लागतात.
संध्याकाळी मात्र खाली गार्डनला जेव्हा सर्व मुलांच्या आई आल्या असतात तेव्हा मात्र बाप मी एकटाच असतो. कारण बायकोला त्याची आवड नाही. आता याता बाकीच्यांच्या आया येतात आणि तुझेच फक्त बाबा येतात म्हणत पोरीसमोर जरा कॉलर टाईट करून घेतो, पण समानता राखायच्या फंदात पडत नाही
ऋन्मेषचे मला १००% पटतेय.
ऋन्मेषचे मला १००% पटतेय.
@ रुपाली
@ रुपाली
येस्स, ते शाहरूखने हिरोईनचे नाव आधी लिहायला सुरुवात केली ते मलाही माहीत आहे. ईथे त्याचा कौतुकाने उल्लेखही केला आहे बरेचदा. तसेच तो कुटुंबवत्सल माणूस आहे. त्याचा हा स्वभावही मला चांगला वाटतो. बाकी गुणदुर्गुण सर्वात असतातच. कोणाचे काय बघायचे आणि अनुकरन करायचे हे आपले आपणच ठरवायचे
काहींचे प्रतीसाद एकीकडे,
काहींचे प्रतीसाद एकीकडे, स्त्रीने यजमानपद घेणं म्हणजे सुधारणा आणि मग लगेच पुरुषाने काय करावे वा करु नये वा स्वंयपाक करावा ह्याची ( उगीच्च) चर्चा आणि दुसरीकडे, नेवेद्य घरचाच असावा असं शास्त्र सांगतं ह्याचा धोशा लावावा..
शास्त्रानुसार फक्त पुरुषानेच पुजेला बसू नये असं वाटत असेल आणि बदल घडवायचाय तर, परत काय ते शास्त्रं ह्यांव म्हणतं आणि त्यांव.. किती तो विरोधाभास लिहिण्यात...
देवाने तर काहीच सांगितलं नाही ना, मग ज्याला ज्यात आनंद वाटतो व ज्या पती-पत्नीला आपसात जसं रुचतं ते करावं...
बाहेरचे कोण सुचवणारे?
@ आदू,
@ आदू,
माझ्याकडे गार्डन खाते असले तरी मुलीच्या शाळेत पालकसभेला मात्र त्या टीचर्सशी तोंड उघडून ईंग्लिश वॉकिंग टॉकिंगच करायचे असल्याने ते काम माझे बायको करते. पण मी सोबत जरूर जातो. मला जमत नसले तरी त्याचा भाग व्हायला आवडते. मुलीसोबत नाचायचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा मात्र मला पर्यायच नसतो
मॉरल - आपण ठरवूनही कामाची समसमान विभागणी नाही करू शकत. ती क्षमता आणि उपल्ब्धतेनुसारच होते. महत्वाचे असते ते ती विभागणी दोघांना मान्य असणे, दोघांच्या संमतीने होणे, वेळप्रसंगी ती विभागणी असमान झाली तरी दोघांनी एडजस्ट करणे, आणि संसाराचा गाडा खेचायला दिलेल्या एकमेकांच्या योगदानाचा आदर करणे.
देवाने तर काहीच सांगितलं नाही
देवाने तर काहीच सांगितलं नाही ना, मग ज्याला ज्यात आनंद वाटतो व ज्या पती-पत्नीला आपसात जसं रुचतं ते करावं...
>>>>>>>>.
+७८६
खरे तर मूळ धाग्याचे सार म्हटले तर हेच होते की देवाने काही सांगितले नाही तर प्रथेने परंपरेने स्त्री वा पुरुषांना दिलेले हे मान सन्मान आता आपण बदलत्या काळानुसार आपल्या सोयीने आणि समानतेने अॅडजस्ट करायला हवेत. आपण चालवून घेतले की देवालाही चालते.
मध्येच स्वयंपाक आला आणि १०० पोस्ट त्यावरच झाल्या
१११ पोस्ट्स...अनलकी असतो
१११ पोस्ट्स...अन्-लकी असतो म्हणे हा नंबर.
कसले क्रांतिकारक विचार आहेत
कसले क्रांतिकारक विचार आहेत हो तुमचे.
>>>>स्त्री स्त्री चीच दुश्मन
>>>>स्त्री स्त्री चीच दुश्मन असते त्या. विषयी पण सांग.
सून नणंद,
सून सासू
सून भावजय
हा स्त्री मधीलच संघर्ष आहे इथे पुरुषाचा संबंध काय.
खऱ्या आयुष्यात स्त्री िचा स्त्री शी च संघर्ष तीव्र आहे.>>>> असं काही नसतं हो. अजिबात खोटे आहे ते. धादांत असत्य. तद्दन कल्पनाविलास.
आमच्याकडे मला खाण्यापिण्यावर निर्बंध जेवढे माझ्या नवर्याने घातले न तेवढे ना सासूने घातले. सासूने तर एकही बंधन घातले नाही माझे व माझ्या वहीनीचे संबंध अक्षरक्षः बहीणीसारखे आहेत. ना मी तिच्या संसारात लुडबुडते ना वाटा मागत डोकेदुखी करते. तिचे खूप लाडच करते .
मायबोलीवरच्या सुडो फेमिनिस्ट
मायबोलीवरच्या सुडो फेमिनिस्ट स्त्रिया स्वयंपाक च्या वर विचार करत नाहीत हे दिसून आले....
मुळात स्वयंपाक करणे सर्वच स्त्रियांना त्रास वाटतो का? खूप स्त्रिया आनंदाने करतात ते काम..
कारण त्यांना आवड असते...
आता हे म्हणू नका त्यांना पद्धतशीर पणे ब्रेन वॉश केले जाते...
मागच्या धाग्यातही मी हेच म्हणालो होतो डोन्ट जज...
मृणाल - तुमची कमेंट संपूर्ण धाग्याचे सार आहे... +1
आमच्याकडे मला खाण्यापिण्यावर
आमच्याकडे मला खाण्यापिण्यावर निर्बंध जेवढे माझ्या नवर्याने घातले न तेवढे ना सासूने घातले
>>> तुम्ही कमी पडलात... इथे जसे मुद्दे मांडता व्यवस्थित तसे त्याला समजावणे जमले नाही तुम्हाला...
पण भरपूर कुटुंबात स्त्रिया नवऱ्याला पुरून उरतात... सासू आणि बाकीच्यांना पण पळता भुई थोडी करतात... असेही चित्र असते काही ठिकाणी...
खरे तर मूळ धाग्याचे सार
खरे तर मूळ धाग्याचे सार म्हटले तर हेच होते की देवाने काही सांगितले नाही तर प्रथेने परंपरेने स्त्री वा पुरुषांना दिलेले हे मान सन्मान आता आपण बदलत्या काळानुसार आपल्या सोयीने आणि समानतेने अॅडजस्ट करायला हवेत. >>
मला प्रतिसाद देताना तुम्ही
>>
बायको देवधर्म करणारी असल्याने तिला पूजा योग्य प्रकारे झालेली हवीच आहे.
पण जर शास्त्रातच लिहिले असेल की पूजा नवर्यानेच करावी तर तिला मलाच विनंती करणे भाग पडते.>>
असे लिहिलेय. तर तुमच्या पत्नीचे मतपरीवर्तन करण्यात तुम्हाला यश आले का? इथे त्या संदर्भात नानबा यांनी छान लिहिले आहे ते तुम्हाला उपयोगाचे आहे.
बाकी स्वयंपाकाबाबतीत बोलायचे तर एक लाईफस्किल म्हणून बेसीक स्वयंपाक प्रत्येकानेच शिकून घ्यावा. तुमच्या प्रांतात जे काही बेसीक घटक आहेत ते वापरुन स्वयंपाक करता आला तर कठीण परीस्थितीत तगून जाता येइल. तुमच्या प्रांतातील बेसीक घटक असे मुद्दाम लिहिले कारण सप्लाय चेन तुटणे म्हणजे काय ते पँडेमिकमधे वारंवार अनुभवले. घर चालवायला लागणारी इतर बेसिक स्किल्सही शिकून घ्यावीत. हातात पैसे असले तरी इमर्जन्सीत कामासाठी माणसे मिळतीलच असे नाही किंवा बाहेरुन अन्नाची सोय होईलच असे नाही.
देव-पूजा वगैरे गोष्टींवर विश्वास असेल, घरी असे काही केले जावे अशी इच्छा असेल तर नैवेद्याचा बेसीक स्वयंपाकही शिकून घ्यावा. वरण-भात, बटाट्याची भाजी, पुरण्/खीर आणि कोशिंबीर हे पदार्थ सहज जमावेत. हौस असेल तर त्यात पुरी/घडीची पोळी अशी भर घालता येइल. सर्व कुळधर्म -कुळाचार व्यवस्थित पार पडावेत असा हट्ट ठेवायचा आणि ते पार पाडताना स्वयंपाकाची सगळी जबाबदारी एकट्या स्त्रीवर, मग तिने पहाटे लवकर उठून , प्रसंगी नोकरीच्या ठिकाणी सवलत मागत (इथे पुन्हा तिच्याच नावाने खडे फोडले जाणार) सर्व पार पाडायचे असे चित्र नसावे.
हा सर्कास्टिक न्हवता होय धागा
हा सर्कास्टिक न्हवता होय धागा!
बाकी काही न करता आरती ओवाळताना कंटाळा आला म्हणून ताम्हन बायकोला देणे म्हणजे झाली आजची समानता दाखवून. करून दाखवले ची नुसती सोयीस्कर जाहिरात. बाकी समानतेचा पत्ता नाही अशा दांभिक लोकांना आरसा दाखवायला काढलाय धागा असं वाटलेले. हे खरोखर समानता वाटेल कुणाला हे स्वप्नातही वाटलं न्हवत.
ऋन्मेष,तुम्ही सेन्सिबल धागे
ऋन्मेष,तुम्ही सेन्सिबल धागे ,माहितीपर धागा,राजकीय वगैरे धागे काढत जा.तुम्ही जो खेळ काही वर्ष चालवला आहे तो सरळसरळ पोरकटपणा वाटतो. सोशल फोरमचा वापर विधायक व्हावा असे वाटते.बघा बुवा तुम्ही.
आता समानतेच्या हट्टापायी मी
आता समानतेच्या हट्टापायी मी मुलीचा मेकअप आणि ड्रेसिंग करायला बसलो वा ईंग्लिश शिकवायला गेलो तर या आमच्या हट्टापायी तिचे नुकसान नाही का होणार? कि मी आता ईंग्लिश शिकायचे ती समानता जपायला?
>> मुलीचे नुकसान टाळण्यासाठी इंग्लीश शिकवण्याची जबाबदारी न घेण्याचा निर्णय ठीकच . बाकी मेकअप, ड्रेसिंग बद्द्ल बोलायचे तर आमच्या इथे बरीच बाबा मंडळी मुलीसोबत बाँडिंग म्हणून, दर वेळी पत्नी, इतर स्त्री सदस्य मदतीला असतीलच असे नाही तेव्हा या कारणास्तव मुलीचा हिरमोड होवू नये म्हणून हे देखील शिकून घेत आहेत. त्यासाठी वेगळे क्लास असतात. हे समानता म्हणून नव्हे तर आपल्या अपत्याची गरज भागवणे म्हणून केले जाते. गेल्या वर्षी याच सुमारास मॉल मधे दोन लेकींना घेवून असेच एक बाबा आले होते. रंगीत लिप ग्लॉस वगैरे खरेदी सुरु होती. मुलींनी सिलेक्ट केलेल्या वस्तू दाखवून ते बाबा इतर स्त्रीयांना हे अॅप्रोप्रिएट आहे का विचारत होते. मुलींचे 'माझ्या सगळ्या मैत्रीणी..' म्हणत हट्ट करणे, बाबाचे 'तू अजून लहान आहेस...' म्हणत कुरकुरणे, आम्हाला विचारुन खात्री करणे हे सगळे बघणेच इतके आनंददायी होते की बस्स!
Pages